क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Highest Batting Average for an Indian in Australia- Tests (Minimum: 10 Innings)

62.40 - Rishabh Pant (12 Innings)
55.66 - Mohinder Amarnath (13)
54.08 - Virat Kohli (25)
53.20 - Sachin Tendulkar (38)
51.11 - Sunil Gavaskar (19)
47.66 - Vijay Hazare (10)
47.40 - Virender Sehwag (20)
47.28 - Cheteshwar Pujara (21)
45.73 - GR Viswanath (15)
44.25 - Murali Vijay (12)
44.14 - VVS Laxman (29)
43.96 - Rahul Dravid (30)
42.09 - Ajinkya Rahane (23)

ईश्वरन
जैस्वाल
गिल
कोहली
पंत
जुरेल (यर)
रेड्डी
अश्विन
राणा
आकाशदीप
बुमरा (क)

असा संघ पहिल्या कसोटीसाठी. तसंही ३-२० पहिल्या चालते बळी आहेतच आपले फलंदाज. निदान खालचे काहीतरी करतील अशी अपेक्षा.

पहिल्या चौघांनी आपल्याला किमान १५० चेंडू खेळायचेच आहेत असं काहीसं ठरवलं तर चित्र वेगळे असेल.

वॉशिंग्टन सुंदर नाहीं बसत का या संघात ? न्यूझीलंडविरुद्ध रणांगणात रथाचं चाक त्यानेच मुंबईत कैकियिसारख धरून ठेवलं होतं ना ! व, ऑसीज पूर्वीपासून ऑफ स्पिन विरुद्ध जरा बिचकतच खेळतात असं म्हटलं जातं !! Wink

Watch out.
Ausचा पाकिस्तान कडून दारुण पराभव.

AUSA 223
INDA 161 & 73/5 (31)

IND VS S A
पहिली T20 8;30 सुरु होत्येय.

सुनिल त्या सांघामधे राणा नि रेड्डी दोघेही असणे जवळजवळ अशक्य आहे. दोघांनाही कसोटीचा फारसा अनुभव नाहिये नि ऑस्ट्रेलिया विरुद्ध तोही बाहेर धाडसी वाटते. एक मिसिंग खेळाडू जाडेजा असावा असे धरतो.

"त्या सांघामधे राणा नि रेड्डी दोघेही असणे जवळजवळ अशक्य आहे." - सहमत! वर शर्मा नसताना, इंडीया इतके धाडसी निर्णय घेईल ह्याची शक्यता खूप कमी आहे.

आजच्या टी२० मधे संजू मस्त खेळला. दोन बॅक टू बॅक टी-२० (आंतरराष्ट्रीय) शतकं झळकावलीयेत त्याने. बॅक एण्डला इतक्या विकेट्स पडल्या नसत्या तर २२५ पर्यंत पोहोचू शकले असते. २०३ चेसेबल वाटतोय.

>>इंडीया इतके धाडसी निर्णय घेईल ह्याची शक्यता खूप कमी आहे.
गौती है तो मुमकीन है Wink

संजू एकदाचा लागला रांगेला Happy

बॅक एण्डला इतक्या विकेट्स पडल्या नसत्या >> तिलक बाद झाला तेंव्हाच वाटलेले कि इनर्शिया मेंटेन करताना विकेट जातील. सॅमसन जबरदस्त फॉरर्ममधे आहेत. त्याचा प्रीफर्ड स्लॉट मिळताच लगेच फरक पडलाय.

केशवकूल हे बघा
दोन सामन्याआधी संजू सॅमसनचा रेकॉर्ड बघा.
पण तरी त्याला संधी मिळत होतीच.
कारण आज ना उद्या चमकेल हा विश्वास होता त्यावर..

IMG_20241109_020119.jpg

मित्रहो, मी वर दिलेला संघ हा 'मला बघायला आवडला असता' श्रेणीतील आहे. असा संघ असणार नाही हे मान्य.

@भाऊ -पर्थ ला दोन ऑफ स्पिनर्स खेळवतील असं नाही वाटत. अश्विनला पहिली पसंती असेलसे वाटते.

@असामी - बरोबर. बुमरा आकाशदीप आणि प्रसिद्ध खेळवतील बहुधा.

@फेरफटका - नाहीच घेणार असा निर्णय. स्वप्नरंजन होते ते !

जुरेल एमसीजी वर दोन्ही डावात चांगला खेळलाय. दुसर्‍या डावात ५६-५ अशी भीषण परिस्थिती असताना रेड्डी बरोबर ९४ धावांची भागिदारी करताना ६८ वर गेला. त्याला wk/batter म्हणून घ्यायला हवं. पंत फलंदाज म्हणून खेळवावा.

माझा अंदाज ः-

गिल
जायस्वाल
कोहली
सरफराज
पंत
जुरेल
जाडेजा
अश्विन
आकाशदीप
बुमरा
प्रसिध्द

असा संघ असू शकेल.
तो गौती ऐनवेळी काय करेल देव जाणे !

त्याला wk/batter म्हणून घ्यायला हवं. पंत फलंदाज म्हणून खेळवावा.
>>>
किपर पंतच आणि जुरेल फलंदाज म्हणून खेळवावा
कृष्णाने सुद्धा आज पहिल्याच ओवरमध्ये दोन विकेट काढल्यात..

