वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राइम

बॉश - सीझन ४ - फारच आवडला. (अर्थात त्यासाठी आधीचे ३ बघावेच लागतील. )

कोणत्याही प्रकरणासाठी पोलिसांना करावा लागणारा relentless तपास, पुरावे गोळा करण्याच्या आणि सांभाळून ठेवण्याच्या नियमबद्ध पद्धती, जबाब नोंदवण्याच्या पद्धती, कोल्ड केसेसचं लूप त्यांच्या डोक्यात सतत सुरू असणं, पोलिसांचे आपसांतले हेवेदावे, पोलिसदलातलं राजकारण, भ्रष्टाचार, प्रशासनासमोरच्या अडचणी, पोलिसांच्या वैयक्तिक आयुष्यावर होणारे परिणाम, हे सगळं भारी आहे. पोलिस दल आणि एफ.बी.आय. यांच्यातलं टशन सुद्धा छान.
(यातलं काही सि.लिबर्टी म्हणून दाखवलेलं असण्याची शक्यता आहेच, पण दहा गुंडांना लोळवणारा एक इन्स्पेक्टर यापेक्षा ते बरंच विश्वसनीय वाटतं.)

बॉश आणि त्याच्या मुलीमधलं नातं खूप छान डेवलप होत जाताना दाखवलंय. वरकरणी मख्ख चेहरा पण आत बरंच काही दाबून ठेवलेलं - ही गोष्ट बाप-मुलीच्यात कॉमन असते आणि ती बारीकसारीक प्रसंगांमधून समोर येते.

बॉशचं घर पहिल्या तीन सीझन्समध्ये बघताना 'कसलं क्लास आहे!' असं वाटलं. ते घर का, त्याचं लोकेशन तसं का, याचं पोलिसी कारण चौथ्या सीझनमध्ये नेमक्या टेन्स मोमेंटला येतं.

कथानकातले काही प्रसंग, संवाद मूळ कोणत्या घटनेवर / केसवर बेतलेले आहेत, हे additional notes मध्ये दिलं आहे. आधी त्यातला काही मजकूर योगायोगाने वाचला गेला. नंतर नंतर मी ठरवून, एपिसोड पॉज करून त्या नोट्स वाचल्या.

आता थोडा ब्रेक घेऊन मग ५वा सीझन बघणार.

ही सध्या स्टार वर्ल्ड वर रात्रौ दहाला असते. कितवा सीझन ते पाहिलं नाही. समोर बसून पाहत नाहीए.
पोलिस दल आणि एफ बी आय मधलं टशन बहुतेक सगळ्या अमेरिकन क्राइम मालिकांत असत़च.

कोणत्याही प्रकरणासाठी पोलिसांना करावा लागणारा relentless तपास, पुरावे गोळा करण्याच्या आणि सांभाळून ठेवण्याच्या नियमबद्ध पद्धती, जबाब नोंदवण्याच्या पद्धती, कोल्ड केसेसचं लूप त्यांच्या डोक्यात सतत सुरू असणं, पोलिसांचे आपसांतले हेवेदावे, पोलिसदलातलं राजकारण, भ्रष्टाचार, प्रशासनासमोरच्या अडचणी, पोलिसांच्या वैयक्तिक आयुष्यावर होणारे परिणाम >>> ललिता मग तू "द वायर" पाहिलीस का? त्यातही हे फार सुरेख घेतले आहे.

Hulu वर only Murders in the building सिझन १ पाहिली. स्टिव्ह मार्टिन, मार्टिन शॉर्ट आणि सेलेना गोमेझ मुख्य भूमिकेत आहेत.
न्यूयॉर्कच्या affluent अपार्टमेंटमध्ये राहणारे ह्या तीन तऱ्हेच्या तीन शेजाऱ्याना crime पॉडकास्ट ऐकण्यात इंटरेस्ट असतो. एक दिवस त्यांच्याच बिल्डिंगमध्ये एक खून होतो. हे तिघे (२ म्हातारे व एक तरुण मुलगी) त्यावर स्वतः शोध करून पॉडकास्ट करायचे ठरवतात. यात एकमेकांशी काही खोटेही बोलत असतात.नंतर काय घडते ते पाहण्यासारखे आहे.
मस्ट वॉच कॉमेडी थ्रिलर आहे. ऍक्टिंग टॉप नॉच. यात त्यांचे ते न्यूयॉर्कमधले अपार्टमेंट तर क्लासिक आहे.
आता सिझन २ आजपासून पाहणार . एपिसोड ३०-३५ मिनिटाचेच आहेत. पटकन होतात पाहून

श्रीकांतची मुलगी अशी काय आहे? कशाचा माज आहे एवढा? मान्य आहे वडील नसतील देत जास्ती वेळ तिला पण ही काय पद्धत वडीलांशी असं वागायची? टीनेजच्या नावाखाली अती झालेत नखरे . दोन चार कानाखाली द्याव्याशा वाटतात तिला. सुचिचा त्रागा पण विनाकारण वाटतो.
->>> लोल

मसाबा मसाबा चे सिझन १ एपिसोड १ पासून सिझन २ एपिसोड ७ एका रात्रीत एका बैठकीत बिंज वॉच करून संपवेन असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं.

अफाट.. अप्रतिम.. रियलिस्तिक..

मसाबा नीना गुप्ता ची मुलगी असूनही अशी वेगळी का दिसते आणि तिचे बाबा कोण आहेत / असतील हा विचार अनेकदा मनात येऊन गेला. सिरीज संपल्यावर तातडीने तिच्याविषयी गुगल केल्यावर कळलं की तिचं ओरिजिन साऊथ आफ्रिकन आहे म्हणून तिचं सौंदर्य जरा वेगळं आहे. तिच्या प्रेमात इतके लोक पडतात ते बघून खूप मस्त वाटलं. Happy

इंडियन matchmaking चा दूसरा सिझन आलाय.

