वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आश्रम 3 बघायला घेतला.जरा पाणी घालून पातळ केल्या सारखा वाटला.खूप विषय एकावेळी हाताळले आहेत.
ईशा गुप्ता चे नृत्य योगा आणि जिम्नॅस्टिक चा उत्तम डेमो वाटला.सॉलिड आहे.
सर्व सज्जन, शिक्षित, बाबा कडून आधीच्या 2 सिझन मध्ये फटके खाल्लेले लोक या सिझन मध्ये परत त्याच चुका करून अडकत असलेले पाहून गंमत वाटली.

मिथ्य पाहिली हुमा कुरेशी साठी....
नाही पाहिली असती तरी चाललं असतं.
रजत कपूर आणि नील झालेला... दोघांची कामं चांगली झाली आहेत

आधीच्या 2 सिझन मध्ये फटके खाल्लेले लोक या सिझन मध्ये परत त्याच चुका करून अडकत असलेले पाहून गंमत वाटली.

>> मला 'फोर मोर शॉट्स' आठवली. दोन्ही सीझनमध्ये त्याच चुका, तोच इमोशनल द्रामा, त्याच अडचणी :कपाळाला हात:

पंचायत 2 अप्रतिम सिरीज
पूर्ण फॅमिलीने एकत्र बघावी आशा ज्या काही मोजक्या सिरीयल असतील त्यातली एक
ना भडक पात्रे ना भडक डायलॉग
एमले शिव्या देतो पण त्याही अस्सल वाटतात
माजोरडा विधायक अगदी उतरलाय

अभिनय तर बोलायलाच नको, इतक्या छोट्या छोट्या प्रसंगातून दिसतो
विधायकशी भांडलो हे तावातावाने प्रधानजी सांगत असतात त्यावेळी सचिव चे अलगद हसू पण टिपले जाते समाधानाचे

बाकी रिंकी मस्त घेतली आहे, तिचे ड्रेस पण छान
आणि सचिव पेक्षा हीच involve वाटत आहे
काही घडायचं असेल तर तिलाच पुढाकार घ्यावा लागेल बहुदा

इतक्या लवकर सिरीज बंद करणार नाहीत कारण गावातल्या छोट्या मोठ्या गोष्टी हाच जीव आहे
कथा अशी एकसलग म्हणाली तर आहे म्हणाली तर एकेक पार्ट वेगळा बघितला तरी चालतोय

आश्रम 3 बघतोय. पहिल्या 2 भागासारखी ग्रीप घेत नाही. सपक वाटतेय. वेगवेगळ्या कथेचे तुकडे जोडून कडबोळी बनवल्या सारखं... पूर्वीसारखा "फील" येत नाही बघताना खूप विस्कळीत पणा आहे.

Apple TV+ वर Prehistoric Planet सिरीज बघत आहे. David Attenborough चे नॅरेशन आहे. पाच भागांची छोटी मालिका आहे, पण जबरदस्त आहे. Ice Worlds हा मला सर्वात आवडलेला भाग. Happy
डायनोसोर फॅन असाल तर नक्की बघा.

या आठवड्यात पंचायत उरलेले दोन बघायला हवेत, राहून जातंय.

नवरा सध्या हॉट्स्टारवर जस्ट बियाँड बघतोय, भुतं खेतं वगैरे टाईप. वेगवेगळ्या स्टोरीज आहेत.

ती एका एपिसोडपुरती होती. प्राईमवरच्या मिसेस मिझेल सिरीजमध्ये मुख्य लीड आहे.
या सीरिजमध्ये प्रत्येक एपिसोड वेगळा आहे. स्पॉयलर अस काही नाही. Happy

ये काली काली आंखें (नेटफ्लिक्स)

मला ताहिर राज भसीन आवडतो, म्हणून बघायला सुरुवात केली. त्याने काम छानच केलंय. तरी ३ भाग पाहून सोडून दिली. कथेचा कोअर प्लॉटच कै-च्या-कै वाटला. त्या आंचल सिंगला एकच एक एक्स्प्रेशन द्यायला लावलंय.

