हिंडेनबर्ग रिपोर्ट आणि अदानी

Submitted by अमितव on 2 February, 2023 - 00:09

हिंडेनबर्ग या न्यूयॉर्कच्या शॉर्ट सेलर ने दोन वर्षे विविध लोकांच्या मुखाखती घेऊन, ज्यात अदानीकडे पूर्वी काम करणारे लोकही समाविष्ट आहेत, पब्लिक डोमेन मधील विखुरलेली माहिती एकत्र करुन, अर्धा डझन देशांतील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन आणि हजारो कागदपत्रांची छाननी करुन १७.८ ट्रिलअन रुपये (२१८ बिलिअन अमेरिकन डॉलर) मूल्यांकन असलेल्या अदानी समुहावर शेअर्सच्या किमती निश्चित करणे आणि अकाउंटिंग फ्रॉड असे अनेक अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

गौतम अदानी याची संपत्ती गेल्या तीन वर्षांत चक्रवाढ गतीने वाढून २० बिलियन ची १२० बिलियन झाली, आणि त्याच काळात अदानी गृपच्या ७ महत्त्वाच्या शेअर्सची किंमत तब्बल ८१९% वाढली आहे. अदानी कंपन्यांचे फंडामेंटल फारच तकलादू असल्याने या प्रचंड मूल्यांकनामुळे एकुणच त्या कंपन्यांतील गुंतवणूक function at() { [native code] }यंंत धोकादायक आहे. अदानी ग्रुपहा कौटुंबिक व्यवसायासारखा लागेबांधे ठेवून चालू असल्याचा दावा ही अहवालात आहे.

गौतम अदानी, त्यांचे भाऊबंद, मेव्हणे, जावई इ. इ. लोकांनी परदेशात, जेथे करसवलती आहेत तिकडे कशा बेनामी कंपन्या काढल्या आणि तिकडून पैसे कसे सायफन करुन गैरव्यवहार केले हे वाचलं तरी भिती वाटते. अदानी कुटुंबातील अनेकांवर पूर्वी सेबीने कारवाई केली आहे, अनेकांनी तुरुंगाची हवा खाल्ली आहे पण नंतर त्या सर्वांची पदन्नती होऊन ते सगळे आता डायरेक्टर इ. झाले आहेत.

सविस्तर अहवाल इथे बघता येईल. https://hindenburgresearch.com/adani/
बराच मोठा अहवाल आहे. त्यात एकाच व्यक्तीच्या १४ कंपन्या आहेत, त्यांचं डोमन नेम एकाच दिवशी रजिस्टर झालं आहे, अनेकांच्या वेबसाईट तंतोतंत जुळणार्‍या आहेत, त्यातील एकाने अदानीला काही शे मिलियन डॉलरचं कर्ज दिलं आहे. ती चांदीच्या व्यापारात कंपनी आहे, पण त्यांच्या फाईलिंग रिपोर्ट नुसार त्या कंपनीत शून्य लोक काम करतात, त्यांचं ऑफिस मोडकळीला आलेल्या इमारतीत कायम स्वरुपी बंद आहे, आणि तिकडे गिचमिड अक्षरांत संपर्काचा दूरध्वनी क्रमांक दिला आहे अशा अनेक रंजक आणि सिनेमातील वाटतील अशा कथा आहेत.

हा रिपोर्ट आल्यावर अदानी कंपन्याचे शेअर्सची घसरगुंडी झाली नसती तरच नवल. त्यांचा एफपीओ जो ११२% (ओव्हर सबस्काईब) झालेला तो ही काल मागे घेतला आहे. क्रेडीट स्विसने अदानी बॉंड इ. नाकारण्यास सुरुवात केली आहे.