>> बघणेबल आहे का? मी पहिला एपिसोड सुरू केला. पण लग्नाच्या बाजारात जे जे काही भावनाशून्य पद्धतीने चालतं ते बघून हल्ली जरा डीप्रेसिंग वाटतं त्यामुळे बंद केलं. मेड इन हेवन शेवटी शेवटी जरा बरी वाटली होती पण ते लग्न तुटल्यावरच.

काहीही hopeful असेल तर सांगा. नक्की बघेन. Netflix चे पैसे वसूल करायचे आहेत Wink

हॉटस्टार वर क्रिमिनल जस्टिसचा ३ रा सिजन येतोय. पंकज त्रिपाठी रॉक्स.

>> मी क्रिमिनल जस्टिस १ नवीन नवीन असताना पाहिली होती. आता टोटल विसरून गेलेय सगळं. तर आत्ता सिझन २ बघितला तर काही अडेल का? प्लीज कन्फर्म सांगा कारण SHE सिझन २ बघताना मला सुरुवातीला अजिबात लिंक लागली नव्हती पहिला सिझन विसरल्याने. तसं काही आहे का? की पूर्ण नवीन स्टोरी आहे?

फौदाचा चौथा सिझन येतोय, दोरोन ह्यावेळी काय अन् कुठं घुसेल काही सांगता येत नाही. इगरली वेटींग.

फौदा वर आधारित भारतीय सिरीज येतेय, तणाव म्हणून. इंटरेस्टिंग असेल जर मूळ सिरीज सोबत प्रामाणिकता मेन्टेन केली असेल तर

इंडियन matchmaking चा दूसरा सिझन आलाय.>> सीमा आंटी ?? वा काय मस्त न्यूज Proud @ पियू, ही सिरीज एकदम भिकार आहे पण पण ....बघाच एकदा Proud Never have i ever पण पुढचा सिजन आलाय आज , मस्तच असेल Happy

इंडियन matchmaking चा दूसरा सिझन आलाय.

>> बघणेबल आहे का? मी पहिला एपिसोड सुरू केला.>

आता ३च एपिसोड पाहिलेत. मलातरी हा शो entertaining वाटतो. पण ह्यावेळी नवीन लोक अजून तरी २च आहेत. एक नाशिकचा अक्षय धुमाळ आणि एक अमेरिकेतील विरल शाह (जिला तिशीतला debt free डॉक्टर नवरा पाहिजे !) जुने लोक जे पहिल्या सीझनमध्ये खूप पॉप्युलर झाले त्यातल्या अपर्णा, नादिया, प्रद्युमन ला परत आणले आहेत . अपर्णा मला आवडलेली कारण तिची statements भारी असायची. तिला खूप पब्लिसिटी व पैसाही मिळाला. पण आता परत तेच ते लोक कशाला.
शिवाय आताच्या कॉन्टेस्टण्टना कळले आहे कि काय बोलायचे व पॉप्युलर कसे बनायचे. वगैरे, त्यामुळे पहिल्या सीझनचा मजा येणार नाही असे वाटते.

कुंडलीतील दोष काढण्यासाठी पूजा बिजाही दाखवली आहे यात. हम्म....

झी५ वर "रंगबाज" ही सिरीज बघायला सुरूवात केली. त्यातल्या लीड बद्दल माहिती शोधली तेव्हा लक्षात आले की मी चालू केला तो तिसरा सीझन होता - पण या सीझनमधली कथा पूर्ण वेगळी दिसते. त्यामुळे सुरूवातीपासून पाहात आहे असेच वाटत होते.
https://en.wikipedia.org/wiki/Rangbaaz_(web_series)

या सीझनचे पहिले दोन भाग तरी इंटरेस्टिंग वाटले. बहुतांश कलाकार "याला कोठेतरी बघितले आहे" कॅटेगरीतील आहेत. शाह अली बेग चे काम करणारा विनीत कुमार मस्त काम करतो. स्क्रीन प्रेझेन्स चांगला आहे त्याचा. त्याच्यामुळेच इंटरेस्ट निर्माण होतो पाहताना.

पहिले दोन सीझन पाहिलेले नाहीत पण आता उत्सुकता आहे.

Mind the Malhotras S2 आलाय. 2 एपि बघितले.
मला सीजन1 आवडला होता. तो जास्त crispहोता.
मस्त, डोक्याला जास्त ताप नाही types commedy .

कोणी The sandman पाहत आहेत का? सात भाग झालेत बघुन. काही भाग फारच छान रचले आहेत . विशेष म्हणजे 24/7 आणि sound of her wings .

मसाबा नीना गुप्ता ची मुलगी असूनही अशी वेगळी का दिसते आणि तिचे बाबा कोण आहेत / असतील हा विचार अनेकदा मनात येऊन गेला. सिरीज संपल्यावर तातडीने तिच्याविषयी गुगल केल्यावर कळलं की तिचं ओरिजिन साऊथ आफ्रिकन आहे म्हणून तिचं सौंदर्य जरा वेगळं आहे. तिच्या प्रेमात इतके लोक पडतात ते बघून खूप मस्त वाटलं. Happy>>>>
मसाबाचे वडील विव रिचर्ड्स. ब्लॅक आणि इंडियन ब्राउन कॉम्बिनेशन खरंच खूप छान आणि वेगळं दिसतं. height figure सगळंच छान आहे तिचं. आणि मसाबा किती सहज काम करते. नीना गुप्ता पण छानच. मला हा दुसरा सिझन जास्त आवडला.

Pages