हिंडेनबर्ग या न्यूयॉर्कच्या शॉर्ट सेलर ने दोन वर्षे विविध लोकांच्या मुखाखती घेऊन, ज्यात अदानीकडे पूर्वी काम करणारे लोकही समाविष्ट आहेत, पब्लिक डोमेन मधील विखुरलेली माहिती एकत्र करुन, अर्धा डझन देशांतील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन आणि हजारो कागदपत्रांची छाननी करुन १७.८ ट्रिलअन रुपये (२१८ बिलिअन अमेरिकन डॉलर) मूल्यांकन असलेल्या अदानी समुहावर शेअर्सच्या किमती निश्चित करणे आणि अकाउंटिंग फ्रॉड असे अनेक अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
गौतम अदानी याची संपत्ती गेल्या तीन वर्षांत चक्रवाढ गतीने वाढून २० बिलियन ची १२० बिलियन झाली, आणि त्याच काळात अदानी गृपच्या ७ महत्त्वाच्या शेअर्सची किंमत तब्बल ८१९% वाढली आहे. अदानी कंपन्यांचे फंडामेंटल फारच तकलादू असल्याने या प्रचंड मूल्यांकनामुळे एकुणच त्या कंपन्यांतील गुंतवणूक function at() { [native code] }यंंत धोकादायक आहे. अदानी ग्रुपहा कौटुंबिक व्यवसायासारखा लागेबांधे ठेवून चालू असल्याचा दावा ही अहवालात आहे.
गौतम अदानी, त्यांचे भाऊबंद, मेव्हणे, जावई इ. इ. लोकांनी परदेशात, जेथे करसवलती आहेत तिकडे कशा बेनामी कंपन्या काढल्या आणि तिकडून पैसे कसे सायफन करुन गैरव्यवहार केले हे वाचलं तरी भिती वाटते. अदानी कुटुंबातील अनेकांवर पूर्वी सेबीने कारवाई केली आहे, अनेकांनी तुरुंगाची हवा खाल्ली आहे पण नंतर त्या सर्वांची पदन्नती होऊन ते सगळे आता डायरेक्टर इ. झाले आहेत.
सविस्तर अहवाल इथे बघता येईल. https://hindenburgresearch.com/adani/
बराच मोठा अहवाल आहे. त्यात एकाच व्यक्तीच्या १४ कंपन्या आहेत, त्यांचं डोमन नेम एकाच दिवशी रजिस्टर झालं आहे, अनेकांच्या वेबसाईट तंतोतंत जुळणार्या आहेत, त्यातील एकाने अदानीला काही शे मिलियन डॉलरचं कर्ज दिलं आहे. ती चांदीच्या व्यापारात कंपनी आहे, पण त्यांच्या फाईलिंग रिपोर्ट नुसार त्या कंपनीत शून्य लोक काम करतात, त्यांचं ऑफिस मोडकळीला आलेल्या इमारतीत कायम स्वरुपी बंद आहे, आणि तिकडे गिचमिड अक्षरांत संपर्काचा दूरध्वनी क्रमांक दिला आहे अशा अनेक रंजक आणि सिनेमातील वाटतील अशा कथा आहेत.
हा रिपोर्ट आल्यावर अदानी कंपन्याचे शेअर्सची घसरगुंडी झाली नसती तरच नवल. त्यांचा एफपीओ जो ११२% (ओव्हर सबस्काईब) झालेला तो ही काल मागे घेतला आहे. क्रेडीट स्विसने अदानी बॉंड इ. नाकारण्यास सुरुवात केली आहे.
हिंडेनबर्ग रिपोर्ट, अदानी आणि त्याचे भारतीय गुंतवणुकीवर, सेबीवर पडणारे पडसाद याची चर्चा करायला हा धागा.
अमेरिकेने लादेन ल पाकिस्तान
अमेरिकेने लादेन ल पाकिस्तान मध्ये जावून मारले.
मोदी सरकार ला दाऊद नक्की कुठे आहे हे पण माहीत नाही .
पकडणे आणि मारणे हे तर खूप दूर .
Hindenberg ल अडाणी दिसला त्यांच्या देशातील बँक दिसल्या नाहीत.
ह्या प्रकारचं माझा पहिला para आहे.
