क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दाढी!
ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या ................................अप टू इन्फिनिटी.

पंत नाही ही अफवा असावी...
निर्णायक सामना आहे. पंत नेहमी अखेरचा निर्णायक सामना गाजवतो. पंत असलाच पाहिजे.

Rohit 'Opts Out' Of 5th Test:
As reported by The Indian Express newspaper, Rohit has informed Head Coach Gautam Gambhir and Chairman of the Selectors Ajit Agarkar about his decision to 'opt out.'

" स्टार्कप्रमाणे विकेटवरच्या बेल्स बदलून चांगला फायदा होईल" - ते ख्रिसमसनिमित्त त्याने 'जिंगल बेल, जिंगल बेल' केलं होतं. Happy

कोणी असा विचार केला आहे का की मे बी… जस्ट मे बी….कोच गंभिरच या भारताच्या दयनिय “ उतरंडीला” जबाबदार आहे?

द्रविड जाउन तो कोच झाल्यापासुन आपण न्युझिलंड कडुन ०-३ असा सपाटुन मार खाल्ला! तेही भारतात! जिथे गेली क्वार्टर सेंचुरी भारतिय संघ जवळजवळ अभेद्य होता!

आता ऑस्ट्रेलियात १-२ असे मागे( खरतर १-३ असे द्रुष्य दिसले असते ब्रिस्बेन मधे पावसाने भारताला वाचवले नसते तर!)

गेल्या ३ महिन्यात त्याने भारतिय संघाला पार रसातळाला पोहोचवले आहे! द्रविडने टेस्टमधे पहिल्या नंबरवर पोहोचवलेल्या संघाला याने ३ महिन्यात पार जमिनीखाली गाडुन टाकले. त्याचा कोच म्हणुन ट्रॅक रेकॉर्ड काय तर आय पी एल मधे ३ वेळा ट-२० कप विजेता! वा रे वा! कुठे टी-२० व कुठे टेस्ट मॅचेस? नो वंडर त्याच्या टी -२० मेंटॅलीटी मुळे संघात पिचवर टिकुन कसे राहावे हेच आपले बॅटर्स विसरुन चालले आहेत. जो तो आउट होतो ते टी-२० चे “ मटके“ शॉट्स मारण्याच्या नादात! तेही संघाचे हित खेळपट्टीवर मोठी खेळी खेळण्यात आहे हे दिसत असुनही! मेलबोर्नचा पराभव हे त्याचे ताजे उदाहरण!

गंभिरला कोणीतरी सांगीतले पाहीजे.. अहो महाशय! कसोटी क्रिकेट म्हणजे ट-२० चा मटका/ तमाशा नव्हे जिथे ११ जणांना मिळुन आडवे तिडवे फटके मारुन फक्त २० च षटके खेळुन काढायची असतात! कसोटी सामना म्हणजे तसे “ झटपट“ क्रिकेट नव्हे! तिथे खरा कस लागतो! रोज ९० षटके असे ५ दिवस म्हणजे ४५० षटके खेळायला लागतात. गंभिरला कोच करणे म्हणजे १०० मिटर्स धावण्याच्या शर्यतीच्या कोचला मॅरेथॉन शर्यतीचा कोच करण्यासारखा शेखचिल्लीपणा आहे! दुसरे काही नाही!

आता टी-२० व टेस्ट साठी जसे वेगळे चमु असतात तसे त्यांचे कोचही त्या त्या फॉर्मॅट ला योग्य टेंपरामेंट असलेले असावेत अस मला वाटत. गंभिर प्रेस कॉन्फरंस मधे नेहमी उद्धटपणे व “ फॉल्स ब्रव्हाडो” दाखवुन बोलतो. नो वंडर ऱोहीत शर्मा सारख्या “ इव्हन किल्ड“ माणसाचे गंभिरशी पटत नसावे!

आणी दुष्काळात तेरावा महिना म्हणावे तसे गेल्या १०-१२ कसोटीत एखादा अपवाद वगळता आपले भरवश्याचे खंदे वीर विराट व स्वतः रोहित हे लिन पॅच मधुन जात आहेत व बहुतेक त्यांच्या दैदित्यमान कारकिर्द्रिच्या अस्तास पोहोचले आहेत.

असे असताना सिडनी कसोटीत विजयाची अपेक्षा ठेवणे जरा धाडसाचेच ठरेल. ज्योत अखेरची मावळायच्या आधी जशी थोडा वेळ प्रज्वलित होते तसे रोहित व कोहली या कसोटीत खेळले तरच तसे होउ शकेल.

गंभिरने जर त्याचा “ टी- २०“ अ‍ॅप्रोच खेळाडुंवर लादायचा वेडेपणा व नाद सोडला तर यशस्वि जयस्वाल व शुभमन गील हे दोघे रोहित व विराटचा वारसा पुढे चालु ठेवुन भारताचे क्रिकेटमधले वर्चस्व टिकवुन धरु शकतील असे मला वाटते.

