हिंडेनबर्ग या न्यूयॉर्कच्या शॉर्ट सेलर ने दोन वर्षे विविध लोकांच्या मुखाखती घेऊन, ज्यात अदानीकडे पूर्वी काम करणारे लोकही समाविष्ट आहेत, पब्लिक डोमेन मधील विखुरलेली माहिती एकत्र करुन, अर्धा डझन देशांतील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन आणि हजारो कागदपत्रांची छाननी करुन १७.८ ट्रिलअन रुपये (२१८ बिलिअन अमेरिकन डॉलर) मूल्यांकन असलेल्या अदानी समुहावर शेअर्सच्या किमती निश्चित करणे आणि अकाउंटिंग फ्रॉड असे अनेक अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
गौतम अदानी याची संपत्ती गेल्या तीन वर्षांत चक्रवाढ गतीने वाढून २० बिलियन ची १२० बिलियन झाली, आणि त्याच काळात अदानी गृपच्या ७ महत्त्वाच्या शेअर्सची किंमत तब्बल ८१९% वाढली आहे. अदानी कंपन्यांचे फंडामेंटल फारच तकलादू असल्याने या प्रचंड मूल्यांकनामुळे एकुणच त्या कंपन्यांतील गुंतवणूक function at() { [native code] }यंंत धोकादायक आहे. अदानी ग्रुपहा कौटुंबिक व्यवसायासारखा लागेबांधे ठेवून चालू असल्याचा दावा ही अहवालात आहे.
गौतम अदानी, त्यांचे भाऊबंद, मेव्हणे, जावई इ. इ. लोकांनी परदेशात, जेथे करसवलती आहेत तिकडे कशा बेनामी कंपन्या काढल्या आणि तिकडून पैसे कसे सायफन करुन गैरव्यवहार केले हे वाचलं तरी भिती वाटते. अदानी कुटुंबातील अनेकांवर पूर्वी सेबीने कारवाई केली आहे, अनेकांनी तुरुंगाची हवा खाल्ली आहे पण नंतर त्या सर्वांची पदन्नती होऊन ते सगळे आता डायरेक्टर इ. झाले आहेत.
सविस्तर अहवाल इथे बघता येईल. https://hindenburgresearch.com/adani/
बराच मोठा अहवाल आहे. त्यात एकाच व्यक्तीच्या १४ कंपन्या आहेत, त्यांचं डोमन नेम एकाच दिवशी रजिस्टर झालं आहे, अनेकांच्या वेबसाईट तंतोतंत जुळणार्या आहेत, त्यातील एकाने अदानीला काही शे मिलियन डॉलरचं कर्ज दिलं आहे. ती चांदीच्या व्यापारात कंपनी आहे, पण त्यांच्या फाईलिंग रिपोर्ट नुसार त्या कंपनीत शून्य लोक काम करतात, त्यांचं ऑफिस मोडकळीला आलेल्या इमारतीत कायम स्वरुपी बंद आहे, आणि तिकडे गिचमिड अक्षरांत संपर्काचा दूरध्वनी क्रमांक दिला आहे अशा अनेक रंजक आणि सिनेमातील वाटतील अशा कथा आहेत.
हा रिपोर्ट आल्यावर अदानी कंपन्याचे शेअर्सची घसरगुंडी झाली नसती तरच नवल. त्यांचा एफपीओ जो ११२% (ओव्हर सबस्काईब) झालेला तो ही काल मागे घेतला आहे. क्रेडीट स्विसने अदानी बॉंड इ. नाकारण्यास सुरुवात केली आहे.
हिंडेनबर्ग रिपोर्ट, अदानी आणि त्याचे भारतीय गुंतवणुकीवर, सेबीवर पडणारे पडसाद याची चर्चा करायला हा धागा.
दामोदरन हे सेबी आणि युटीआयचे
दामोदरन हे सेबी आणि युटीआयचे पुर्वअध्यक्ष आहेत. करण थापर ने मुलाखत घेतली आहे.
