वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंकन लॉयर संपवली वीकेंडला. कोर्टरुम आणि लीगल ड्रामा आहे.
काही काही अशक्य चीझी प्रसंग, कथा-नायकाच्या बाजूने सारी कायनात खडी होऊन कायच्या काय कन्विनिअंट घटना घडत जाणे इ. प्रकार असुनही बिंजवर्दी आहे.
फा +१. डायव्होर्स, ड्रग युज बरोबर अपत्याची जॉईंट कस्टडी नसणे आणि ते अपत्य मुलगी असणे हे ही. मला मुलगा असलेली एकही सिरिज चटकन आठवत नाहीये. तसंच पॅरा लीगलने शेवटी लॉ कॉलेज जॉईन करणे.
मॅन्युअल गार्सिआ - रुल्फो चं काम ही नाही आवडलं. सफाईदार बोलत नाही, एकदा काय ते बोलुन टाकू असं काही काही प्रसंगांत जाणवतं, किंवा एडिटिंगची चूक म्हणू. इतकं सगळं असुनही बघितली. का ते माहित नाही. Proud

मॉडर्न लव्ह मुंबई : स्टोरी/कथा अशी कुठलीच नाही आवडली पण सादरीकरण चांगलं आहे, अजुन थोड्या कमी ड्युरेशनच्या चालल्या असत्या !
मला फातिमाची स्टोरी आवडली सर्वात आणि मसाबाची सर्वात बोरिंग वाटली !
कलाकारांनी सगळ्या छान काम केलय , फातिमा सना शेख, चित्रांगदा , अर्शद वार्सी, प्रतीक गांधी आपापल्या रोल्स मधे भारी , चित्रागदा कित्ती सुंदर दिसते अजुन !
रणवीर ब्रार टोटल सरप्राइझ !

डिझनेच्या सिनेमात असतं तश्या आवाजात आणि टोन मध्ये डबिंग केलंय.>>>>>>>>>>> Lol
त्यामुळेच नाही बघवलं गेलं.

गुल्लक सिझन ३ बघून संपवला. ५ च एपिसोड आहेत. मजा आली बघायला.

'बेस्टसेलर' कोणी पाहिली नाही का प्राईमवर??
मस्त आहे एकदम. मला आवडली. एक लेखक किती आयुष्य संपवू शकतो याचा अंदाज देते ही सिरीज.

लिंकन लॉयर अगदी उत्साहाने सुरू केलेली ३-४ एपिसोड्स नंतर कंटाळलो Happy ज्यांनी इतर लाइट लीगल ड्रामाज फारसे पाहिले नसतील त्यांना आवडेल. नाहीतर जरा तेच तेच फिलिंग येइल.

काही काही अशक्य चीझी प्रसंग, कथा-नायकाच्या बाजूने सारी कायनात खडी होऊन कायच्या काय कन्विनिअंट घटना घडत जाणे >>> हो Happy

पहीला एपिसोड रिंकी दिसेपर्यंत बघितला. रिंकी बदलली आहे, मला आधीची आवडलेली. >>> मार्केटिंग मधे सांगतात ते प्रॉडक्ट मधे भलतेच असते तसे झाले का? Happy

८ वा शेवटचा एपिसोड सुरु आहे. खूप छान आहे हा सिझन सुद्धा ८ वा एपी रडवतो. पहिल्याची सर नाहीये, abrupt एन्ड आहे

अरे ! इथे बातमी समजली पण. मी आपला गुपचुप बघत होतो. Lol
तीन भाग तर मस्त झालेत. कमी नाही आणि जास्त नाही पहिल्यापेक्षा. आता बाकीचे पुरवून पुरवून बघणार.

मार्केटिंग मधे सांगतात ते प्रॉडक्ट मधे भलतेच असते तसे झाले का? >>> म्हणता येईल तसं. मी नवीन एकच शॉट बघितला रिंकीचा, जुनी आणि ही वेगळी आहे जाणवलं म्हणून नावं बघितली, दोघी वेगळ्या आहेत. आधीची जास्त छान होती. कलाकार का बदलली कोणास ठाऊक. एनिवे पुढे ती कदाचित आवडेलही पण आत्ता ती का नाही चुटपुट लागली आहे खरी. मी अजून बघितलं नाही पुढे.

हा सीझन घाईत संपवला. दोन दिवस आधीही आलेला. कदाचित आज जास्तीचे एक दोन भाग येतील. अशा मालिकांना खरे तर सुरूवात शेवट नसतो. नुक्कडची आठवण करून देते मालिका. त्यात इमोशनल ड्रामा असायचा. जो यात नाही. तिसर्‍या सीझनची तयारी सुरू असेल.

रिंकी बदलली आहे >>> मला बदललेली रिंकीही आवडली. (गिल्टी माइंड्समधली सहायक वकील झालेलीच आहे का ही? मला नावं माहिती नाहीत, पण क्लोज-अप्स, हसू पाहून तसं वाटलं.)

