क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिम मॅक्सवेल, डॅरन लीमन, ग्लेन मॅग्रा, मार्क वॉ, गावसकर आणि हर्षा भोगले...
मजा येतेय रेडिओ वर कॉमेंट्री ऐकायला..

राऊल आणि जैस्वाल छान खेळतायत ...
७५-०
लाकूडस्पर्श !

अरे कोहली हल्ली बरेच कॅच ड्रॉप करतो हे fact आहे..
कोहली च्या हल्ली धावा होत नाहीत.. स्पेशली कसोटीत ऐवरेज खूप उतरला आहे हे सुद्धा fact आहे..
आणि हल्ली म्हणजे हा काही वर्षाचा काळ आहे.
तर या दोन्ही बाबतीत त्याच्या भूतकाळात रमण्यात काय अर्थ आहे Happy
सध्याची सिच्युएशन स्विकारूया आणि पुढे जाऊया..

जे regularly सामने बघतात, त्यांना माहीत आहे की विराट खूप झेल सोडतो, आकडेवारीची गरज नाही

हो बरोबर.. रेग्युलर लाईव्ह क्रिकेट बघितले की हे समजते.
जे बघत नाहीत त्यांना म्हणून आकडे शोधायला गेलो.
शर्माचे सुद्धा हल्ली प्रमाण वाढू लागले आहे कॅच सोडायचे अन्यथा तो सुद्धा आधी सेफ hand होता..

पण पैजेत काहीतरी लावावे. त्याने मजा वाढते. काहीतरी गमवायची रिस्क हवी ना

ओके, पैज लावली असे म्हणा, पैसे लावणे आणि पैज लावणे यात अंतर आहे आणि अर्थ सुद्धा वेगळा.

आज ओपनिंग चांगली मिळाली. यशस्वी अर्धशतक आणि राहुल अर्धशतकाच्या जवळ. एकूण 150+ ची लीड.

असेच खेळत रहा.

विशेष म्हणजे दोन्ही फलंदाजांचा strike रेट सध्या ४०-४१ आहे.
भारतीय फलंदाज ॲप्रोच बद्दल जी चर्चा मध्यंतरी जिथे तिथे चालू होती त्याला सुद्धा उत्तर दिले यांनी.

Yes, this is test play. 49 ओव्हर मध्ये 137 म्हणजे 3 च्या आसपास रन रेट. पारंपरिक टेस्ट मध्ये साधारण असाच रन रेट असतो. दिवसाला 90 ओव्हर मध्ये 250 ते 270 रन. फार फार तर 300.

*असेच खेळत रहा.* _ +१
विराटचं झेल सुटण्याचं प्रमाण वाढलंय हे आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. पण, निष्काळजीपणा, सरावाचा अभाव, शारीरिक, मानसिक मरगळ इ. कारणांमुळे विराटकडून झेल सुटतील हे अशक्य वाटतं. शिवाय, विराट स्वतःच त्याबाबत अस्वस्थ होऊन मेहनत घेणारा खेळाडू आहे. तेंव्हा, त्यावर फार विचार न करता, one of those things म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य.

“ भारतीय फलंदाज ॲप्रोच बद्दल जी चर्चा मध्यंतरी जिथे तिथे चालू होती त्याला सुद्धा उत्तर दिले यांनी” - काय उत्तर दिलं? ह्या टेस्टमधे पहिल्या इनिंगपासून चांगला - म्हणजे सिच्युएशनप्रमाणे अ‍ॅडाप्ट होऊन खेळण्याचा अ‍ॅप्रोच दाखवला - जे अपेक्षित आहे - त्याचं कौतुक आहे. समयोचित खेळणं हेच टेस्ट क्रिकेटमधे अपेक्षित आहे.

