वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंकन लॉयर बघून संपवली . मला आवडली . सगळ्या फिल्मीपणा सकटच .
हिरो पण आवडला . त्याचे आणि ईझ्झी चे सीन आवडले . सेपिया टोन मध्ये जेव्हा तो काही काही गोष्टी एक्सप्लेन करतो ते पण आवडले .

अशा सिरियालीच्या अनुभवावरून पहिल्या भागातली इझी किंवा जज काहीतरी झोल करणार याची खात्री होती. इझीला इतकं ग्यान देऊन नंतर तिचा काही वापरच केला नाही. तिला अगदीच फुकट दवडली.

पाचवा भाग भन्नाट होता पंचायतचा, मी या सीझनमधला हा भाग मनापासुन एन्जॉय केला. होप सो पुढे एन्जॉय करेन.

पंचायत दुसरा सिझन पाहिला. आवडला पण सगळे भाग लहान वाटले.
शेवटच्या 3 भागात अनेक कथासूत्र घ्यायची ठरवून अर्धी सोडल्या सारखे वाटते.थोडक्यात भाग बघून आवडले पण पोट नाही भरले.

पंचायत 2 बघून संपवली . छान वाटली .पण पूर्ण समाधान नाही झाले . काहीतरी अर्धवट ठेवल्यासारखे वाटले .विधायक ची भाषा अजिबात आवडली नाही . त्याला नीना गुप्ता सुनावते ते खूप आवडले
पण बिचारे सचिव जी !! त्याची काळजी वाटतेय . कदाचित खूपच गुंतलेय त्या पात्रात

Ohh. Ok. मी पहिलाच भाग अजून पूर्ण करू शकलो नाही. दोन वेळा ट्राय केला पण काही घडतंच नाहीये काहीबाही चालू आहे. त्यामुळे सोडला. आणखी कोणाला आवडली का? नेटाने बघू का?

पन्चायतचा सिझन २ आवडलाच, मला तरी रिन्की सेम वाटली, शेवट फार अनपेक्षित आहे पण मला खटकला नाही, धक्कातत्र वापरल आहे खरतर सचिवची बदली होणार हा दुसरा धक्काही देता आला असता, ही सिरिज कन्टिन्ञु झालेली आवडेल.

पन्चायतचा सिझन २ आवडलाच, मला तरी रिन्की सेम वाटली >>> आज मलाही वाटली. उगाच एक सीन बघून मी आकांडतांडव केलं की काय, हाहाहा.

स्ट्रेंजर थिंग मला खूप आवडला. आता १ जुलै च्या प्रतीक्षेत. नेटाने बघा आधीचे भाग पाहिले असतील आठवत असतील तर या भागाची लिंक लागते आणि बघायला अजुन मज्जा येते. कसलं स्केरी आहे यावेळी

हेहे
हो नक्की बघणार.घरातील अंडर 18 ना आधीच तंबी देऊन ठेवलीय शेजारी जाऊन बसा आम्ही बघू तेव्हा म्हणून.

माझे २ एपिसोड्स झाले बघून. चांगली वाटतीय. पण बरेच रेफरन्स आठवायला अवघड जात आहेत. पुन्हा नाही बघणार पण आधीचे सीझन्स. गुगल करेन.

काल होम शांतीचा पहिला एपिसोड बघितला, मस्त होता. सु पा चा नवरा म्हणून अंजन श्रीवास्तव हवे होते, असं वाटलं, त्याने जास्त उत्स्फूर्तपणे केला असता अभिनय. आत्ताचे कलाकार चांगले आहेत पण अंजन जास्त आवडले असते.

मागच्या २ दिवसात दि रायकर केस पाहून संपवली. पाहिली नसती तरी चालली असती. सगळा प्रकार खूप बाळबोध वाटला. कथानक ज्या पद्धतीने पुढे सरकते. तसेच कलाकारांचा अभिनय सगळेच यथातथा वाटले.
पण ललित प्रभाकर एकदम वेगळ्या रूपात पाहायला मिळाला. त्याचं काम आवडलं.

२-३ आठवड्यांपूर्वी सोनी लिव्हवर पेट पुराण पाहिली. खूप आवडली. ललित प्रभाकर खूप आवडायला लागला आहे. सई ताम्हणकर पण सुसह्य होती.
व्यंकू फार गोड आहे.

अ‍ॅनाटॉमी ऑफ अ स्कँडल - सगळ्या पोस्टींना +१

रुपर्ट फ्रेंडचा पीटर क्विन लैच आवडता आहे, त्यामुळे ही देखील पाहिली.

भूतकाळ-वर्तमानकाळ उड्या आणि मिक्सिंग खूप छान आहे.
(पहिल्या एपिसोडचा पहिला सीन पाहताना मला उगीच पिरियड ड्रामा, ५०-६०च्या दशकातलं लंडन असेल असं वाटलं आधी) ---- +१२३४५६७

पेट पुराण फारच छान आहे.. ललित प्रभाकर ने कमाल केली आहे अक्टिंग. झोंबिवली मध्ये पण छान दिसला आहे आणि अक्टिंग पण.
सई तर फारच छान.. अक्टिंग चांगली करते आणि इथे कपडे पण फार मस्त आहेत तिचे.. एकदम regular outfits .. apt for situations .
Dialogues छान आहेत आणि काही काही प्रसंग मस्त जमून आले आहेत.

SonyLiv वर तब्बर नावाची सेरीज पहिली. Ok आहे. पंजाबी घर, वातावरण जमलं आहे, पण काही काही ठिकाणी अ आणि अ वाटते .. शेवट तर अगदीच बोअर घेतला आहे.. इतक्या मोठ्या politician व्यक्तीचा असा शेवट पटत नाही..आणि तो ही अती सामान्य माणसांकडून. काहीतरीच.

कोणी Love Death + Robots बघितले का? सि३ मधे जास्तच रक्तपात दाखवला आहे.
पण मस्त ॲनिमेशन, कथा आहेत.

ब्लॅकलिस्टचा सीझन 9 चा फिनाले पाहून संपवला. नेहमप्रमाणेच थ्रिलर आणि रोचक. मजा आली पाहायला.

Marvin तर गेला पण जाता जाता रेमंडच्या पाठी वूजिंग रुपी पिडा लावून गेला (थोडक्यात पुढच्या सीझनची सोय करून गेला )

एराम आणि एजंट पार्क असे दोन मोहरे गळाले आहेत. एराम गेला त्यामुळं हिरमुसलेल्याच फिलिंग आल.
होप , परत येईल लवकरच

आत्ता प्रतिक्षा १० व्या सिझनची

Pages