वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Netflix वर somewhere between बघतोय !
प्लॉट तोच , सिरीयल किलर .....
District attorney general ला देखील ब्लॅकमेल करून हत्या घडविल्या जात आहेत .
पण स्टोरीत एकच गोष्ट खटकली ....
थोडीशी fantasy घातली आहे पण तो भाग वगळता बाकी स्टोरी मस्त फिरवली आहे .
DAG ची बायकोला तिच्या लहान मुलीची पण हत्या होणार असल्याचे आठ दिवस अगोदरच कळते (इथेच स्टोरी ने थोडा मार खाल्ला , पण अमीर च्या पहेली मूव्ही ला आपण चालवून घेतोच की )
मग मुलीला वाचविण्यासाठी सात दिवस अगोदर पासून तीची चाललेली धडपड आणि त्याच वेळी इतर होत असलेल्या हत्या यावर आधारित कथा .

Netflix वर The Midnight Club नावाची सिरीज पाहिली. टिपिकल Mike Flanagan च्या सिरीज असतात तशीच आहे. ड्रामा, नात्यांची इक्वेशन्स आणि एक धागा supernatural गोष्टींचा. मालिका खूप हॉरर मात्र नाही. थोडेफार jump scares आहेत.

Brightcliffe Hospice या ठिकाणी terminally ill तरूण पेशंट्स रहात असतात. इथे म्हणे बर्‍याच वर्षांपासून एक अलिखित (आणि डॉक्टरांच्या नजरेआड) परंपरा चालू असते - रात्री सगळी पेशंट मुलं तिथल्या लायब्ररीत जमून एकमेकांना भुतांच्या गोष्टी सांगत असतात. याला ते म्हणत असतात Midnight Club. तशातच Brightcliffe मधे एक नवीन मुलगी येते. तिला माहिती असतं की या घरामधे खूप खूप पूर्वी एक Paragon नावाचा cult कार्यरत असतो आणि काही वर्षांपूर्वी तिथून एक पेशंट मुलगी अचानक आश्चर्यकारकरित्या खडखडीत बरी होऊन घरी परत गेलेली असते. एक दिवस लायब्ररीमधे तिच्या हातात त्या cult ची माहिती पडते आणि त्याचबरोबर तिच्या मनात बरं होण्याची एक आशा निर्माण होते. त्यानंतर काय काय होतं हे इच्छुकांनी सिरीजमधेच पहा Happy

बर्‍यापैकी एंगेजिंग आणि इंटरेस्टिंग मालिका आहे. त्या मुलांनी सांगितलेल्या गोष्टीही मस्त आहेत. आधी उल्लेख केल्याप्रमाणे या कथेला एक supernatural जोड आहे. मात्र त्याचा संपूर्ण उलगडा त्यांनी या सीझनमधे केलेला नाही.

Only Murders in the Building (HULU / HOTSTAR)

सेलेना गोमेझ मेन रोल मध्ये असल्याने जरा धाकधूक होती.

पण सिरीज खरोखऱच आवडली. दोन्ही सीजन बिंज वॉच करून संपले.

Happy
मला देखील एखादी वेब सिरीज आवडली की संपे पर्यंत पाहण्याचे व्यसन लागले आहे , somewhere between रात्रि दोन वाजता संपवली .
Netflix खूपच user friendly वाटतं !
पण ते ही फक्त टॅब वर .
टिव्ही वर डायरेक्ट फॉरवर्ड ऑप्शन आहे
Tab वर you tube प्रमाणे स्पीड १.२५ करून पाहू शकतो ज्यात डायलॉग देखील ऐकू येतात .
हे ऑप्शन बाकीचा कोणताही प्लॅटफॉर्म देत नाही असं मला तरी दिसले.

हाउस ऑफ द ड्रॅगन्स शेवटचा एपिसोड लीक झालेला आहे.

पाहिला. Happy
सगळ्यांनी बघितल्यावर स्पॉयलर धागा काढून पूर्ण सिझनवर चर्चा करता येईल.

