वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हुलू वर "द ड्रॉपआउट" पाहात आहे. थेरॅनोस व एलिझाबेथ होम्स वरची सिरीज. याच विषयावर एचबीओ वरची डॉक्युमेण्टरी पाहिली आहे. पण ही सिरीज सुद्धा इंटरेस्टिंग वाटते. सुरूवात जरा स्लो आहे पण दुसर्‍या भागापासून खिळवून ठेवते.

>>मला अजिबातच कनेक्ट होता आलं नाही त्या भाडिपा सिरिअलशी.
हो.... म्हणजे उगाच ओढूनताणून वाटतात गोष्टी!!
BEरोजगार आणि 9 to 5 दोन्हीने निराशा केलीय खर म्हणजे!
म्हणजे आई आणि मी, कांदे पोहे किंवा Casting Couch वगैरे खुप छान जमल्या आहेत पण सलग कथानकवाल्या मालिकांचा जॉनर त्यांना अजुन जमल्यासारखा वाटत नाही !!

पण सलग कथानकवाल्या मालिकांचा जॉनर त्यांना अजुन जमल्यासारखा वाटत नाही !! >>>>>> मला खात्री नाही या वेब सिरीज भाडीपाच्या आहेत का, पण 'पेट पुराण' आणि 'शांतीत क्रांती' जर त्यांच्या असतील तर चांगल्या जमल्या आहेत.

९ टू ५ मध्ये तो बॉस इतका तिनपाट दाखवलाय की त्याच्या हून जास्त काम तर इंटर्न करत असावा अशी शंका येते.
१ टुकार टॅग लाईन सुचणे हीच काय ती हुशारी.. जरा अ आणि अ वाटली.
BE ऱोजगार जरा आवडली होती. ही खास नाही वाटली. पण आई शी बोलताना अनी चे भाव खूप बोलके वाट्ले.
गिरीजा ओक प्रसन्न दिसते, काम चांगले करते, पण सीरियल मधे तिला छाप सोडण्या इतका रोल नाही..

हश हश ..वरील प्रतिक्रियांना मम. शेवट दु:खी करून गेला. जुही विचित्र टोन मधे बोलते..संन्याशा सारखं. सोहा काम चांगलं करते पण प्रचंड म्हातारी दिसते..फक्त ४० चीच आहे तरी..नवाब फॅमिलीतल्या असून पदरी ट्रेनर, डायट , मेकप सर्व हाताशी असताना ह्यांना मेंटेन का करता येत नसावं?
बाकीच्या दोघी छान काम करतात..

बाय द वे; मी भाडिपा हेटर वगैरे अज्जिबात नाहिये पण त्यांच्या इतर कामामुळे वाढलेल्या अपेक्षा BEरोजगार आणि 9 to 5 मध्ये पूर्ण झाल्या नाहीत इतकेच म्हणायचे होते Happy

मराठीमध्ये सातत्त्याने दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण कंटेंट देणारा दुसरा चॅनेल (माझ्या माहितीत तरी) नाहिये!!

मराठीमध्ये सातत्त्याने दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण कंटेंट देणारा दुसरा चॅनेल (माझ्या माहितीत तरी) नाहिये!!>>> +१
हेटर बीटर काय? Happy

द ड्रॉपआउट भन्नाट आहे. पहिल्या एपिसोडला जरा पेशन्स लागला. पण नंतर एकदम खिळवून ठेवते. पाहाच. हुलू वर आहे.

द ड्रॉपआऊट - जबरीच आहे. मी हॉटस्टारवर पाहिली होती.
ज्या पत्रकाराने ते उघडकीस आणलं त्याने त्यावर पुस्तक लिहिलंय. त्याचा रिव्ह्यू म.टा.मध्ये वाचला. किंडलवर पुस्तक घेऊन ठेवलं. मग नेटवर एचबीओवरची डॉक्युमेंट्री सापडली होती. ती सुद्धा लगेच पाहिली.
तरी पुन्हा द ड्रॉपआऊट पाहिलीच.
तो विषय डोक्यातून जात नाही.
पुस्तक अजून वाचायचंय Proud

hush hush baghitla Prime var. High drama and average story line vatli. Nahi baghitla tari chalel. Adds mdhe khup kahitari suspense ahe asa dakhavlay but its not true.

मग नेटवर एचबीओवरची डॉक्युमेंट्री सापडली होती. ती सुद्धा लगेच पाहिली.
तरी पुन्हा द ड्रॉपआऊट पाहिलीच. >> हो मीही एचबीओ ची डॉक्युमेण्टरी आधी पाहिली होती. पण ही सिरीज तरीही खिळवून ठेवते.

आता पूर्ण पाहिल्यावर मला एक जाणवले. सिलीकॉन व्हॅली मधल्या स्टार्टअप, त्यांचे हाइप, त्यांनी वेळोवेळी केलेले अफाट क्लेम्स यावर बरीच टीका होते. ती बरोबर आहेच. पण या बर्‍याच कंपन्यांमधे गफला घुसतो तो नंतर. मूळ कल्पना सहसा क्रांतिकारी असते. फाउण्डर ने बहुतांश वेळा काहीतरी भन्नाट काम केलेले असते. त्यातली तंत्रज्ञानावरची कामगिरी, शोध १००% खरे असते. मग त्यांना फंडिंग मिळते. व्हीसी व इतर इन्वेस्टर्सच्या महत्त्वाकांक्षा वाढत जातात. मूळ कल्पनेला ताणून अचाट क्लेम्स केले जातात. आणि या प्रोसेस मधे कोठेतरी तडजोडी सुरू होतात व सगळे करप्ट होते. फेल गेलेल्या अनेक स्टार्टअप्स मधे हा पॅटर्न असतो. इव्हन "सिलीकॉन व्हॅली" या सिरीज मधे हाच प्रकार दाखवला आहे. तेथे ते यशस्वी/अयशस्वी होण्याची कारणे इतरही विनोदी असली तरी.

