हिंडेनबर्ग या न्यूयॉर्कच्या शॉर्ट सेलर ने दोन वर्षे विविध लोकांच्या मुखाखती घेऊन, ज्यात अदानीकडे पूर्वी काम करणारे लोकही समाविष्ट आहेत, पब्लिक डोमेन मधील विखुरलेली माहिती एकत्र करुन, अर्धा डझन देशांतील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन आणि हजारो कागदपत्रांची छाननी करुन १७.८ ट्रिलअन रुपये (२१८ बिलिअन अमेरिकन डॉलर) मूल्यांकन असलेल्या अदानी समुहावर शेअर्सच्या किमती निश्चित करणे आणि अकाउंटिंग फ्रॉड असे अनेक अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
गौतम अदानी याची संपत्ती गेल्या तीन वर्षांत चक्रवाढ गतीने वाढून २० बिलियन ची १२० बिलियन झाली, आणि त्याच काळात अदानी गृपच्या ७ महत्त्वाच्या शेअर्सची किंमत तब्बल ८१९% वाढली आहे. अदानी कंपन्यांचे फंडामेंटल फारच तकलादू असल्याने या प्रचंड मूल्यांकनामुळे एकुणच त्या कंपन्यांतील गुंतवणूक function at() { [native code] }यंंत धोकादायक आहे. अदानी ग्रुपहा कौटुंबिक व्यवसायासारखा लागेबांधे ठेवून चालू असल्याचा दावा ही अहवालात आहे.
गौतम अदानी, त्यांचे भाऊबंद, मेव्हणे, जावई इ. इ. लोकांनी परदेशात, जेथे करसवलती आहेत तिकडे कशा बेनामी कंपन्या काढल्या आणि तिकडून पैसे कसे सायफन करुन गैरव्यवहार केले हे वाचलं तरी भिती वाटते. अदानी कुटुंबातील अनेकांवर पूर्वी सेबीने कारवाई केली आहे, अनेकांनी तुरुंगाची हवा खाल्ली आहे पण नंतर त्या सर्वांची पदन्नती होऊन ते सगळे आता डायरेक्टर इ. झाले आहेत.
सविस्तर अहवाल इथे बघता येईल. https://hindenburgresearch.com/adani/
बराच मोठा अहवाल आहे. त्यात एकाच व्यक्तीच्या १४ कंपन्या आहेत, त्यांचं डोमन नेम एकाच दिवशी रजिस्टर झालं आहे, अनेकांच्या वेबसाईट तंतोतंत जुळणार्या आहेत, त्यातील एकाने अदानीला काही शे मिलियन डॉलरचं कर्ज दिलं आहे. ती चांदीच्या व्यापारात कंपनी आहे, पण त्यांच्या फाईलिंग रिपोर्ट नुसार त्या कंपनीत शून्य लोक काम करतात, त्यांचं ऑफिस मोडकळीला आलेल्या इमारतीत कायम स्वरुपी बंद आहे, आणि तिकडे गिचमिड अक्षरांत संपर्काचा दूरध्वनी क्रमांक दिला आहे अशा अनेक रंजक आणि सिनेमातील वाटतील अशा कथा आहेत.
हा रिपोर्ट आल्यावर अदानी कंपन्याचे शेअर्सची घसरगुंडी झाली नसती तरच नवल. त्यांचा एफपीओ जो ११२% (ओव्हर सबस्काईब) झालेला तो ही काल मागे घेतला आहे. क्रेडीट स्विसने अदानी बॉंड इ. नाकारण्यास सुरुवात केली आहे.
हिंडेनबर्ग रिपोर्ट, अदानी आणि त्याचे भारतीय गुंतवणुकीवर, सेबीवर पडणारे पडसाद याची चर्चा करायला हा धागा.
शहाणी माणसे कोर्टात आपल्या
शहाणी माणसे कोर्टात आपल्या पसंदीचा न्यायमूर्ती नेमण्याचा हट्ट धरतात.