तसेच फारच उत्कंठा वाढल्याने संयम संपून फायर अँड ब्लड वाचले. व्हीजेरीसच्या आधीच्या जेहारीस आणि मेगॉर राजांचा इतिहास सुद्धा मनोरंजक आहे. एकूण "खोटाखोटा इतिहास" हा फॉरमॅट आवडलेला आहे. त्यात मार्टिनने अधिकृत इतिहास आणि मशरूम नावाच्या दरबारातल्या बुटक्याचा शंकास्पद इतिहास असे दोन्ही दिले आहे. मश्रुमच्या डायरीमधून चावट लिहिण्याची GRRM ची हौस भागली आहे Happy

अ‍ॅपल टीव्ही प्लस वर "शांताराम" आली आहे. या पुस्तकावर माबोवर पूर्वी चर्चा झालेली आहे. ते वाचून काही वर्षे गेली आता पण काही गोष्टी लक्षात आहेत. एकूण सिरीज इंटरेस्टिंग आहेच पण पुस्तकावर बेतलेली असल्याने अनेकदा संवाद पुस्तकातून आल्यासारखे होतात. मुख्य लीड, "प्रभू" चे काम केलेला नट व "अब्दुल कादर खान" चे काम केलेला - तिघांची कामे चांगली आहेत. पुस्तकातील शांताराम गंभीर्/ग्रिम वाटला होता. इथे जरा हलकेफुलके आहे त्याचे कॅरेक्टर, विशेषतः मुंबईत आल्यावर.

मात्र चित्रीकरण कायच्या काय आहे. एकतर ८० च्या दशकात मुंबईत पब्लिक बस इतकी कळकट दाखवली आहे अगदी ऑल्मोस्ट पहिल्याच सीन मधे. तेव्हाच लक्षात आले की जाहिरात वाले जसे मराठी वाक्यांबद्दल काहीही फिकिर न करता वाट्टेल ते लिहीतात तसे भारतातील त्यावेळचे डीटेलिंग भिकार आहे. ८० मधे सुद्धा मुंबईत बेस्ट च्या बसेस मस्त असत. झोपडपट्ट्यांमधले बरेच सीन्स इथे लोक राहात नाहीत का असा प्रश्न पडेल असे आहेत. एखादी नाट्यपूर्ण घटना घडत असते आणि आजूबाजूला कोणीही नसते. ते ही भर झोपडपट्टीत. कोणाला साधे कुतूहलही नाही, जरी परदेशी गोरा माणूस तेथे असला तरी. लोकांच्या बोलण्यातील मराठीतर महाभिकार आहे. यांना नीट मराठी बोलणारे लोक मुंबईत मिळाले नाहीत का काय असे वाटते.

४ भाग आले आहेत आत्तापर्यंत. मुख्य लोकांच्या कामामुळे आणि मूळ कथेतील नाट्यामुळे बघावेसे वाटत आहेत.

The Office पाहिली. १० सिजन्स आहेत . काही एपिसोडस अ आणि अ आहेत , पण इन जनरल आवडली.
बेटर कॉल सॉल पाहिली. चौथ्या सिजनपर्यंत सिरीजच्या नावाचा संबंध समजत नाही .याचा लास्ट सिजन नेटफ्लिक्स वर आला नाहीये . हि मात्र आवडली

दाहमर पण पाहिली. अतिशय अंगावर येणारी घटना आणि दृश्य आहेत . एका भारतीय माणसाची अशीच सिरीज होती , पण ते मानवी मेंदू ई. कसा खाल्ला असं इंट्रो मधेच सांगितलं म्हणून अर्धवट सोडली . दाहमरची केस माहित नव्हती त्यामुळे अशी काही कल्पनाच नव्हती . फार भयानक अभद्र वाटलं सगळं .

बेटर कॉल सॉल पाहिली. चौथ्या सिजनपर्यंत सिरीजच्या नावाचा संबंध समजत नाही .याचा लास्ट सिजन नेटफ्लिक्स वर आला नाहीये>>> आहे की नेफी वर मी तर तिथेच बघितला

आहे की नेफी वर मी तर तिथेच बघितला >> मला 5 सिजन्स दिसतायेत. सहावा सीजन गूगल केला तर ,नेफ्लि सोडून बर्‍याच ठिकाणी दिसतोय.

The watcher मी अर्धवटच सोडली !
भुताच्या सिरीज / सिनेमे मी टाळतो Happy
रात्री मी जंगलातून चाललोय आणि शेजारच्या झाडावरून सरकन भूत खाली उतरून ख्याव करून समोर उभे राहते , असलीच स्वप्ने वारंवार पडतात Happy

Happy भूतत्व
'मेगन' सिनेमाचे ट्रेलर बघितले, भूत आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स की भुताने झपाटलेले AI की AI gone haywire.. काही कळले नाही. हळूहळू AI आणि अमानवीय फरक कमी होत आहे. ट्रेलर भारी आहे.
https://youtu.be/BRb4U99OU80

Eternally Confused and Eager for Love पाहीली, नेटफ्लिक्स वर …ठीक होती.

