हिंडेनबर्ग रिपोर्ट आणि अदानी

Submitted by अमितव on 2 February, 2023 - 00:09

हिंडेनबर्ग या न्यूयॉर्कच्या शॉर्ट सेलर ने दोन वर्षे विविध लोकांच्या मुखाखती घेऊन, ज्यात अदानीकडे पूर्वी काम करणारे लोकही समाविष्ट आहेत, पब्लिक डोमेन मधील विखुरलेली माहिती एकत्र करुन, अर्धा डझन देशांतील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन आणि हजारो कागदपत्रांची छाननी करुन १७.८ ट्रिलअन रुपये (२१८ बिलिअन अमेरिकन डॉलर) मूल्यांकन असलेल्या अदानी समुहावर शेअर्सच्या किमती निश्चित करणे आणि अकाउंटिंग फ्रॉड असे अनेक अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

गौतम अदानी याची संपत्ती गेल्या तीन वर्षांत चक्रवाढ गतीने वाढून २० बिलियन ची १२० बिलियन झाली, आणि त्याच काळात अदानी गृपच्या ७ महत्त्वाच्या शेअर्सची किंमत तब्बल ८१९% वाढली आहे. अदानी कंपन्यांचे फंडामेंटल फारच तकलादू असल्याने या प्रचंड मूल्यांकनामुळे एकुणच त्या कंपन्यांतील गुंतवणूक function at() { [native code] }यंंत धोकादायक आहे. अदानी ग्रुपहा कौटुंबिक व्यवसायासारखा लागेबांधे ठेवून चालू असल्याचा दावा ही अहवालात आहे.

गौतम अदानी, त्यांचे भाऊबंद, मेव्हणे, जावई इ. इ. लोकांनी परदेशात, जेथे करसवलती आहेत तिकडे कशा बेनामी कंपन्या काढल्या आणि तिकडून पैसे कसे सायफन करुन गैरव्यवहार केले हे वाचलं तरी भिती वाटते. अदानी कुटुंबातील अनेकांवर पूर्वी सेबीने कारवाई केली आहे, अनेकांनी तुरुंगाची हवा खाल्ली आहे पण नंतर त्या सर्वांची पदन्नती होऊन ते सगळे आता डायरेक्टर इ. झाले आहेत.

सविस्तर अहवाल इथे बघता येईल. https://hindenburgresearch.com/adani/
बराच मोठा अहवाल आहे. त्यात एकाच व्यक्तीच्या १४ कंपन्या आहेत, त्यांचं डोमन नेम एकाच दिवशी रजिस्टर झालं आहे, अनेकांच्या वेबसाईट तंतोतंत जुळणार्‍या आहेत, त्यातील एकाने अदानीला काही शे मिलियन डॉलरचं कर्ज दिलं आहे. ती चांदीच्या व्यापारात कंपनी आहे, पण त्यांच्या फाईलिंग रिपोर्ट नुसार त्या कंपनीत शून्य लोक काम करतात, त्यांचं ऑफिस मोडकळीला आलेल्या इमारतीत कायम स्वरुपी बंद आहे, आणि तिकडे गिचमिड अक्षरांत संपर्काचा दूरध्वनी क्रमांक दिला आहे अशा अनेक रंजक आणि सिनेमातील वाटतील अशा कथा आहेत.

हा रिपोर्ट आल्यावर अदानी कंपन्याचे शेअर्सची घसरगुंडी झाली नसती तरच नवल. त्यांचा एफपीओ जो ११२% (ओव्हर सबस्काईब) झालेला तो ही काल मागे घेतला आहे. क्रेडीट स्विसने अदानी बॉंड इ. नाकारण्यास सुरुवात केली आहे.

हिंडेनबर्ग रिपोर्ट, अदानी आणि त्याचे भारतीय गुंतवणुकीवर, सेबीवर पडणारे पडसाद याची चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या भारतीय संस्था ना कोणत्याच गोष्टी ची कल्पना नसते.

झोपा काढतात काय अशी शंका येते

ऐकीव. घटना
१) पानशेत चे धरण फुटले आहे हे ब्रिटन नी भारताच्या पंतप्रधान ना सांगितले तो पर्यंत त्यांना माहीतच नव्हते.

