हिंडेनबर्ग या न्यूयॉर्कच्या शॉर्ट सेलर ने दोन वर्षे विविध लोकांच्या मुखाखती घेऊन, ज्यात अदानीकडे पूर्वी काम करणारे लोकही समाविष्ट आहेत, पब्लिक डोमेन मधील विखुरलेली माहिती एकत्र करुन, अर्धा डझन देशांतील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन आणि हजारो कागदपत्रांची छाननी करुन १७.८ ट्रिलअन रुपये (२१८ बिलिअन अमेरिकन डॉलर) मूल्यांकन असलेल्या अदानी समुहावर शेअर्सच्या किमती निश्चित करणे आणि अकाउंटिंग फ्रॉड असे अनेक अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
गौतम अदानी याची संपत्ती गेल्या तीन वर्षांत चक्रवाढ गतीने वाढून २० बिलियन ची १२० बिलियन झाली, आणि त्याच काळात अदानी गृपच्या ७ महत्त्वाच्या शेअर्सची किंमत तब्बल ८१९% वाढली आहे. अदानी कंपन्यांचे फंडामेंटल फारच तकलादू असल्याने या प्रचंड मूल्यांकनामुळे एकुणच त्या कंपन्यांतील गुंतवणूक function at() { [native code] }यंंत धोकादायक आहे. अदानी ग्रुपहा कौटुंबिक व्यवसायासारखा लागेबांधे ठेवून चालू असल्याचा दावा ही अहवालात आहे.
गौतम अदानी, त्यांचे भाऊबंद, मेव्हणे, जावई इ. इ. लोकांनी परदेशात, जेथे करसवलती आहेत तिकडे कशा बेनामी कंपन्या काढल्या आणि तिकडून पैसे कसे सायफन करुन गैरव्यवहार केले हे वाचलं तरी भिती वाटते. अदानी कुटुंबातील अनेकांवर पूर्वी सेबीने कारवाई केली आहे, अनेकांनी तुरुंगाची हवा खाल्ली आहे पण नंतर त्या सर्वांची पदन्नती होऊन ते सगळे आता डायरेक्टर इ. झाले आहेत.
सविस्तर अहवाल इथे बघता येईल. https://hindenburgresearch.com/adani/
बराच मोठा अहवाल आहे. त्यात एकाच व्यक्तीच्या १४ कंपन्या आहेत, त्यांचं डोमन नेम एकाच दिवशी रजिस्टर झालं आहे, अनेकांच्या वेबसाईट तंतोतंत जुळणार्या आहेत, त्यातील एकाने अदानीला काही शे मिलियन डॉलरचं कर्ज दिलं आहे. ती चांदीच्या व्यापारात कंपनी आहे, पण त्यांच्या फाईलिंग रिपोर्ट नुसार त्या कंपनीत शून्य लोक काम करतात, त्यांचं ऑफिस मोडकळीला आलेल्या इमारतीत कायम स्वरुपी बंद आहे, आणि तिकडे गिचमिड अक्षरांत संपर्काचा दूरध्वनी क्रमांक दिला आहे अशा अनेक रंजक आणि सिनेमातील वाटतील अशा कथा आहेत.
हा रिपोर्ट आल्यावर अदानी कंपन्याचे शेअर्सची घसरगुंडी झाली नसती तरच नवल. त्यांचा एफपीओ जो ११२% (ओव्हर सबस्काईब) झालेला तो ही काल मागे घेतला आहे. क्रेडीट स्विसने अदानी बॉंड इ. नाकारण्यास सुरुवात केली आहे.
हिंडेनबर्ग रिपोर्ट, अदानी आणि त्याचे भारतीय गुंतवणुकीवर, सेबीवर पडणारे पडसाद याची चर्चा करायला हा धागा.
वाटलेच. थापा मारा, एकदा
वाटलेच. थापा मारा, एकदा व्हॉट्सॲप वर पसरले की फॅक्ट चेक करा आणि काय करा, योग्य परिणाम साधला गेला असतो.
