हिंडेनबर्ग या न्यूयॉर्कच्या शॉर्ट सेलर ने दोन वर्षे विविध लोकांच्या मुखाखती घेऊन, ज्यात अदानीकडे पूर्वी काम करणारे लोकही समाविष्ट आहेत, पब्लिक डोमेन मधील विखुरलेली माहिती एकत्र करुन, अर्धा डझन देशांतील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन आणि हजारो कागदपत्रांची छाननी करुन १७.८ ट्रिलअन रुपये (२१८ बिलिअन अमेरिकन डॉलर) मूल्यांकन असलेल्या अदानी समुहावर शेअर्सच्या किमती निश्चित करणे आणि अकाउंटिंग फ्रॉड असे अनेक अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
गौतम अदानी याची संपत्ती गेल्या तीन वर्षांत चक्रवाढ गतीने वाढून २० बिलियन ची १२० बिलियन झाली, आणि त्याच काळात अदानी गृपच्या ७ महत्त्वाच्या शेअर्सची किंमत तब्बल ८१९% वाढली आहे. अदानी कंपन्यांचे फंडामेंटल फारच तकलादू असल्याने या प्रचंड मूल्यांकनामुळे एकुणच त्या कंपन्यांतील गुंतवणूक function at() { [native code] }यंंत धोकादायक आहे. अदानी ग्रुपहा कौटुंबिक व्यवसायासारखा लागेबांधे ठेवून चालू असल्याचा दावा ही अहवालात आहे.
गौतम अदानी, त्यांचे भाऊबंद, मेव्हणे, जावई इ. इ. लोकांनी परदेशात, जेथे करसवलती आहेत तिकडे कशा बेनामी कंपन्या काढल्या आणि तिकडून पैसे कसे सायफन करुन गैरव्यवहार केले हे वाचलं तरी भिती वाटते. अदानी कुटुंबातील अनेकांवर पूर्वी सेबीने कारवाई केली आहे, अनेकांनी तुरुंगाची हवा खाल्ली आहे पण नंतर त्या सर्वांची पदन्नती होऊन ते सगळे आता डायरेक्टर इ. झाले आहेत.
सविस्तर अहवाल इथे बघता येईल. https://hindenburgresearch.com/adani/
बराच मोठा अहवाल आहे. त्यात एकाच व्यक्तीच्या १४ कंपन्या आहेत, त्यांचं डोमन नेम एकाच दिवशी रजिस्टर झालं आहे, अनेकांच्या वेबसाईट तंतोतंत जुळणार्या आहेत, त्यातील एकाने अदानीला काही शे मिलियन डॉलरचं कर्ज दिलं आहे. ती चांदीच्या व्यापारात कंपनी आहे, पण त्यांच्या फाईलिंग रिपोर्ट नुसार त्या कंपनीत शून्य लोक काम करतात, त्यांचं ऑफिस मोडकळीला आलेल्या इमारतीत कायम स्वरुपी बंद आहे, आणि तिकडे गिचमिड अक्षरांत संपर्काचा दूरध्वनी क्रमांक दिला आहे अशा अनेक रंजक आणि सिनेमातील वाटतील अशा कथा आहेत.
हा रिपोर्ट आल्यावर अदानी कंपन्याचे शेअर्सची घसरगुंडी झाली नसती तरच नवल. त्यांचा एफपीओ जो ११२% (ओव्हर सबस्काईब) झालेला तो ही काल मागे घेतला आहे. क्रेडीट स्विसने अदानी बॉंड इ. नाकारण्यास सुरुवात केली आहे.
हिंडेनबर्ग रिपोर्ट, अदानी आणि त्याचे भारतीय गुंतवणुकीवर, सेबीवर पडणारे पडसाद याची चर्चा करायला हा धागा.
त्यामुळे ठेवीदारांना कव्हर
त्यामुळे ठेवीदारांना कव्हर करण्यात मला फार चूक वाटत नाही. +१ >> हे चुक आहे
उद्या ५० बॅका डुबल्या तर सगळ्याना कव्हर करायला पैसे आहेत का? आणि नाही केले तर लॉ सुट आहेतच. एकाला दिले तर आम्हाला का नाही. मग असे असेल तर २५०,००० कायदाच का केला. बॅका कडुन ईन्सुरान्स चे प्रिमियम तर २५०,००० प्रमाणेच घेतले ना.