हिंडेनबर्ग रिपोर्ट, अदानी आणि त्याचे भारतीय गुंतवणुकीवर, सेबीवर पडणारे पडसाद याची चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

The promoters of Adani Transmission and Adani Green Energy have pledged equity of 0.76 percent and 0.99 percent in favour of SBICAP Trustee Company, a unit of the country's largest lender State Bank of India (SBI)

दोन राज्यातील उद्योगपती
ह्यांस गुजराती पंतप्रधान असल्या मुळे अनेक सवलती नियम बाह्य दिल्या आहेत.
देशाची नैसर्गिक संपत्ती फुकट दिली आहे.
पेट्रोल oil उद्योगात हे दोन च राज्यातील उद्योगपती आल्या नंतर च देशात भाव वाढले आहेत.
इतक्या मोठ्या देशात ही दोन राज्यात च टॅलेंट आहे का?
ओपेक देशात खूप तेल आहे ,रशिया पण खूप देत आहे .
भारता ल स्वतः पेट्रोल,गॅस produce करण्याची काही गरज नाही.
Import त्या पेक्षा स्वस्त पडेल.
देशाची जमीन ,नैसर्गिक साधन संपत्ती ह्यान देण्याची गरज नाही.
कृष्णा गोदावरी खोऱ्यात तेल काढण्याचे किती पैसे भारत सरकार ल मिळतात.
हे खोरे भारत सरकार नी जवळ जवळ फुकट कोणाला दिले .
त्या खोऱ्यात किती उत्पादन होते कोणाला माहीत नाही.
त्याचा देशाला किती फायदा झाला कोणाला माहीत नाही.
पण ज्याला हे खोरे मिळाले तो मात्र जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत आहे.
हिंदुत्व चे गाजर देवून मूर्ख बनवण्याचे काम bjp करत आहे.
भारतीय मीडिया ही काहीच कामाची नाही.
ह्यांचे मालक गुलाम आहेत सरकार चे.
त्या मुळे hindenberg ला महत्वाची जबाबदारी घ्यावी लागली

इथे सिल्व्हरगेट कॅपिटल आणि सिलिकॉन व्हॅली बँक अशा दोन बँका बंद पडल्या आहेत. Svb च्या बाहेर इन्व्हेस्टर्सनी रांगा लावल्या आणि पोलीस बोलवावे लागले. अमेरिकन फायनान्शियल एक्सपर्टस आणि मीडिया अदानीच्या बाबतीत आक्रमक टीका करत होते. आता मात्र बायडनने bail out करून टाकावं असं सुचवत आहेत. आपला तो बाब्या..

अजून एक जाणवलं ते म्हणजे विरोधी पक्षात बसलेले रिपब्लिकन्स काही आनंद, उन्माद, सेलिब्रेशन असं व्यक्त होत नाहीयेत. आपल्या देशाची अर्थव्यवस्था कोसळावी, देशाची अवस्था पाकिस्तानसारखी भुकेकंगाल व्हावी, म्हणजे आपण बायडनबाबाला हरवून आपला माणूस तिथे बसवू अशी fantasy त्यांची दिसत नाही. आपल्या देशाचं शक्य तितकं वाईट व्हावं म्हणजे बायडनवर ठपका ठेवून regime change करू असा दृष्टिकोन बनवण्यासाठी त्यांना कुठे बरं training ला पाठवावं..

अदानी प्रकरणानंतर सारे मोदीभक्त रातोरात अर्थतज्ज्ञ झाले व मिल्टन फ्रीडमन प्रमाणे बोलू लागले !

या दोन प्रकरणात गुणात्मक फरक आहे. या बँकेच्या संस्थापकांच्या विमानातून बायडेन्जी फिरत नव्हते. बायडेनजीनी आपले वजन वापरून या बँकेला कंत्राटे मिळवून दिली नाहीत. अमेरिकेत बायडेन स्टेडियम व तो जो कोण आहे त्याचे पॅवेलियन असा प्रकार नाही. मुळात या बेंकेचा कोण मालक आहे तेही माहित नाही. या बँकेने आपलेच पैसे टॅक्स हेवन मधून फिरवून शेयर्स चे भाव भरमसाठ वाढवले नव्हते. ई. ई.