खरी घटना.
२६ जानेवारी ला भुज ,गुजरात मध्ये भुकुंप झाला हजारो लोक मेली.
मी सर्व चॅनेल वर आलटून पालटून परेड बघत होतो.
एका ही भारतीय न्यूज चॅनल ला ह्या घटनेची माहिती नव्हती.
प्रथम माहीत सीएनएन ह्या विदेशी न्यूज चॅनेल नी दिली.
की भुज मध्ये भूकुंप झाला आहे.

लोकहो,

या प्रकरणावरून पब्लिकचं लक्ष इतरत्र वळवण्यासाठी नक्की काय डिस्ट्रॅक्शन वापरले जाईल?
माझ्या मते हे असलं काहीतरी घडवून आणले जाईल.

दहा लाख किमतीची जमीन असेल तर बँका पाच लाख पण कर्ज सामान्य लोकांस देत नाहीत.
त्याच किमतीचा flat असेल तर सहा एक लाख देतात .
रडत रडत.
पण उद्योग पती ना कमिशन घेवून शेअर वर कर्ज देतात.
ते शेअर विकून कर्ज वसूल होण्याची बिलकुल शक्यता नसते.
अडाणी नी पण कर्ज शेअर वर च घेतले असणार.
स्थावर मालमत्ता वर नाही
बुडणार फक्त बँक,नुकसान होणार फक्त सामान्य लोकांचे अडाणी चे एक रुपयाचे पण नुकसान नाही.

काही तरी strict नियम लागू करणे गरजेचे आहे.
विकास कमी झाला तरी चालेल .
पण तो शास्वत असेल.
अस्थिर आर्थिक स्थिती निर्माण होणार नाही त्या मुळे

https://www.wsj.com/articles/gautam-adani-fortune-hindenburg-modi-116752...

ह्या लेखात अडानी आणि मोदी सरकारचे संबंध कसे जुळले गेले ह्यावर लिहिलय.

बाकी, अडानीनी लगेच भारतावर हल्ला आहे हे बोलून दाखवलं त्या बद्दल गंमत वाटली. आता कोणी मुद्दाम भारतावर किंवा भारताच्या प्रगतीला खो घालण्याकरता हा रिपोर्ट नाहीच पब्लिश केलेला पण पब्लिश केल्यामुळे भारताच्या रेग्युलेटरी सिस्टमच्या दर्ज्यावर खुप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालय. थोडक्यात फॉरेन इन्वेस्टमेंट आपल्या कडे यायला आणि आपली आणखिन प्रगती होण्याच्या दृष्टीनी हे खुपच वाईट झालं.

मला ही फर्स्ट लाईन ऑफ अटॅक मुद्दे खोडून काढणे न करता राष्ट्रवाद बघुन आश्चर्य वाटलेलं आणि चीड आलेली.
इनवेस्टर्स या अशा रेडरिक्टने बिथरतील नाहीतर काय? मल्टी बिलियन डॉलर कंपनी व्हॉट्सअ‍ॅप अंकल स्टॅटेजीवर कशी चालवुन चालेल!

प्रकरणावरून पब्लिकचं लक्ष इतरत्र वळवण्यासाठी नक्की काय डिस्ट्रॅक्शन वापरले जाईल? ### आप वर इडी ने आरोप केले की.

The National Stock Exchange on Thursday placed Adani Enterprises, Adani Port, Ambuja Cement under ASM (Additional Surveillance Margin) framework with effect from Friday (3 February, 2023).

https://www.livemint.com/market/stock-market-news/adani-enterprises-adan...

इंट्रा डे ला १००% मार्जिन लागते , प्लेज करता येत नाही असे त्यात म्हटले आहे तो भाग कळला. पण याचे नक्की काय उद्दिष्ट आणि इम्प्लिकेशन्स असतात?

त्या बातमीत सर्किट ब्रेकर ५% चा लागेल हे आणखी एक म्हटलंय. धाडधाड न कोसळता रोज ५% पडेल बहुतेक. पण ते इफेक्ट मध्ये यायला कदाचित ५ दिवस लागतात अशी शंका बातमी वाचुन आली.
१००% लागणार असतील तर कोण कशाला इंट्राडे करेल? उद्दिष्ट स्पेक्युलेशन बंद व्हावे असावे.

