हिंडेनबर्ग रिपोर्ट आणि अदानी

Submitted by अमितव on 2 February, 2023 - 00:09

हिंडेनबर्ग या न्यूयॉर्कच्या शॉर्ट सेलर ने दोन वर्षे विविध लोकांच्या मुखाखती घेऊन, ज्यात अदानीकडे पूर्वी काम करणारे लोकही समाविष्ट आहेत, पब्लिक डोमेन मधील विखुरलेली माहिती एकत्र करुन, अर्धा डझन देशांतील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन आणि हजारो कागदपत्रांची छाननी करुन १७.८ ट्रिलअन रुपये (२१८ बिलिअन अमेरिकन डॉलर) मूल्यांकन असलेल्या अदानी समुहावर शेअर्सच्या किमती निश्चित करणे आणि अकाउंटिंग फ्रॉड असे अनेक अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

गौतम अदानी याची संपत्ती गेल्या तीन वर्षांत चक्रवाढ गतीने वाढून २० बिलियन ची १२० बिलियन झाली, आणि त्याच काळात अदानी गृपच्या ७ महत्त्वाच्या शेअर्सची किंमत तब्बल ८१९% वाढली आहे. अदानी कंपन्यांचे फंडामेंटल फारच तकलादू असल्याने या प्रचंड मूल्यांकनामुळे एकुणच त्या कंपन्यांतील गुंतवणूक function at() { [native code] }यंंत धोकादायक आहे. अदानी ग्रुपहा कौटुंबिक व्यवसायासारखा लागेबांधे ठेवून चालू असल्याचा दावा ही अहवालात आहे.

गौतम अदानी, त्यांचे भाऊबंद, मेव्हणे, जावई इ. इ. लोकांनी परदेशात, जेथे करसवलती आहेत तिकडे कशा बेनामी कंपन्या काढल्या आणि तिकडून पैसे कसे सायफन करुन गैरव्यवहार केले हे वाचलं तरी भिती वाटते. अदानी कुटुंबातील अनेकांवर पूर्वी सेबीने कारवाई केली आहे, अनेकांनी तुरुंगाची हवा खाल्ली आहे पण नंतर त्या सर्वांची पदन्नती होऊन ते सगळे आता डायरेक्टर इ. झाले आहेत.

सविस्तर अहवाल इथे बघता येईल. https://hindenburgresearch.com/adani/
बराच मोठा अहवाल आहे. त्यात एकाच व्यक्तीच्या १४ कंपन्या आहेत, त्यांचं डोमन नेम एकाच दिवशी रजिस्टर झालं आहे, अनेकांच्या वेबसाईट तंतोतंत जुळणार्‍या आहेत, त्यातील एकाने अदानीला काही शे मिलियन डॉलरचं कर्ज दिलं आहे. ती चांदीच्या व्यापारात कंपनी आहे, पण त्यांच्या फाईलिंग रिपोर्ट नुसार त्या कंपनीत शून्य लोक काम करतात, त्यांचं ऑफिस मोडकळीला आलेल्या इमारतीत कायम स्वरुपी बंद आहे, आणि तिकडे गिचमिड अक्षरांत संपर्काचा दूरध्वनी क्रमांक दिला आहे अशा अनेक रंजक आणि सिनेमातील वाटतील अशा कथा आहेत.

हा रिपोर्ट आल्यावर अदानी कंपन्याचे शेअर्सची घसरगुंडी झाली नसती तरच नवल. त्यांचा एफपीओ जो ११२% (ओव्हर सबस्काईब) झालेला तो ही काल मागे घेतला आहे. क्रेडीट स्विसने अदानी बॉंड इ. नाकारण्यास सुरुवात केली आहे.

हिंडेनबर्ग रिपोर्ट, अदानी आणि त्याचे भारतीय गुंतवणुकीवर, सेबीवर पडणारे पडसाद याची चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेखर गुप्तांचा कट द क्लटर पाहायचा प्रयत्न केला होता. इतका पाल्हाळ, नमनाला घडाभर तेल. पेशन्स संपला. आणि याला ते कट द क्लटर म्हणतात !!

Adani Group Stocks: गौतम अदानी यांच्या अदानी समूहाच्या शेअर्सला पुन्हा एकदा बूस्टर डोस मिळाला आहे. GQG पार्टनर्सने चार महिन्यांत तिसऱ्यांदा अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे.

यूएसस्थित GQG पार्टनर्सने अदानी समूहाचे एक अब्ज डॉलर्सचे शेअर्स खरेदी केले आहेत. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, GQG भागीदारांसह इतर काही गुंतवणूकदारांनी एक अब्ज डॉलर्सच्या ब्लॉक डीलमध्ये अदानी ग्रुपचे शेअर्स खरेदी केले आहेत.<<<< हिंडेनबर्ग रिपोर्ट मुळे नक्की कोणाचा फायदा झाला

https://www.esakal.com/sakal-money/share-market/another-1-billion-dollar...

