क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Australia squad for first Test: Pat Cummins (c), Scott Boland, Alex Carey, Josh Hazlewood, Travis Head, Josh Inglis, Usman Khawaja, Marnus Labuschagne, Nathan Lyon, Mitch Marsh, Nathan McSweeney, Steve Smith, Mitchell Starc

ICC Ranking मध्ये ऑस्ट्रेलिया टेस्ट टीम सध्या नंबर वन आहे.
आणि individual ranking मध्ये सुद्धा त्यांचाच बोलबाला आहे.

Batter -
Steve Smith - 5
Usman Khawaja - 8
Marnus Labuschagne - 10
Travis Head - 13

Bowler -
Josh Hazlewood - 2
Pat Cummins - 4
Nathan Lyon - 7
Mitchell Starc - 11

मजा येणार आहे..

कशाला करायला हवी. सामने ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. तिथल्या बाऊन्सचा कसा फायदा उचलायचा आहे लायनला पुरेपूर ठाउक आहे. नेहमी मोक्याच्या विकेट तोच काढून देतो.

मला खरे तर सुंदरला बघायला आवडेल. पण आश्विन असताना त्या जागी किंवा त्या सोबत सुंदर सुद्धा खेळवतील का हा प्रश्न आहे.
पण त्याने तिथे गोलंदाजी फलंदाजी दोन्ही चांगले केले असते. आश्वासक प्लेअर ठरला असता.
माझ्या हातात असते अकराची संघ निवड तर मी त्याचे नाव लिहून मोकळा झालो असतो

सुंदर मागच्या ऑस्ट्रेलिया मालिकेत सुद्धा चमकलेला आहे.
यंदा सुद्धा फॉर्ममध्ये आहे
ऑस्ट्रेलियातील बाऊन्सचा फायदा गोलंदाज म्हणून तो जडेजा पेक्षा जास्त चांगला उचलू शकतो.
ऑफ स्पिनर ऑस्ट्रेलियाला त्रासदायक ठरतात.
एकूण विचार करता त्यावर का फुली मारावी हे कळत नाही.

“ नाथन लायन सोडून स्पिन बोलिंग कोण करणार?” निदान पर्थला तरी अशी वेळ येईल असं वाटत नाही. पण आलीच तर कामचलाऊ स्पिन बॉलिंग हेड आणि लबुशेन करू शकतात.

ऑसीज पर्थची खेळपट्टी तशीच फिरकीला अनुकूल कां नाहीं करून घेणार ? की, तशी पीचेस बनवणं ही फक्त आपलीच मक्तेदारी आहे ? >> भाऊ आजची पाकिस्तान विरुद्धची मॅच बघून तुम्हाला काय वाटते ? Happy

*पाकिस्तान विरुद्धची मॅच बघून तुम्हाला काय वाटते ? * -
असामिजी, वयपरत्वे आता क्रिकेट फार मोजकंच पहाणं होतं. पाहिलेल्या सामन्यांवर मला नीट लिहिता नाहीं येत , तर न पाहिलेल्या सामन्यांवर बोलण्याचा आगाऊपणा कां करू ? Wink
( तरी पण, ऑसीज हे इतर संघांप्रमाणेच एक संघ आहे, असं समजून त्याच्या विरुद्ध खेळलं तर ऑसीजना ऑस्ट्रेलियातही हरवणं वाटतं तितकं कठीण नसावं. आपणही तें अलीकडेच सिद्धही केलंय ! )

आज आपण टोटल बिनडोक कॅप्टनशिप मुळे हरलो
१२५चेझ करताना १६ ओव्हर्स नंतर आफ्रिका ८८/७ वर अडकली होती. या ७ पैकी ६ विकेट स्पिनर नी काढलेल्या असताना अक्सर च्या ३ ओव्हर शिल्लक असताना (अन् त्यानी एका ओव्हर मधे फक्त २ रन दिलेल्या असतानाही) अर्शदीपला १७ वी ओव्हर दिली. त्यानी १२ रन चा मार खाल्ल्यावर पुढची आवेश ला दिली. त्यानी ही १२ धावा वाटल्यावर परत १९वी ओव्हर अर्शदीप ला देण्यात काय पॉइंट होता देव जाणे. पण त्यानी विश्वास सार्थ ठरवत उरलेल्या सर्व १६ धावा देऊन टाकल्या...

( तरी पण, ऑसीज हे इतर संघांप्रमाणेच एक संघ आहे, असं समजून त्याच्या विरुद्ध खेळलं तर ऑसीजना ऑस्ट्रेलियातही हरवणं वाटतं तितकं कठीण नसावं. आपणही तें अलीकडेच सिद्धही केलंय ! ) >> भाऊ मी त्यांच्याविरुद्ध जिंकणे किंवा हरणे ह्याबद्दल म्हणात नव्हतो तर पाकिस्तान ने त्यांना पर्थ च्या विकेट वर पेसर्स्च्या जोरावर हरवले त्या अनुषंगाने म्हणत होतो.

आजचा सामना पाहिला नाही पण स्कोअर चेक केल्यावर असेच वाटले की इथे अक्षर का शिल्लक ठेवला?? ते सुद्धा कलासेन बाद झालेला असताना..

द्रविड गेल्यानंतर टॅ़टिकल नाऊन्स हा प्रकार आपण बायपासला टाकलेला वाटतो एकंदर. बर्‍याच छोट्या छोट्या गोष्टींमधून जाणवते.

“ टॅ़टिकल नाऊन्स हा प्रकार आपण बायपासला टाकलेला वाटतो” - गेल्या काही मॅचेस (टेस्ट, टी२०) मधे तरी भारताचा अ‍ॅप्रोच बर्यापैकी predetermined आणि unidirectional वाटलाय. मॅच सिच्युएशनला अ‍ॅडाप्ट होण्याचे प्रयत्न दिसत तरी नाहीयेत.

मी सर्व सूत्र माझ्याच हातात ठेवली म्हणून तर आपला संसार इतकी वर्ष सुरळीत चाललाय ! त्या मायबोलीवरचं कांहीं तरी वाचून आता मलाच तुम्ही नेतृत्व गुण शिकवू नका !!purviche.jpg

हुश्श झालं बाबा एकदाचं ! संजूने आपली परंपरा काय ठेवली. तिलक कसला झक्कास खेळलाय आज. मजा आली बॅटींग बघताना.

मैदान छोटे आहे.
त्या दिवशी सुद्धा हे म्हटलेले.
शॉट उचलून सिक्स जातील असेच मारत आहेत.

Sanju deals in binary- 0 or 100 >> seriously ! कायच्या काय खेळले दोघे जण. क्लीयर हिटींग होते एकदम एक ओव्हर वगळता.

मी बघायला सुरुवात केली तेंव्हा संजू ८०-९० च्या आसपास होता आणि तिलक अर्धशतकाच्या उंबरठ्यावर, पण तिथून जे accelarate केले त्याने आणि संजूला कधी क्रॉस करुन गेला कळलेच नाही!!
अगदी ॲट इझ मारत होते दोघेही!!
अर्शदीपने परत एकदा छाप पाडली.... auction अगदी पुढच्या वीकेंडलाच असल्यामुळे याचा चांगला फायदा होणार त्याला...... भारतीय बॉलर्समध्ये सर्वात जास्त बोली लागेल त्याच्यावर बहुतेक!!

Pages