मी दहा बारा पूर्वी रात्री बारा एक पर्यंत एच बी ओ किंवा स्टार मूव्ही पहायचो .
रात्री बरोब्बर १२ च्या आसपास हॉल मधील सोफ्याला काय रोग यायचा कोणास ठाऊक !
१२ च्या आसपास सोफ्यातील कोणतीतरी फळी खाडकन् आवाज करायची !
सूरवातील काही दिवस मी दुर्लक्ष केलं , पण नंतर साडेअकरा वाजताच टिव्ही बंद करणे चालू केले Happy

Only Murders in the Building (HULU / HOTSTAR)

सेलेना गोमेझ मेन रोल मध्ये असल्याने जरा धाकधूक होती.

पण सिरीज खरोखऱच आवडली. दोन्ही सीजन बिंज वॉच करून संपले. >>

मी मागेच ह्याचे दोन्ही सिझन्स असेच बिंज वॉच करून संपवले व इथे लिहिलेही होते. खूप मस्त सिरीज आहे. नक्की पहा. काही अमेरिकन context आहेत.. दुसऱ्या सीझनचा शेवट इतका आवडला नाही. पण बाकी अगदी खिळवून ठेवते. हुलू वरचे कन्टेन्ट बरेच चांगले आहे.

हो. ही चालू केलेली पण मग राहून गेली. डिस्ने वर आहे का? का स्टार्स वर? कसलं तरी सबस्क्रिप्शन घेतलेलं त्यावर होती. Hulu नाही इकडे.

कुठे वाचलेलं आठवत नाही की गोल्डन ग्लोब पुरस्कार आहे असे intro मध्ये वाचलेले म्हणून
Affair वेबसेरीज पाहीली.
टोटल 5 सीजन आहेत.
एका सुट्टीवर गेलेल्या फॅमिली मधील 4 मुलांचा बाप असलेला पुरुष आणि तिथली लोकल वेट्रेस ह्यांचे अफेयर असा विषय आहे. निसरड्या वाटेवरची कथा आहे. खूप vulgar आणि क्लिषे होऊ शकली असती. ( भट्ट कॅम्प किंवा alt Balaji type) पण इथे वेगळेपण आहे. पुढे त्या अफेयर मुळे त्यांच्या जीवनात झालेली उलथापालथ आणि त्यातून ते बाहेर पडतात का ह्याची गोष्ट.
पात्राच्या मनात चाललेल्या गोष्टी आणि त्या त्या पात्राच्या perspective ने कथा पुढे सरकते. हा प्रयोग तसा नवीन नाहीये पण प्रत्येकाच्या मनात कोणती गोष्ट कशी साठून राहते, त्यात सत्य असत्याच्या पातळीवर कसा हलका फरक असतो हे दाखवण्यासाठी त्यांनी कपडेपट आणि घटना ह्याचा वापर मस्त केलाय. काळजीपूर्वक बघाल तर लक्षात येईल.
पहिल्या सिजनच्या अंती एक व्यक्ती मेलाय. खून की अपघात? कोण जबाबदार ह्या नोटवर संपतो.
पुढच्या सीजन मध्ये काही गोष्टी क्लिअर होतात, नवीन गोष्टी घडत जातात. प्रत्येक सिजनच्या शेवटी एक वेगळंच द्वंद दाखवत सीजन संपतो. काही ठिकाणी फ्लॅशबॅक आणि वर्तमान ह्यात आपला गोंधळ होऊ शकतो.
शेवटचा सीजन जरा ओढूनताणून वाटला.
Btw, कथेच्या ओघात न्यूड सीन्स येतात, काही ठिकाणी शिव्या आहेत. त्यामुळे आपापल्या तब्येतीला झेपेल असे बघावे असा डिस्क्लेमर.
Prime वर आहे.

फोर मोर शॉट्स चा तिसरा सिझन >>> मला सिंगापोरात हा दिसतोय पण एपिसोड्स ओपन होत नाहियेत, आधिचे २ सिजन दिसतात. दुसरीकडे पाहिला, जरा पहिले २ एपि. संथ आणि दु:खी आहेत मग मजा आहे.. किती कुणी मरो, पैसे संपो ह्या बाया आपल्या प्यायला एका पाया वर तयार Wink

कोणी Young Sheldon बघितली का? फार मस्त सिरीज आहे. Sheldon या गिफ्टेड मुलाच्या कुटुंबाभोवती पूर्ण सिरीज आहे. त्याची अति ड्रामा करणारी overprotective आई, टिपिकल मिडलक्लास वडील, teenager भाऊ, अतिशय चुणचुणीत जुळी बहिण आणि carefree, कूल आजी. सगळी पात्रं मस्त आहेत. हिच पात्रं मोठी होऊन The big bang theory मध्ये दाखविलीत , जी मी पाहिली नाहिये. पण ती पण बघायला आवडेल.

Pages