एक वर्षानंतर अदानी काय म्हणत आहेत:

"आम्ही (आरोपांचा) पर्दाफाश कसा केला?:
आमच्यावर हल्ले करणाऱ्यांच्या हेतूंचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही वस्तुस्थिती पारदर्शकपणे मांडण्यावर आणि आमची बाजू कथन करण्यावर लक्ष केंद्रित केले. यामुळे आमच्या समूहाविरुद्धच्या नकारात्मक मोहिमांचा प्रभाव कमी होत गेला."

https://www.lokmat.com/business/news/adani-an-attack-neither-ghost-nor-f...

कोणती पारदर्शकता त्यांनाच ठाऊक.

हिंडेनबर्ग २.०

अडाणी यांच्या शेल कंपनी मधे सेबीच्या अध्यक्षा ( माधवी बुच ) आणि त्यांचे पती धवा/ धवल बुच यांनी गुंतवणूक केली असल्याचा हिंडेनबर्गचा आरोप.

https://hindenburgresearch.com/sebi-chairperson/

अमेरिकेत आणखी कोणीतरी अदानीवर , आदर्णीय मोदीजींवर आणि भारतावर जळतंय.
https://edition.cnn.com/2024/11/20/business/gautam-adani-indicted/index....
Billionaire Gautam Adani indicted in New York on bribery charges
बातमीच्या बायलाइनम धलं एक नाव भारतीय वंशाचं आहे. दुसरी पी सफुल वाटतेय. दोघी बायका. शिव्या द्यायल्या सोपं.
निफ्टीतले अदाणी ग्रुपमधल्या दोन कंपन्यांचे शेअर्स २० आणि २३ टक्के पडले होते. आता थोडे वर आलेत. आयटी सेलवाल्यांनी आपला पगार वापरला असावा.

शेखर गुप्ता आणि शरद राघवन यांनी indictment बद्दल छान माहिती सविस्तर पणे उलगडून सांगितली आहे.
https://youtu.be/ltYUfrgUZog?si=nJufkBuOwEqmwoqC

५४ पानी आरोपपत्रात नक्की काय मांडले आहे?
https://www.justice.gov/usao-edny/media/1377806/dl?inline

शेखर गुप्तांचा कट द क्लटर पाहायचा प्रयत्न केला होता. इतका पाल्हाळ, नमनाला घडाभर तेल. पेशन्स संपला. आणि याला ते कट द क्लटर म्हणतात !!>>>अगदी अगदी. पीळ पीळ ,जिलब्य,, काय ते हातवारे! बंद केला.

अमेरिकेची बाजार नियंत्रक असलेल्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने (एसईसी) कथित फसवणूक आणि २६५ दशलक्ष डॉलरच्या लाचखोरीच्या प्रकरणात गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी यांना समन्स बजावण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागितली आहे. या वृत्तांमुळे शुक्रवारच्या सत्रात अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांत १३ टक्क्यांपर्यंत घसरण झाली.
अमेरिकी गुंतवणूकदारांकडून पैसे उभारणाऱ्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडशी निगडित हे प्रकरण आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये ‘एसईसी’ने दाखल केलेल्या आरोपपत्रात, मुख्यत्वे लाचखोरी आणि फसवणूक असा ठपका अदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आहे. निधी उभारणी करताना खोटे आणि दिशाभूल करणारे विधान गौतम अदानी आणि सागर अदानी यांनी केले आणि हा अमेरिकेच्या नियामक कायद्यांचे उल्लंघन असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

अदानी समूहाने मात्र अमेरिकेच्या न्याय विभाग आणि एसईसीने अदानी ग्रीनच्या संचालकांवर केलेले आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. भारताच्या सौर ऊर्जा महामंडळाकडून मोठी कंत्राटे मिळविण्यासासाठी लाच दिल्याचा आरोपही फेटाळला आहे. दरम्यान अमेरिकी नियामक मंडळाने न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन येथील न्यायालयात, समन्स बजावण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांकडून मदत मिळवण्यात त्यांना अपयश आल्याचे सांगितले. त्यानंतर, नियामक मंडळाने अदानी यांना ईमेलद्वारे नोटिसा बजावण्याची परवानगी मागितली आहे.

India's Adani Power (ADAN.NS), opens new tab said on Thursday it has formed an atomic energy-focussed unit, becoming one of the first privately-held utilities to disclose publicly their interest in the newly-opened nuclear sector.
Adani Atomic Energy Ltd, will generate, transmit and distribute electric power derived from nuclear energy sources, the company said, without giving other details.

https://www.nytimes.com/2026/05/14/nyregion/gautam-adani-billionaire-doj...
ही बातमी मला वाचता येत नाही. ट्वीटमध्ये ही समरी मिळाली
The Trump Justice Department is dropping Biden-era charges against Indian billionaire Gautam Adani.

The reversal came after Adani hired a new legal team led by one of Trump's personal lawyers.

That lawyer went to DOJ and made a proposal: If prosecutors dropped the charges, Adani would be willing to invest $10 billion in the American economy and create 15,000 jobs.

राजाला सोन्याचे घड्याळ, त्याच्या मुला-जावयांच्या कंपनीत गुंतवणुक आणि अमेरिकेत जॉब निर्माण होतील, समटाईम इन द फ्युचर, असं तोंडदेखलं ऑप्टीक्स साठी आश्वासन इतक्या भांडवलावर अमेरिकेकडून काहीही मिळवता येतं हे फायनली अडानिला ही समजलं तर!

Pages