ह्यात त्यांचा मुद्दा पटला, की सेबी इत्यादी रेग्युलेटर चे लक्ष जेव्हा हे शेअर्स अतिशय वेगाने वाढत होते तेव्हाच जायला हवे होते. तसे म्हणले तर हिंडणबर्ग ने फक्त मांजराच्या गळ्यात घंटा बांधायचे काम केले आहे.
मला सुद्धा काहीसे असेच वाटलेले. लहान ऑडिटर असणे, जास्त लेव्हरेज असणे ह्या गोष्टी सेबीने बघण्याचे काही कारण दिसत नाही. राहिली गोष्ट शेल कंपन्यांकडून भाव वाढवून ठेवायची, हे सेबीच्या अखत्यारित आहे आणि त्यांना समजणे अपेक्षित आहे.
आजिबात स्पेक्युलेशन नाही आणि काळजीपूर्वक तोलून मापून बोलणे आहे, बघण्यासारखी मुलाखत.
Not Convinced by Hindenburg But Adani Claim of Attack on India Is Wrong: M Damodaran
https://www.youtube.com/watch?v=_65PYAnyQXc
हाच दामू आत्ता सेबीचा अध्यक्ष
हाच दामू आत्ता सेबीचा अध्यक्ष असता तर?
अर्थस्य पुरूषो दासो दासस्त्वर्थो न कस्यचित्।
इति सत्यं महाराज बद्धोस्म्यर्थेन कौरवैः।।. इत्यादी.
The Adani Enterprises issue
The Adani Enterprises issue reached the Supreme Court of India after a public interest litigation was filed seeking an investigation against US-based firm Hindenburg Research, whose report led to a massive plunge in the value of Adani Group shares in the stock market.
पी आ य एल दाखल केली आहे एम
पी आ य एल दाखल केली आहे एम एल शर्मा यांनी. त्यांनी याआ धी कशाकशावर पी आय एल दाखल केल्या होत्या , ते बघा. तसंच ते एका गाजलेल्या वाईट केसमध्ये आरोपींचे वकील होते. त्यांनी काय काय मुक्ताफळे उधळली होती ते शोधा.
.....known among lawyers for being the first to approach the court on any burning issue. His petitions are always poorly drafted and lack substance or legal backing. By virtue of being the first to file a petition in court, he makes his way to daily headlines and fame.
ऑडिटर फर्म लहान-मोठी
ऑडिटर फर्म लहान-मोठी महत्वाचे नाही, योग्य पद्धतीने ऑडिट होणे महत्वाचे. तशी तर आर्थर अँडरसनही मोठी फर्म होती पण दिवे लावायचे ते लावलेच.
अदानी समुहाशी जगभरातील वेगवेगळ्या बँकाचे कर्जाचे व्यवहार आहेत, परदेशातील कंपन्यांनी गुंतवणूक/भागीदारी स्वरुपाचे संबंध जोडलेत. अशावेळी 'केवळ भारतीय उद्योग समूह असा आकस ठेवून मुद्दाम टार्गेट केले' इतके साधे-सोपे हे प्रकरण असेल का असाही विचार भक्त मंडळी करत नाहीत.
भक्त? ते पक्षाचं अधिकृत
भक्त? ते पक्षाचं अधिकृत नॅरेटिव्ह आहे. वर मी बिजयंत पांडांच्या लिंकची ट्वीट दिली आहे. ते राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.
कॉन्स्पिरसी थियरी मांडणारा लेख ऑर्गनायझरने छापलाय.
अर्थात सगळ्याच वाद-प्रकरणांत हेच ऑर्ग्युमेंट केलं जातं आणि ते खपवून घेतलं जातं.
भक्त मंडळी सुद्धा अनेकदा हे खोटं आहे हे माहीत असूनही रेटत राहतात.