वास्तविक ईडी ने याआधीच लक्ष घालायला हवे होते. पण इतर संस्थांप्रमाणे ईडीही मोशांच्या घरचे नोकर असल्यासारखे वागत आहे यात आश्चर्य ते काय ? ईडी मध्येही व्हॅस्तॅप अंकल्स भरले आहेत अशी शंका येते. त्यांनी रिया चक्रवर्तीची 'चौकशी' केली ! सिद्दिक कप्पन कडे रोख रक्कम सापडली म्हणून केस केली. इतका मोठा फ्रॉड मात्र दिसला नाही.

हो अमित. त्या रिपोर्टची पण समरी वाचली. त्यात म्हणे ३०-४० पानं फक्त रेलेवंट माहिती होती, बाकी सगळी पानं इर्रेलेवंट डिटेल्स नी भरलेली होती.

विकु, तेच म्हणत होतो. फ्रॉड दिसायला सेबी वगैरे च्या लिस्टिंगच्या गाईडलाईन्स मध्ये ड्यु डिलिजन्सचे स्ट्रक्चर नीट पाहिजे. इथेच आपण थोडे (किंवा बरेच) मागे आहोत हे दिसून येतं. इथे बसून हिंडन्बर्ग वाल्यांनी शोधून काढलं की कोण नक्की शेअरहोल्डर आहेत आणि इथे बसून रेग्युलेटर्स ना कळलं नाही. ह्याचा अर्थ प्रॉपर फ्लॅग्स आणि चेक्स नाहीत.

कुणाला 'राष्ट्रीय सेना झंडा दिवस' च्या निमेत्ताने सेनेसाठी ५ रूपये द्या ह्या धर्तीवर हिंडेनबर्ग रिपोर्टच्या निमित्ताने किमान ५००० टाकून अडाणी शेअर्स विकत घ्या 'राष्ट्रीय बिझनेसमॅन चंदा दिवस' असे फॉर्वड्स आले का? मला दोन चार आले.
भारतीय बाजारपेठेवर होत असलेला चायना आणि यूएस प्रणित परकीय हल्ल्याला खंबीरपणे तोंड देत ऊभे राहाणार्‍या अडाणी पाठी देशासाठी ऊभे रहा. त्यासाठी पदरचे किमान ५००० टाकून अडाणी शेअर्स विकत घ्या. आज अडाणी धारातीर्थी पडले तर सगळी भारतीय बाजारपेठ कोलमडून जाईल, हा देशावर नवा हल्ला आहे. देशभक्ताच्या पाठी मागे ऊभे राहण्याची प्रेरणा मिळण्यासाठी ह्या देशभक्ताची यशोगाथा सुद्धा फॉर्वड्स मधून कथन केली जात आहे.

देवा! ज्या कोणी व्हॉट्सॅपंकल नी हा मेसेज लिहिला त्यांना…
कोपरा पासून सलाम Proud
तरी बरय, बर्याच अंकल अंटींना शेअर खरेदी विक्री कशी कारायची ह्याची काहीच कल्पना नसते. फक्त भक्तगिरीचे व्हॉट्सॅपिय घोडे दौडवत रहायचे उतार वयात. येवढीच त्यांची धाव.

वर भरत यांनी पण लिहिलंच आहे.
हिंडेनबर्गने नक्की शॉर्ट केलं कसं हा प्रश्न युएस मधील इतर शॉर्ट करणारे लोक विचारत आहेत. https://www.reuters.com/world/india/hindenburg-bet-against-indias-adani-...
त्यांनी सेबीकडे इनव्हेस्टर्सची माहिती नसलेलं इन्स्ट्रुमेंट पार्टिसिपेटरी नोट्स वापरलं असेल असं म्हणत आहेत. पी-नोट्स कशा काम करतात ते इथे दिलं आहे.

