क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

“ त्यामूळे ड्रॉप करू नये असे वाटते. मधल्या फळीत सर्फराज पेक्षा जुरेल ला आणता आले तर जास्त योग्य वाटते मला.“ - यशस्वीला ड्रॉप न करण्यामागचा तुझा विचार पटतो मला. पण मी ह्या सिच्युएशनकडे रोहितच्या आणि मिडल ऑर्डरच्या अँगलने बघतोय.

रोहित मधल्या फळीत अगदीच निष्प्रभ आहे. पण कॅप्टन असताना त्याला बाहेरही बसवता येणार नाही. मग त्यातल्या त्यात त्याला ओपनिंगचा स्लॉट परत देणं हाच ऑप्शन उरतो. राहूल ला हलवण्यात अर्थ नाही. त्यातल्या त्यात जैस्वाल सध्या आऊट ऑफ टच वाटतोय. सर्फराझ आलाच तर तो एका टेस्ट सेंच्युरीनंतर आल्यामुळे कदाचित जास्त कॉन्फिडंट असू शकेल असा तो सगळा विचार आहे. अर्थात जुरेलही तिथे खेळू शकेल.

शर्मा कोहली गंडलेले वाटत आहेत. गिल काही विशेष करत नाहीये. पंत त्याच्या लौकिकाला जागला नाहीये. अश्यात यशस्वीला बसवायची चर्चा कशी होऊ शकते. उर्वरित दोन सामन्यात एखादे धडाकेबाज शतक मारून सामना जिंकवायची धमक आहे त्यात..
याही उपर आकडे पाहता तो आपला सध्याचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे. त्याने एक विनिंग शतक मारल्यावर त्याचे पुढचे तीन डाव फसलेले बघून बसवले तर किती तो वाईट संदेश जाईल Happy

प्रश्न यशस्वीला ‘बसवायचा’ नसून, शर्माला टीममधे ‘बसवायचा’ आहे. तो बाहेर तर जाणार नाही. मग त्याचा बेस्ट उपयोग ओपनिंग स्लॉटमधेच होऊ शकतो. त्या दोनपैकी राहूलची जागा पक्की आहे. This is the best sub-optimal solution to India’s problems (that I could think of).

बुमरा ऑस्ट्रेलियाला १५ २० ओव्हर्समध्ये आऊट करून शर्मा t२० बॅटिंग करणार आणि विजयश्री खेचून आणणार. होणार नाही मला माहीत आहे पण स्वप्न तर बघूयात. मध्यमवर्गीय माणूस स्वप्नांवरच जगतो.

शर्माला ओपनिंग स्लॉटमध्येच ठेवावे म्हणून यशस्वीला थेट संघाबाहेर काढावे हे काही सोल्यूशन नाही झाले.
समजा यशस्वीचे अजून एखादे शतक असते तर मग काय केले असते?
अश्या परिस्थितीत दोन ओपनर पैकी एखादा वन डाऊन उतरू शकतो का हे चाचपू शकतो.
किंवा कर्णधाराला दुखापत झाली कारण देऊन बसवू शकतो.

बूमराह आला
कामाला लागला
ख्वाजा गेला

ऑस्ट्रेलिया अजून पर्यंत काही वेगळे खेळत नाहीये.. म्हणजे १५ ओवर मध्ये १०० मारा असा विचार पहिल्या चार ओवर तरी डोक्यात दिसला नाहीये.
हेझलवूड आता बॉलिंग टाकणार नाही वाटते या मॅचमध्ये..
एक बॉलर कमी झाल्याने ऑस्ट्रेलिया जिंकायचा विचार करत नाही वाटते.
त्यानीच विचार नाही केला तर सामना अनिर्णितच..
अन्यथा ५० ओवर मध्ये ऑल आऊट होणे भारतासाठी कठीण नाहीये..

तिसरी गेली
८ ओवर १६-३
यांची बॉलिंग बघून असे वाटते की आपल्याला ४० ओवर सुद्धा अवघड जातील.
गेम ऑन आहे हा अजून

*उद्या सामना वाचवताना आपली बॅटिंग ऑर्डर काय असावी?* - मला वाटतं पहिल्या डावाचीच बॅटिंग ऑर्डर ठेवावी. तेवढा तरी विश्वास स्वतःवर ठेवणं हे कसोटी सामान्यांच्या पातळीवर अत्यंतिक महत्त्वाचं. हे सर्व खेळाडू अनुभवी आहेत व ते अपयशावर मात करणारे आहेत. अपयशाला घाबरून ह्या मोक्याच्या वेळी पॅनिक होवून बदल करणं मला योग्य नाही वाटत.

बॅटिंग ऑर्डर बदल म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव असं मला वाटत नाही..
फेमस कलकत्ता कसोटी मध्ये लक्ष्मण पुढे पाठवला होता जो मास्टर स्त्रोक ठरला.
फेमस सिडनी गाबा मालिकेत पंत पुढे पाठवला होता जो मास्टर स्त्रोक ठरला.

54 ओव्हर मधे 275

जिंकणे शक्य आहे पण अवघड, अन् ड्रॉ साठी खेळून काढणं ही सोपं नाही

डोकं लाऊन खेळले तर जिंकतीलही
पण बिनडोक आडवी तिडवी बॅट फिरवली तर अवघड आहे

“ त्याने बरेचदा मॅच्युरिटी दाखवली आहे” - मी ऑलरेडी इंप्रेस झालोय. त्याने पहिल्याच ओव्हरमधे सरळ बॅटने खेळायची अ‍ॅडजस्टमेंट दाखवलीय.

