वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Open end आहे >> पण 99% भल्ला अडकेल अशी सोय करून ठेवली आहे.

विधायक काय बोलला >> Exactly !! म्हणूनच मला वाटतंय की पुढचा सिझन येणे नाही.

पंचायतसारखी मालिका क्वचितच होते. दोन्हीही सिझन्स अप्रतीम आहेत. इतकं बारीक निरिक्षण क्वचितच भारतीय मालिकांत असते. ड्रामा फार नाही, खळखळून हसवणारे संवाद नाहीत पण गावातल्या छोट्या छोट्या गोष्टी अगदी संवेदनशीलपणे टिपल्या आहेत. 'शहर का किनारा, उसे छोडते ही भारतीय देहात का महासागर शुरू होता है|' अशी श्रीलाल शुक्लांच्या राग दरबारीची सुरुवात आहे, याच महासागराचे दर्शन इथे घडते. संवाद तर अफाट सुंदर आहेत. जितू, प्रल्हाद, विकास यांचा अभिनय लाजवाब. पण सर्वात कमाल केलीये रघुबीर यादव या कसलेल्या कलाकाराने. इतका ताकदीचा अभिनेता भारतीय सिनेमाला नीट वापरून घेता आला नाही हे आपलेच दुर्दैव. प्रधान असल्याने आलेल्या जबाबदार्‍या, राजकारणातले डावपेच खेळून आलेले शहाणपण पण तरीही बेरकीपणापेक्षा भावनाशील, सचिव, विकास, प्रल्हाद सार्‍यांशी त्याचे असलेले ऋणानुबंध खुप खरे वाटतात. नीना गुप्ताची समजुतदार साथ या मालिकेचे बलस्थान आहे.
दुसर्‍या सिझनचा शेवट धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारा आहे. अगदी गलबलून आले.

पुंबा छान निरीक्षण, मस्त पोस्ट.

मी दुसरा भाग बघितला आज. तो त्या नर्तिकेला मलमपट्टी करतो त्यामुळे शेवट धक्कादायक आहे की काय असं वाटतंय, किंवा तो हिरो म्हणतो, इथे रहायचं नाही तर इथे कोणावर जीव लाऊ कशाला.

दुसर्‍या सिझनचा शेवट धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारा आहे. अगदी गलबलून आले. >>> हे वाचून वाईट वाटलं, बघु की नको.

विधायक काय बोलला >> Exactly !! म्हणूनच मला वाटतंय की पुढचा सिझन येणे नाही. << मला तर ह्यामुळेच पुढचा भाग येईल असं वाटतेय. तो एक लढा हे छोट्यश्या गावातील लोकं कसे देतात हे दाखवतील्/दाखवायला पाहिजे...

तीन भाग बघितले पंचायतचे, बड्डे गर्ल छान दिसत होती. शेवटचे हीरोचे डायलॉगज छान होते.

तो प्रधान म्हणतो बड्डेला कमी लोकं येणार आहेत, गांवजेवण होतं खरंतर, फार कमी जण वगळले होते.

सेम पिंच अंजु, माझे पण 3 एपिसोड झाले, रोज एक पहायचा प्रयत्न आहे. अभिषेक ची तगमग, चिडचिड, असूया अगदी भिडते.

बघितली पूर्ण. पहिल्या सीझनपेक्षा थोडा स्लो वाटला.
सचिव जी एकदम रूळलाय फुलोरामध्ये. Happy
तो मस्त गोड हसतो मध्ये मध्ये.
दुधीवाला सीन छान. कसले भारी expressions दोघांनी.
त्या dancer ला डॉ कडे घेऊन जातो तेव्हा कमीत कमी शब्दात पूर्ण सीन आहे.
रिंकी आवडली.
शेवटचा भाग एकदम ह्रद. प्रल्हाच्चा आणि मंजूदेवीने डोळ्यातून पाणी काढलं.

लोक्स Stranger Things चा सिजन-4 मे 27 ला येत आहे Happy पहिल्या आठ मिनिटांचा भाग नेफ्लिने रिलीज केलाय, फारच उत्सुकता आहे. इथे कोणी आहेत का फॅन ?? अभिनय, उच्च बॅकग्राउंड स्कोर, जुन्या काळची वातावरण निर्मिती, भय इत्यादी सगळे एकदम टॉप क्लास आहे. हॉपर जिवंत असू देत हीच इच्छा..

अरे वा! हो! स्ट्रेजर थिंग्ज्स पहिले दोन सीझन खूप आवडलेले. तिसरा आता आलाच आहे तर बघू करत बघितला.
आता चौथा येत असेल तर जरा उजळणी केली पाहिजे. मला दुसर्‍याचा शेवट आठवतोय, पण या क्षणी तिसर्‍यात काय झालं काहीच आठवेना.
पोरांची वयं वाढली असतील तरी त्यांना मोठं करू नका रे! Happy गेल्यावेळी टीन्सचे इश्यू होते आता फार मोठं प्लीज करू नका.