मिस्टर अमेरिकॅॅनो,
विरोधी पक्षाचे सोडून द्या हो. पण हाच अडाणी अमेरिकेत असता तर अमेरिकन सरकारने काय केले असते? एनरॉन आठवून उत्तर द्या बरका.
बहुतेक त्याला फुलांनी सजवून मढवून त्याची मिरवणूक काढली असती.

Happy
अदाणी म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था नाही.
एक प्रश्न
अदितीच्या उद्योगांचे की किती त्याने स्वतः: उभारलेत? ( कसे त्याकडे नंतर येऊ)
आणि किती बळकावलेत ? कसे ते सा़ंगायला हवं का?

https://abcnews.go.com/Business/story?id=87398&page=1
H O U S T O N, Jan. 25, 2002 -- Former high-ranking Enron executive J. Clifford Baxter was found shot dead today in suburban Houston, leaving a suicide note referring to the Enron scandal, ABCNEWS has learned.

Police in Sugar Land confirmed the death of the 43-year-old Baxter, a former Enron vice chairman who had also served as chief strategy officer for the now-bankrupt energy company and was familiar with many of its inner workings.

Screenshot_20230311-104525~2.png

अमेरिकन्सना आपल्या घरात काय चालू आहे कळत नाही? अशा वेळी खरंच शंका येते की हा भारतीय इकॉनॉमीवर targeted attack होता का? भारतात जयचंद बसलेले आहेतच कुईकुई करायला.

Screenshot_20230311-104958~2.png

फोर्ब्स वाले मागच्या आठवड्यात बँकेला अवार्ड देऊन मोकळे झाले. काय तो अभ्यास. भारतावर टीका करताना आधी आपली अक्कल ती काय याचा काही विचार? की फोर्ब्स पण सामील होतं या svb घोटाळ्यात?

Screenshot_20230311-110029~2.png

बिचारे पुरोगामी. जिथे जिथे आशा लावतात तिथे निराशा होते.

>उन्माद, सेलिब्रेशन असं व्यक्त होत नाहीयेत. आपल्या देशाची अर्थव्यवस्था कोसळावी, देशाची अवस्था पाकिस्तानसारखी भुकेकंगाल व्हावी,

कल्पनाशक्ती अफाट आहे !

अडानी ही एक खाजगी कंपनी आहे. हिंडेनबुर्ग ही एक खाजगी कंपनी आहे. अडानी वर हल्ला म्हणजे भारतावर हल्ला हे अगदीच शिशुशाखिय लॉजिक झाले ! नशीब, सर्व मायबोलीकरांनी पाच पाच हजाराचे अडानी शेयर्स खरेदी करून भारतमातेवर झालेला हल्ला परतवून लावायला मदत करावी असे वीरश्री युक्त आवाहन नाही आले.

पुरोगाम्यांनी एसव्हीबी बँकेवर आशा लावली होते हेही अगदीच हास्यास्पद आहे. ती एक बॅंक आहे आपल्या कर्माने बुडेल किंवा तरेल. ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व घेऊन, ऑस्ट्रेलियात बसून, अमेरिकेचा झेंडा ठेवून आमच्यावर हल्ला झाला हो असे करूण आवाहन त्या बँकेचे सी एफ ओ करत नाहित.

हे नेहमीचंच टुलकिट आहे. अदाणीच्या बिझिनेस मॉडेल आणि त्याच्या शेअर्सच्या किंमती अफाट वाढण्याबद्दल काही न बोलता बाकी गोष्टींबद्दल बोलणं आणि प्रत्येक पोस्टमध्ये अदाणीला एक्स्पोज करणं म्हणजे भारतावर हल्ला आहे असं म्हणणं.
tactics to divert discussion and engage in irrelavant points.

Just use the Boggart banishing spell - Riddikulus;

straw man
noun
noun: strawman
1.
an intentionally misrepresented proposition that is set up because it is easier to defeat than an opponent's real argument.

