क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेडडी मागच्या match च्या पहिल्या इनिंग मध्ये देखील छान खेळला
त्याचे शॉट्स प्रॉपर वाटतात
उगीच आडवा गुट्टा फिरवला असे नाही.

तिकडे त्या बारक्या सूर्यवंशीचे ३४ बॉल मध्ये ६७
५ सिक्स
भारताच फायनल प्रवेश..

पाहिला दिवस कांगारूंचा..
बघूया उद्या कुठे जातो सामना..
सकाळच्या सत्रात चार-पाच विकेट आल्या नाही तर गेम दूर जाईल.

ड्रॉप ईन पिचेस वर पहिल्या सेशनमधे जनरली बॉल नवा असल्याशिवाय बॉलर च्या करामतीशिवाय विकेट्स जात नाहित (असे जाणकार लोक म्हणालेत - तलवारी म्यान करा) हे जर खरे असेल तर उद्या बुमरा वर मदार सगळी. नंतर संध्याकाळ होत आली कि सगळ्यांच्या तलवारीला आपोआप धार येईल. परत सडेअसात नंतर बॅटिंङ सोपी होत जाईल. आपण पहिल्या डावात कमी धावा करून एक मोठा मौका गमावलाय असे फिलिंग येतेय.

रेड्डीची बॉलींग सुधारली तर खरच एक मार्श, स्टॉक्स लेव्हलचा प्लेयर मिळून जाईल.

स्मिथ गेला..
ऑस्ट्रेलिया तिसरी. 103-3
मदत नाहीये फार गोलंदाजांना पण बूम बूम आपले काम करतोय.. ग्रेट बोलार

ऑस्ट्रेलिया 337
लीड 157
यशस्वी जयस्वाल दुसऱ्या डावात काय खेळतो हे महत्त्वाचे ठरेल आता. त्याचे हात शिवशिवत असतील. यशस्वी ठरतो का बघूया.
साधारण 350-375 हवेत.
ऑस्ट्रेलियाला टार्गेट 200 तरी हवे.

हर्षित राणा, वयाच्या २२ व्या वर्षी, जेमतेम १० फर्स्ट-क्लास मॅचेसच्या अनुभवावर, थेट ऑस्ट्रेलियात, भारताचा तिसरा सीमर म्हणून टेस्ट खेळतो ते दिल्लीच्या का केकेआरच्या कनेक्शनमुळे? - असा प्रश्न काल त्याची बॉलिंग पाहून पडला. (शामीला चार्टर विमानाने पाठवण्याकरता क्राऊड फंडिंग सुरू करावं का?)

Ind 58/2
अजूनही 99 धावांनी मागे

ते दिल्लीच्या का केकेआरच्या कनेक्शनमुळे?
>>>>
+786
मलाही तसेच वाटते. पण मी बोललो की लोकांना पुरावे हवे होतात म्हणून बोललो नव्हतो.

ते दिल्लीच्या का केकेआरच्या कनेक्शनमुळे? >>>>>
असे वाटत नाही, त्याच्यामध्ये saprk वाटला म्हणून त्याला खेळवले, पर्थ मध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी टाकली. नितीश रेड्डी ची first-class फलंदाजी ची सरासरी 23 ची आहे आणि Sarfaraz chi 65 ची आहे. पण ऑस्ट्रेलियात रेड्डी जास्त आश्वासक वाटतो, selectors चे तेच काम असते, नाहीतर selector म्हणून चांगले statistician ठेवले असते.

साधा माणूस मला नाही वाटत फेरफटका केवळ आकडे आणि अनुभवाबद्दल बोलत आहेत. तेसुद्धा त्याची बॉलिंग क्षमता पाहूनच बोलत असावेत.
तो काही एक्स्ट्रा स्पेशल टॅलेंट नाही वाटत जे रांगेत मध्ये घुसवावे. हा मुद्दा आहे. पंतला त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला इतरांच्या आधी आणि जास्त संधी देणे हे मला पटत होते कारण त्यात होते तसेच टॅलेंट. इथे ती केस मलाही वाटत नाही.
स्वतःला आकाशदीप जागी ठेवून विचार करा.

ऑस्ट्रेलिया जर भारताच्या उरलेल्या पाच विकेट २९ धावात काढू शकले तरच ते सामना जिंकू शकतील, अन्यथा नाही हा.