पंचायत सीझन-२, कोटा फॅक्टरी सीझन-२, किम्स कन्व्हिनियन्स सीझन-१, गिल्टी माइंड्स - असं एकाच वेळी बघते आहे. पूर्वी दूरदर्शनवर रोज एका वेगळ्या मालिकेचा एक-एक भाग असायचा, तसं वाटतं. Lol
दूरदर्शनसारखंच आपणही वार, टाइमटेबल ठरवून बघावं असा विचार केला होता, मग म्हटलं इतकं काही प्लॅनिंग नको Proud

वर्किंग मॉम्स चा सहावा सीझन बघून संपला. मस्त झाला आहे हा सीझन!! अ‍ॅन ची फार च फॅन आहे मी. या सीझन मधे केट पण आवडली. काही खूप भारी डायलॉग्ज आहेत दोघींमधे.

कलाकार का बदलली कोणास ठाऊक. >>>दोन्हीकडे पाहून मला तर अजूनही ती तीच वाटते आहे. वेगळ्या असतील तर कोणीतरी दोघींचे फोटो दाखवून फरक स्पष्ट करा.

पहिल्या सीझन मधे पूजा सिंग या नावाने काम केलंय तर दुसर्‍या सीझन मधे सान्विका या नावाने. फरक काय आहे हे नाही माहिती.
पूजा सिंग - आसमान से आगे, फ्रेण्ड्स : कंडीशन अप्लाय अशी लिस्ट दिसली.

काल फार उशीराने 'बंदिश बंदीट्स' बघितली आणि मग (नेहमीचा आवडीचा छंद कम् प्रोटोकॉल असल्याप्रमाणे) इथे येऊन त्यावरच्या कमेंट्स वाचल्या. मोस्टली दिपंजलीच्या सगळ्या कमेंट्सना +१

(इन जनरल कोणत्याही) वेबसिरीजमधले बेडसीन्स / प्रणयदृष्ये काहींना खटकतात त्याविषयी:

मला त्यात खटकण्यासारखे काय आहे कळत नाही. हेच सगळे पूर्वी इंग्रजी सिनेमात दाखवायचे तेव्हा 'ते बघा प्रणय सुद्धा किती नजाकत सें करतात' अशी कौतुके ऐकली आहेत. टीनेज मध्ये असताना HBO आणि स्टार मुव्हीज सुद्धा काही छान (प्लीज नोट.. पॉर्न मध्ये दाखवतात तशी विकृत नव्हे) प्रणयदृष्ये असली तर सिनेमा आवर्जून बघितला जायचा. आता तशीच दृश्ये वेबसिरीजमध्ये असतात. इंग्रजी सिनेमांमध्ये ती दाखवायचे (खरं तर अजूनही दाखवत असतील.. पण आता फक्त 'तसे' सीन्स बघण्यासाठी इंग्रजी सिनेमे बघावे लागत नाहीत) तेव्हा ती नक्की कथेची गरज असायची याची सर्वांना १००% खात्री आहे का की आता वेबसिरीजमध्ये आली की 'कथेची गरज नसताना अशी दृश्ये..' आणि सगळी चर्चा चालते?

आपल्याकडे तसा नाजूक रोमान्स मी तरी वेबसिरीजशिवाय कुठे पाहिला नाही. जी पिढी हे आवडीने बघतेय तिने काहीतरी वेडेवाकडे, सर्कसवाले पॉर्न बघण्यापेक्षा (हल्ली कितीही सॉफ्ट / इंटिमेट पॉर्न असे गुगल केले तरी काहीतरी हिडीस डबल एक्स पॉर्न समोर येते) असे नाजूक काही बघितले तर जरा मनोवृत्तीत फरक पडेल (का?). सेक्स ही फक्त आटोपायची किंवा फुलांवर फुले आपटून झाकायची गोष्ट नसून आनंद घेण्याची काही गोष्ट असते याचा जनतेच्या डोक्यात प्रकाश पडेल असे वाटते.

कुमार सरांच्या त्या लैंगिकता वाल्या धाग्यावर या अनुषंगाने चर्चा झाली तेव्हापासून इथे वेबसिरीजवाल्या धाग्यावर हे टाकायचे मनात घोळत होते.

सोनी लिव्ह वर रॉकेट बॉईज सिरीज आहे त्यात adult scenes आहेत का?
ज्ये ना आणि मुलांना दाखवण्यासारखी आहे क}?

पंचायत दोन दिवसात संपवली. छोटेच एपिसोड असल्याने पटकन पाहून होते. खूप addictive आहे ही वेब सिरीज. बऱ्याचदा पहिला सिझन मस्त असतो पण दूसरा गंडतो. पण मला हाही आवडला. सर्व कॅरेक्टर्स हळू हळू बिल्ड केली आहेत. सर्व ऍक्टर्सनी कमाल केली आहे. रघुबीर यादवचे एक्सप्रेशन्स लाजवाब !
रिंकी बदलेली आहे मी मुद्दाम पहिला सीझनचा एन्ड जाऊन पहिला. आधीची छानच होती एका सीनमध्ये प्रभाव सोडून गेली. दुसरी चांगली आहे पण खूप प्रभावी नाही वाटली मला तरी.

स्पॉइलर - शेवटचा एपिसोड खरंच डोळ्यात पाणी आणतो. एकदम धक्काही देतो.

एका छोट्याशा गावात हळुवारपणे फुलत जाणारी कथा सगळे इरसाल कॅरेकटर कुठेही गावाच गावपण न हरवता प्रेक्षकांना अलगद गावातून फेरफटका मारून आणणारी वेब सिरीज म्हणजे पंचायत. मालगुडी डेझ नंतर त्याच लेवलची आत्तापर्यंतची ऐकमेव सिरीज म्हणता येईल

Pages