ज्याचे पैसे गेले त्याचाबद्दल सहानभुती आहेच. त्याचा काही दोष नाही. पण कधी कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात.
ये भी ठीक आहे. न पटण्यासारखे
ये भी ठीक आहे. न पटण्यासारखे काहीच नाही. पण जेव्हा काही लोकांचे पैसे बुडाल्याने मोठ्या संख्येने लोकांचे नुकसान होऊ शकते तेथे सरकार बेल आउट करते एरव्हीही. २००८ मधे जीएम व इतर कंपन्यांना केले. त्यामुळे हे सब्जेक्टिव्हली केले जाते असेच चित्र दिसते.
अडानी म्हणजे भारतीय सिस्टीम,
अडानी म्हणजे भारतीय सिस्टीम, भारत हा संबंध भक्तांनी नाही तर पुरोगाम्यांनी जोडला. अदानी प्रकरणावरून पूर्ण सिस्टीमवर प्रश्नचिन्ह उभं करणं, भारतीय सिस्टीम सरसकट weak/ corrupt ठरवणं, मग पूर्ण stock market, LIC SBI बाकीच्या बँका सगळे आता कधीही मरतील अशा अवस्थेत असल्याची प्रेडिक्शन्स gloating करत सांगणं. आता ज्या forbes, credit suisse शी आमचा संबंध नाही म्हणतात त्यांच्या लिंक्स कौतुकाने देणं इत्यादी.
पण आता परदेशातील सिस्टिम्स, त्यांचे watchdogs, तथाकथित बिग फोर ऑडिटर्स, बायडनचा fdic निर्णय आणि संबंधित लॉबिंगचे आरोप यामुळे भारतावर बोट रोखणाऱ्यांना , gloat करणार्यांना स्वतःच्या घरात बघायची गरज आहे. SVB सीईओ san Francisco फेडरल बोर्डावर होता आता त्याला हाकललं आहे. 27 फेब ला त्याने साडेतीन मिलियन डॉलर्सचे शेअर विकले. लब्बाड! क्रेडिट स्विसमध्ये आता स्विस सरकार पैसे ओतून बसलं आहे कारण इतर कोणी तर मदत करायला तयार नाही. फर्स्ट रिपब्लिक बँक या आणखी एका अमेरिकन बँकेला वाचवायला अमेरिकन सरकार सर्व तयारीने उतरून deal करून देत आहे.
तिकडे भारतीय इकॉनॉमीच्या बाबतीत मात्र 'ही जखम अशीच वाहत राहिली तर म्हैस चारपाच मिनिटात मरेल' हे पुरोगाम्यांचं wishful thinking खरं झालेलं नाही. म्हैस उठून पुढे चालू लागली.
ऑडिट करणारे खरेच प्रामाणिक
ऑडिट करणारे खरेच प्रामाणिक पने त्यांचे काम करत नाहीत असे मला तरी वाटत.
कारण भारतात पण अगोदर अनेक कंपन्या,बँका ह्या दिवाळखोरीत गेल्या अचानक.
वार्षिक रिपोर्ट मध्ये खूप मोठ्या profit मध्ये दाखवल्या गेल्या होत्या होत्या त्या नंतर दोनतीन महिन्यात च बुडाल्या.
घोटाळे कसे लपवायचे हे च काम ऑडिट वाले करत आहेत.
RBI ला pan प्रतेक वेळेस बँक बुडल्या वर च माहीत पडते ह्या बँकेत घोटाळा झाला आहे ते अगोदर ह्यांना कधीच माहीत पडत नाही.
दिलेल्या कर्जावर येणार कथित व्याज पण इन्कम मध्ये पहिले जोडले जायचे.
ते व्याज आलेले नसायचे येईल किंवा येणार आहे असे समजून इन्कम मध्ये जोडले जायचे.
रघुराज न नी हा प्रकार बंद केला होता .
हर्षद मेहता sbi चेच पैसे शेअर बाजारात लावून .