ट्रवीस हेड बाद झाला. मग ह्याने त्याला मिडल फिंगर दाखवली. मग त्याने त्याला दोन हातांनी वर्तुळ काढून काही हातवारे केले. मग तो चिडला आणि शिव्या देत बॅट उगारून त्याच्या अंगावर धावून गेला. अम्पायर मध्ये पडले. दोघांनी मिळून अम्पायरला बुकलायाला सुरवात केली. प्रेक्षकात हल्ला बोल सुरु झाले. स्टेज वर बॉलीवूडची सुप्रसिद्ध नायिका फलाणा धीकाना अवतीर्ण होऊन डान्स करू लागली. प्रेक्षक शांत झाले. ट्विटर प्रतिसादांनी वहायला लागले...
पाउले चालती wwe ची वाट
सभ्य ह्या खेळाची लावूनिया वाट
अश्शी खूप खूप मज्जा झाली.
गेम पुन्हा सुरु झाला.
असे क्रिकेट मला केव्हा बघायला मिळेल?

असे वाटत नाही, त्याच्यामध्ये saprk वाटला म्हणून त्याला खेळवले, पर्थ मध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी टाकली >> +१. पर्थला त्या सूत होणारी विकेट होती. इथे नाहीये ह एक मोठा भाग आहे. तो अननुभवी आहे हे बघता हवी असलेली अ‍ॅडजस्ट्मेंट करायला जमेलच ह्याची खात्री नाही (इथे बॉलिंग कोचचा भाग यायला हवा). वेगळ्या स्टाईलचा बॉलर जो थोडीफार बॅटिंग करू शकतो ह्या विचारत तो खेळला असे वाटतेय.

“ पर्थला त्या सूत होणारी विकेट होती. इथे नाहीये ह एक मोठा भाग आहे.” - हे बरोबर आहे. पर्थला त्याच्या ‘हिट द डेक हार्ड‘ स्टाईलला पूरक विकेट होती. पण अ‍ॅडलेडला आणि पिंक बॉल असताना आकाशदीप जास्त सूट झाला असता. खलील अहमदला सुद्धा फास्ट ट्रॅक केलं होतं जे यशस्वी नाही होऊ शकलं. असं घडू शकतं. त्याविषयी शंकाच नाही. पण तिथे एक लेफ्ट आर्म सीमरची आवश्यकता होती. इथे आकाशदीप अजून नवखा आहे, तो प्रॉमिसिंग आहे, सेटल होतोय. ऑस्ट्रेलिया ए विरूद्ध नेलेल्या टीममधे सुद्धा राणा नव्हता, तर मुकेश आणि प्रसिध होते (जे दोघं त्या दोन मॅचेसमधे हाय्येस्ट विकेट टेकर्स होते. जर ‘हेवी बॉल‘ टाकणाराच बॉलर हवा असेल, तर राणापेक्षा थोडे जास्त अनुभवी, प्रूव्हन आणि रांगेत उभे असलेले प्रसिध कृष्णा आणि आवेश आहेत. ह्या सगळ्या पार्श्वभुमीवर राणाला फास्ट ट्रॅक करण्यामागे जी मंडळी आहेत त्यांचा विचार अजून तरी फारसा दिसला नाहीये. त्यातून जर तो चमकला (त्याने आणि भारतासाठी खेळणार्या सगळ्या खेळाडूंनी चमकावं) तर माझा आक्षेप चुकीचा ठरला हे मान्य करिन.

साधा माणूस, सर्फराझचा आणि रेड्डीचा खेळ पहाता, बाऊन्सी/स्किडी विकेट्सवर रेड्डी जास्त व्हायेबल ऑप्शन आहे हे बर्यापैकी स्पष्ट आहे. त्यातून रेड्डी पाचवा बॉलर म्हणून रिलीव्हरची भुमिका पार पाडू शकतो (ज्याची भारतात खेळताना फारशी गरज पडत नाही). रेड्डीने स्वतःची ही उपयुक्तता ए दौर्यावर पण सिद्ध केली. त्याला समांतर भारत-न्यूझीलंड सिरीजमधे सर्फराझही चमकला. त्यामुळे दोघंही टीममधे असणं, रेड्डीचं सर्फराझच्या आधी प्लेयिंग ११ मधे स्थान मिळवणं हे समजू शकतो. राणाचा आयपीएल सोडून असा कुठला रिसेंट परफॉर्मन्स आठवत नाही ज्यावरून ऑस्ट्रेलियात टेस्ट खेळायला आणि ते ही तीसरा सीमर म्हणून, तो तयार होता असं म्हणता येईल. असो. होपफुली काल त्याचा ऑफ डे होता आणि पुढे तो चांगला खेळेल अशी आशा करू या.