अरे हो की. ये नया भारत है
अरे हो की. ये नया भारत है विसरूनच जातो मी नेहमी.
आज ट्रेडिंग हॉल्ट केले म्हणे
आज ट्रेडिंग हॉल्ट केले म्हणे ?
शहाणी माणसे कोर्टात आपल्या
शहाणी माणसे कोर्टात आपल्या पसंदीचा न्यायमूर्ती नेमण्याचा हट्ट धरतात. >
किंवा न्यायमूर्तीने आपल्या पसंतीचा न्याय दिला नाही/ देणार नसेल तर त्याचा लोया करतात
आज ट्रेडिंग हॉल्ट केले म्हणे
आज ट्रेडिंग हॉल्ट केले म्हणे ?>>> सुरू आहे. Adani Ent - -35% बाकी स्टॉक्सही लोअर सर्किटवर.
ACC, Ambuja सर्किट हिट नाही पण रेड मध्ये बऱ्या पैकी.
कोर्टात जाणार असा पवित्रा
कोर्टात जाणार असा पवित्रा घेणे त्या वेळी गरजेचे होते, पण त्या निव्वळ पोकळ धमक्या होत्या. कोर्टाने कागदपत्रे मागितली तर काय देणार? कोर्टात गेल्याने अडाणीला काहीही मिळणार नाही. झाकली मुठ सव्वा लाखाची ठेवणे याला प्राधान्य मिळेल.
<< सुरू आहे. Adani Ent - -35%
<< सुरू आहे. Adani Ent - -35% बाकी स्टॉक्सही लोअर सर्किटवर. >>
------ ते ५ , १० % वर पडझड थांबवण्याचे काय झाले? आत्ता -२५ % दाखवत आहे.
सामान्य इन्वेस्टरही येता जाता
सामान्य इन्वेस्टरही येता जाता साईट्स ,बॅलन्स शीटसं चेक करतात तर सेबीवाले चेक करत नसतील काय? आणि त्यांना काहीच सापडत नाही? दुर्लक्ष करत असतील?
बाहेरून भंडोफोड(?) झाल्यावर जागे होतात?
सेबी डीआरआय २०२१ पासून चौकशी
सेबी डीआरआय २०२१ पासून चौकशी करत होते तरीही सापडलं नाही.
<< सामान्य इन्वेस्टरही येता
<< सामान्य इन्वेस्टरही येता जाता साईट्स ,बॅलन्स शीटसं चेक करतात तर सेबीवाले चेक करत नसतील काय? आणि त्यांना काहीच सापडत नाही? दुर्लक्ष करत असतील?
बाहेरून भंडोफोड(?) झाल्यावर जागे होतात?
नवीन Submitted by Srd on 3 February, 2023 - 00:06 >>
----- न्याय यंत्रणा, विविध चौकशी यंत्रणा ( ED, CBI, IT, police, customs), पत्रकार , TV अँकर्स यांना खिशांत ठेवता येते तर सेबी अपवाद का असेल?
शेकडो किलो चे ड्रग्ज / हेरॉईन अडाणीच्या मुंद्रा पोर्ट मधे पकडल्या गेल्यावर किती चर्चा झाली? काय पाठपुरावा झाला? केवळ एक उदाहरण.
ते ५ , १० % वर पडझड
ते ५ , १० % वर पडझड थांबवण्याचे काय झाले? आत्ता -२५ % दाखवत आहे.
F & O मधील स्टॉकचे सर्किट cooling period संपला की मोकळे होऊन पुढील सर्किट activate होते. त्यामुळे -२५ % दाखवत होते.
भक्त मंडळी च्या पोस्ट सर्व
भक्त मंडळी च्या पोस्ट सर्व सोशल मीडिया वरील वाचा.
फुल enjoyments आहे.
फुल्टू जोक्स.
