वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागच्या आठवड्यात मेनिफेस्ट सिरीजचे सगळे सीझन नेटफ्लिक्सवर बघून संपवले. वैज्ञानिक आणी पौराणिक संकल्पनेतील कथा यांचा संमिश्र प्रभाव या सीरिजच्या पटकथेत वापर केला आहे. स्टोन परिवारातील स्टीव्ह स्टोन आणि पत्नी हे म्हातारे दाम्पत्य त्यांच्यासोबत मुलगा बेन स्टोन त्याची पत्नी ग्रेस, जुळे कॅल (मुलगा), ऑलिव्ह (मुलगी) आणि मुलगी मिशेला स्टोन असं सगळे जमैकाच्या सहलीवरून परत घरी न्यूयॉर्कला येत असताना विमानतळावर आपल्या विमानाची वाट पाहत असतात. बेन आणि ग्रेसचा मुलगा कॅल कॅन्सरग्रस्त असून त्याची पुढील वैद्यकीय उपचारांवरून दोघेही चिंतीत असतात. मिशेला न्यूयॉर्कच्या पोलीस खात्यात असून तिचा सहकारी आणि कॉलेजमधील मित्र जराड वास्केज याने तिला मागणी घातलेली, पण अजून मिशेलाने निर्णय घेतलेला नसतो. ते सर्व ज्या फ्लाईटची वाट पाहत असतात त्यामध्ये जागा नसल्याने स्टीव्ह आणि पत्नी, ग्रेस आणि मुलगी ऑलिव्ह पुढे जाण्याचे ठरवतात. बेन त्याची बहीण मिशेला आणि मुलगा कॅल नंतरच्या दुसऱ्या फ्लाईटने येण्याचा निर्णय घेतात. ते ज्या विमानात बसतात ते मॉंटगो एअर फ्लाईट ८२८ प्रवासात असताना अचानक वातावरणात बदलामुळे थोड्या वेळासाठी तीव्र वादळात सापडतात. वैमानिक बिल डॅली आपल्या कौशल्याने वादळातून विमानाला सहीसलामत वापस काढतात आणि जेव्हा ATS (Air Traffic Controller) शी परत संपर्क करतात तेव्हा ATS कडून परत परत विचारणा केली जाते. फ्लाईट ८२८ जमिनीला स्पर्श करते आणि सर्व प्रवाशांची तपासणी आणि चौकशी राष्ट्रीय सुरक्षा समितीकडून सुरु होते, कारण तब्बल साडेपाच वर्ष फ्लाईट ८२८ अंतर्धान पाऊन अचानक उगवलेली असते. या काळात बेन आणि मिशेलाच्या आईचा मृत्यू झालेला असतो, बेनची मुलगी ऑलिव्ह मोठी झालेली असते, मिशेलाने विमानात जराडला होकार देण्याचे ठरवले, परंतु त्याने आणि मिशेलाची जिवलग मैत्रीण लोर्डेस यांनी लग्न केलेलं असतं. फ्लाईट ८२८ च्या सर्व प्रवाश्यांचे वय मात्र अजिबात वाढलेले नसतात, या पाच-साडेपाच वर्षात जग पुढे निघून गेले परंतु विमानातील प्रवाशी मात्र आपण काय गमावलंय या बाबतीत अनभिज्ञ असतात.

या सर्व प्रवाश्यांच्या आयुष्यात आता विचित्र घटना घडण्यास सुरुवात होते. बेन आणि मिशेलाला आवाज जाणवायला लागतात, जसे काही कोणीतरी सूचना देतेय, त्यानुसार मिशेला अपह्रत मुलींची सुटका करते, बेन विमानातील एका सहप्रवाश्याची मदत करतो, कॅन्सरग्रस्त कॅलच्या प्रकृतीत सुधारणा होते. त्याच्यावर उपचार करणारी डॉक्टर सान्वी बहल हीदेखील फ्लाईट ८२८ च्या प्रवाशांच्यापैकी एक असते. कॅलला पुढील होणाऱ्या घटनांची चाहूल लागत असते आणि त्याप्रमाणे तो चित्र काढत असतो. अचानक एका रात्री बरेच प्रवाशी विमानतळावर जेथे फ्लाईट ८२८ असते त्या हँगरजवळ एकत्र येतात आणि विमानाचा स्फोट होतो.