माझ्या त्या प्रश्नांचे उत्तर ध्या मग हिंडेनबर्ग कडे वळूया
अदाणी ग्रूप हिंडेनबर्गला
अदाणी ग्रूप हिंडेनबर्गला कोर्टात खेचणार होता, ते कुठवर आल़य? अमेरिकेतल्या कोर्टात खेचायला मदत करा कोणीतरी.
अती हुशारी च ह्यांना महागात
अती हुशारी च ह्यांना महागात पडणार आहे .
2024 मध्ये ते सिद्ध होईल च
>EPW हे प्रकाशन सोताच तर
>EPW हे प्रकाशन सोताच तर लेफ्टी होय फुल, आता कुऱ्हाडीचा दांडा अन् गोताले काळ ठरला येच्यात बी पाते हलके ! अशे कशे चालावं साहेब.
त्याचा इथे काय संबंध ?
राहूल गांधी विरुद्ध थयथयाट करायचे काम स्मृतीजी ( या कायम थयथयाट मोड मध्येच असतात) व रविशंकर प्रसाद ( पुन्ही मंत्रीमंडळात घेतील या आशेवर ) यांचाकडे आहे मुख्यतः. बाकी रिशि बागदी वगैरे झिलकरी आहेतच.
> svb आणि अडणीची तुलना, ती ही चुकीच्या आणि अज्ञानदर्षक प्रकारे ह्या धाग्यावर करायचा सपाटा का लावलाय समजत नाही.
हे समजत नसेल तर तुम्ही भाबडे आहात.
( असो, rhetorical प्रश्न होता, येक डाव माफी असावी )
Rhetorical प्रश्न होता.
Rhetorical प्रश्न होता.
भरत. on 16 March, 2023 - 09
भरत. on 16 March, 2023 - 09:03
परफेक्ट लिहिलत
मी या धाग्यावर आधी काहीही
मी या धाग्यावर आधी काहीही लिहिलं नाही कारण अदानी प्रकरणात वाचन करायला वेळ नव्हता व एकूणच रस नव्हता.
तरीही इतका गोळीबार ? Confidence ला सलाम
माझा कसला कॉन्फिडन्स.
माझा कसला कॉन्फिडन्स..शेअर्सचे भाव, मार्केट न्यूज बघून तेच facts इथे लिहीत आहे.
राहुल जयचंद गांधीचा परकीय शक्तींना भारतात मोदींविरुद्ध लढायला आवाहन करण्याचा व्हिडियो व्हायरल झालेला असतानाही 'तो असं बोललाच नाही' हे रेटून खोटं बोलणारे तुम्ही व माबोसत्यप्रयोगानंद हे खरे कॉन्फिडन्सचे बादशहा.
Svb बँक ज्या दिवशी कोसळली त्यादिवशी आधी बोनसेस काढून घेणे, चार दिवस आधी फॉर्ब्जने ranking देणे व बँकेने ते मिरवणे, मॅनेजमेंटने मिलियन्स ऑफ डॉलर्स चे शेअर्स आधी विकणे, fdic चे नियम सरकारकडून बदलून घेऊन २५० k वरून थेट unlimited करून घेणे हे सर्व कॉमिना standard ethical business practice, कसलाही फ्रॉड नाही असं वाटतं ना. छान छान. बाय द वे तुम्ही कुठे काम करता हो कॉमि..
(No subject)
आज की ताजा खबर
आज की ताजा खबर
Adani Group on Thursday clarified that Vinod Adani, elder brother of conglomerate's chairman Gautam Adani, is part of the "promoter group" of various listed entities within it.
"We would like to submit that Mr. Gautam Adani and Mr. Rajesh Adani are individual promoters of various listed entities within the Adani group and Mr. Vinod Adani is an immediate relative of the individual promoters. Accordingly, as per the applicable Indian regulations, Mr. Vinod Adani is part of the ‘promoter group’ of various listed entities within the Adani group. This fact has been submitted to Indian regulatory authorities from time to time in various disclosures," said Adani Group in a stock exchange filing.
vb बँक ज्या दिवशी कोसळली
vb बँक ज्या दिवशी कोसळली त्यादिवशी आधी बोनसेस काढून घेणे, चार दिवस आधी फॉर्ब्जने ranking देणे व बँकेने ते मिरवणे, मॅनेजमेंटने मिलियन्स ऑफ डॉलर्स चे शेअर्स आधी विकणे, fdic चे नियम सरकारकडून बदलून घेऊन २५० k वरून थेट unlimited करून घेणे हे सर्व कॉमिना standard ethical business practice, कसलाही फ्रॉड नाही असं वाटतं ना.