<< अदानी आणि एस्व्हीबी बँकेची तुलना? कठीण आहे !
नवीन Submitted by स्वाती२ on 11 March, 2023 - 13:51 >>

------ सोईचे आहे म्हणून तुलना करायची... Happy

<< अदानी प्रकरणानंतर सारे मोदीभक्त रातोरात अर्थतज्ज्ञ झाले व मिल्टन फ्रीडमन प्रमाणे बोलू लागले !
या दोन प्रकरणात गुणात्मक फरक आहे. या बँकेच्या संस्थापकांच्या विमानातून बायडेन्जी फिरत नव्हते. बायडेनजीनी आपले वजन वापरून या बँकेला कंत्राटे मिळवून दिली नाहीत. अमेरिकेत बायडेन स्टेडियम व तो जो कोण आहे त्याचे पॅवेलियन असा प्रकार नाही. मुळात या बेंकेचा कोण मालक आहे तेही माहित नाही. या बँकेने आपलेच पैसे टॅक्स हेवन मधून फिरवून शेयर्स चे भाव भरमसाठ वाढवले नव्हते. ई. ई.
Submitted by vijaykulkarni on 11 March, 2023 - 11:21 >>

------ FOX TV च्या माध्यमातून बायडेन्जींवर सातत्याने खरमरित टिका होत असते म्हणून FOX Corporation वर कब्जा मिळविण्यासाठी SVB च्या मालकांनी गैरमार्गाचा अवलंब करुन चॅनेलचा ताबा घेतला आणि टकर कार्लसन/ रुपर्ट मरडॉक यांना कायमचे घालविले असे झालेले नाही.

अदाणीविरोधात तपास यंत्रणांकडे पडून असलेल्या किंवा स्क्रॅप केलेल्या केसेसची यादी आहे का कुठे? अदाणी ग्रुपला वेगवेगळ्या एजन्सीजनी ठोठावलेला दंड आणि तो माफ केल्याची?
२०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून काळ्या पैशाबाबत निवृत्त न्यायाधीश प्रमुख असलेली एक एस आय टी स्थापन केली गेली होती. त्यांच्याकडे आलेल्या सुरुवातीच्या केसेसमध्ये अदाणी ग्रुपने आयात मालाचं ओव्हरप्राइसिंग , त्यातून कर चोरी आणि बेनामी व्यवहाराची केस होती. इडी तपास करत होते. पुढे काय झालं?

एवढंच नाही. मी जे वाचलं त्यानुसार फारच भयंकर गोष्टी घडल्यात. पण मला अधिकृत बातम्या मिळत नाहीएत. त्यामुळे धागे जुळवून कॉन्स्पिरसी थियरीज मांडण्यात अर्थ नाही. ज्याने लिहिले त्याला त्याच्या सोर्सेसकडून माहिती मिळाली असेल. तोही अमेरिकेत बसून लिहिणारा मराठी /कानडी माणूस आहे.

मूर्ख पना आहे अक्षरशः.
मोदी म्हणजे देश नाही,तसा अडाणी,राहुल, योगी , etc etc म्हणजे देश नाही.
अडाणी नी ची संपत्ती वाढते,अंबानी ची वाढते.
म्हणजे घोटाळा आहेच .
देशात असंख्य उद्योगपती आहे टॅलेंट खूप आहे.
पण बाबू गिरी आणि केंद्रीय सरकार ची मर्जी ह्या वर यश अवलंबून असते.
अडाणी काही वर्षात मोठा होतो म्हणजे सरळ आहे talent नाकारून केंद्र सरकार नी सर्व कायद्यानं ची ,नियमांची वाट लावून .
कर्ज मिळवून दिली.
सर्व बेकायदा गोष्टी कडे दुर्लक्ष केलं
लायक लोकांस स्पर्धेतून बाद केले.
म्हणून च हे पुढे आले.
अंध,अती अंध bjp supporter लोकांना अडाणी चे इतके कौतुक का?
बुध्दी गहन ठेवली आहे का?
आरोप झले आहेत तर चोकशी करा .
राष्ट्रीय आणि गरज पडलो तर अंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने कडून.
तुम्ही प्रामाणिक आहात ना भिता कशाला.
देश हा काही bjp च्या मालकी हक्काचा नाही.
ना अडाणी अंबानी chya.
त्यांच्या विरुद्ध बोलणे हा देशद्रोह नाही तर देश प्रेम आहे