इथे ते करप्शन सहज दिसते. पण मूळ कल्पना व्हॅलिड होती का, रक्ताच्या एका थेंबावर किमान काही टेस्ट्स यांना करता येत होत्या का याचा नीट उलगडा होत नाही. म्हणजे एक व्हॅलिड कन्सेप्ट कमालीचा ताणून लोकांना गंडवले, की अगदी पहिल्यापासून हा टोटल फ्रॉड होता हे नीट कळत नाही. किंबहुना टोटल फ्रॉडच होता असे चित्र उभे राहते. ते कितपत खरे आहे कल्पना नाही. एलिझाबेथ होम्स या विषयात हुषार दाखवली आहे पण शोध वगैरे लावण्याइतकी तज्ञ नव्हती. तज्ञ तो "इयान" असावा. त्यांनी मुळात काही शोध लावला होता का ते नीट कळत नाही. बहुधा त्यावर संशोधन सुरू होते - मुख्यतः इयान, तो ब्रेण्डन व इतर टीम करत होते. पण ते पूर्णत्वाला जायला अवकाश होता. त्याआधीच या बाकी लोकांनी डील्स वगैरे करून फ्रॉड केला. इयान, ब्रेण्डन वगैरेंनी केलेला विरोध दाखवला आहे. ते तसेच असावे.

फारएंड

तुमची मेडिकल डिव्हाईस / इन व्हिट्रो डाइग्नोस्टिक डिव्हाईस ची कन्सेप्ट कितिही भारी असली तरी तुम्ही जो पर्यंत ती पूर्णपणे व्हेरिफाय आणि व्हॅलीडेट करत नाही तो पर्यंत ती जवळपास यूजलेस आहे.

>>ज्या पत्रकाराने ते उघडकीस आणलं त्याने त्यावर पुस्तक लिहिलंय.
Bad blood. ते ४ वर्षांपूर्वी आलं तेंव्हा वाचलं होतं. फक्त wire fraud चा निकाल बघून चिड्चिड झाली होती. अश्क्य लेव्हलचा white collar crime! ती बाई मजेत हिंडतीये, कधीही काडीचा remorse दिसला नाही.

इथे सुचवलेली 'बॉडीगार्ड' बघितली. मस्त आहे. आम्हांला आवडली. त्यातला तो बड म्हणजे गॉट मधला रॉब स्टार्क. बर्‍याच वेळाने ट्युब पेटली. सगळ्यांची कामं, गोष्ट, एकूण वातावरण आणि मुख म्हणजे ब्रिटीश अ‍ॅक्सेंट.. सगळंच छान आहे. Happy

तुम्ही बरोबर आहात, 8 व्या भागाचे दिग्दर्शन गीता पटेल यांनी केले आहे आणि तिने नेत्रदीपक काम केले आहे. परफॉर्मन्स खरोखर आवडले
जेव्हा मी तिथे भारतीय नाव पाहिले तेव्हा मी आश्चर्यचकित झालो.

इथे वाचून लक्षात आलं, हाऊस ऑफ ड्रॅगन हल्ली नवरा बघत नाही बहुतेक, मागे दोन तीन एपिसोडस लावले होते. त्याला सांगते आठवा एपिसोड आला. बरेच सीन्स मात्र पुढे ढकलत न्यायला लागतात, अतिरंजित अतिरेकी असतात.

@ अन्जु : आतापर्यंत तरी अतिरंजित नाही दाखवले काही... ७ व्यात थोडफार आहे, ८ वा भाग पाहिला नाही अजून, आज पाहीन

तुमची मेडिकल डिव्हाईस / इन व्हिट्रो डाइग्नोस्टिक डिव्हाईस ची कन्सेप्ट कितिही भारी असली तरी तुम्ही जो पर्यंत ती पूर्णपणे व्हेरिफाय आणि व्हॅलीडेट करत नाही तो पर्यंत ती जवळपास यूजलेस आहे. >> अक - त्याबद्दल काही वाद नाही. मुळात हे फक्त कन्सेप्ट लेव्हलला होते, की यात इतपत प्रॉमिस होते की अजून २-३ वर्षांच्या कामानंतर हे खरोखर होऊ शकले असते व फक्त खूप आधीच मोठमोठे क्लेम करून घाई केल्याने हे गोत्यात आले - ते या सिरीज मधून नीट कळत नाही.

सिलिकॉन व्हॅली मधल्या टेक स्टार्टअप्स मधे तंत्रज्ञान व त्याचे किमान काही फायदे, काही "युनिक सेलिंग पॉइंट्स" नक्की असतात. तसे मुळात यात काही होते का याचा पत्ता इथे लागत नाही.

ही सिरीज बघून झाल्यावर लगेच "डोपसिक" ही सिरीजही पाहिली. हुलू वरच आहे. ही सुद्ध जबरदस्त सिरीज आहे. पाहाच.

नेट्फ्लिक्स वर आफटर शॉक - नेपाळ आणी एव्हरेस्ट मधे २०१५ ला झालेल्या भुकंपावर आहे. छान आहे. निसर्गाचे असे भयाण रूप बघुन आपण किती कीड्या मुन्ग्यां सारखे आहोत हे जाणवते.. गावच्या गावं नाहीसे झालेत, ९००० म्रूत्यु आणी लाखो बेघर झालेत त्या भुकंपात..

Delhi Crime
डायरेक्ट दुसरा सिझन पाहायला घेतला तर कळेल ना... पहिल्यात अन दुसऱ्यात काही लिंक नाहीत ना

Pages