बदलेल्या काळासोबत जुळवून घेतांना येणाऱ्या अडचणी आणि अज्ञात येणारे आवाज, सूचना आणि सर्व प्रवाशी एकमेकांना जोडल्या जाणे. त्यातून यांच्या मानसिकतेवर होणार परिणाम या वेबसिरीजमध्ये दाखविल्या आहेत. कॅलची जुळी बहीण ऑलिव्ह अचानक त्याच्यासाठी पाच वर्षांनी मोठी झालेली असते. अचानक कॅलची प्रकृती खालावते तेंव्हा बेनला कळते की सर्व प्रवाशी एकमेकांशी जोडल्या गेले आहेत आणि काही प्रवाशी संकटात आहेत, त्यामुळे कॅलवर विपरीत परिणाम होत आहे. बेन याचा पोलीस बहिणीच्या मदतीने माहिती काढतो तेव्हा कळते की काही प्रवाशी अचानक गायब झाले आहेत आणि त्यांच्यावर एका गुप्त प्रयोगशाळेत संशोधन सुरु आहे. NSA आणि कॅल यांच्या मदतीने बेन गुप्त प्रयोगशाळेचा छडा लावतो, पण मुख्य सूत्रधार मेजर मात्र हाती लागत नाही. पुढे घडत जाणाऱ्या विचित्र घटना, नातेसंबंधातील चढ उतार यासाठी हि सिरीज बघावी.

मेनिफेस्ट interesting वाटतेय .

गेल्या आठवड्यात , "lie and deceit " सिरीज पाहिली नेटफ्लिक्स वर पाहिली . ५ च एपिसोड आहेत . मूळ स्पॅनिश आहे. थोडी थ्रिलर , थोडी डार्क आहे .

high school literature teacher लॉरा , एका संध्याकाळी , तिच्या शाळेतल्या मुलाच्या - लुकास च्या विधूर वडिलांबरोबर - डॉ. जाविअर सोबत dinner date ला जाते . दूसर्या दिवशी उठल्यावर तिला रात्रिचे प्रसंग अंधूकसे आठवतात . तिची बहिण -काता - जाविअर च्या हॉस्पिटलमध्ये anesthetist आहे. तिला भेटून लॉरा आपल्यावर जाविअर ने अतिप्रसंग केल्याची शंका बोलून दाखवते . तिथे दूसरीकडे कालच्या डेटमुळे जाविअर खूश आहे . नविन रिलेशन्कडे पहिलं पाउल म्हणून. त्याचा वेगळा मूड त्याच्या मुलालाही जाणवतो.
ईथे लॉराचे मेडिकल चेक अप होते , पोलिस कंल्पेन्ट होते आणि जाविअरला चौकशीसाठी बोलावले जाते . अचानक झालेल्या आरोपाने तो हबकतो . जे पण काही झाले ते सामंजसाने झाले तरी लॉराने असा आरोप का केला हे त्याला कळत नाही . रीतसर पोलिस चौकशी सुरु होते.
आणि मग सुरु होतो her words Vs his words चा खेळ . या प्रकरणाचा दोघांच्याही खाजगी आयुश्यावर परिणाम होतो. दोघांच्या भूतकाळातल्या काही गोष्टी खणून निघतात . लुकाससोबत लॉराचे वागणे बदलते. बरीच उपकथानक ही आहेत - लुकास आणि त्याची मैत्रीण अमाल , लॉरा चा पोलिस असलेला एक्स पार्टनर , काता आणि तिचा नवरा , लॉराची केस हाताळणारी डॅनिआला आणि तिचा पार्टनर . पहिले २-३ भाग मस्त खिळवून ठेवणारे आहेत .पण एकदा नक्की काय झाल असेल याचा अंदाज आला की मग वेग थोडा कमी होतो .रहस्यभेद फारच लवकर होतो असं वाटतं . मग फक्त हे सगळं उघडकीस कसं येणार एवढच उरतं. जाविअरचं काम करणारा नट आवडला .
शेवटाकडे जाताना जरा अ आणि अ वाटली . . काही loopholes आहेत , पण one time watch वाटली.

मसाबा मसाबा सीजन दोन आलेला आहे. काल बघुन टाकला छान आहे. एका पार्टीच्या सीन मध्ये नीना गुप्ता ने एक लाल ड्रेस घातला आहे तो मला हवा आहे. त्यावर तिने आपले मराठी अलंकार घातले आहेत ठुशी व त्यावर एक चोकर असतो तो. मजेशीर आहे.