विक्रमादित्यासारखं परत परत एस व्ही बी च प्रेत का आणताय ? मुळात याचा आणी अदानी प्रकरणाचा बादरायण तरी संबंध आहे का ? आणी यातल्या कोणत्या गोष्टीचे समर्थन झाले आहे इथे ? समजा हा सारा प्रॉड होता, मग त्यमुळे अदानी पूर्वलक्षी प्रभावाने स्वच्छ ठरतात का? काहीही. हे इतके असंबद्ध आहे की whataboutary ही म्हणता येणार नाही.
अदानीबद्दल मी लिहितच नाही
अदानीबद्दल मी लिहितच नाही कारण अभ्यास नाहिये!
पण अदानी प्रकरण हे अदानीइतकं मर्यादित न ठेवता त्यावरून मग भारतीय सिस्टीमला , watchdogs ना 'इतकं होईपर्यंत कळलं कसं नाही', म्हणजे सिस्टीम एकतर weak आहे किंवा पूर्ण fraud आहे, आता भारतीय अर्थव्यवस्थेवरचा जगाचा विश्वास उडेल अरेरे , sbi पण collapse होणार, LIC पण संपणार असा कांगावा पुरोगामी+ western liberal media + Soros cabal करत होते. इथले काही nri तर असं gloating करत होते जसं अचानक त्यांच्या कीबोर्डवर सरस्वतीदेवीने financial analysis चा क्लासच उघडला आहे. भारताची इमेज खराब होणार blah blah.
काय झालं? भारतात पुरोगाम्यांच्या दुर्दैवाने सर्व ठीक चालू आहे. आणि अमेरिका युरोपमधील सिस्टिम्स, watchdogs, बँका, बिग 4 ऑडिटर्स यांच्याबद्दल तेच प्रश्न उभे राहिले आहेत जे तुम्ही लोक एक महिन्यांपूर्वी भारताबद्दल करत होतात.
याला म्हणतात instant money transfer सारखा instant karma. ये नया भारत है, घरमे घुसके...
अडाणी चे गुन्हे अमेरिकन बँका
अडाणी चे गुन्हे अमेरिकन बँका बुडाल्या म्हणून कमी होत नाहीत.
अडाणी म्हणजे भारत नव्हे उगाच देशाचे हित म्हणजे अडाणी चे हित असले युक्तिवाद नकोत.
मोदी म्हणजे पण देश नव्हे...
मोदी सरकार वर जागतिक कोणत्या ही देशात अगदी पाकिस्तान मध्ये पण जावून टीका करणे म्हणजे ..
देशद्रोह नव्हे..
इथे पुरोगामी ,हिंदू,मुस्लिम
इथे पुरोगामी ,हिंदू,मुस्लिम हे विषय च नाहीत.
पूर्ण देशाची संपत्ती एकच व्यक्ती ल दान जे मोदी सरकार करत आहे त्याला देशप्रेमी लोक विरोध करत आहेत.
अस्सावा सुंदर स्ट्रॉमनचा
अस्सावा सुंदर स्ट्रॉमनचा बंगला. जे अदानीने हिंडेनबर्गला उत्तर देताना म्हटलं आणि भाजपच्या इको सिस्टमने उचललं तेच शब्द फिरवून पुरोगामी इ. नेहमीच्या टारगेट्सच्या तोंडी कोंबलं.
svb ब्ला ब्ला ब्ला ...२@%&>
svb ब्ला ब्ला ब्ला ...२@%&> ब्ला ....
पण ह्याचा आणि अडाणीचा संबंध नाही.
पप्पू गांधी ब्ला ब्ला ब्ला !#(&$$?> ब्ल ब्ला ब्ला ब्ला देशद्रोही ब्ला
ब्ला ब्ला देशावर ह...ब्ला केम्ब्रि ब्ला ब्ला
अहो पण...
नाही कसा? ब्ला ब्ला ब्ला पाकी... चाय... हा हा हा इत्यादि.
अखेर कुलकर्णी यांनी हार ...
मागे रिहाना आणि ग्रेटा यांनी
मागे रिहाना आणि ग्रेटा यांनी शेतकरी आंदोलनावर ट्वीट केलं होतं तेव्हा लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर इ.नी त्यांना उत्तर दिलं होतं.