सर्व संबंधित दोषी वर सरकार कारवाई करणार च असे बाईडन ह्यांनी जाहीर केले आहे.
आणि अडाणी घोटाळ्या वर मोदी एक शब्द बोलायला तयार नाहीत
हा फरक आहे
धृतराष्ट्र आंधळा होता ह्याचा खरा अर्थ आता माहीत पडत आहे....

अमानुष मनवसांहर अंध पना मुळे च झाला महाभारतात..
राज्य बुडली,सुखी जनता संकटात आली .
त्याची पुनरावृत्ती तर आता होत नाही ना...
भक्तांचे विचार ऐकून तसेच वाटत आहे

Whitehat,
SVB मध्ये काही "घोटाळा" असल्याचा किमान आरोप तरी आहे का ? नसल्यास अडाणी शी कशी तुलना करता ? तिथे market manipulation आरोप आहे ना ?

<< इडी तपास करत होते. पुढे काय झालं?## त्यानंतर ईडी काडी घालण्यात बिझी झाली >>
------ ED चा तपास नेहेमीच सुरु असतो, वेग कमी - जास्त असतो.

नारायण राणे हे भाजपांत सामिल झाले, केंद्रात मंत्री झाले. त्यांना एकमेव काम दिले. राज्यांत सेनेला नामोहरम करण्याचे कंत्राट मिळाले, परतीमधे केंद्रात मेंत्री मंत्रीपद. आता ED च्या तपासाचा वेग कमी होणे हे आलेच. , नाही तर काम कसे करणार?
उद्या राणे यांनी भुंकणे बंद केले तर EDच्या तपासाचा वेग वाढेल.

EDच्या अनेक तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर राज ठाकरे यांची तोफ पण थंडावली.... ED च्या चौकशीचा वेग पण मंदावला.

फार कमी लोकांनी ED च्या चौकशीला भिक घातली नाही.

आपल्या देशाचं शक्य तितकं वाईट व्हावं म्हणजे बायडनवर ठपका ठेवून regime change करू असा दृष्टिकोन बनवण्यासाठी त्यांना कुठे बरं training ला पाठवावं.. >>> त्यान्ना भारतातील विद्यमान विरोधकान्कडे training साठी पाठवायला हवे. त्यान्ना राजकारण देशापेक्षाही वरचढ वाटते. त्यासाठी ते देशाची परदेशातही बदनामी करायला मागेपुढे पाहत नाहीत.

हाहा देशाची बदनामी नाही स्वतःचीच लायकी दाखवली पप्याने. थेट बायडनआबाना साकडं घातलं म्हणे भारतात येऊन मोदींना धडा शिकवा असं. Europe and US not doing enough to restore democracy in india असं पप्या परदेशात तक्रार करून आला.
Not doing enough? म्हणजे काय त्यांनी भारतावर हल्ला करावा? का युक्रेनला शस्त्र दिली तशी पाकिस्तानला द्यावी? का थेट आपलं सैन्य पाठवून regime change करावा २०२४ च्या आधीच? आता ते सोरॉसआजोबा करतायत ना ऑलरेडी खटपट. बायडन आपल्या देशात रोज एक ब्यांक बंद पडतेय ते निस्तरेल का याचे बालहट्ट पुरवेल? आणि युरोपात तो ऋषिकेश व मॅक्रोन हे तर कट्टर संघी आहेत ते कशाला मदत करतील? आणि लोकशाही restore करायची म्हणजे काय करायचं? चहावाला पीएम, रिक्षावाला सीएम याना हाकलून एकाच घराण्यात सत्ता restore केली की काँग्रेसच्या मते ती लोकशाही. की युरोपियन वंशाकडे भारताचा कंट्रोल द्या अशी मागणी आहे ?

Pages