Love मसाबा मसाबा, बिंज वॉच केला. मसाबा किती छान काम करते, नीना मसाबाच्या टेन ईयर पार्टीत 'ही डीप नेकलाईन तर झाली नाही न फार' विचारते तेव्हा मसाबा म्हणते 'मेरा देखा है?' ते आणि 'आप ना हॉर्मोन चेक करालो' हहपुवा आणि ओपन मदर डॉटर टॉक जबरदस्त आवडले. कश्मीरला तिने चूक करून फ बॉयची कानउघाडणी केली ती आवडली. तिची मैत्रिण जिया पण कसली धमाल आहे. नीना राम कपूरला खडसावते व स्वतःला पटलेलेच करते तेही अप्रतिम. दोघींच्या insecurities , केलेल्या चुका, त्यातून बाहेर येणं व बिग्गर पिक्चर बघणं, स्वतःच्या कामावरचं प्रेम
, राग-लोभ , फार रिअल वाटतं.
I loved this season and everything about it.

आणि ती मसाबा ची एकता कपूर सारखी दिसणारी बेस्ट फ्रेंड कोण आहे? >>> Rytasha Rathore
रीताशा राठोड आहे त्या ऍक्टरचे नाव. मला प्रचंड आवडते ही. ४/५ वर्षांपूर्वी टीव्हीवर एक बढो बहू नावाची सिरीज येत होती. त्यात ती लीड रोल मध्ये होती. मी तेव्हापासून तिची फॅन आहे, इतकी बंडल सिरीज पण तिच्यामुळे कधी कधी बघायचे.. किती टॅलेंटेड आहे पण तिला तिच्या weight मुळे फारसे meaty रोल्स मिळत नाहीत. आता वजन कमी पण झाले आहे. तिला स्वतंत्र लीड म्हणून चांगल्या शोमध्ये परत पाहायचे आहे मला.

स्ट्रेंजर थिंग्स दुसरा सिझन जरा आठवतोय थोडा गुगल केला. तिसरा बघावा कि नाही? डायरेक्ट चौथा बघितला तर कळेल का?

शेवटी जरी गाव सोडून जाण्याची वेळ आली तरी या लोकांशी जमलेले ऋणानुबंध सचिव कायम जपतो असा असावा. >>>> मला वाटतं की गाव सोडुन जायच्या आधी, सचिवजी मुखियांचे जावई होणार बहुतेक.
एकंदरीत मस्त आहे ही सिरीज. दुसरा सिझन पण मस्त. तिसर्‍याची वाट बघतोय मी पण.

वाॅकिंग डेड चा अकरावा सिजन येत 23 ऑगस्टला नेफी वर >>> सही!

सोनी लिव्ह वर "डॉ अरोरा" नावाची मजेदार सिरीज आहे. ब्राउझर हिस्टरी, अ‍ॅड्स च्या भीतीने यापेक्षा जास्त लिहीत नाही Happy

इम्तियाज अलीने बनवलेली व बहुधा एक दोन भाग दिग्दर्शित केलेली सिरीज आहे. कुमुद मिश्रा मुख्य रोल मधे. बाकी बरेच चांगले कलाकार आहेत. सहसा चित्रपटांत दुय्यम रोल्स मधे असणारे. बॅकग्राउण्डला काही चांगली गाणीही आहेत.

>>ब्राउझर हिस्टरी, अ‍ॅड्स च्या भीतीने यापेक्षा जास्त लिहीत नाही >> यातच बरंच काय लिहुन गेलास! Lol
सोनी लिव्ह नाही. आयपी टीव्ही वर बघतो असेल तर.

अमित, त्याच्या बरोबर सॅण्डविच्ड फॉरेवर (सोनी लिव्ह) पण बघ बरे वाटले होते सुरुवातीचे एपि. मी पूर्ण बघितली नाहिये Happy

संपवली आज स्ट्रेंजर थिंग्ज. बापरे‌‌. अक्षरशः फडशा पाडलाय तीन दिवस दोन रात्री मधे, सीझन तीन आणि चार. हुश्श. स्टोरी, ॲक्टींग, डायरेक्शन, म्युझिक, थरार, सगळंच भारी जमून आलंय. एवढे मोठे भाग असलेली ही पहिलीच पाहीली असेल‌‌.

पण शेवटचा भाग तितकासा अपील झाला नाही, काही गोष्टी कळल्या नाहीत म्हणून असेल कदाचित ‌.

स्पॉयलर ::

एक म्हणजे एल सोबत वन तिच्या सोबतच दाखवलाय पहिल्या पासून आणि वेकना पण आधीपासूनच दुसऱ्या ठिकाणी असतो , असं कसं? नंतर तो वेकना झाल्याचे दिसते आपल्याला. ? ती past मधे गेलेली असते का?