अंबानी, टाटा , बिर्ला, जिंदल,चेंबर ऑफ कॉमर्स, असोचेम , फिक्की यांनी हिंडेनबर्गवर काही म्हटलंय का? नाही म्हणजे, तो भारतीय अर्थव्यवस्थेवरचा हल्ला ना ? हे लोक अदाणीइतके नसले तरी भारतीय अर्थव्यवस्थेचे लहानसे भाग आहेत .
किनई माझा अदाणी प्रकरणाचा
किनई माझा अदाणी प्रकरणाचा अजिबात अभ्यास नाही. मागे मी त्याच्याबद्दलचे एक पुस्तक वाचले होते आणि तो किती ग्रेट आहे, मेहनती आहे ते मला कळले असे इथेच कुठेतरी लिहिले होते. पण आता जे काय प्रश्न आलेत त्यावर उत्तर नाही. कारण 'आमच्या' गाइडलाच ती उत्तरे मिळत नाहीएत. अदाणी हिंडेनबर्ग प्रकरणानंतर साधारण दीड महिन्याने अमेरिकेतल्या बँकांचे प्रकरण झाल्यावर आमच्या गाइडने त्यावर प्रश्न लिहून पाठवले. त्या प्रश्नांची तलवार घेऊन मी अदाणी हिंडेनबर्ग मैदानात प्रवेश केला आणि सपासप चालवली.
तसंही पेपर कोणताही असो, एंटायर पोलिटिकल सायन्सच्या पुस्तकातला कुठलातरी मजकूर चिकटवायचा असं आमच्या युनिव्हर्सिटीत शिकवलंय.
Riddikulus
कोणत्याच पक्षाचे कट्टर विरोधक
कोणत्याच पक्षाचे कट्टर विरोधक किंवा समर्थक नसलेली लोक पण आता bjp च्या आयटी सेल च्या अजब युक्तिवादा ला कंटाळले आहेत.
शेती कायद्या ला विरुद्ध निषेध नोंदवणारे शेतकरी लोकांना आयटी सेल नी देशद्रोही ठरवायचं प्रयत्न केला.
पंजाब राज्यातील लोक bjp ला किंमत देत नाहीत तिथे bjp निवडून येणे अशक्य आहे.
हे लक्षात आल्यावर.
सर्व शीख बांधव हे खलिस्तान चे समर्थक आहेत आणि शीख म्हणजे देशद्रोही असा प्रचार bjp आयटी सेल करू लागली.
ममता च्य बंगाल मध्ये डाळ शिजत नाही हे दिसल्यावर ममता कशी बांगलादेशी मुस्लिम लोकांची समर्थक आहे हे bjp it' सेल आणि त्यांचे टीव्ही चॅनेल सांगू लागले.
महाराष्ट्रात ठाकरे सरकार ल रोज बदनाम करण्याचे काम केले.
केंद्रीय तपास यंत्रणांची सर्रास बेकायदेशीर कारवाई.
Bjp सोडून बाकी सर्व विरोधी पक्षातील नेत्यांवर चालू आहे.
आता अडाणी वर प्रश्न म्हणजे देशद्रोह असेल ज्ञान bjp आयटी सेल आणि त्यांचे न्यूज चॅनल पाजळत आहेत.
आणि एकदम ताजे उदाहरण.
जुनी पेन्शन योजना चालू करावी म्हणून कामगार मोर्चे काढत आहेत.
तर ते कसे लाचखोर आहेत अशा अर्थाचे msg हेच पसरवत आहेत.
पण लाचेतून पार्टी funding पण होते आणि लाच वर पर्यंत पोचते म्हणूनच ती सर्रास घेतली जाते.