कोणी का असेना कोर्टात तर गेले
कोणी का असेना कोर्टात तर गेले. त्या निमित्ताने अदानी च्या भानगडींची चर्चा तर होईल. नाही तर सगळेच डोळ्यावर झापड आणून बसले आहेत. आणि बोलके पोपट रात्री ९.०० वाजता सांगतच आहेत टीव्हीवर की अदानी किती महान देशभक्त आहे म्हणून.
होय स्वाती, बरोबर. फर्म लहान
होय स्वाती, बरोबर. फर्म लहान असली तरी लिस्टेड कंपनीचे ऑडिट करतात म्हणजे क्वालिटी कंट्रोल, NFRA ओवरसाईट, पिअर रिव्ह्यू हे सगळे सोबत आलेच. आता हे सगळे असून सुध्दा खराब ऑडिट असू शकते हे खरेच.
भारताला टार्गेट केले हे आजिबात पटत नाही.
रिसर्व बँकेने सगळ्या बँकांकडून अडाणी ग्रुप मध्ये किती एक्सपोजर आहे माहिती गोळा केली आहे.
SBI - चेअरमन -
-एकूण कर्जांपैकी <१% कर्ज अडाणी ग्रुपला.
-शेअर्स ठेऊन कर्ज दिले नाहीये.
- कर्ज दिले आहे त्या संस्थांचा कॅश फ्लो पाहता चिंतेचे कारण दिसत नाही.
https://www.moneycontrol.com/news/business/sbi-chairman-our-exposure-to-...
कॉमी, चांगली लिंक दिलीत.
कॉमी, चांगली लिंक दिलीत. दामोदरन आणि करन थापरची. खुपच लेवल हेडेड वाटतात दामोदरन. बरेच मुद्दे मांडले ते कॉमन सेन्सचे होते आणि महत्वाचे म्हणजे थापरांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं ह्यात मिडिया, कॉमन माणूस ह्यांच्या असलेल्या धारणा वर्सेस सेबि, सरकार ह्यांचे खरे काम, पब्लिक स्टेटमेंट्स देणे न देणे ह्या मागचे लॉजिक ह्यातली तफावत दिसून येते.
पुढे जाऊन सध्या एफ टि एक्स चे अगदी रिसेंट उदाहरण आहेच.
दामोदरनांच्या मते लाँग टर्म इफेक्ट नाही होणार भारताचा इन्वेस्टमेंट डेस्टिनेशन म्हणून रेप्युटेशनवर. जे एकून बरं वाटलं. त्यात सेन्स पण आहे कारण शेवटी इन्वेस्टर लोकांना जिथे ग्रोथ आहे, तिथे इन्वेस्ट करायचे आहे. फ्रॉड विषयी सुद्धा उत्तर रोखठोक दिलं त्यांनी. ते म्हणाले जी लोकं भारतीय रेग्युलेटरी सिस्टमवर ताशेरे ओढत आहेत आणि क्वालिटी चांगली नाही म्हणत आहेत त्यांनी एन्रॉन, वर्ल्डकॉम ही उदाहरणं पण लक्षात घ्यावी.
चिंतेची बाब म्हणजे दामोदरन म्हणाले की आर बि आय नी, बँकांना तुमचे अडानी समूहाशी निगडीत एक्स्पोजर किती आहे ते आम्हाला कळवा असे कसं काय सांगितले. कारण ही माहिती त्यांच्याकडे आधी पासून असते/असायला पाहिजे.
अजून एक गोष्ट ते म्हणाले की, कोणीतरी संसदेत अनाऊन्स केले की अडानी कंपनीजवर २०२१ पासून इन्वेस्टिगेशन सुरु आहे. पुढे जाऊन ते म्हणतात की सेबि आता काय अनाऊन्स करतं त्या पेक्षा इन्वेस्टिगेशनचे काम किती वेगात पार पडतं ह्यावर खरं भारताच्या रेग्युलेटरी सिस्टमच्या रेप्युटेशन अवलंबून आहे. हे एकदम बरोबर वाटलं कारण मॅटर रेंगाळणे हे भारतातल्या नुसत्या रेग्युलेटरीच नाही तर इतर सगळ्यांच सिस्टम्सची खासियत आहे.