ठराविक शेअर चे भाव पाडत आहे किंवा चढवत आहे.
हे गळ्याला येई पर्यंत ना rbi च्या लक्षात आले ना सेबी च्या
'Modani' scam.
'Modani' scam.
जितके वेळा खोटं लिहिलं जाईल,
जितके वेळा खोटं लिहिलं जाईल, तितके वेळा ते खोटं आहे , हे सांगितलं जाईल. Lies Lies and damn lies.
This is not merely an unwarranted attack on any specific company but a calculated attack on
India, the independence, integrity and quality of Indian institutions, and the growth story and
ambition of India.
हे अदाणीच्या तथाकथित रिस्पॉन्स मधून. हीच लाइन भाजपच्या इको सिस्टमने उचलली. आपल्या मालकाच्या मालकाला एक्स्पोज केल्याने आय टी सेल जास्तच चेकाळला आणि चवताळला.
एका खाजगी कंपनीचा , भारतीय नागरिक नसलेला, भारतात राहत नसलेला अधिकारी बोलताना शेजारी भारताचा झेंडा कशाला ठेवतो?
अडानी म्हणजे भारतीय सिस्टीम,
अडानी म्हणजे भारतीय सिस्टीम, भारत हा संबंध भक्तांनी नाही तर पुरोगाम्यांनी जोडला. >> अदानी घोटाळ्याचा जास्त अभ्यास केला नाहिये त्यामुळं अदानीनं दिलेलं प्रेस रिलीज वाचलेलं नसेलच..
पण आता परदेशातील सिस्टिम्स, त्यांचे watchdogs, तथाकथित बिग फोर ऑडिटर्स, बायडनचा fdic निर्णय आणि संबंधित लॉबिंगचे आरोप यामुळे भारतावर बोट रोखणाऱ्यांना , gloat करणार्यांना स्वतःच्या घरात बघायची गरज आहे. >> बरोबर आहे.. त्यांनी तिकडंही बघितलं पाहिजे. पण त्यांनी ते केलं तरी अमेरिकेत त्यांना कोणी देशद्रोही म्हणणार नाहीत हे नक्की आहे..
शिवाय त्यांनीच बघितलं पाहिजे असं नाही. तुम्ही तुमची कंपनी चालू करा आणि हे करा... तुम्हालाही आपली (बेगडी) देशभक्ती दाखवायची संधी मिळेल.
जाता जाता.. तुमच्या लाडक्या भाजपाच्याच मोहनदास पै यांनी भारत सोडून बाहेर जाणार्यांना काय म्हटलं आहे ते एकदा वाचून घ्या..
https://scroll.in/latest
https://scroll.in/latest/1045742/nobel-panel-member-clarifies-that-he-di...
मुघले -फेक-न्यूज
आपल्या देशातील मीडिया नी
आपल्या देशातील मीडिया नी स्वतःला विकले आहे.
जवळ जवळ सर्व न्यूज चॅनल.
टाइम्स आणि असे बरेच ग्रुप
बिलकुल विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत. एक विशिष्ट community (धर्म नाही)
ह्याचीच लाल हे करत असतात .
आणि बदनाम मात्र पूर्ण देशाला करत असतात.
उघडा डोळे बघा नीट.
सरकार चे सर्व गैर धंदे भारतीय मीडिया ला दिसत नाहीत
म्हणून hindenberg ला ती जबाबदारी घ्यावी लागली
>तिकडे भारतीय इकॉनॉमीच्या
>तिकडे भारतीय इकॉनॉमीच्या बाबतीत मात्र 'ही जखम अशीच वाहत राहिली तर म्हैस चारपाच मिनिटात मरेल' हे पुरोगाम्यांचं wishful thinking खरं झालेलं नाही. म्हैस उठून पुढे चालू लागली.
नेहेमीप्रमाणे कांगावा ! आमचे सर्व नातेवाईक , मित्र भारतातच आहेत आणी भारतीय (किंवा इतर कोणत्याही) इकॉनॉमी ची वाट लागो म्हणून आम्ही देवाला साकडे घालत नाही. ते मोदीभक्तांचे लक्षण. सिलेंडर महाग झाला अशी तक्रार केली की मग लगेच पाकिस्तान च्या दिवाळखोरीच्या बातम्या देतात व चघळतात.