त्या मध्ये एक मराठी संकेत स्थळ पण आघडीवर आहे.
तिथे फक्त अंध भक्त च आहेत.
बाकी कोणाला तिथे सभासद् होवून च दिले जात नाही.
निराश वाटायला लागले की भक्त लोकांच्या पोस्ट वाचतो.
जाम हसायला येते.
आडणी म्हणजे देश.
त्याच्या घोटाळ्या चे पण समर्थन करणे म्हणजे देश प्रेम .
काय ये भक्तांचे दिव्य विचार असतात.
अडाणी हे दोषी आहेत आणि
अडाणी हे दोषी आहेत आणि त्यांना पकडुन तुरुंगात taka, संपत्ती जप्त करा अशी मागणी कोणी च करत नाही .
फक्त त्यांच्या प्रतेक व्यवहाराची चोकशी करा ही मागणी आहे.
पण भक्त भलतेच काही लिहीत आहेत.
बोगस कंपन्या,कर्ज बुडवणे,स्व देशाला च लुटणे हे सर्रास चालते त्या मध्ये काय नवीन
मग aadani तसे वागले तर काय वेगळे वागले.
असे पण अक्कलेचे तारे भक्त तोडत आहेत.
मग
भक्तांनी आता पैसे गोळा करून
भक्तांनी आता पैसे गोळा करून अदानी च्या वतीने अब्रुनुकसानीचा दावा ठोकला पाहिजे कोर्टात
एका वाक्यात देशाच्या
एका वाक्यात देशाच्या पंतप्रधनपदी बसलेल्या व्यक्ती नी लोकसभेत सांगितले असते.
अडाणी च्या प्रतेक कर्जाची चोकशी सर्व पक्षीय संसदीय दला कडून होईल.
त्यात ते दोषी आहेत असे वाटले तर योग्य ती कारवाई केली जाईल.
सेबी, इडी, सीबीआय ह्या संस्था ना इतके होवून पण कळत नसेल तर त्या सर्व अधिकाऱ्यानं ची चोकशी करून त्यांस तुरुंगात टाकले जाईल.
तर पुढे कोणी काहीच प्रश्न विचारले नसते.
पंतप्रधान हे सक्षम आहेत ह्या वर लोकांचा विश्वास बसला असता.
५०० जागा देवून लोकांनी त्यांना निवडून दिले असते.
पण सरकार,भक्त,एजन्सी असे वागत आहेत की ज्यांना देशा पासून खूप लपवायचे आहे.
सर्व च सहभागी आहेत घोटाळ्यात.
असा संशय त्या मुळे लोकांना येतो .
आणि त्या मध्ये काही चूक नाही.
(No subject)
कोर्टात गेल्याने अडाणीला
कोर्टात गेल्याने अडाणीला काहीही मिळणार नाही. झाकली मुठ सव्वा लाखाची ठेवणे याला प्राधान्य मिळेल.
कोर्टात गेल्यास कोणत्या राजकीय पक्षाला electoral bond द्वारे किती देणगी दिली हे अकाउंट मध्ये सापडू शकेल ( tax exemption घेतले असेल तर ).
अडाणी एक वेळ भारतीय कोर्टात
अडाणी नी नी अमेरिकेतील न्यायालयात च न्याय मागावा.ती न्यायालय दबावात राहून निर्णय देत नाहीत.
असे पण aadani चे मोदी बरोबर खास संबंध आहेत आणि त्या मुळे भारतीय यंत्रणांनी डोळे झाक केली असा लोकांस संशय आहे.
आदानी खरेच निर्दोष असतील तर त्यांनी अमेरिकेतील न्यायालयात न्याय मागवा.
मला काय सर्व भारतीय जनतेला पूर्ण खात्री आहे(अर्धवट भक्त सोडून)aadani अमेरिकेतील कोर्टात जाणार नाहीत.
अडाणी एक वेळ भारतीय कोर्टात
.