कुणाला 'राष्ट्रीय सेना झंडा दिवस' च्या निमेत्ताने सेनेसाठी ५ रूपये द्या ह्या धर्तीवर हिंडेनबर्ग रिपोर्टच्या निमित्ताने किमान ५००० टाकून अडाणी शेअर्स विकत घ्या 'राष्ट्रीय बिझनेसमॅन चंदा दिवस' असे फॉर्वड्स आले का? >> अजून तरी नाही, पण आला तर जे १५ लाख मला देणार होते त्याच्यातून कापून घ्या म्हणून सांगेन.

अमितव ते नक्की इनव्हेस्टर्सना प्रोटेक्ट करण्या साठी आहे की कंपनीला असे वाटुन गेले. Proud
म्हणजे माझें शेअर्स आहेत त्या कंपनीत आणि मला विकून टाकायचे आहेत. आता या मेजर्स मुळे विकणारे खूप, विकत घेणारे आधीच कमी असलेले अजूनच कमी होतील, ५% सर्किट फार लवकर हिट होईल. दुसऱ्या दिवशी मग परत सेल ऑर्डर लावणार परत तेच. यात माझे सेल होई पर्यंत स्टॉक रसातळालाही गेलेला असू शकतो. असे दिवसेंदिवस मार्केट उघडल्या उघडल्या ५% लोअर सर्किट लागून खाली जाणारे काही स्टॉक्स पाहिले आहेत. कंपनीला फायदा असा की बराच वेळ मिळतो. म्हणजे जेव्हा मी असे स्टॉक्स पाहिले तेव्हा मला असे वाटले होते, की हे कंपनीला प्रोटेक्ट करायला.
माझा समज पूर्णतः चुकीचाही असू शकतो. त्यासाठी तो प्रश्न.

खरं आहे मानव. याचा एकदा अनुभव घेतला आहे. यातुन कंपनीलाच वाढीव वेळ मिळतो. त्याचा फायदा कसा करुन घेते कंपनी कल्पना नाही. पण सामान्य लोकांना शेअर्स विकणं अशक्यच असतं.

शेअर म्हणजे त्या वित्तीय संस्थेत भागीदारी.
असा सामान्य अर्थ सामान्य लोकांना माहीत असतो.
त्या वित्तीय संस्थेला व्यवसायात जो फायदा होईल तो सर्व शेअर धारकात त्यांच्या हिस्सेदारी नुसार वाटला जातो .
म्हणजे divident.
इथ पर्यंत सर्व सरळ मार्गी आहे.

शेअर पासून जो फायदा होईल तो त्या संस्थेच्या वित्तीय स्थिती शी संबंधित आहे .
हे पण सरळ समजण्यास सोपे आहे .

पण असे हे मार्केट नाही.
शेअर ची किंमत आणि त्या संस्थेचा व्यापारी नफा ह्याचा काही संबंध नाही
शेअर खरेदी आणि विक्री हा वेगळाच रस्ता आहे.
तो जास्त धोकादायक आहे.
शेअर भाव कृत्रिम पने वाढवणारे आणि आणि भाव पाडणारे असे दलाल शेअर मार्केट मध्ये असतात.

तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो ।
तुम्ही हो बंधू, सखा तुम्ही हो ॥
तुम ही हो साथी, तुम ही सहारे ।
कोई ना अपना सिवा तुम्हारे ॥
तुम ही हो नईया, तुम ही खिवईया ।
तुम ही हो बंधू, सखा तुम ही हो ॥
---- मै चूप राहुंगी(गा)
हम सब चूप रहेंगे

काल पासून डोक्यात एक प्रश्न होता, कृपया जाणकारांनी उत्तर द्यावे

सत्यम घोटाळा अश्याच प्रकारचा होता का?

धन्यवाद धाग्याबद्दल अमित. गेले २-३ दिवस बातम्या ऐकल्या आहेत व फेबुवर कॉमेण्ट्स पाहिल्या आहेत लोकांच्या. पण डीटेल्स माहीत नव्हते. त्यातील आर्थिक बाबींबद्दल फारशी माहिती नाही. पण हिंडेनबर्गचे नाव मध्यंतरी अमेरिकेतील कोणत्यातरी कंपनीचे घोटाळे बाहेर काढण्याबद्दल ऐकले होते हे लक्षात आहे.

