वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रेया पिळगावकर ला बरेच मुख्य चॅलेंजींग रोल्स मिळत आहेत..गूड जॉब!
राधिका आपटे नंतर आता हीचे नाव घेतले जावे बहुधा..
ती धुलापिया पण मधे मधे फार बोकाळली होती, अ‍ॅक्टींग च चांगली आहे, सध्या गायब आहे.

गिल्टी माइंड्स बघून झाली. मजा आली बघायला.
कथानकाचा ग्राफ शेवटी उंचीवर नेऊन ठेवलाय. मुख्य पात्रं crossroads वर उभी आहेत. पुढचा सीझनही असाच असू दे.
श्रि.पि. फारच छान काम करते. Next star of OTT.

नेफ्लिवर SHE बघितली होती का कोणी आदिती पोहनकरची. त्याचा दुसरा सिझन आलाय. बघतेय. आधीचा आवडला होता भाग हाही आवडतोय.
नायक डेंजर माणुस आहे.

नेफ्लिवर SHE बघितली होती का कोणी आदिती पोहनकरची. त्याचा दुसरा सिझन आलाय. बघतेय. आधीचा आवडला होता भाग हाही आवडतोय.
>>>>
हो मी पहिली होती. खूप आवडलेली. त्यात विजय वर्माचे कॅरॅक्टर मारल्यावर वाईट वाटले होते कारण त्यांची केमिस्ट्री मस्त होती. आणि तो खूपच मस्त ऍक्टर आहे. दुसरा सिझन या विकांताला पाहायला सुरवात करणार.

नेटफ्लिक्स वरचा love deaths + robot चा तिसरा सिजन पहिला. पूर्वीप्रमाणेच एकदम कडक अनिमेशन. खासकरून जीबारो या एपिसोड साठीतरी नक्की पहा.

रणबीर कपूर च्या शमशेराचा ट्रेलर पाहिला. साउथच्या सिनेमांचा चा प्रभाव दिसत आहे. ( यात रणबीर का??)
आता बॉलिवुड मधे तसेच साउथच्या सिनेमांसारखे कै च्या कै महापराक्रमी हिरो, अ. आणि अ. अ‍ॅक्शन , बळेच भडक आणि विद्रुप केलेले व्हिलन्स असा ट्रेन्डच येणार असे दिसते. आता हे सिनेमे हिंदी सोबतच तमिळ तेलुगु मधेही डब होऊन रिलीज होत आहेत. त्यामुळे तिकडे तरी चालतील असे या लोकांना वाटत असावे.

स्ट्रेन्जर थिंग्स लहान मुलांची असावी असे वाटुन पाहिली नव्हती. पण वरची चर्चा वाचुन सुरु केली आणि पहायची थांबवता येईना. डोळे खोबणीतुन बाहेर येऊ नयेत म्हणून संयम ठेवली. शेवटचा भाग म्हणजे कळस आहे कळस! खास करून शेवटचा काही धागेदोरे उलगडताना दाखवलेला भलामोठा सीन. अप्रतिम! मी तर चार टाळ्याही वाजवल्या. तुम्हाला धन्यवाद, इथे लिहिल्याबद्दल नाहीतर मी काय पाहिली नसती.

मात्र सगळ्यात बोअर व घाणेरडे वाटते ते मध्ये मध्ये येणारी कायम टॅबलेटची अ‍ॅड. एक माणूस किळसवाणे थुंकतो काय...फार बेकार वाटते. प्रत्येक एपिसोडला २ वेळा तरी ही अ‍ॅड येतेच.
>>>लोल

शी बघायला सुरुवात केली तर चुकून पहिलाच सिझन पुन्हा पहिल्यापासून लागला. मला पहिल्या सीझनमध्ये काय झालं होतं त्याचा जरा विसर पडलाय. तर पुन्हा अख्खा सिझन बघू का त्यांनी थोडा रीकॅप दिलाय?

शी बघायला सुरुवात केली तर चुकून पहिलाच सिझन पुन्हा पहिल्यापासून लागला. मला पहिल्या सीझनमध्ये काय झालं होतं त्याचा जरा विसर पडलाय. तर पुन्हा अख्खा सिझन बघू का त्यांनी थोडा रीकॅप दिलाय?

चांगले वकिली डावपेच असलेल्या मालिका हव्या होत्या. सुचवाल काय? नेटफिल्क्स किंवा प्राईमवर.
लिन्कन लॉयर पाहिलीये. आवडली.

आबा धन्यवाद.

चांगले वकिली डावपेच असलेल्या मालिका हव्या होत्या. सुचवाल काय? >> Suits Netflix - वकिली पेक्षा जास्त कॉर्पोरेट वकिली बद्दल आहे.
सुरुवातीला चांगली आहे नंतर जरा तोच तो पणा येतो
पाचवा सिझन ( बहुतेक) चांगला आहे पुन्हा.

मला आता हाणाल ललिताप्रिती व सावली. ती पिळगावकर व डायनाची सून दोघीही मला आवडत नाहीत म्हणून पाहिल्या नाहीत या मालिका. पण खूप धन्यवाद दोघींना.

The practice, Boston legal , the good wife, the good fight
यापण बघ सुनिधी.
विशेषतः The practice

सॉरी. नेफ्लि किंवा प्राइमवरच असणाऱ्या हव्या आहेत हे नीट वाचले नाही. The good wife, the good fight आहेत प्राइमवर

होय तीच ती. म्हणजे १-२ भाग पाहिले व तिची एन्ट्री झाल्यावर जरावेळाने सोडले. मला तिचे चालणे, बोलणे, तिची बॉडी लॅन्ग्वेज ही आत्मविश्वासू, हुषार अशी न वाटता ‘मी भारी, तु फालतु‘ अशी वाटली जे मला सगळे सीजन सहन करता येईल असे वाटले नाही.
पात्राचे सौंदर्य, हुषारी, आत्मविश्वास अभिनयात सहज पेलवता यायला हवे जो तिला जमले नाही असे मला वाटले, म्हणुन मी बंद केली पहायची.

पिळागावकर तिच्या पहिल्या मराठी सिनेमात व तो सिनेमाही इतका बोर होता की मी धसकाच घेतला.

प्राची, थँक्स.

असे कसे एक चित्रपट बघून डिसिजन घेता? असे तर अमिताभ बच्चन चे आधीचे चित्रपट बघून तो फालतू कलाकार आहे म्हटल्यासारखे झाले...
प्रत्येक चित्रपट अन बायस्ड होऊन बघावा..

Pages