हे मात्र सांगत नाहीत
क्रेडिट स्वीस आणि सिलिकॉन
क्रेडिट स्वीस आणि सिलिकॉन वॅली दोन्ही बँकांनी मागच्या वर्षभरात अनुक्रमे ९५% आणि ६५% मार्केट वॅल्यू गमावलेली आहे. ईन्वेस्टर्स आणि ओवर रिटेल मार्केटला ह्या बँकांच्या बिझनेसमध्ये रस नाही हे त्यांनी अनेक वर्षांपासून दाखवून दिले आहे. ह्या बँकांमधला सध्याचा गडगडाट हा अनफेवरेबल मॅक्रो फॅक्टर्स आणि घटता बिझनेस ज्यातून निर्माण झालेली कॉम्प्लिकेशन्स, जे ऊर्वरित चांगल्या बिझनेसलाही अॅफेक्ट करणार आणि आता गोईंग कन्सर्न वर प्रशन्चिन्ह ऊपस्थित झाले आहे आहे ह्या धारणेतून होत आहे. ह्यात फ्रॉड वगैरे नसून रेग्यूलर कॅपिटल मार्केट्स अॅट वर्क.. असे आहे. हे बँक स्टॉक्स अनेक महिन्यांपासून ऑलरेडी प्रचंड पडलेले आहेत त्यात ऊर्वरित गडगडाट हा एखाद दुसर्या मोठ्या ईन्वेस्टरने काढता पाय घेतल्याने होत आहे. मिडीयातून ह्या आधीच्या ऊतरणीला फॉलो न करता नुसती पॉईंट ईन टाईम ब्रेकिंग न्यूज फॉलो केली की शॉर्ट साईटेड ओपिनिअन बनतात.
ह्याऊलट अडाणी स्टॉक हिंडेनबर्ग रिपोर्ट येण्यापूर्वी प्रचंड फुगवलेल्या प्राईसवर, फ्रॉड्युलंट रिपोर्टिंग्वर ट्रेंड होत होता. फ्रॉड बाहेर येताच तो गडगडला.
सध्याच्या डळमळीत बँका अणि अडानी ग्रूप ऑफ कंपनीज ह्यांची तुलना हास्यास्पदच नाही तर दुर्दैवाने अज्ञानदर्शक आहे.
अज्ञानदर्शक हा शब्द इथे
अज्ञानदर्शक हा शब्द इथे योग्य नाही. या शब्दात presumption of innocence ध्वनित होते. इथे जाणून बुजून थयथयाट सुरू अहे. काहीही करून अदानी वरून लक्ष विचलित करणे.
बरेच मोदी समर्थक क्रेडिट स्वीस बुडाली, एस व्ही बी बुडाली म्हणून नाचत आहेत.
हिंदुत्ववाद्यांनी अर्थकारण वगैरे विषयावर बोलण्या ऐवजी लव्ह जिहाद, हलाला, वगैरे हातखण्डा विषयावर बोलावे हे उत्तम !
हिंदुत्ववादी हा शब्द पण नका
हिंदुत्ववादी हा शब्द पण नका वापरू.
हिंदू च bjp ल वैतागले आहेत त्यांचे हिंदुत्व हे alien हिंदुत्व आहे ते त्यांच्या पुरतेच मर्यादित आहे.
ह्यात फ्रॉड वगैरे नसून
ह्यात फ्रॉड वगैरे नसून रेग्यूलर कॅपिटल मार्केट्स अॅट वर्क.. असे आहे.
Svb बँक ज्या दिवशी कोसळली त्यादिवशी आधी बोनसेस काढून घेणे, चार दिवस आधी फॉर्ब्जने ranking देणे व बँकेने ते मिरवणे, मॅनेजमेंटने मिलियन्स ऑफ डॉलर्स चे शेअर्स आधी विकणे, fdic चे नियम सरकारकडून बदलून घेऊन २५० k वरून थेट unlimited करून घेणे //
हा fraud अजिबातच नाही ना? This is how it works? आणि क्रेडिट स्विसचा material weakness in reporting पण नैसर्गिक आहे ना? मॅडम तुम्ही कुठे कॅपिटल मार्केटमध्ये काम करता का? छान छान.
एक बोधकथा आठवली.
एक बोधकथा आठवली.
एक माणूस अचानक म्हणू लागतो की मी मेलो आहे, माझ्यावर अंत्यसंस्कार करा ! तू जिवंत आहे असे कितीही समजावले तरी ऐकत नाही. शेवटी एका शहाण्या माणसाला बोलवले जाते. तो त्याला व काही लोकांना घेऊन एका प्रेतगृहात जातो. आधी काही प्रेतांच्या बोटाला टाचणी टोचतो. रक्त येत नाही. मग त्याला याचा अर्थ विचारतो, 'प्रेतांच्या बोटातून रक्त येत नाही' मग तो काही जिवंत लोकांना टोचतो, रक्त येते. ' जिवंत लोकांच्या बोटातून रक्त येते' आता तो विजयी मुद्रेने त्या माणसाच्या बोटाला टोचतो. 'याचा अर्थ काय ?' कधी कधी प्रेतंच्या बोटातूनही रक्त येते.