अमेरिकन शेअर बाजारात अदानींना
अमेरिकन शेअर बाजारात अदानींना झटका; डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून बाहेर, गौतम अदानी श्रीमंतांच्या टॉप-20 यादीतूनही घसरले
नंबर विसावा किंवा दोनशेंवा
नंबर विसावा किंवा दोनशेंवा त्यांना काय फरक पडतो? बुडतील तेव्हा सर्वांना घेऊनच बुडतील.
बुडले तर च भारतीय लोकांची खोड
बुडले तर च भारतीय लोकांची खोड मोडेल अंध पने कोणावर ही विश्वास ठेवतात.
https://finance.yahoo.com
https://finance.yahoo.com/news/boris-johnson-younger-brother-just-163942...
https://twitter.com/PandaJay
https://twitter.com/PandaJay/status/1621470141023404032
There's a camouflaged criminal connivance of external & internal players, adamant at demonizing & demoralizing India, derailing her growth story. Peep into this nexus, you'll decipher a scary pattern.
So, this is the official party line.
भारतीय उद्योगपती जगात आपलं स्थान तयार करताहेत हे काहींना बघवत नाहीए - हरीश साळवे
---
एक थियरी - अदाणीने स्वतःचेच पैसे FPOमध्ये लावले. FPO चालू असतानाही शेअर्स गडगडत होते. शेअर्स अलॉट केले असते तर त्याचेच नुकसान झाले असते. म्हणून FPO मागे घेतला.
अडानी मध्ये ३ बिलियन गुंतवणुक
अडानी मध्ये ३ बिलियन गुंतवणुक असलेली फ्रेंच टोटल-एनर्जीज म्हणत्येय की अदानी बिग-फोर ऑडिटर्स कडून जनरल ऑडीट करुन घेईल. अदानीला तोच प्रश्न विचारला तर काही उत्तर नाही.
अशा क्रायसिस मध्ये आमचा ४ पार्टनर आणि ११ कर्मचारी असलेला आणि आज वेबसाईट ही गायब करणारा चिंधी ऑडीटर होता ते चुकलंच, आम्ही फ्रॉड केलेला नाही आम्ही मोठ्या ऑडिटर कडुन ताबडतोब ऑडीट करुन घेतोय इ. पीआर लगेच करायचा सोडून 'भारत खतरे मे' रेडरिक्ट पीआर कुठे करायला गेले! पीआर/ काऊन्सिल कोणी आहे का तिकडेही शा अँड धांदरिआ प्रकार?
भारतात व्यक्तीपूजा काही संपत
भारतात व्यक्तीपूजा काही संपत नाही. एकदा 'अबक' म्हणजेच भारत हा आचरटपणा सुरु केला की उथळ राष्ट्र्वादाच्या नावाखाली लोकांना मूर्ख बनवणे करता येते. बहूसंख्यांनाही असली सवंग भक्तीच झेपणार असते.
भारतात इतर अनेक उद्योगपती उत्तम काम करत आहेत त्यांच्यावर कुणीही आरोप केलेले नाहीत. यावर्षीच्या ब्लूमबर्गच्या जेंडर इक्वीटी इंडेक्सच्या यादीत ८ भारतीय कंपन्या आहेत. त्यांचे काम अभिमानाने मिरवा की! बाकी 'परकीय शक्ती' वगैरे माझ्या लहानपणी ऐकलेलीच व्यक्तव्ये नव्या वेष्टनात गुंडाळलेली बघून निराश वाटले.
एनरॉनची भानगड बाहेर आली तेव्हा नुकतेच ९/११ घडले होते. पण आर्थिक घोटाळ्याकडे 'हल्ला' म्हणून बघायचा वेडेपणा कुणी केला नाही. त्यातून धडा घेवून उपाय योजना केली.
अदानी कच्चा लिंबू निघाला.