मोदिभक्त पाल्हाळिक बुवांची
मोदिभक्त पाल्हाळिक बुवांची यू ट्यूब वर कमतरता नाही. 'घाल पाणी, कर कालच्यावाणी', हेच त्यांचे ब्रीदवाक्य. अडानी प्रकरणावर ते काय बोलणार याचा अंदाज होताच, आणी तो खराही निघाला.
https://www.youtube.com/watch?v=Tn8AWywz47o
निद्रानाश असलेल्यांनी आवर्जून पहावा.
भाऊ तोरसकरनी ह्या विषयावर
भाऊ तोरसकरनी ह्या विषयावर काही मत प्रदर्शित केले आहे की नाही
भक्त,it सेल वाले,अर्णव सारखे
भक्त,it सेल वाले,अर्णव सारखे गोदी मीडिया ह्यांचे एक वाक्य,वाचले.
किंवा फक्त ह्यांचे व्हिडिओ ओपन जरी झाले
तरी डोकं उठते .
फक्त बिनडोक पना.
ह्या शिवाय काही नसते.
भारतात अनेक लोक अडाणी आहेत त्या मुळे ते ह्यांच्या प्रचाराला बळी पडतात.
उत्तर भारतीय .
दक्षिण भारत ह्यांना कधीच किंमत देत नाही.
महाराष्ट्र मध्ये ह्यांचे जास्त लाड कोणी करत नाही..
भक्त,it सेल वाले,अर्णव सारखे
भक्त,it सेल वाले,अर्णव सारखे गोदी मीडिया ह्यांचे एक वाक्य,वाचले.
किंवा फक्त ह्यांचे व्हिडिओ ओपन जरी झाले
तरी डोकं उठते .
फक्त बिनडोक पना.
ह्या शिवाय काही नसते.
भारतात अनेक लोक अडाणी आहेत त्या मुळे ते ह्यांच्या प्रचाराला बळी पडतात.
उत्तर भारतीय .
दक्षिण भारत ह्यांना कधीच किंमत देत नाही.
महाराष्ट्र मध्ये ह्यांचे जास्त लाड कोणी करत नाही..
अडाण्याचा गाडा कोण आणि कसे
अडाण्याचा गाडा कोण आणि कसे चालवतो ह्याची माहिती
https://www.aksharnama.com/client/article_detail/6556
काल अदाणी पोर्ट्स आणि अदाणी
काल अदाणी पोर्ट्स आणि अदाणी ग्रीन एनर्जी या दोन कंपन्यांनी समभाग तारण ठेवून घेतलेली ९२१५ कोटीची कर्जे मुदतीआधी फे डण्याची घोषणा केली आहे.
तारण शेअर सोडवून अदानी आपली
तारण शेअर सोडवून अदानी आपली आर्थिक मजबूत असल्याचे दाखवतो. त्याच्या कंपनीच्या बाँडला कोणी विचारणार नाही ह्याची भीती वाटल्याने हे उसने अवसान आणले आहे.
भाऊ तोरसकरनी ह्या विषयावर
भाऊ तोरसकरनी ह्या विषयावर काही मत प्रदर्शित केले आहे की नाही Wink
आयटी सेल चा च तोरसकर भाग आहे.
आयटी सेल ची यंत्रणा आहे वरून जो पर्यंत आदेश येत नाही तो पर्यंत तो मत व्यक्त करणार नाही
काय मत व्यक्त करायचे हे पण आयटी सेल च ठरवतो .
त्या मुळे बघा सर्व भक्तांचे प्रतिसाद,मत एक सारखीच असतात.
हिनडेनबर्ग आणि आदनी ह्यांच्या
हिनडेनबर्ग आणि आदनी ह्यांच्या शी भारतीय नागरिकांचा काही संबंध नाही.
पण भारतीय नागरिक आर्थिक बाबतीत अस्थिर होत आहेत,
त्यांचे पैसे सुरक्षित नाहीत..