हो मग हेच उत्तर दिले
तेच तर वर लिहिले आहे.
सोशल मीडियावर चर्चा चालू होती की या आयपीएल जनरेशन खेळाडूना टिकून संयमाने खेळता येत नाही. काही नाईटीज किड तर द्रविड आठवून सेंटी होत होते.
खरे तर मायदेशात गेले अठरा मालिका हे लोकच सलग अपराजित होते. पण एक मालिका जाताच हा संघ अगदी बंडल आहे, यांची कसोटी फायनल पोहोचायची लायकीच नाही. मायदेशात 3-0 हरले तर ऑस्ट्रेलियात हे 5-0 हरून येणार. अश्या चर्चा चालू होत्या.
पण पहिलेच दोन दिवसात यांनी कमाल केली आहे.
सामना अजून संपला नाही. तरी भारत 5-0 हरतो बोलणारी तोंडे तूर्तास शांत झाली आहेत Happy

जयस्वाल पहिल्या सामन्यात लवकर बाद होताच त्यावर सुद्धा आमच्या इथे टीका चालू होती.
पण मला विश्वास होता की हा गुणवान खेळाडू आहे. हा शिकणार लवकरच. म्हणूनच पैज लावली.
जसा त्याचा पॉझिटिव्ह खेळ आहे, जे तो सतत रन्स शोधत असतो ते ऑस्ट्रेलियात कामाला येणार.. इथे फक्त एक गोष्ट शिकणे गरजेचे असते. बाऊंसचा अंदाज घेऊन बॉल सोडणे जमायला हवे.

समयोचित खेळणं हेच टेस्ट क्रिकेटमधे अपेक्षित आहे. >> +१

विराटचं झेल सुटण्याचं प्रमाण वाढलंय हे आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. पण, निष्काळजीपणा, सरावाचा अभाव, शारीरिक, मानसिक मरगळ इ. कारणांमुळे विराटकडून झेल सुटतील हे अशक्य वाटतं. शिवाय, विराट स्वतःच त्याबाबत अस्वस्थ होऊन मेहनत घेणारा खेळाडू आहे. तेंव्हा, त्यावर फार विचार न करता >> +१. परत कोहली नि शर्मा हे क्लोज ईन फिल्डर्स आहेत त्यामूले त्यांच्याकडे रीअ‍ॅक्टरी कॅचेस जाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामूळे वयोमानपरत्वे ड्रॉप होणेही अधिक असणे फारसे वावगे वाटत नाही.

इथे फक्त एक गोष्ट शिकणे गरजेचे असते. बाऊंसचा अंदाज घेऊन बॉल सोडणे जमायला हवे. >> आता मी परत स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत आहे हे मान्य असूनही .... जैस्वालचा रीलीज शॉट त्याचे ड्राईव्ह्स आहेत. ऑस्ट्रेलियामधे जनरली सगळे २/३ लेण्ग्थ वर बॉलिंङ करतात. निव्वळ बाऊन्स साठी नाही तर सीम मूव्हमेंट ला अधिक वाव मिळतो ते तेव्हढेच मह्त्वाचे कारण असते. त्या लेंग्थला ड्राईव्ह करण्यासाठी जी अ‍ॅडजेस्ट्मेंट लागते ती उपखंडातल्या प्लेयर्स ना अधिक वेळ लागणे साहजिक आहे. जईस्वालचा पहिला दौरा आहे. टॅलेंटेड पोरगा आहे ( त्याचाही लवकरच चुम्मा होणार हि लक्षणे दिसत आहेत) अशी टेक्निकल अ‍ॅडजेस्ट्मेंट नक्कीच करेल. राहता राहिला टेंपरामेंटचा भाग तर २२ वर्षाचा पोरगा अशा काही इनिंग आधीही खेळलाय ज्यात टेंपरामेंटची कमी त्यात नाही हे सिद्ध झालय. (हेच मुद्दे गिललाही लागू होतात)

“ अशी टेक्निकल अ‍ॅडजेस्ट्मेंट नक्कीच करेल. राहता राहिला टेंपरामेंटचा भाग तर २२ वर्षाचा पोरगा अशा काही इनिंग आधीही खेळलाय ज्यात टेंपरामेंटची कमी त्यात नाही हे सिद्ध झालय. (हेच मुद्दे गिललाही लागू होतात)”- टोटली सहमत!! अशी अ‍ॅडजस्टमेंट एका इनिंगमधे करण्याइतकी समज आणि कुवत ह्या मुलात २२ वर्षी असेल तर त्याचं कौतुक आहे.