अमित, त्या टीजर मध्ये तर 11 तेवढीच दाखवली आहे. पण कदाचित जरा ग्रोन अप दाखवतील. ही मालिका बघताना काही ठिकाणी एकदम टरकायला होते. आबा, बरे होईल तो जीवन्त असेल तर.

एनोला होम्स मध्ये एल दिसल्यावर कसला आनंद झालेला मला. आणि त्या डस्टिनचा टुकार काही तरी एक शो पण बघितलेला मध्यंतरी. Proud

पंचायतचा दुसरा सिझन बघितला. मला तरी शेवटचा भाग नाही आवडला. पंचायतच्या दोन्ही सिझनमध्ये सगळेच प्रसंग, भावभावना अतिशय संयतपणे (subtle) दाखवले आहेत. म्हणजे विनोदाचा अतिरेक नाही, प्रचंड मालमसाला नाही किंवा टू मच ड्रामा नाही आणि मला वाटतं तिच मालिकेची ताकद आहे. असं असताना शेवटच्या भागात ती सगळी क्रियाकर्म आणि एकूण इमोशनल ड्रामा जरा जास्तच झाला! शिवाय पुढचा सिझन काढायचा किंवा नाही काढायचा काहीही ठरलं असतं तरी त्यासाठी कथेला हे वळण देणं मला तरी अनावश्यक वाटलं (आत्तातरी).
ह्या सिझनमध्ये सगळे कलाकार एकदम सेटल्ड वाटले. नीना गुप्ता भारी काम करते. सचिवजी आणि सरपंचपती सुद्धा!

बरोबर पराग. आणि काहीतरी मेलोड्रामाच दाखवायचा होता तर अभिषेक आणि रिंकी चं प्रेमप्रकरण / लग्न तरी दाखवायचं.

मला समहाऊ हा सिझन विशेष आवडला नाही पहिल्या सिझनच्या तुलनेनं. त्यामुळे निगेटिव्ह कमेंट्स वाचून मीच आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करतेय की मला नक्की का आवडला नाही सिझन. Uhoh

फैसल या कलाकाराबद्दल जास्त लिहिले गेलेले नाही. दोन्ही सीझनमध्ये उपसचिव आणि उपप्रधान या जोडीने नैसर्गिक अभिनय केला आहे. गावातले पात्र बनले आहेत दोघेही. मुख्य कलाकारांना पूर्ण क्रेडिट मिळाले आहे. पण सगळे प्रसंग जानदार होण्यासाठी सर्वांनीच मेहनत घेतली आहे. पहिल्या भागातील वीट कारखानदार, प्रधान पदाचे दावेदार जोडपे हे सर्व प्रशंसनीय.
रिंकी अभिनयात ठाकठीक वाटली. डीएम मॅडम, सचिवचे तालुक्याचे बॉस सगळे मस्त.
आमदाराची माणसं सुद्धा खरी खरी वाटली. बाहुबली आमदार मिर्झापूर पेक्षा उजवा आहे.

पराग, अनुमोदन.
मी तेवढा भाग पुढे पळवत पळवत पाहिला.
रघुवीर यादव, नीना गुप्ता..... रेंज अफाट आहे यांच्या अभिनयाची. किती वेगवेगळे रोल्स!!!

शान्त माणूस, अगदी अगदी... छोट्या छोट्या भुमिकांमध्येही सुरेख अभिनय केला आहे सगळ्यांनीच

स्ट्रेंजर थिंग्ज मस्त आहे. काही वेळेस पुनरावृत्ती वाटते पण नवनवीन फ्रेश पात्रं येतात त्यामुळे चालून जाते.

अभिषेक आणि रिंकी चं प्रेमप्रकरण / लग्न तरी दाखवायचं. >>> ओहह हे दाखवलंच नाहीये, मला वाटलं हे दाखवतील.

आज चौथा भाग बघितला पंचायतचा, रिंकी छान दिसत होती.

बाकी नशामुक्ती अभियान आणि सगळेच नशा करतायेत हे फार डोक्यात गेलं.

त्या ड्रायव्हरला वरवरचा भात देऊ शकले असते, खाली थोडाच करपला होता. तसा किंचित छान लागतो खरंतर (मला आवडतो) पण वरचा चांगला देऊ शकले असते.

इतर कोणी असतं तर बेवड्याला जोरदार झापडच दिली असती ताई. आपले सचीव प्रेमळ असल्याने त्यांनी भात आमटी तरी दिली.

Pages