वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टर्मिनल लिस्ट सिरीज प्राईम वर पाहिली..

तीच रटाळ मिलिटरी मॅन फॅमिलीचा रिव्हेंज वगैरे स्टोरी..
कथा सुद्धा वेगवान नाहीये १० पैकी ४

अमेझॉन प्राईमवर The Rings of Power सुरु झाली आहे. आतापर्यंत २ एपिसोड्स झाले आहेत. हळूहळू कथा पकड घेत आहे.

The good wife हिन्दीमध्ये बनतेय.
काजोल is ALicia Florickk <<<>>>>>> अरेरे. फार पूर्वी grey's anatomy हिंदीत कोणत्यातरी चॅनलवर सुरु झाली होती. पहील्यात भागात वाट लावली.
आता ही काय करतात बघू. ट्रेलर शोधून बघितला. नावातच प्यार, धोका असे शब्द दिसले. म्हणजे लीगल केसेस सोडून ह्यावरच भर देणार की काय !!

नेटफ्लिक्स वर बॉडीगार्ड बघितली. गृहसचिव आणि तिचा बॉडीगार्ड यावर कहाणी आधारीत आहे - गृहसचिवांचा खून होतो आणि मग त्याची उकल. सस्पेन्स मस्तच आहे. शेवटच्या १५ मिनीटात मिळणारा ट्वीस्ट जबरी आहे. मालिकेत इतका सस्पेन्स राखणं कठीण असते कारण जसजसा वेळ वाढत जातो तसतसे आपण सगळ्याच पात्रांवर संशय घेऊ लागतो. यात मात्र मुख्य गुन्हेगारावर संशय निदान मला तरी आला नाही.

दुसरा एक प्रकार असतो की कथानकातल्या मूळ धाग्यानुसार गुन्हा घडलेलाच नसतो. अगदी शेवटी एक दुसरेच उपकथानक उलगडते आणि त्यात गुन्हेगार सापडतो - जसे की सुझल. (अशा वेळेस कार्तिकेयला काय वाटले असेल ते कळते... नीट काही सांगायचे नाहीत आणि मग दुसराच विनर जाहीर करायचा) तसेही काही या मालिकेत नाहीये. मालिका संपल्यावर मधल्या काही प्रसंगाचा ताळमेळ पण व्यवस्थीत बसला आहे. ६ भागच (१ तासाचे) असल्यामुळे पटकन बघून होते.

Prime वर नवीन आलेली hush hush पाहिली. छान . आवडली मला.>>> spoiler देऊन जरा शेवट उलगडून सांगा. झेपला नाही..

Hotstar वरची criminal justice यावेळी संथ वाटतेय. पंकज त्रिपाठी आणि श्वेता बसू विश्वास (मकडी मधली चुन्नी) यांचं काम छान आहे. पण एपिसोड पटकन संपतो असं वाटतं. स्टोरी फार पकड घेत नाहीये. आणि दर शुक्रवारी १ एपिसोड रिलिज होतो त्यामुळे खूप वाट बघावी लागते आणि लिंक तुटते.

Hush hush मला पण आवडली.. त्यांची ती सोसायटी कसली भारी आहे..मागे गोल्फ कोर्स वगैरे . आणि घरं पण सुंदर.
हो..संपली च नाहीये अर्धवट आहे.

Criminal justice 3 खरंच..नाही लिंक लागते नीट.. श्वेता बसू फारच amzing अक्टिंग करते .. ताश्कंद फाईल्स मध्ये पण आणि बाकी सगळ्या तिच्या pic/series मध्ये अभिनय सुंदर केलाय.
पंकज त्रिपाठी तर बोलायलाच नको.पण एपिसोड पूर्ण वाटत नाही म्हणून फार भट्टी जमत नाहीये

Hush Hush - too boring. खूप उथळ आणि पांचट वाटली Happy दोन भागानंतर बघवेना.

Hush hush मला पण बोरिंग वाटली.
क्रिमिनल जस्टिस चा तिसरा सीझनपण फारच संथ सुरू आहे. आठवडाभर वाट पाहिल्यावर पुढचा एपिसोड पहावा तर गोष्ट तिथेच घुटमळत राहते.
The good wife मला आवडली होती. अलिशियाच्या रोलमध्ये काजोल चांगली दिसेल खरं तर. त्याच एज कॅटेगरीतली आहे. त्यामुळे, चांगले करेल काम. थोडा लाउड अभिनय कमी केलातर बरं होईल.
मूळ सिरियल थोडीफार एकता कपूर स्टाइलच आहे. त्यामुळे जास्त डोकं न लावता जशीच्या तशी कॉपी केली तर चांगलं होईल. (असं मला वाटतं हं. सगळा फियास्कोपण होऊ शकतो. पण आपण आशावादी रहायला काय हरकत आहे?)

लीगल केसेस सोडून ह्यावरच भर देणार की काय !!>>> मूळ सिरियल मध्ये पण आहेच ही सगळं.

Hush hush मला पण बोरिंग वाटली. >>> पहिला भाग थोडा बघितला, काही टोटल लागलीच नाही. जुही कसली म्हातारी दिसते, नाही आवडली (ही मला आवडते एरवी) आणि शर्मिला लेक (तोंडावर नाव आहे, पण आठवत नाहीये) पण बघवत नाहीये. कृत्तिका ना ती तिसरी, सिरियलवाली, ती कयूट दिसते आणि चौथी स्मार्ट दिसते.

आत्ता मला काहीच सांगता येणार नाही, कशी वाटतेय. नाहीतर पहिला भाग आणि शेवटचा बघायचा.

Hush Hush फार उथळ , बाळबोध वाटली.
जुहीने वैताग आणला. विचित्र टोन मध्ये बोलते ती सगळ्या सीन्समध्ये.
Dolly is cutest. सोहा बघवत नाही इतकी बारीक दिसते, पण काही काही ठिकाणी तिचे facial expressions कमाल आहेत.
शहाना खास वाटली नाही.
त्यांची सोसायटी मात्र झक्कास .

थँक्स आबा. हो मला पहिल्यापासून बघावी लागेल मग दोन्हीमध्ये काही लिंक असली तर.

मला अजिबातच कनेक्ट होता आलं नाही त्या भाडिपा सिरिअलशी. अत्यंत रटाळ आणि मुद्दाम काही तरी विचित्र टर्न घ्यायचे, स्टेटमेंट करायला काही तरी बोलायचं, आणि प्रॉडक्ट प्लेसमेंट करायची... फक्त तेवढ्यासाठी म्हणून सिरिअल काढली आहे असं झालं.
कॅज्युले करत काहीच सिरियसली घ्यायचं नाही असा प्रकार आहे. यापेक्षा टिकटॉक व्हिड्यू बघत वेळ बरा जातो.

Pages