माझ्या मते संघ असा असेल
1 जैस्वाल
2 इस्वरन
3 गिल
4 विराट
5 पंत
6 जुरेल
7 रेड्डी
8 आश्विन
9 प्रसिद्ध
10 बुम्मरा
11 आकशदीप

ते २०-२० मालिका बघायची इच्छा सुद्धा होत नाही.
फॉरमॅट मध्ये सुद्धा मजा नाही आणि ना तिथे रोहीत, कोहली, बूम बूम आणि चुम्मा..
वर्ल्डकप येईल तेव्हा बघूया..

हा राहुल आहे भिती सारखा
>>>>

+786
मी पहिल्यापासून हे इथे म्हणत आलोय. यावरून माझे इथे मतभेद सुद्धा झालेत.. (कधी नाही होत म्हणा)
खूप छान शैलीदार फटके आहेत त्याच्याकडे हे नेहमी कौतुक करत आलोय.
पण जिगर नावाचा प्रकार नाही. सेल्फ कॉन्फिडन्स नाही. प्रेशर झेलता येत नाही... हार्श नाही व्हायचे आहे. पण त्याला खरेच यावर काम करायची गरज आहे.

“माझ्या मते संघ असा असेल” - सामा, मला वाटतं जुरेल, इश्वरन, राहूल पैकी दोघं खेळतील (राहूल चं पारडं किंचित जड वाटतं). रेड्डी ऐवजी जडेजा खेळेल आणि बुमराह, सिराज आणि आकाशदीप असा पेस अ‍ॅटॅक असेल असा माझा अंदाज आहे.

सामा, मला वाटतं जुरेल, इश्वरन, राहूल पैकी दोघं खेळतील (राहूल चं पारडं किंचित जड वाटतं). रेड्डी ऐवजी जडेजा खेळेल आणि बुमराह, सिराज आणि आकाशदीप असा पेस अ‍ॅटॅक असेल असा माझा अंदाज आहे. >> +१. राहुल नि जुरेल खेळतील असे वाटते. राहुल च्या सराव सामन्याला मी जास्त लक्ष देत नाहिये. तो लँड झाला नि लगेच सामना खेळला होता. पेसर्स विरुद्ध कंफरटेबल होता नि ऑफ स्पिन वर बॉल वळल्यामूळे बाद झालाय (इती ऑस्ट्रेलियन स्किपर). तू लिहिलेल्या पेस अ‍ॅटॅक मधे प्रसिद्द असेल असे वाटाते (आकश दीपच्या जागी)

नि ऑफ स्पिन वर बॉल वळल्यामूळे बाद झालाय >>> Happy
कधी कधी ऑफ स्पिन वर बॉल न वळल्यामूळे देखिल बाद होइल. बाद व्हायला कारण लागत नाही.

पहिल्या सामन्यात फार प्रयोग होणार नाही.
गोलंदाजी ठरलेली राहील.
आश्विन, जडेजा, आकाशदीप, सिराज, बूम बूम..
विकेट मागे आपला चुम्मा.
आता पाच फलंदाज निवडायचे आहेत.
त्यात कोहली, गिल, जयस्वाल फिक्स आहेत. त्यांचे नंबर सुद्धा फिक्स आहेत.
दोन जागेसाठी चुरस राहील.
ओपनर आणि सहावा क्रमांक खेळू शकणारा.
गेला अ संघाचा सामना पाहता जुरेल सहाव्या क्रमांकावर चांगला वाटतो. त्याला बिनधास्त खेळवावे. ऑस्ट्रेलियात जिंकायचे असल्यास असे निर्णय घेता येणे गरजेचे. तसे झाल्यास सरफराजचा पत्ता कट.
बाकी राहुल ईश्वर कोणीही खेळवा पुढे. फक्त राहुल मागे खेळवून जुरेल पत्ता कट करू नका.

यशस्वी
राहुल
गिल
कोहली
पंत
जुरेल
जडेजा
आश्विन
आकाशदीप
बूम बूम
सिराज

सामना पर्थ ला असल्यामुळे 2 फिरकी गोलंदाज खेलवणार नाहीत असे मला वाटते त्यामुळे जाडेजा ऐवजी रेड्डी ला संधी मिळेल असे वाटते आणि सिराज च्या सध्याच्या फॉर्म मुळे त्याला खेळवणार नाहीत असे मला वाटते

आपल्याकडे कोणी चांगला चौथा वेगवान गोलंदाज नाही जो फलंदाजी सुद्धा करू शकेल.
सगळे अवलंडर फिरकी गोलंदाज आहेत.
त्यामुळे चार वेगवान खेळवले की फलंदाजी कमजोर होऊन जाते.
त्या पांड्याला कसोटी खेळायची नाहीये. आणि तो शार्दुल ठाकूर कुठे आहे म्हणे सध्या..

* सगळे अवलंडर फिरकी गोलंदाज आहेत.* -
सहज मनात शंका आली - आत्ताची आपली फिरकी विरुद्ध झालेली दुर्दशा बघून, ऑसीज पर्थची खेळपट्टी तशीच फिरकीला अनुकूल कां नाहीं करून घेणार ? की, तशी पीचेस बनवणं ही फक्त आपलीच मक्तेदारी आहे ?

Pages