vb बँक ज्या दिवशी कोसळली
vb बँक ज्या दिवशी कोसळली त्यादिवशी आधी बोनसेस काढून घेणे, चार दिवस आधी फॉर्ब्जने ranking देणे व बँकेने ते मिरवणे, मॅनेजमेंटने मिलियन्स ऑफ डॉलर्स चे शेअर्स आधी विकणे, fdic चे नियम सरकारकडून बदलून घेऊन २५० k वरून थेट unlimited करून घेणे // >> आफ्टरमॅथ मध्ये बोनसेस काढून घेणे, ईनसायडर ट्रेडिंग केलेही असेल svb च्या एक्झेक्युटिव्जनी पण त्याने काय सिद्ध होते?
तुमची कंपनी बँक्रप्सी जाहीर करत असेल तर एम्प्लॉयी म्हणून केलेल्या कामासाठी तुम्ही मिळणार्या बोनसचा अव्हेर करणार का? तुम्हाला पगाराच्या बदल्यात मिळालेले कंपनीचे शेअर्स असतील तर त्यांची किंमत शून्य होण्याआधी मिळेल त्या भावात विकणार नाहीत का?
चौकशी होईल की त्याचीही. थोडा सबर रो करो.
फोर्ब्ज ही मिडीया कंपनी आहे.. ऑडिटर नाही. मिडिया अॅवार्ड्स मॅनेज्ड असतात हे अतिशय बाळबोध ज्ञान तर आहेच पुन्हा बँकेला काय अॅवार्ड मिळाले ह्याच्याशी ईन्वेस्टर्सना काहीही देणेघेणे का असावे. इन्वेस्टिंग महण्जे पॉप्युलॅरिटी कॉन्टेस्ट असते का? की अॅवार्ड मिळाले म्हणून कोणी जाऊन कंपनीतला आपला स्टेक वाढवते.
material weakness in reporting पण नैसर्गिक आहे ना? >> हो बिलिव ईट ऑर नॉट हे नैसर्गिक प्रोसेस्सिंग आहे. अशा अनेक चुका आणि कमतरता SEC काढत असते. कंपन्यांना कळवत असते आणि त्यांचे रेमेडिएशन करवून घेत असते. ह्या सगळ्याची ट्रेल अवेलेबल असते. ५० मिलिअनच्या कंपनीपासून अडीच ट्रिलिअनच्या अॅपलपर्यंत वर्षातून अनेकवेळा कंपन्या रिपोर्टिंगमधला material weakness इन्वेस्टर्सना रिपोर्ट आणि रेमिएडिट करतात. अनेकदा त्यासाठी त्यांना फाईन सुद्धा होतात.
क्रेडिट स्वीस काय किंवा svb काय ह्या बाबतीत आता प्रत्येक छोटी मोठी गोष्ट मिडियामध्ये 'ब्रेकिंग न्यूज' म्हणत ऊधळली जाणार. तुमच्या माहिती साठी २०१९ आणि २० मधल्या रिपोर्टिंग मधल्या material weakness ची बातमी मंगळवारीच आली आणि त्यानंतर क्रेडिट स्वीसचा स्टॉक खाली न जाता नॉर्मल ट्रेड करत राहिला. ह्यावरून तुम्हाला कळेल की material weakness ची बातमी किती 'material' होती.
तुम्ही पुढचा मागचा तपास न करता material weakness ची बातमी स्टेक वर लाऊन फ्रॉड फ्रॉड ओरडत तो स्टेक नाचवत आहात.
म्हणून म्हणाले हे सगळे फार हास्यास्पद आहे.
बोनस देणे हा प्रफेंशियल
बोनस देणे हा प्रफेंशियल पेमेंट मधला घोटाळा असू शकतो, पण हे काही SVB कोसळण्याचे कारण नव्हे. Svb कोसळण्याचे कारण कोणताही scam नाही हे खरेच आहे. (As far as we know)
फोर्ब्सच्या मुद्याचा संबंधच समजला नाही. फोर्ब्ज आजवर अनेक बंडल गोष्टी करत आले आहे. एलिझाबेथ होम्स, बँकमन फ्रिड वैगरे लोक फोर्ब्ज मध्ये फ्रंट पेजवर आलेली आहेत. पण फोर्ब्ज काय सरकारी संस्था आहे काय ? मग संबंध काय ? फोर्ब्ज ने अमुक केले हा दावा सारखा सारखा रिपीट करण्याचा उद्देश काय ?