आणी अडानी ची म्हैस खरेच चालू लागली असेल तर कॅबिनेट मंत्र्यापासून दोन रुपये ट्रोल सारे राहूल गांधींवर का भुंकत आहेत ?
मूळ विषयाकडे.
बोफोर्स प्रकरण झाले तेव्हा गुरूमूर्ती, शौरी यांनी लावून धरले होते. ते रोज काही प्रश्न विचारत, ते प्रश्न इन्डियन एक्स्प्रेस मध्ये येत. इतर ही वृत्तपत्रे प्रसिद्धी देत. पोस्ट कार्ड लिहायची मोहीम ही होती. ही वृत्तपत्रे सरकार ला घाबरत नसत.
आज गोदी मेडिया मध्ये ही हिंमत नाही. आर्णव तर टीवी वर कोकलत होता की म्हैस चालू लागली !
https://twitter.com/ysathishreddy/status/1630808825073917952
सिलिकॉन व्हॅली बॅंक
सिलिकॉन व्हॅली बॅंक बुडाल्याची आनंद होणं हे कसलं लक्षण म्हणावं?
कुलकर्णी आणि
कुलकर्णी आणि सत्यप्रयोगानंदांना कधीच खरं बोलता येत नाही का?
टाईमलाईन स्वतः verify करा- २४ २५ जानेवारीला हिंडर्नबर्गने रिपोर्ट रिलीज केला. ताबडतोब भारतीय पुरोगामी व Soros payroll वाल्यानी भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह व इतर narrative सुरू केलं. अदानी गृपने त्यानंतर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली.
आता भक्तांना आनंद कोणतीही बँक बुडल्याचा नसून भारताच्या वाईटावर टपलेले पुरोगामी तोंडावर आपटल्याचा आहे. परकीय गुंतवणूक आता येणारच नाही, सगळी इकॉनॉमी कोसळेल, लोकांच्या नोकऱ्या गेल्यातच जमा- काय वाट्टेल ते स्वप्नरंजन या धाग्यावरही झालेलं आहे.
> मॅडम तुम्ही कुठे कॅपिटल
> मॅडम तुम्ही कुठे कॅपिटल मार्केटमध्ये काम करता का? छान छान.
अशी शेरेबाजी टाळावी, निदान मोदीभक्तांनी तरी.
वस्तुतः जे लिहिले आहे ते इतके बाळबोध आहे की त्यासाठी कॅपिटल मार्केट मध्ये काम करत असणेही जरूरीचे नाही. मेंदूत मोदीभक्तीची जळमटे नसली की पुरे. दुर्दैवाने एकदा मोदीभक्त झाले की मग Hallucinations सुरू होतात, मोदींवर टीका करणारे सारेच भारताच्या अधोगतीसठी देव पाण्यात बुडवून बसले आहेत वगैरे. शिवाय कॅपिटल मार्केट्स मधले बेसिक सुद्धा समजत नसले तरीही इतरांना असे टोमणे मारायचा आत्मविश्वासही येतो. असो.
Hit by Hindenburg Research's
Hit by Hindenburg Research's stinging report, Adani Group has reportedly suspended work on a Rs 34,900 crore petrochemical project in Gujarat's Mundra. In 2021, Gautam Adani-led group's flagship firm Adani Enterprises Ltd (AEL) incorporated a wholly-owned subsidiary - Mundra Petrochem Ltd - for setting up a greenfield coal-to-PVC plant at Adani Ports and Special Economic Zone (APSEZ) land in the Kutch district of Gujarat.
Now, a report suggests that the group has decided not to pursue, for the time being, the 1 million tonnes per annum Green PVC project. The group has shot off emails to vendors and suppliers to 'suspend all activities' on an immediate basis, the news agency PTI reported on Sunday
हिंदु त्ववादी लोक अदाणीसाठी क्राउड फंडिंग का करत नाहीत?