दुसरे म्हणजे, एल चे खरे वडील नक्की कोण असतात? आणि तिच्या पावर्स जास्ती नसतानाही मॅक्स कशी काय जिवंत राहते शेवटी?
वेकनाने उघडलेल्या दरवाजांचं शेवटी काय होतं?

एल आपल्या मित्रांसोबत जाताना शेवटी डॉ ओवेनला का नाही नेत? त्याचं काय होतं पुढे?
वेकना नॅन्सी ला का मारत नाही? तिच्याही मनात पास्ट मधील भीती आणि गिल्ट असतेच की. फक्त तिला स्टोरी दाखवून सोडून देतो?

तसंच हॉपरचे काम कमीच आहे या भागात. त्याला इतर मुलांसोबत मिळून ॲक्शन मोड मधे बघायला जास्त आवडलं असतं. इथे त्याचं रेस्क्यू मिशन फार लांबलय. तसंच एल च्या पावर्स परत येण्याचं सुध्दा.

एडी गेल्याचं दुःख फक्त डस्टीनलाच आहे. बाकींच्या रीॲक्शन दाखवल्याच नाही. कदाचित पुढच्या सिझन मध्ये काही गोष्टी अजून कळतील. वेटींग फॉर नेक्स्ट सिझन.

जसे आठवते तसे लिहीते…
एक म्हणजे एल सोबत वन तिच्या सोबतच दाखवलाय पहिल्या पासून आणि वेकना पण आधीपासूनच दुसऱ्या ठिकाणी असतो , असं कसं? नंतर तो वेकना झाल्याचे दिसते आपल्याला. ? ती past मधे गेलेली असते का?>>> ती भूतकाळात नाही जात. आपल्याला भूतकाळ दाखवला आहे. ती जेव्हा पाण्यात झोपून भूतकाळ बघते तो आपल्याला दाखवला आहे.

एल चे खरे वडील नक्की कोण असतात?>>>तिचे खरे वडील दाखविले नाहीत. ती ज्याला ‘पापा’ म्हणते तो institute चालवणारा Dr Brenner त्याला सगळेच पापा म्हणत असतात.

तिच्या पावर्स जास्ती नसतानाही मॅक्स कशी काय जिवंत राहते शेवटी? >>एल तिच्या मेमरीत शिरून वेक्नाशी सामना करते म्हणून ती जिवंत राहते. पण पुरेशी ताकद नसल्यामुळे ती मॅक्सला पूर्ण वाचवू शकत नाही. मॅक्स शेवटी कॅामात गेलेली दाखवली आहे.

एल आपल्या मित्रांसोबत जाताना शेवटी डॉ ओवेनला का नाही नेत? त्याचं काय होतं पुढे?>>> त्याचे काम तिथेच संपते. तिला घेऊन जायला तिचे मित्र आलेले असतात कारण तेव्हा मॅक्सला वाचवणे गरजेचे असते. त्यावेळी डॅा ओवेन्स अंडरग्राऊंड लॅबमधे असतो. तो मेलेला दाखवला नाही.

वेकना नॅन्सी ला का मारत नाही? >>> त्याला एलला निरोप द्यायचा असतो म्हणून…. https://youtu.be/5VMDHSjr0MA

तसंच एल च्या पावर्स परत येण्याचं सुध्दा.>>>+१
एडी गेल्याचं दुःख फक्त डस्टीनलाच आहे. >>> तो त्याच्याबरोबर जास्त वेळ असतो ना. अन त्यांच्यातली मैत्री घट्ट होताना दाखवली आहे.

Hotstar वर "घर वापसी". कालच बघितला. Binge watch करून. अप्रतिम आहे.

images (23).jpeg

निव्वळ अमेझिंग, कधी कधी नकळत हसू तर कधी तरी डोळ्यात पाणी ! शेखर झालेल्या (लीड) पोराची ॲक्टिंग कमालच आवडली ह्या webseries मधली.

लोकहो, अमेझॉन प्राईम वरील "आर्केन" हि ऍनिमेटेड मालिका जरूर पहा. सुरेख ऍनिमेशन आणि रोमांचक कथा आहे.

ती जेव्हा पाण्यात झोपून भूतकाळ बघते तो आपल्याला दाखवला आहे.>> हम्म, बरोबर.
लिंकवरून जरा क्लिअर झाले. धन्यवाद सोनाली आणि आशु.

यू ट्यूब वर take a break चॅनेल ची 'कामवाली बाई ' नावाची web series आली आहे..दर रविवारी एक एपिसोड release होतो...आत्तापर्यंत 3 episodes झालेत...मस्त कॉमेडी आहे...भन्नाट अ‍ॅक्टींग..

Pages