अॅडमिन यांना विनंती -
अॅडमिन यांना विनंती -
>>Submitted by अज्ञानी on 9 February, 2023 - 12:32>> या पोस्टमधे फेक न्यूज आहे तेव्हा प्लीज संपादित कराल का?
मायबोलीसारख्या संस्थळावर फेक न्युज नसावी असे मला वाटते. स्वसंपादनाची वेळ निघून गेल्याने अज्ञानी यांना विनंती करु शकत नाही म्हणून अॅडमिन यांना विनंती!
सॉरी अज्ञानी!
अॅडमिन
अॅडमिन
नका करू एडीट.
त्याखाली मी WIRE चा दुवा दिलेला आहेच .
थोडा विनोद( विनोद अडाणी नव्हे) आरोग्यकारी.
डीलीट करायची गरज नाही असे
डीलीट करायची गरज नाही असे मलाही वाटतेय. कसला कचरा भक्त लोक फिरवत आहेत तेही कळू दे. अशाच एका पाल्हाळीक बुवांचा ( माझे आडनाव बंधू) व्हिडिओ पाचेक मिनिटे पाहिला. हिंडेन्बुर्ग कंपनी कशी फालतू आहे, तिथे फक्त पाच लोक काम करतात, वगैरे वगैरे. अरे पण इतक्या फालतू कंपनीने एक रिपोर्ट लिहिताच जर शेअर्स ५०% खाली आले तर मुळात तुमचा बंगलाच पत्त्यांचा आहे हे कधी मान्य कराल ?
अरे डिलीट नका करू तिकडेचिकटवा
अरे डिलीट नका करू
तिकडे चिकटवा
विकु तुमचं राजकारण आणि पदव्यापासून मला लांबच ठेवा
विकु +१. हिंडेनबर्ग कसा फालतू
विकु +१. हिंडेनबर्ग कसा फालतू म्हणता मग इतक्या फालतू कंपनीने फुंकर मारुन तुमची का तंतरते हा प्रश्न विचारायला बोटं शिवशिवतात पण वाईड बॉल मारायचा नाही म्हणून सोडून देतो.
विकु, माझपण +१. सत्य वचनाचा
विकु, माझपण +१. सत्य वचनाचा लोकांना एव्हढा का राग यावा?
हा फोटो परंजय गुहा ठाकुरता
हा फोटो परंजय गुहा ठाकुरता यांनी ट्वीट केला आहे. २००७ ची बातमी.
SAT - Securities Appealate Tribunal ने ही बंदी उठवली होती.
अदाणी ग्रुपच्या कंपन्यांनी त्यांच्या विरोधात अनेक कोर्ट केसेस ठोकल्या आहेत.
मागच्या पाच आठवड्यात अडाणी
मागच्या पाच आठवड्यात अडाणी समुहाच्या शेअर्सच्या किंमतीत सातत्याने घसरण सुरुच आहे. या काळांत, Adani Enterprises Limited चा शेअर रुपये ३४४३ वरुन ६० % अधिक घसरलेला आहे. Adani Total Gas चा तर ८२ % गॅस हवेत गेला आहे. थोडीफार अशीच परिस्थिती अडाणी समुहाच्या इतर कंपन्यांची आहे.
या पाच आठवड्यांच्या काळांत, अडाणी समुहाने १२ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
https://www.outlookindia.com/business/hindenburg-effect-gautam-adani-sli...
एव्हढा मोठा आर्थिक गैरव्यावहार होत असतांना त्यावर संसदेत चर्चा करण्याची गरज सरकारला वाटत नाही आणि विरोधक मुद्दा लावून धरण्यात कमजोर पडत आहेत.
शेअर्सची किंमत घसरणे हा गैर
शेअर्सची किंमत घसरणे हा गैर व्यवहार कसा?
उबो, तुम्हाला खरंच वाटतंय का
उबो, तुम्हाला खरंच वाटतंय का शेअरची किंमत घसरणे "हा" गैरव्यवहार आहे असं इथे कुणाला वाटतंय?
(No subject)
कर्ज शेअर वर बँका देतात,.