हे दोन्ही प्रश्न देशांशी निगडित आहेत.
भारताची सर्व संपत्ती जी १३०, कोटी लोकांच्या मालकीची आहे ती एकच अडाणी कडे कशी जात आहे?
सरकारी मदती शिवाय हे घडणे अशक्य आहे.
मोदी च ह्या प्रकरणं शी काय संबंध असे बिनडोक भक्त विचारात असतात.
पण मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत.
१३० कोटी लोकांची जबाबदारी त्यांच्या वर आहे.
सर्वांच्या हक्काचे रक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.
त्या साठी च हजारो करोड देश मोदी वर खर्च करतो.
त्यांनी त्यांचे कर्तव्य नीट केले असते तर.
एक अडाणी नाही तर लाखो उद्योग पती देशात निर्माण झाले असते.
लाखो उद्योग पती चा हक्क मारून फक्त अडाणी आणि एक दोन मित्र ह्यांस सरकार सरळ सर्व नियम मोडून मदत करत आहे.
नियम मोडले की गैर व्यवहार होतात.
तेच गैर व्याहवर hindenberg नी बाहेर काढले आहेत.
सरकार त्या मध्ये जबाब देही आहे.
भक्त हे मेंदू नसलेले मानव प्राणी आहेत.
त्यांना अडाणी शी काही देणेघेणे आहे ना देशांशी देणेघेणे आहे.
त्यांना फक्त शेठ शी देणेघेणे आहे.
अडाणी शून्यातून वर गेलेले उद्योग पती त्यांचा अभिमान आहे.
गोरी लोक भारता वर जळतात एक भारतीय उद्योगपती जगातील सर्वात श्रीमंत होत आहे ते त्यांस बघवत नाही.
म्हणून hindenberg नी अडाणी ची बदनामी केली भारतावर हल्ला केला.
मोदी च काय संबंध ह्या प्रकरणाशी(जसे मोदी जे निरागस बाळ च आहे)
असे बिनडोक मेसेज भक्त सर्रास करत आहेत.
एक इमॅजिन करा .
उद्या अडाणी नी मोदी सरकार कसे भ्रष्ट आहे.
मोदी कसे गैर व्यवहार करतात .
ह्या वर भाष्य केले.
की आज जे aadani प्रेमी बिनडोक भक्त आहेत.
ते सर्व अडाणी कसे देशाला धोकादायक आहेत.
हे लोकांस पटवून देण्याचा आटापिटा करतील.
अडाण्याचा गाडा कोण आणि कसे
अडाण्याचा गाडा कोण आणि कसे चालवतो ह्याची माहिती
https://www.aksharnama.com/client/
लिंक वाचली.
बरीच माहिती मिळाली आणि अडाणी हे नक्की च गैर व्यवहार करत आहेत.
ह्याची खात्री पटली.
अडाणी ह्याना पत वाचवायची असेल आणि त्यांची बाजू सत्य असेल तर त्यांनी अमेरिका मधील न्यायालयात hindenberg वर अब्रू नुकसानीची दावा करावा.
भारत सरकार नी सर्व संबंधित सरकारी यंत्रणांना सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावेत.
त्या मुळे भारताची पत टिकून राहील.
विरोधी पक्ष सह एक सर्व पक्ष सदस्य असणारी समिती नेमून त्यांच्या कडे हे प्रकरण द्यावे
वॅनगार्डच्या इमर्जिंग मार्केट
वॅनगार्डच्या इमर्जिंग मार्केट इंडेक्स फंड ची अदानी समुहात गुंतवणूक आहे आणि ब्लॅकरॉकची अदानीच्या कर्जरोख्यात गुंतवणूक आहे. वॅनगार्ड आणि ब्लॅकरॉक दोन्ही मोठी नावं, बर्याच अमेरीकन जनतेचे रिटायरमेंटसाठीची गुंतवणूक- 401k वगैरे यांच्या म्युच्युअल फंडांतून, इटीफ मधून केली जाते. तेव्हा भारतीय उद्योग समुह म्हणून मुद्दाम ... वगैरेला काही अर्थ नाही. जागतिकीकरणाच्या जमान्यात कुठल्यातरी अमेरीकन खेड्यातील माणसाची गुंतवणूक ही भारत, थायलंड, मलेशिया येथील उद्योगसमुहांच्या यशावर अवलंबून असते. त्या सामान्य व्यक्तीला गुंतवणूक करताना परतावा काय हे महत्वाचे. त्यातही सामान्य मार्केट सायकल म्हणून एखादे वर्ष परतावा निगेटिव येणे वेगळे आणि हा प्रांत विश्वासार्हच नाही असे वाटू लागणे वेगळे. त्यामुळे अदानी म्हणजे भारत नाही हे स्पष्टपणे सांगणे महत्वाचे.