दारुण पराभव. दोन्ही लो स्कोरिंग मध्ये पंत टॉप scorer नाही. रोहित चा फॉर्म आणि देहबोली बघता तो काही धावा काढेल असे वाटत नाही, विराट चेही तसेच. गिल, जैस्वाल, पंत आणि आता रेड्डी कडूनच अपेक्षा आहेत

प्रश्न -शर्मा परतल्यावर राहुलचं काय होणार?
उत्तर- शर्मा परतल्यावर आपण पुढच्या सगळ्या टेस्ट हारणार.
Submitted by बोकलत on 24 November, 2024 - 09:57>>>>>>
चिते की चाल, बाझ की नजर और बोकलत के क्रिकेट ज्ञान पे कभी…….

मी जर क्याप्टन असतो तर ऑस्ट्रेलियाला शेवटचे १९ रन्स काढायला बोलावलं नसतं. बोललो असतो जिंकलात तुम्ही विनाकारण बॅटिंग करायला येऊ नका.

*उत्तर- शर्मा परतल्यावर आपण पुढच्या सगळ्या टेस्ट हारणार.* - मी समजत होतो की रोहित एकहाती सामने जिंकवून देणारा खेळाडू आहे !! तो एकटा सामने इतक्या खात्रीपूर्वक हरवू पण शकतो !!! कमाल आहे, मानलं त्याला !!! Wink

शर्मा कोहली यांचा फॉर्म नडतोय हे खरे..
गिल राहुल हे काही इथे सातत्याने धावा टाकतील असे नाहीयेत. एकवेळ गिलबद्दल संभव आहे पण राहुलने तरी आजवर कुठल्याच टेस्ट सिरीजला सातत्याने धावा केल्याचे आठवत नाही. यशस्वी अजून एखाद दुसरी मॅच विनिंग खेळी खेळू शकतो. पंत गरजेला आपला impact दाखवू शकतो. नव्हे दाखवेलच. पण सर्वांनी मिळून धावा केल्या तरच सातत्याने चांगला स्कोअर पडत राहणार.. जे सध्या अवघड वाटत आहे. बघूया पुढे कुठे जाते सिरीज. एखादा ताजा नव्या दमाचा वेगवान गोलंदाज येईल पुढच्या सामन्यात.. बुमराहला साथ देईल. ऑस्ट्रेलियाची एखादी इनिंग स्वस्तात उखडून आपण पुन्हा उसळी मारू अशी अपेक्षा.

*पण सर्वांनी मिळून धावा केल्या तरच सातत्याने चांगला स्कोअर पडत राहणार* - +१ ! म्हणूनच, महत्त्वाच्या फलंदाजांचं सातत्यानं अपयशी होणं खूपच काळजीदायक ठरतं. पण, त्या फलंदाजांना कुत्सितपणे वागवणे हा त्यावरचा उपाय नसून, ते बहरात येतील अशी आशा करणं व इतर फलंदाजांनी अधिक योगदान देण्याचा कसोशीने प्रयत्न करणं ही सांघिक भावना महत्त्वाची ! कुणाचं अपयश किती काळ सहन करणं संघाला मानवणारं आहे, हे निवड समितीवर सोपवणंच योग्य !

मला भारतीय बॅटिंगची इतकी काळजी वाटत नाही - कारण बरेच अनुभवी, प्रूव्हन, बॅट्समेन चा लाईन-अप आहे. त्यातले काहीजण, कुठल्या ना कुठल्या क्षणी चमकतीलच. मला भारताचा बुमराह वरचा अति-अवलंबित्वाची काळजी वाटते. त्याने विकेट्स काढल्या नाहीत तर उरलेल्या बॉलर्सपैकी २-३ जण सातत्याने २० विकेट्स काढतील असा भरवसा वाटत नाही.

घरचा व्हाईट वॉश आपल्याला फलंदाजांच्या कृपेनेच मिळाला

सिराज चांगली गोलंदाजी करतोय.
फक्त बुमराह असाधारण करत असल्याने त्याच्या तुलनेत सिराज साधारण वाटतो.
तिसरा वेगवान कमी पडतोय. ती जबाबदारी कोणी उचलताच बॉलिंग युनिट चांगले वाटेल
शमी त्याच्या नेहमीच्या फॉर्ममध्ये परतायला हवा.

Pages