कर्ज शेअर वर बँका देतात,.
शेअर चे भाव घोटाळा करूनच फुगवले जातात.
दोन रुपये पण किंमत नसणारे शेअर ची किंमत 100,,रुपये घोटाळे करून केली जाते.
तेच तारण ठेवून 90, रुपये कर्ज घेतात.
बँका ते कर्ज कसे वसूल कसे करणार ज्या तारण म्हणून ठेवलेल्या शेअर ची खरी किंमत च दोन रुपये आहे.
आणि कंपनी ची स्थावर मालमत्ता पण काही नाही.
लोकांचे कष्टाचे पैसे (,,बँकेत ,किंवा वित्तीय संस्थेत असलेले)
बुडतात त्या मुळे.
आक्षेप शेअर बाजारावर नाही.
आक्षेप शेअर बाजारावर नाही.
तिथे पैसे लावून बुडणाऱ्या लोकं विषयी नाही.
तो खेळ वेगळा आहे.
जिथे सर्व सामान्य लोक पैसे जमा करतात.
त्या संस्था.
एलआयसी,बँका,epf, etc ह्या
कर्ज देताना ते वसूल होईल इतकी स्थावर मालमत्ता ज्याच्या कडे आहे त्यालाच कर्ज दिले पाहिजे.
शेअर वर जनतेचे पैसे लावू च नका.
ते तुमचे पैसे नाहीत लोकांचे आहेत.
रिटर्न कमी मिळाले तरी हरकत नाही.
पण लोकांचे पैसे उडवणारे हे कोन?
चोरांना कर्ज देणाऱ्या लोकांची सर्व संपत्ती सर्व नातेवाईक सहित जप्त करून .
त्या अधिकाऱ्या सहित्त त्याचे सहभागी असणारे
सर्व नातेवाईक जेल मध्ये हवेत.
जेव्हा बँक बुडते तेव्हा.
पण रिझर्व्ह बँक काय करते ज्यांचे कष्टाचे पैसे बुडले आहेत त्यांच्या पैशाची चोरी करायला परवानगी देते.
सर्वात मोठ्या दरोडेखोर असणाऱ् कर्जदार ,योग्य तारण न घेता कर्ज देणारे अधिकारी हे डाकू पेक्षा मोठा दरोडा लोकांच्या पैष्यावर टाकतात.
ते दरोडेखोर बँक अधिकारी,lic adhikari , आदेश देणारे मंत्री असतात.
ह्यांना काहीच शिक्षा मिळत नाही.
कर्ज बुडवणारे तर ऐश करत असतात
अडाणी प्रकरणात हेच झाले आहे
शेअर वर जनतेचे पैसे लावू च
शेअर वर जनतेचे पैसे लावू च नका.
ते तुमचे पैसे नाहीत लोकांचे आहेत.
रिटर्न कमी मिळाले तरी हरकत नाही.
पण लोकांचे पैसे उडवणारे हे कोन?
>>> मग LIC इतक्या पैश्याचे करणार काय ??? नुसते बँकेत साठवून ठेवायचे काय पैसे ?
सेबी पाठोपाठ आता सुप्रीम
सेबी पाठोपाठ आता सुप्रीम कोर्टाने अडानी समूहातील कंपन्या, समभागांची किंमत फुगवण्यासाठी त्या कंपन्यांतील तथाकथित गैरव्यवहार व त्यानुषंगाने घडून आलेली त्यांच्या समभगांच्या किंमतीतील प्रचंड घसरण ह्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सहा एक्स्पर्ट लोकांची कमिटी नेमली आहे. ह्या कमिटीला तपास पूर्ण करून रिपोर्ट सादर करण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे.
अडानी समुहाने सुप्रीम कोर्टाच्या ह्या निर्णयाचे 'आता सत्य लवकरच ऊजेडात येईल' असे म्हणत स्वागत केले आहे.