स्वाती२ +१
स्वाती२ +१
वॅनगार्डची टॉप २० होल्डर्स पैकी आहे. त्यांचा अदानीत ०.७५% स्टेक आहे. त्यांनी अजुन नुस्कानीचा अंदाज दिलेला नाही पण ४०१के चा फटका जास्त पसरू न देणे आणि अदानी - भारत - नाही हे स्पष्ट करणे बद्दल ही +१.
देशाच्या संपत्ती वर स्वतः
.
ही एक भारतात गुंतवणुकी बद्दल
ही एक भारतात गुंतवणुकी बद्दल पॉझिटिव पोस्ट
https://www.cnbc.com/2023/02/07/mark-mobius-says-big-problems-at-adani-p...
आणि हे एक रत्न सापडले. एकंदरीत खूपच घोळ आहे असे वाटू लागलेय.
https://qz.com/a-pandora-papers-ex-banker-is-adanis-man-in-london-185008...
अदानी आयसोलटेड केस म्हणुन
अदानी आयसोलटेड केस म्हणुन बघताहेत ते चांगले आहे.
दुसरी बातमी बघुन चक्रावल्या सारखे झाले. काय हे!
इथे इंग्लंडच्या कंपनीज हाऊसमध्ये त्या १२४ कंपनीची यादी आहे.
ADANI ENERGY TWO HOLDINGS LIMITED ते ADANI ENERGY FOURTEEN HOLDINGS LIMITED अशी कंपनीची नावे कशी काय रजिस्टर्ड करता आली /करू दिली याचंही आश्चर्यच वाटतंय.
(Companies house does not verify the accuracy of the information filed असा वर disclaimer आहे, पण अशी आणि एवढी नावे.)
प्रोफेसर अस्वथ दामोदरन यांचे
प्रोफेसर अस्वथ दामोदरन (Popularly known as "Dean of Valuation") यांचे अदानी कंपनीचे विश्लेषण
https://youtu.be/oVGJeBe_xGA
ब्लॉग पोस्ट
https://aswathdamodaran.blogspot.com/2023/02/control-and-complexity-deco...
'इंडिया टुडे'मधील मुलाखत
https://www.indiatoday.in/business/video/hindenburg-charge-a-hyperbole-p...
(No subject)
तिन्ही बाबींचा पुरावा द्याल
तिन्ही बाबींचा पुरावा द्याल का ?
>>तिन्ही बाबींचा पुरावा द्याल
>>तिन्ही बाबींचा पुरावा द्याल का ?
Not True:
https://www.livemint.com/news/world/is-hindenburg-research-under-investi...
अदाणीने काही कर्ज मुदतीआधी
अदाणीने काही कर्ज मुदतीआधी फेडल्याची बातमी आली होती. त्यात ली किमान निम्मी कर्जे मार्जिन कॉलमुळे लवकर फेडावी लागली.
https://www.reuters.com/world/india/indias-adani-faced-margin-call-11-bl...
Nationalist Narrative, Same
Nationalist Narrative, Same Spelling Error: How Fake News Chains on Hindenburg-Adani Used Twitter
https://thewire.in/politics/nationalist-narrative-same-spelling-error-tw...
Pages