आठवली - "निकोला". तो तर फार मजेदार किस्सा आहे. लिहीतो त्याबद्दल.

२०२० मधे इलेक्ट्रिक ट्रक कंपनी "निकोला" जोरात असताना हिंडेनबर्ग रिसर्चने ते सगळे फेक आहे असा रिपोर्ट पब्लिश केला. सुरूवातीला त्याला जोरदार विरोध करून झाल्यावर नंतर कंपनीने त्यातील काही क्लेम्स मान्य केले. त्यातील सर्वात आउटरेजस क्लेम होता की जाहिरातीत दिमाखाने रस्त्यावरून धावणारा हायड्रोजन फ्युएल सेल वाला ट्रक हा प्रत्यक्षात - सिरीयसली - फक्त उतारावरून खाली सोडलेला होता Happy तो ही खरा निघाला.

<< वास्तविक ईडी ने याआधीच लक्ष घालायला हवे होते. पण इतर संस्थांप्रमाणे ईडीही मोशांच्या घरचे नोकर असल्यासारखे वागत आहे यात आश्चर्य ते काय ? ईडी मध्येही व्हॅस्तॅप अंकल्स भरले आहेत अशी शंका येते. त्यांनी रिया चक्रवर्तीची 'चौकशी' केली ! सिद्दिक कप्पन कडे रोख रक्कम सापडली म्हणून केस केली. इतका मोठा फ्रॉड मात्र दिसला नाही. >>

------ ED काय करणार होती? सर्व तपास यंत्रणांचा वापर विरोधकांना (विरोधी विचारांना) संपवण्यासाठी होत आहे. आजच्या परिस्थिती मधे न्यायाधिश/ पोलिस/ पत्रकारांना कायद्यानुसार / घटनेनुसार काम करण्याचे कितपत स्वातंत्र्य कितपत आहे?
" .... judges at the grassroots are reluctant to give bail due to the fear of being targeted for granting it in heinous case..." - CJI D Y Chandachud, Nov 2022

http://timesofindia.indiatimes.com/articleshow/95646464.cms?

<< विकु, तेच म्हणत होतो. फ्रॉड दिसायला सेबी वगैरे च्या लिस्टिंगच्या गाईडलाईन्स मध्ये ड्यु डिलिजन्सचे स्ट्रक्चर नीट पाहिजे. इथेच आपण थोडे (किंवा बरेच) मागे आहोत हे दिसून येतं. इथे बसून हिंडन्बर्ग वाल्यांनी शोधून काढलं की कोण नक्की शेअरहोल्डर आहेत आणि इथे बसून रेग्युलेटर्स ना कळलं नाही. ह्याचा अर्थ प्रॉपर फ्लॅग्स आणि चेक्स नाहीत. >>

----- फ्रॉड दिसला नाही असे म्हणायला काही आधार नाही.
फ्रॉड दिसला असेल पण तसे सांगायला लागणारे धाडस नसेल अशी पण शक्यता आहे किंवा सांगितलेही असेल, आणि नंतर....

मागचा इतिहास आणि कर्तुत्व बघता, फ्रॉड निदर्शनास आणून देणार्‍यास( देशद्रोह्यास) काय बक्षिस मिळाले असते?

भरत यांनी दिलेल्या ट्विट लिंक मधे एक २००२ च्या बातमीची लिंक दिसली. नॉन बेलेबर वॉरंट होते, नंतर समझौता झाला असे दिसते.
https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/gautam-adani...

देश प्रेम म्हणजे .
मुस्लिम द्वेष.
सरकार च्य चुकीच्या निर्णयाचे पण स्वागत करणे.

बँका बुडाल्या, तरी त्या विरुद्ध बोलायचे नाही .
असे बोलणारा देशप्रेमी नसतो.
उद्योगपती मित्र जो काही आर्थिक घोटाळा करत आहेत त्या मागे फक्त देशप्रेम हीच भावना आहे.
असले विचित्र विचार bjp samarthak लोक आणि मीडिया ह्यांचे असतात.

Adani oops, shahani manase kortachi payari chadhat nahit.

(Phone war dev nagri lihita yet nahiy, sorry.)

Pages