खतरनाक सुरुय मॅच
सकाळी एक विकेट गेली पाहिले आणि नंतर थोड्याच वेळात स्कोर पाहिला तर 4
अजून थोड्या वेळात पाहिले तर 7

Declare केलं

बॅटिंग प्रॅक्टिस करून घ्या फुल

“ समजा यशस्वीचे अजून एखादे शतक असते तर मग काय केले असते?” - प्रश्न बरोबर आहे. पण त्या केसमधे इंडियन बॅटिंग मधे काही बदल करण्याइतकी परिस्थितीच निर्माण झाली नसती. म्हणूनच म्हटलंय कि ह्या मॅचच्या दुसर्या इनिंगवर अवलंबून आहे. बहुतेक असं काही होणार नाही.

वरुण भारताच्या बाजूने बॅटिंग करतोय अजून त्यामुळे सामना वाचेल बहुतेक.
नाहीतर लौकिक बघता ४० ओव्हर पुरेश्या होत्या आपल्याला सर्वबाद करायला.

*बॅटिंग ऑर्डर बदल म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव असं मला वाटत नाही..*- एखाद्या फलंदाजावर दृढ विश्वास असल्यामुळे त्याच्या ऑर्डरमध्ये एखादा समायोचीत बदल करणं व अविश्वासामुळे खेळाडूच्या क्रमात बदल करणे, यात खूप फरक असावा असं मला वाटतं.

15:05 Local Time, 05:05 GMT, 10:35 IST: The rain has picked up now, chances of play seem bleak. Here's something more very interesting. A couple of journalists have already tweeted about a "big announcement". Now we're not here to make any assumptions but they did just show Kohli and Ashwin having a chat sitting next each other and it ended with Kohli giving Ashwin a hug. They continue to sit next each other and stare at the rain, Kohli even had his arms around Ashwin's shoulder. Make of that what you will, nothing more than wild speculation.

कोहली रिटायर्ड होतोय

Will miss the brainy analyst on the field...
Take a bow AshAnna ...

*कोहली रिटायर्ड होतोय* - *nothing more than wild speculation.* -

अहो, बहुतेक ते दोघे नक्की तुमच्याबद्दलच बोलत असणार - " रिटायर्ड झालेला रिकामटेकडा दिसतोय;, मॅच संपलीय तरी बसलाय टिव्ही समोर !! " 20191219_224951_4.jpg

आश्विनचे निवृत्त होणे चटका लावून जाणारे आहे. त्यात सहज दोन वर्षे कसोटी क्रिकेट शिल्लक होते. स्पेशली भारतात खेळताना.
आश्र्विनची जागा घेईल आणि त्या लेव्हलला कोण जाईल आता हा प्रश्न आहे.

*आश्विनचे निवृत्त होणे चटका लावून जाणारे आहे.*+१ !
अश्विन अभ्यासू आहे, जिद्दी आहे व गोलंदाजीत वैविध्य आणण्यासाठी प्रयोगशील राहून झटणारा खेळाडू आहे. खेळात कसलीही कमतरता न ठेवण्याची त्याची अत्यंतिक वृत्ती त्याला फलंदाजीतही सफल बनवून त्याची संघातील उपयुक्तता द्विगुणित करून गेली ! एरापल्ली प्रसन्नांनतर च्या काळातला सर्वात प्रभावी भारतीय ऑफ स्पिनर !!! शुभेच्छा !!

स्पिनरसाठी गरजेचा फिटनेस त्याच्याकडे होता. फक्त फलंदाज म्हणून थकत चालला होता. ज्यामुळे बाहेर सुंदर, जडेजा याना त्याच्या आधी संधी मिळू लागली होती.
पण भारतात कसोटी खेळताना आजही स्वबळावर सामना नाही तर मालिका जिंकवून द्यायची क्षमता राखून होता. आणि हे सर्वात विशेष! सर्वाधिक ११ मालिकावीरचा विश्वविक्रम आहे त्याचा ते उगाच नाही.
इतके वर्षे खेळला तरी गोलंदाजीतले वैविध्य लोप पावले नव्हते. दरवेळी नवीन प्रश्नपत्रिका घेऊन तयार असायचा. क्रिकेटींग ब्रेन कमाल होते. वाटलेच नव्हते अचानक निवृत्ती घेईल. अजून दोन वर्षे आणि शंभर विकेट मोजल्या होत्या मी त्याच्या.. म्हणून म्हटले अचानक चटका लावून गेला.

अ‍ॅशच्या बातमीने कससच वाटले. सचिन च्या वेळीही असे वाटले नव्हते. अ‍ॅश अजून काही सिरीज खेळेल असे वाटले होते त्याला साजेशा होम सिरीजला भरपूर वेळ असला तरीही) एक किवी सिरीज वगळता तो अजूनही तेव्हढाच प्रभावी आहे असे वाटत होते. सुंदरला वेळ मिळावा म्हणून अ‍ॅशने हा निर्णय घेतला असेल असे वाटते (अजून काही पर्सनल प्रॉब्लेम नसावा अशी आशा धरतो). भारताच्या टॉप ५ बॉलर्स मधे मी अ‍ॅश चे नाव धरेन (अगदी प्रसन्नाच्या आधी) - बुमरा, बेदी, अ‍ॅश, कुंबळे नि कपिल. अ‍ॅशला कॉमेंट्री बॉक्स मधे ऐकायला आवडेल. त्याच्या सोशल मिडीया पोस्ट वरून तो किती थिंकिंग क्रिकेटर आहे ते जाणवते - मैदानात विचार करणे हा एक भाग पण बाहेरही तिसर्‍या पार्टीबद्दल एव्हढा सखोल विचार करणे - हॅटस ऑफ टू हिम !

सुंदर हॅज बिग बूट्स तो फील अप.

Pages