<< सेबी पाठोपाठ आता सुप्रीम
<< सेबी पाठोपाठ आता सुप्रीम कोर्टाने अडानी समूहातील कंपन्या, समभागांची किंमत फुगवण्यासाठी त्या कंपन्यांतील तथाकथित गैरव्यवहार व त्यानुषंगाने घडून आलेली त्यांच्या समभगांच्या किंमतीतील प्रचंड घसरण ह्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सहा एक्स्पर्ट लोकांची कमिटी नेमली आहे. ह्या कमिटीला तपास पूर्ण करून रिपोर्ट सादर करण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे.
अडानी समुहाने सुप्रीम कोर्टाच्या ह्या निर्णयाचे 'आता सत्य लवकरच ऊजेडात येईल' असे म्हणत स्वागत केले आहे. >>
------ वराती मागून घोडे असा प्रकार आहे.
गौतम अडाणीला क्लिन चिट मिळवायला बराच वेळ लागत आहे....
सर्वोच्च न्यायालयाने
सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीबद्दल सुचेता दलाल यांची प्रतिक्रिया.
(ज्यांना सुचेता दलाल माहीत नसतील , त्यांच्यासाठी - हर्षद मेहता घोटाळा यांनी उघडकीस आणला होता.
Today’s committee is historic. Far cry from Chagla Commission. Too many constraints & conflicts due to corporate board positions, software services clients & innumerable broker/manipulators and even 1st line regulators as clients! no wonder it was warmly welcomed!
Several of the committee members, if serious, ought to explain to SC how markets function- concern for investors cannot be about a fall in prices while being complacent about the rise!
Is there a parallel anywhere in the world where corporate honchos / lawyers with deep connections to the business community are appointed to what is supposed to be an investigation exercise?
छगला कमिशन - नेहरूंच्या काळा तलं एल आय सी - मुंद्रा प्रकरण ज्यात टी टी कृष्णम्म्मचारींना राजीनामा द्यावा लागला.
आताही एल आय सी आहेच.
गुजरात सरकार अदाणी कडून घेत
गुजरात सरकार अदाणी कडून घेत असलेल्या विजेचा भाव एका वर्षात दुप्पट झाला.
https://indianexpress.com/article/cities/ahmedabad/adani-power-gujarat-g...
कोळशाच्या वाढलेल्या किंमती हे कारण दिलं गेलं आहे. कोळशाची अचानक टंचाई कशी झाली यामागेही काही गुपित असेल का?
हाच अदानी बांगलादेशसमोर
हाच अदानी बांगलादेशसमोर झुकला
https://economictimes.indiatimes.com/industry/energy/power/adani-to-supp...
आजच टाईम्स ऑफ इंडियात वाचले
आजच टाईम्स ऑफ इंडियात वाचले की अदानी ग्रुपने घेतलेले ७४०० कोटी रुपयांचे कर्ज मुदतीपूर्वी फेडले आहे.
<< आजच टाईम्स ऑफ इंडियात
<< आजच टाईम्स ऑफ इंडियात वाचले की अदानी ग्रुपने घेतलेले ७४०० कोटी रुपयांचे कर्ज मुदतीपूर्वी फेडले आहे. >>
----- अडाणीचे सर्वच आकडे मोठे आहेत, माणूसच तसा मोठा आहे, आणि कामही मोठे आहे. १४० कोटी लोकसंख्या असलेल्या देशाच्या पंतप्रधानांना आपल्या खासगी विमानात बसवतो म्हणजे फार फार मोठा उद्योगपती.
७०० कोटी रुपये म्हणजे त्याने घेतलेल्या एकूण कर्जाच्या किती % हा हिस्सा आहे? नगण्य असल्यास आश्चर्य वाटायला नको.
सर्वसामान्यांनी बँकांकडून घेतलेले कर्ज त्यांना एका ठराविक मुदती मधे बँकांना परत करावे लागते, नाहीतर बँका मागे लागतात. पुढचे कर्ज सहजा सहजी मिळत नाही, अर्थात सामान्यांसाठी .