( बाकी नंद्या म्हणतात तसे संघातल्या न दाढी वाढवल्यांनी दाढी वाढवुन बघायलाही हरकत नसावी Proud )

हे दोघे महान फलंदाज स्वतःवर विजय मिळवून , स्वतःचा खरा क्लास दाखवल्याशिवाय पडद्याआड जाणार नाहीत, ही रास्त आशा आहे ! >> कोहली एकाच प्रकारे बाद झाला असला तरी जेव्हढा वेळ होता तेव्हढा वेळ ट्च मधे असल्यासारखा वाटला आहे. ह्याउलट रोहित चा तो एक्स्ट्रा सेकंड मिळणारा वेळ सध्या गायब झाल्यासारखा वाटतो आहे. त्याच्या बेटींग च्या अपयशाचा परीणाम त्याचा कर्ण्धार म्हणून घेतल्या जाणार्‍या निर्णयांवर होतो आहे असे मला वाटतेय. गंभीर्‍ बरोबरचे जे काही असेल ते अजून वेगळेच.

गंभिरने जर त्याचा “ टी- २०“ अ‍ॅप्रोच खेळाडुंवर लादायचा वेडेपणा व नाद सोडला >> नक्की गंभीरने लादला आहे का ह्याचे उत्तर माहित नाही कारण इतरत्र नि विश्ववसनीय (???) सूत्रांच्या बातम्यांनुसार गंभीर ला ही संघ निवडी मधे फार से नव्हता (त्याला पुजाराला परत आणायचे होते पण शर्मा नि आगरकर ला ते योग्य वाटले नाही वगैरे). एकंदर कोच, सिलेक्टर चेकरमन नि कप्तान ह्यांच्यामधे ताळामेळ नाहि असे वाटतेय - त्याचा परीपाक म्हणून संघ निवडी मधे एकसूत्रता नाही - जी निकालांमधे दिसते आहे.

सिडने ला गिल्,जुरेल्,सर्फराज ह्यांना खेळवून फार काही मोठा फरक पडेल असे वाटत नाही. त्यापेक्षा रोहित नि कोहली ला एक शेवटची संधी द्यावी. ह्यात फेल गेले तर श्रीफळ- शाल देऊन अलविदा सांगावे असे वाटते. (पंत च्या त्या शॉटनंतरही तो असावा असे मला वाटते. त्याला कानपिचक्या दिलेल्या आहेत हे उघड आहे. पण किमान त्याची पोझीशन फक्त पास्ट परर्फॉर्मन्सवर ग्रँटेड नाहिये )

81-४ !!
पंत जर चेंडूवर तुटून पडला नाहीं, तर चेंडू त्याच्यावर तुटून पडतो !! त्याला न रुचणारा बचावात्मक खेळून किती मार खातोय बिचारा !! ( गावसकरचं " stupid , stupid, stupid" फारच मनाला लावून घेतलंय वाटतं त्याने ).जडेजा व तो समयोचित खेळण्याचा कसोशीने प्रयत्न करताहेत, तेंही अचूक व सातत्याने होत असलेल्या घातक गोलंदाजी विरुद्ध !!

“ जडेजा व तो समयोचित खेळण्याचा कसोशीने प्रयत्न करताहेत” - अति बचावात्मक खेळतायत असं मला वाटतंय. चांगले बॉल्स डिफेंड करणं एक बाब झाली. पण रन्स काढण्याचा प्रयत्नच न करण्यामागची भुमिका समजत नाहीये. एखाद-दुसरी विकेट पटकन गेली तर ८७-४ वरून ८७-६ होईल. प्रत्येक बॉल डेड बॅट करण्याची गरज नाहीये. ४४ ओव्हर्स झाल्या आहेत. बॉल इतकाही नवीन नाहीये. एकेरी-दुहेरी रन्स चालतील.

*अति बचावात्मक खेळतायत असं मला वाटतंय* -
खरंय. गावसकरचं " stupid , stupid, stupid" फारच मनाला लावून घेतलंय वाटतं त्यानी !!!

*इंडियाने एका पुजाराला ड्रॉप केलं आणि..*-
+1 ! कसोटीत फलंदाजी कशी करावी याचं मॉडेल म्हणून तरी पुजारा ( व रहाणे देखील ) संघात आणखी कांहीं काळ असणे योग्य ठरले असते, असंही वाटतं.