But suspension of this
But suspension of this project a big loss for us. This was good project. So many of my friends joined Adani Petrochemicals and they are working on this project. Hope they will not lose their jobs.
<< But suspension of this
<< But suspension of this project a big loss for us. This was good project. So many of my friends joined Adani Petrochemicals and they are working on this project. Hope they will not lose their jobs.
नवीन Submitted by mandard on 19 March, 2023 - 22:45 >>
------ रोजगार गमावणार्यां बद्दल मला सहानुभूती आहे.
कुणाच्याही रोजगाराला धक्का लागेल अशी परिस्थिती आपण निर्माण करु नये पण हिंदुत्ववादी काय करत आहेत ? बांगडीवाला, भाजीवाला, छोटे मोठे व्यावसाय करणारे पण नावडत्या धर्माच्या लोकांचे व्यावसाय ठप्प कसे होतील हे बघत आहेत, त्या व्यावसायांना व्यावस्थित रितीने टारगेट करत आहेत. कुणाच्या तरी पोटावर आपण संघटित पणे लाथ मारत आहोत.
"काल पर्यंत आम्ही त्याच्याकडून घ्यायचो... पण आता नाही... " असे दोन महिने आधीच्या भारत भेटी मधे एकायला मिळाले. कुठल्या शहरी असा भेद होत आहे हे महत्वाचे नाही पण जरुर अशी दरी निर्माण केली जात आहे. ते बेरोजगार होतील, त्यांची मुले - बाळे उघडी पडतील... पण आपण आज आहोत त्यापेक्षा जास्त असुरक्षित होणार आहोत. एका समाजाचा आपण किळस वाटावी एव्हढा दुस्वास करत आहोत.
पठाण वर बॉयकॉट, लाल सिंग वर बॉयकॉट असे नारे मिळतात तेव्हा केवळ शाहरुख किंवा अमिरचे खानचे नुकसान करत नसतो...
no bindi - no business... हे कशासाठी आहे?
इतर व्यावसाय संपविण्याचे योजनाबद्ध रितीने कारस्थान चालत असते अशावेळी आपली प्रतिक्रिया 'मला काय त्याचे' अशी नसावी.
भाजपाचे लोक आक्रस्ताळेपणा
भाजपाचे लोक आक्रस्ताळेपणा करुन संसदेचा वेळ वाया घालवत आहेत. माफी मागायला राहुल गांधी हे काय माफीवीर आहेत काय? माफी मागतील आणि सोडवतील स्वत: ला.
मी तरी धर्म जात बघुन खरेदी
मी तरी धर्म जात बघुन खरेदी करत नाही. पण अडाणींच्या बंद पडणे हे नक्कीच चांगले लक्षण नाही.
अदाणीचे सगळे प्रोजेक्ट कर्ज
अदाणीचे सगळे प्रोजेक्ट कर्ज काढून उभारले जात होते. त्यासाठीचा पैसा वापरकर्त्यांच्या , ग्राहकांच्या आणि करदात्यांच्याही पैशातून जातो.
वर कोल ट्रान्सपोर्टचं उदाहरण दिलं आहे. त्यामुळे वीज महाग होणार. ते शुल्क कोणाच्या खिशातून जाणार?
एअरपोर्ट ऑथोरिटीकडची विमानतळे अदाणीच्या ताब्यात गेल्यावर विमान कंपन्या आणि प्रवासी , दोघांना लावल्या जाणार्या शुल्कात पाच पट वाढ होत असल्याच्या बातम्या आहेत. ही काही नवी विमानतळे नाहीत.
Please use the sharing tools
Please use the sharing tools found via the share button at the top or side of articles. Copying articles to share with others is a breach of FT.com T&Cs and Copyright Policy. Email licensing@ft.com to buy additional rights. Subscribers may share up to 10 or 20 articles per month using the gift article service. More information can be found at https://www.ft.com/tour.
https://www.ft.com/content/a01c8930-005d-48e1-8a52-cbd0850cbbff
Almost half of all foreign direct investment into Gautam Adani’s conglomerate in recent years came from offshore entities linked to his family, highlighting the role of hard-to-scrutinise money flows in financing the Indian tycoon’s business empire.