अडानीचा शेअर त्याच्या फंडामेंटल व्हॅल्यू पेक्षा इतका वाढला होता हाच एक रेड फ्लॅग होता आणि तेव्हाच सेबीने त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवे होते हे खुद्द सेबीचे पूर्व अध्यक्ष दामोदरन म्हणले आहेत, कोणी एरागैरा पुरोगामी नाही.
हिंदेनबर्ग सुध्दा प्रायव्हेट संस्था आहे. त्यांनी अडाणी वर अनेक वर्षे रिसर्च करून मग निर्णय घेतलेला. SVB चे पतन काही महिन्यांची गोष्ट आहे. त्यामुळे हिंदेंबर्ग ने अमुक कंपनी का नाही बघितली हा युक्तिवाद बकवास आहे.
चार दिवस आधी स्टॉक विकणे हे
चार दिवस आधी स्टॉक विकणे हे फ्लॅशी हेडलाईन म्हणून व्हॉअॅ अंकलना ठीक आहे. पण इन-सायडर्स असे वाट्टेल तेव्हा खरेदी विक्री करू शकत नाहीत. त्यांना १०बी५ काही महिने आधी एसईसीकडे डिक्लेअर करुनच खरेदी विक्री करावी लागते. आता ते टाईम्ड असेल, कूलींग ऑफ पिरिएड पुरेसा नसेल इ. असेल तर एसईसी हात धुऊन मागे येईलच.
मॅनेजमेंटने मिलिअन्स ऑफ् डॉलर्सचे शेअर्स आधी .... म्हणजे ... तो गेल्या दोन वर्षांतील आधीचा हिशेब आहे तो. त्याला काही अर्थ आहे का? कॅपिटल मार्केट असंच चालतं. परत व्हॉअॅ अंकलना माहित नसेल कदाचित. बाकी फेड बँकेला बेल आऊट करत नाहीये.
आफ्टरमॅथ मध्ये बोनसेस काढून
आफ्टरमॅथ मध्ये बोनसेस काढून घेणे, ईनसायडर ट्रेडिंग केलेही असेल svb च्या एक्झेक्युटिव्जनी पण त्याने काय सिद्ध होते?
>>>
एक्झॅक्टली.ह्या सगळ्या गोष्टी SVB पडल्यावर उंदरांनी साखरेचे कण जमविण्याचा प्रकार आहे.
बाकी, WHITEHAT, FDIC लिमिट पेक्षा जास्त पैसे द्यायला लावणे हा तुमचा मुद्दा खरोखर रास्त आहे आणि मला पूर्णपणे मान्य आहे. हे खरेच क्रॉनी भांडवलशाहीचे उदाहरण आहे. ही अमेरिकेतली जुनी उज्ज्वल परंपरा आहे. श्रीमंत लोकांना वाचवायला सगळे पक्ष एकत्र येतात.
कॉमी त्यातही न्युआन्स आहे.
कॉमी त्यातही न्युआन्स आहे. लिमिट पेक्षा जास्त पैसे हे ठेव्रीदारांचे कव्हर करत आहेत. गुंतवणूकदारांचे नाही. ठेवीदारांचे नाही कव्हर केले तर काय होईल - एट्सी सारख्या सर्वसामान्य लोक वापरणार्या कंपन्या धोक्यात येतील. अनेक लहानमोठ्या उद्योजकांना आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे ठेवीदारांना कव्हर करण्यात मला फार चूक वाटत नाही.
बाकी डेम्स काय रिपब्लिकन्स काय, ते राजकारणीच आहेत. कोणीही संत नाही. क्रोनी कॅपिटॅलिजमही असणारच. तो कोणत्याच सिस्टीमला चुकलेला नाही. लोकशाही व ओपन प्रेस मधे किमान पकडला जाऊ शकतो.
त्यामुळे ठेवीदारांना कव्हर
त्यामुळे ठेवीदारांना कव्हर करण्यात मला फार चूक वाटत नाही. +१
शिवाय ते कव्हर केले नाही तर त्या कंपन्या बंद पडतींल व लोकांच्या नोकर्या जातील हेही आहेच.
Pages