भारतीय क्रिकेटचं भविष्य ह्या यंग ब्रिगेडच्या हातात उज्वल आहे असं नक्कीच वाटतं.

यशस्वी जयस्वाल सिक्स मारून शतक !

दणकून जिंकायला हवा हा सामना...
आणि ही मालिकाच
मजा येणार मग. वाट बघतोय असे होण्याची.

ऑस्ट्रेलियात आलेली तीन द्विशतके

Sachin Tendulkar 241 not out
Sydney 2004

Rahul Dravid 233
Adelaide 2003

Ravi Shastri 206
Sydney 1992

सचिनचे २४१ नाबाद हा ऑस्ट्रेलियातीलच नाही तर आपला सर्वोच्च ओवरसीज हायेस्ट स्कोअर आहे

सचिन आणि ऋषभ पंत यांच्या पंक्तीत बसला आज यशस्वी!

Youngest Test Centurions in Australia

सचिन तेंडुलकर १९९२ - १८ वर्षे २५३ दिवस
ऋषभ पंत २०१९ - २१ वर्षे ९१ दिवस
दत्तू फडकर १९४८ - २२ वर्षे ४२ दिवस
यशस्वी जयस्वाल २०२४ - २२ वर्षे ३३० दिवस

त्याचाही लवकरच चुम्मा होणार हि लक्षणे दिसत आहेत
>>
भीती त्याचीच आहे...

मायदेशात गेले अठरा मालिका हे लोकच सलग अपराजित होते. पण एक मालिका जाताच
>>
मालिका गेल्याच्या दुःखा पेक्षा ती कशी गेली याचं दुःख जास्ती आहे...

राच्याकने,
आता शर्मा परतल्यावर राहुल चं काय होणार??
अन् जर पड्डिकल नी दुसऱ्या डावात शतक केलं तर गिल आल्यावर त्याचं काय होणार???

प्रश्न -शर्मा परतल्यावर राहुलचं काय होणार?
उत्तर- शर्मा परतल्यावर आपण पुढच्या सगळ्या टेस्ट हारणार.

मालिका गेल्याच्या दुःखा पेक्षा ती कशी गेली याचं दुःख जास्ती आहे...
>>>>

प्रश्न दुःखाचा नाहीये. ते तर मलाही फार झाले.
पण सोशल मीडियावर काही प्रतिक्रिया वाचल्या ज्यात भारतीय संघाला जसे झोडपत होते, त्यांची लायकी काढत होते, जणू कधी यांना अपयश मिळते आणि आम्ही झोडपून काढतो याची वाटच बघत होते अश्यांना आता भारतीय संघाने चोख उत्तर द्यावे अशी इच्छा आहे Happy

वर्ल्ड रेकॉर्ड

ब्रँडन मॅक्युलमने कसोटी क्रिकेटमध्ये 2014 या वर्षात 33 षटकार मारले होते. आता हा विक्रम मोडीत काढत यशस्वी जसस्वालने 2024 या एका वर्षात 34 षटकार मारले आहेत.

या टेस्ट मध्ये आता पर्यंत 7 सेशन झाले, पैकी पाहिले 2 ऑसिजच्या खात्यात तर उरलेले 5 भारताच्या.

यशस्वीचे चुम्मेश्वरी अभिनंदन (डोळ्यात बदाम)

“ आता शर्मा परतल्यावर राहुल चं काय होणार?” - दोन्ही इनिंग्जमधे राहूलने दाखवलेल्या टेक्निक आणि टेंपरामेंट नंतर मला वाटतं राहूल ही सिरीज पूर्ण खेळेल. तिसर्या किंवा सहाव्या नंबरवर खेळेल, पण खेळेल.

*त्याचं काय होणार???*
क्रिकेटमधली अशी " सुशिक्षित बेरोजगारी " रोखायला निवृत्तीचं वय कमी करणं हा उपाय योजावा लागेल की काय ! Wink
अर्थात, " आता कोणाला घेणार ? " असा केविलवाणा प्रश्न पडण्यापेक्षा, " त्याचं काय होणार ??? " हा प्रतिभेची विपुलता दर्शवणारा प्रश्न भारतीय क्रिकेटसाठी बराच म्हटला पाहिजे !

Pages