Hindenburg Research, whose
Hindenburg Research, whose report into India's Adani Group triggered a massive sell-off and decline in share prices, says another 'big' report is coming. "New report soon -- another big one," Hindenburg research wrote in a tweet on Thursday, without offering any other details.
चला अमेरिकेवर हल्लाबोल करून हिंडेनबर्ग कैद करुया!
जज्ज लोया किंवा हरेंन पंड्या
जज्ज लोया किंवा हरेंन पंड्या करता येईल का त्यांचा?
My guess is Vedanta
My guess is Vedanta or Tether
My guess is Vedanta or Tether
My guess is Vedanta or Tether >> Block
माझ्या रत्नागिरीत अडाणी?
माझ्या रत्नागिरीत अडाणी?
Lok Sabha MP Vinayak Raut on Thursday alleged that 123 hectares of land in Maharashtra's coastal Ratnagiri district was illegally transferred to Adani Transmission Ltd between 2015 to 2018.
पूर्ण बातमी
https://news.rediff.com/commentary/2023/mar/24/uddhav-sena-adani-co-duel...
ब्लॉक ही एक अमेरिकन कंपनी आहे
ब्लॉक ही एक अमेरिकन कंपनी आहे. पण 'अमेरिकेवर हल्ला!' अशी कोल्हेकुइ सुरू झाली नाही.
ती जॅक डॉर्सीची आहे. तो राईट
ती जॅक डॉर्सीची आहे. तो राईट विंग आहे का? केस क्लोज्ड!
हिंडेनबर्गने जॅक डॉर्सीच्या
हिंडेनबर्गने जॅक डॉर्सीच्या (ट्विटर फाऊंडर) ब्लॉक वर फ्रॉडचे आरोप केले आहेत. काल आफ्टर मार्केट १७% पडलेला स्टॉक आज ओपननंतर बर्यापैकी रिकवर होईल असे वाटते. ब्लॉक (आधीची स्क्वेअर) जीची मार्केट वॅल्यू पँडेमिक मध्ये पाच पटींनी वाढली पोस्ट- पँडेमिक झाडून सगळ्या ग्रोथ कंपनीज आऊट ऑफ फेवर होताच तीही प्रीपॅंडेमिक लेवलवर आली.
हिंडेनबर्गच्या आरोपानंतर (ज्यात ब्लॉकवर SEC चे ईन्वेस्टिगेशन चालू असल्याची शक्यताही वर्तवली आहे) मोठ्या ईन्वेस्टर्सनी ब्लॉकच्या पडलेल्या शेअर्सचा फायदा घेत आणि हिंडेनबर्ग रिपोर्टला नाकारत खरेदी सुरू केली आहे असे वाटते.
हे सगळे ठीकच आहे.... अगेन कॅपिटल मार्केट अॅट वर्क
पण आता तार स्वरात हिंडेनबर्ग रिपोर्ट म्हणजे भारतावर हल्ला ओरडणारी फौज कुठे गेली असा प्रश्न पडला. शिवाय जॅक डॉर्सीचे (खरे तर हा खूप चांगला माणूस आहे) फॉलोअर्स, ब्लॉक युजर्स असे कोणीच अमेरिकेवर हल्ला वगैरे म्हणत नाहीयेत, छ्या! देशभक्ती म्हणजे काय कळतंच नाही ह्या लोकांना.
फौज जागेवर च आहे पण आदेश येत
फौज जागेवर च आहे पण आदेश येत नाही तो पर्यंत ते फक्त वाचन ह्या मोड मध्ये असते.
मजकूर छापून तो फौजे कडे फॉरवर्ड केला जाईल मग ते अस्त्र घेवून फौज इथे अवतरेल.
आणि अजून जहाल देशभक्तीयुक्त
आणि अजून जहाल देशभक्तीयुक्त अद्वा तद्वा बोलण्याचे दिवस कुठे आले आहेत? एखादी निवडणूक, भाजपचे एखादे नवे फ्रॉड युक्त स्कँडल जाहीर होईल तेव्हा हे अस्त्रांचे कारखाने धाड धाड चालू लागतील आणि सगळी अस्त्रे परजली जातील.
Pages