ता.रा.भ.ला भविष्यात चांगल्या सिरीज/सिनेमे मिळोत.

Apple TV+ वर अजुन काय काय चान्गल आहे ते सान्गा. ३ महिन्याचे फुकट मीळाल आहे. तेहरान चालु केली आहे.

ऍपल टीव्ही वरच्या एक दोनच मालिका बघितल्या आहेत.

स्लो हॉर्सेस - गॅरी ओल्डमॅन मेन रोल मध्ये असलेली ब्रिटिश स्पाय सिरीस आहे. जर स्लो बर्न टाईप चे ब्रिटिश ड्रॅमा आवडत असतील तर नक्की बघू शकता.

शायनिंग गर्ल्स - हॅण्डमेड टेल मधली एलिझाबेथ मॉस हि प्रमुख भूमिकेत दिसणारी साय-फाय, थ्रिलर अशी मालिका आहे. टाइम ट्रॅव्हल वगैरे गोष्टी आवडत असतील तर मालिका चांगली आहे.

अरे इथे अ‍ॅपल टीव्हीचीच चर्चा सुरू आहे Happy मी पहिल्या धाग्यावर आत्ता हेच लिहून आलो.

अ‍ॅपल टीव्ही प्लस वर "We Crashed" नावाची सिरीज आहे - "WeWork" ़़कंपनीचा सीईओ व त्याची बायको यांच्या स्टोरीवर आधारित. एक दोन वर्षांपूर्वी ही कंपनी आयपीओ होणार म्हणून व $४७ बिलियन्स इतके व्हॅल्युएशन वगैरे गाजावाजा होत असताना सीईओ चे कंपनीमधलेच काही आर्थिक व्यवहार पुढे आले व नंतर त्याला राजीनामा द्यावा लागला व आयपीओ पुढे ढकलला इतपत लक्षात आहे. यात त्या पॉइंटपर्यंत कथा आहे असे दिसते. एक भाग पाहिला आहे. इंटरेस्टिंग आहे. नंतर मागच्या वर्षी ही कंपनी पब्लिक झाली.

मर्डर इन अगोंडा ही छोट्या ५ भागांची सिरीज अमॅझॉन मिनीवर पाहिली. श्रेया पिळगांवकर व तिच्या भावाचे काम केलेला अभिनेता यांनी मस्त कामे केली आहेत. छोटे छोटे भाग व लवकर संपणारी सिरीज पहायची असेल तर जरूर पहा.

धन्यवाद राधिका , फारएंड , अक .
suspicion नावाची सिरीज पाहिली त्यात बिग बॅंग थेअरी मधला कुणाल नय्यर आहे. थ्रिलर आहे .

फायनली पंचायत हा सीझन पूर्ण केला.

तो साप येतो तो सीन मस्त, जाम फनी होता.

शेवट फार टचिंग, रडू आलं.

विधायक हीरो आहे एकदम, सिरियलमध्ये असतो बहुतेक, बरेचदा बघितलं आहे त्याला.

त्याला प्रधान अडवते आणि सुनावते ते बघून कलेजे मे थंडक.

पुढचा सीझन येईल बहुतेक, आला तर पहिल्याच भागात सचिवाबाबत positive असुदे आणि विधायक पडलेला दाखवा आणि rinky अभिषेक लवस्टोरी हवी. हलकाफुलका करा.

फायनली rinky ला परत फुटेज देते मी, आवडली मला.

Lincoln lawyer बद्दल जरा वाचल्यावर कुतुहल म्हणून Bosch बघायला सुरुवात केली आहे. अजून पहिला सीझनच सुरू आहे आणि आवडतेय सीरिज.
पोलिस ड्रामा आवडणाऱ्यांनी नक्की बघा.

पुढचा सीझन येईल बहुतेक,>>+१ शेवटी त्याची ट्रान्सफर ॲार्डर मंजूदेवीच्या हातात पडली. ती थांबवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतील गाववाले.

Pages