अदानी कच्चा लिंबू निघाला. मार्केट manipulate करून FPO मधून स्वतः झटपट पैसे कमवू अशा विश्वासाने FPO आणला होता. परंतु ही हिंडेनबर्गने मीठाचा खडा टाकला. त्याला कोर्टात खेचले तर सगळेच मुसळ केरात जाणार,त्यात रोज त्याच्या कंपनीचे शेअर कोसळत होते. पैसे लावून FPO यशस्वी करून दाखवला,परंतु listing चे नियम अंगाशी येऊन नुकसान होणार हे जेव्हा कळले तेव्हा त्याचे उसने अवसान गळून पडले आणि FPO कॅन्सल केला.
हिंडेनबर्गचे भूत आता आयुष्यभर त्याच्या आणि सरकारच्या बोकांडी बसून राहणार आहे,त्याच्या वाटेला दोघेही जाणार नाहीत. ED ची मात्रा फक्त देशातच चालू शकते.
'अॅटॅक ऑन ईंडिया' र्हिटॉरिक
'अॅटॅक ऑन ईंडिया' र्हिटॉरिक 'स्पिन' करण्यामध्ये अदाणी ने जाणते अजाणते सरकारला सुद्धा जबाबदेही करण्यास भाग पाडले आहे.
हे प्रकरण तापायला लागले आणि सरकारी एजन्सीज व पॉलिटिकल असामींवर शेकायला लागले की हे लोक हात झटकून अदाणीला बसखाली फेकत नामानिराळे होणार. वास्तव सिनेमाची कॉर्पोरेट आवृती.
एका कंपनीची क्रेडिबिलिटी ही पूर्ण ईंडियन कॉर्पोरेट मार्केटची क्रेडिबिलिटी असा देखावा ऊभा करत प्रेस्टीज ईश्यू बनवण्याची मोठी किंमत चुकवावी लागू शकते. ऊद्या मूडीज, फिच आणि एमएससीआय ह्या रेटिंग एजन्सीजनी ह्याची दखल घेत कंट्री रेटिंग डाऊनग्रेड केले किंवा
फॉरेन ईन्वेस्टर्सनी असोसिएटेड रिस्क प्रिमीअम वाढवले तर ह्याची किंमत टाटा, रिलायंस सारख्या ग्लोबल काँगलोमरेट बरोबरच एकूण एक भारतीय पब्लिक कंपनीला चुकवावी लागेल.
"Our ongoing monitoring will be looking closely at any major changes to the rated entities' access to financing or cost of financing on a long-term basis, unfavourable regulatory/legal developments or ESG-related matters that could affect credit profiles," Fitch said.
करण गौतम अडाणी चा सासरा सिरिल
करण गौतम अडाणी चा सासरा सिरिल श्रॉफ हा सेबीच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स वर लक्ष ठेवणार्या कमीटीवर आहे.
याच सिरिलची लॉ फर्म अडाणी ला रिप्रेझेंट करते.
कोण काय उपटून घेऊ शकणार आहे?
आज तक वर सहज चॅनेल बदलताना
आज तक वर सहज चॅनेल बदलताना तेथील चर्चा कानावर पडली.
एक सुटाबुटा मधील कोणी तरी युक्तिवाद करत होता.
भक्त च होता.
अडाणी नी किती रोजगार निर्माण केला .
किती मोठे काम केले.
ते ऐकताच सर्व दयावान डोळ्यासमोरून गेले.
दाऊद पण ग्रेट वाटू लागला.
चोऱ्या,खून, लबाडी करा आणि त्या मधील काही गरिबांना वाटा.
केवढा महान विचार आणि काम आहे त्या दयावान लोकांचे.
संसाधन देशाची,पैसा लोकांचा .आणि त्या मधील काहीच पैसा रोजगार म्हणून लोकांस दिला की तो माणूस महान होतो .
देश बदल रहा है.
हे वाक्य खरेच पटले
Pages