तारण ठेवलेल्या वस्तूची ( शेअर्सची ?) किंमत कमी झाल्यावर कर्जाची रक्कम कमी करण्यासाठी बँका अडाणीच्या मागे लागल्या अशी शक्यता कमीच आहे.... दिल्ली मधे मोठी उठबैस आहे.
आता तर म्हणे सर्वोच्च न्यायालयांच्या आदेशानुसार चौकशीच्या कसरती होणार आहेत. कशाला न्यायालयाच्या वेळेचा अपव्यय?
अडाणीला क्लिन चिट मिळणार आहेच, कधी मिळणार हाच प्रश्न आहे.
लूट लो देश को .
लूट लो देश को .
राजकारणी,अधिकारी आणि उद्योगपती मिळून.
आंधळी जनता असेल तर हेच घडणार
हिंदुत्व के लिये हम कुछ भी
हिंदुत्व के लिये हम कुछ भी करने के लिये तय्यार है. बस एक गोली दे रे बाबा.
मुकेश शहा अदाणी पॉवरचे
मुकेश शहा अदाणी पॉवरचे इंडिपेंडंट डिरेक्टर.
मुकेश शहा यांची सी ए फर्म आहे.
ही सी ए फर्म Adicoprt Enterprises ची ऑडिटर आहे.
या कंपनीने अदाणी ग्रुपच्या चार कंपन्यांकडून ६२२ कोटी रुपये कर्जाऊ घेतले.
याच कंपनीने अदाणी पॉवरला ६०८.५ कोटी रुपये कर्जाऊ दिले.
हे सव्यापसव्य कशासाठी?
हे सव्यापसव्य कशासाठी?
कशासाठी? पोटासाठी
अदानीच्या थाटासाठी.
प्लीज मला झोपू द्या. पप्पू आला का परत? आला की उठवा. मग बघू त्याच्याकडे आपण.
दिगोची
दिगोची
टाइम्स ग्रुप च मालक कोणी तरी जैन आहे आणि मिंट च अंबानी.
भारतातील एका पण मीडिया हाऊस वर बिलकुल विश्वास नाही.
हे सर्व तेच आहेत जे सरकार चे लाभार्थी आहेत.
आणि काही मोजक्याच लोकांच्या हातात भारताची आर्थिक सत्ता असावी हे ध्येय असणारे आहेत
कोणत्या विदेशी मीडियानं नी जसे की हिंदेनबर्ग सारख्या .
न्यूज दिली तर च विश्वास ठेवता येईल
आजच टाईम्स ऑफ इंडियात वाचले
आजच टाईम्स ऑफ इंडियात वाचले की अदानी ग्रुपने घेतलेले ७४०० कोटी रुपयांचे कर्ज मुदतीपूर्वी फेडले आहे.
काय विश्वासू मीडिया ग्रुप च हवाला दिला आहे.
भारतातील एक तरी मीडिया हाऊस विश्वास ठेवण्याच्या लायकीचे आहे का?
हा प्रश्न स्वतःलाच विचारा
७३७४ कोटी रुपये कर्जाची
७३७४ कोटी रुपये कर्जाची परतफेड केली
हे कर्ज शेअर्स तारण ठेवून घेतले होते.
सध्या अदाणी ग्रुपने कर्ज वाढून जलदगतीने उद्योगविस्तार करायच्या धोरणाला मुरड घातली आहे. अन्य उद्योगधंदे, प्रकल्प ताब्यात घेण्याचे काही बेत रहित केले आहेत. ( वरच्या बातमीतून)
अदाणी एंटरप्राइजेसच्या शेअरची किंमत २५ जानेवारी रोजी ३३८९ रुपये होती. २७ फेब्रुवारीपर्यंत ती ११९३.५ इतकी घसरली होती. तिथून वधारत काल २०३९.७ रुपये इतकी झाली आहे.
हिंडेनबर्ग प्रकरण निपटल्यावर
हिंडेनबर्ग प्रकरण निपटल्यावर हिंदूंंबर्ग प्रकरण म्हणजे स्वरा भास्करचे मुसलमानाशी लग्न ह्यावर एक कमिशन बसवावे ह्या मताचा मी आहे.
Pages