कोचिंग स्टाफविषयी बरेच प्रश्न आहेत. सगळे बॅट्समेन एकच प्लॅन असल्यासारखे पुढे खेळतायेत/चालत पुढे येताहेत. हा एकच प्लॅन आहे का? प्लॅन बी वगैरे नाहीये का? मघाशी म्हटल्याप्रमाणे इतकी स्लो बॅटिंग असताना एकदम दोन विकेट्स गेल्यामुळे स्कोअरबोर्ड अगदीच दयनीय दिसतोय.

*कोचिंग स्टाफविषयी बरेच प्रश्न आहेत. * - मला वाटतं , भारतासारख्या जीवघेणी स्पर्धा असलेल्या देशात राष्ट्रीय संघात स्थान मिळवलेल्या दर्जेदार खेळाडूंना कोचींगवर इतकं अवलंबून राहण्याची गरज नसावी. असलाच तर मुख्य दोष मर्यादित षटकांच्या सामन्यांमुळे संयमी व दीर्घ खेळी खेळण्याच्या मानसिकतेचा अभाव, हाच असावा. ( अर्थात, ह्या दौऱ्यातलं ऑसीजच्या सातत्यपूर्ण नेमक्या, अचूक गोलंदाजीचं श्रेयही कमी लेखत नाही )

>>जस्ट मे बी….कोच गंभिरच या भारताच्या दयनिय “ उतरंडीला” जबाबदार आहे?

तो जबाबदार आहे की नाही माहित नाही पण असा खराब खेळ होत असताना ज्या प्रकारचे मेंटल कुशनिंग द्रवीडसारखा कोच देऊ शकला असता ते गंभीरला कितपत शक्य आहे याबद्दल शंका आहे.... उलट गंभीर जास्त व्हल्नरेबल वाटतो अश्या प्रेशरला.... ज्याप्रकारे तो प्रेसला सामोरे जातो ते बघता त्याचा ड्रेसींग रुममधला वावर खेळाडूंवरचा ताण वाढवणाराच असेल असे वाटते!!

सर
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा काढा

“भारतासारख्या जीवघेणी स्पर्धा असलेल्या देशात राष्ट्रीय संघात स्थान मिळवलेल्या दर्जेदार खेळाडूंना”

अहो पण तश्या जिवघेण्या स्पर्धेतुन आलेले खेळाडु( सर्फराज खान .. फर्स्ट क्लास सरासरी ६५.६१, अभिमन्यु इश्वरन— फर्स्ट क्लास सरासरी ४८.८७, देवदत्त पड्डीकल - फर्स्ट क्लास सरासरी ४१.५६ व ध्रुव जुरेल— फर्स्ट क्लास सरासरी ४५.७४ ) नुसते हात चोळत संघाबाहेर तंबुत बसले आहेत. त्यांच्या ऐवजी फर्स्ट क्लास सामन्यांची प्रॅ़क्टीस नसलेले व आउट ऑफ फॉर्म मधे असलेल्या के एल राहुल, विराट कोहली व रोहित शर्मालाच संघात परत परत घेत आहेत( या सामन्यात शेवटी रोहीतला नारळ दिला हे नवलच म्हटले पाहीजे) .

उलट ऑस्ट्रेलियाचे बघा!खाटकन ( आउट ऑफ फॉर्म मधे असलेल्या ) मिचेल मार्शला लाथ मारुन हाकलवले. त्या के एल राहुलला जितक्या संध्या मिळाल्या आहेत तितक्या संध्या कोणालाच मिळाल्या नसतील. पण त्याने मातीच केली आहे त्या सगळ्या संध्यांची! त्यापेक्षा पुजारा व राहाणेला जर तेवढा“ रोप“ दिला असता तर आज तेच संघाला वाचवु शकले असते.

एनिवे, आजही आपण दिवेच लावले पहिल्या डावात. पण जोपर्यंत दोन्ही संघाचे पहिले डाव खेळुन होत नाहीत तोपर्यंत बोलणे योग्य नाही. कदाचित या पिचवर अमेझिंग बुमराही ऑस्ट्रेलियाला १५०
च्या आत गारद करेल. लेट्स सी!

( भाउ—“अर्थात, ह्या दौऱ्यातलं ऑसीजच्या सातत्यपूर्ण नेमक्या, अचूक गोलंदाजीचं श्रेयही कमी लेखत नाही”—- याबाबतीत सहमत! एकजात सगळे साडेसहा फुटी असलेले ऑस्ट्रेलियन द्रुतगती गोलंदाज अनप्लेयेबलच वाटतात! तो बोलंड ६-२ च व तुलनेने उंचीला कमी आहे पण कसली बॉडी ( शोल्डर्स, चेस्ट) आहे त्याची! नुसती त्यांची हाइट बॉडीच नाही तर त्यांची कमालीची अ‍ॅक्युरसी खरच वाखाणण्यासारखी आहे)

संध्या !!!
वेब्स्टर 6 ft 7 इंचेस.

Pages