वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विधायक हीरो आहे एकदम, सिरियलमध्ये असतो बहुतेक, बरेचदा बघितलं आहे त्याला.>>>
तो ब्लॅक फ्रायडे सिनेमात होता
त्यातही त्याचा रोल असाच भडक डोक्याच्या माणसाचा होता, आणि टेररसिस्ट असतो तो

विधायक जरा जास्तच बोलतो असं वाटतं.
बिचारा सचिव.. फार वाईट वाटलं तेव्हा त्या कॅरेक्टर साठी. त्या दोस्ती एपिसोड मधे त्याचा स्टँड बरोबर वाटला अगेन्स्ट प्रधानजी की ते काहीच बोलले नाहीत जेव्हा त्याला विधायक सुनवत असतो. मस्त एक्स्प्रेशन्स!

ते लौकी चॅलेंज फिरतेय सगळीकडे Lol सगळ्या सेलेब्रिटीजच्या हातात दुधीभोपळे असं काहितरी

मर्डर इन अगोंडा ही छोट्या ५ भागांची सिरीज अमॅझॉन मिनीवर पाहिली. >>> हे मिनी अमॅझॉन प्राइम व्हिडिओवर नाही का दिसत.

बिचारा सचिव.. फार वाईट वाटलं तेव्हा त्या कॅरेक्टर साठी << मला त्या विकास ला विधायक बोलतो तेव्हा वाईट वाटलं पण जाम हसायलाही आलं. बिचारा परफ्युम लाउ न आलेला :))

रान बाजार जाम बोर करत आहेत
8 भाग झाले बघून आधी जरा वेगवान वाटलेलं पण आता इतके ट्रॅक घुसडलेत
त्यात टिझर मध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे कळत आहेच आता फक्त कसे हे बघायचं पण मजा नाही

पोलिस ड्रामा आवडणाऱ्यांनी नक्की बघा >>> हो, माझा पहिला सीझन पाहून झाला. पुरवून, पुरवून बघणार आहे पुढे.

हे मिनी अमॅझॉन प्राइम व्हिडिओवर नाही का दिसत.
काय माहित?

मला वाटते त्या नुसार अमॅझॉन मिनी हे फक्त मोबाईल वाल्यांना टारगेट करण्यासाठी प्लॅटफॉर्म आहे. फक्त मोबाईलवरच दिसते (अमझॉन अ‍ॅप किंवा मोबाईल ब्राऊझर वर अमॅझॉन शॉपिंग साईट वर)

Apple TV+ वर अजुन काय काय चान्गल आहे ते सान्गा. >>> Tehran, the mosquito coast व Defending Jacob तिन्ही एकाहून एक सरस सिरीज आहेत नक्की बघा

मला वाटते त्या नुसार अमॅझॉन मिनी हे फक्त मोबाईल वाल्यांना टारगेट करण्यासाठी प्लॅटफॉर्म आहे >>> हो. नवऱ्याच्या मोबाईलवर दिसतंय, मला ते एवढ्याश्या स्क्रीनवर बघायला कंटाळा येतो.

धन्यवाद योगी.

Apple TV+ शायनिंग गर्ल्स -> सहि आहे एकदम ही वेब सिरिज . रत्नाकर मतकरी किन्वा धारपाची कान्दबरी वाचतोय असे वाटले, ४०५ चन्दनवाडी वर आधारीत अस काहितरी काढता येइल.

महेश्कुमार धन्यवाद.. Tehran सुरु केलिये..बाकिच्या पण बघतो.

आश्रम ३ पूर्ण झाली : कपाळबडवंती कंटीन्यूज !!
असेच काहीसे वाटले. सिझन २ जिथे संपला आणि सिझन ३ जिथे संपला ह्यात काहीच फरक वाटत नाही जास्त. त्याच प्रकारचे नवनवीन आरोप बाबा निरालावर लादलेत. बाबांकडून तोच तोच अन्याय करवून घेण्यासाठी उगाचच जास्त पात्रं घुसडवली आहेत असे वाटले. बाबा निरालाची बाबा होण्याअगोदरची थोडीफार कहाणी (शेवटच्या भागात) हेच काय ते थोडे वेगळे पण.

बाकी बॉबीने छान काम केलंय. इतर सहकलाकारांचा अभिनय ही मस्त. पम्मी व अक्कीचे सिन नंतर नंतर बोअर होतात. तो उजागर एवढा हात धुवून मागे लागलाय हे समजले असते तरी त्याच्या मागे भोपास्वामी कोणालाच का पाठवत नाही हे मात्र समजले नाही.

मात्र सगळ्यात बोअर व घाणेरडे वाटते ते मध्ये मध्ये येणारी कायम टॅबलेटची अ‍ॅड. एक माणूस किळसवाणे थुंकतो काय...फार बेकार वाटते. प्रत्येक एपिसोडला २ वेळा तरी ही अ‍ॅड येतेच.

Exactly योगी !! तुमच्या शब्दाशब्दाशी सहमत.

तिसऱ्या पॅरा विषयी : तुम्हाला कायम चूर्ण च्या ऍड का दिसल्या माहीत नाही. मला पूर्ण सिरीजमध्ये इंटेल लॅपटॉप्स च्या इनोव्हेटिव्ह जाहिराती दिसत होत्या.

तिसऱ्या पॅरा विषयी : तुम्हाला कायम चूर्ण च्या ऍड का दिसल्या माहीत नाही. मला पूर्ण सिरीजमध्ये इंटेल लॅपटॉप्स च्या इनोव्हेटिव्ह जाहिराती दिसत होत्या.
मलाही माहित नाही. मी कधीच कायम किंवा त्यासारखे औषध आधी शोधले नव्हते. बहुतदा मी गॅझेट्स वगैरेच पहात असतो त्यामुळे त्याच्या अ‍ॅड्स येणे अपेक्षित आहे पण या व्हीडीओ अ‍ॅड असल्याने त्या युझरची कुकीस वाचून अ‍ॅड पाठवत नसाव्यात.

आश्रम ३ मलाही नाही आवडली इतकी!
विशेषतः पहिल्या दोन भागांनी अपेक्षा उंचावून ठेवल्या होत्या म्हणून असेल !
त्या ड्रग अ‍ॅडिक्ट मुलीचे आणि तिच्या आई वडिलांचे कथानक उगिचच घुसडल्यासारखे वाटले... पण मला भोपा स्वामी आवडला मात्र.
किती डेडिकेटेड! Happy

मुळात बाबा च्या 'सेवा' स्ट्रॅटेजी ची अति अति जास्त पुनरावृत्ती झाली आहे.एक माणूस सारखं तसं वागतो म्हणून तुम्ही सारखं तेच तेच दाखवू शकत नाही.हे म्हणजे राजावर निबंध लिहिणाऱ्या मुलासारखं.'महाराज घोडयावर बसले, त्यांनी घोड्याला टाच मारली आणि ते दौडत निघाले टबडक टबडक टबडक टबडक टबडक टबडक टबडक टबडक टबडक टबडक असं पुढे 3 पानं.

टबडक टबडक असं पुढे 3 पानं.
हा हा... चांगले उदाहरण..!!

त्या ड्रग अ‍ॅडिक्ट मुलीचे आणि तिच्या आई वडिलांचे कथानक उगिचच घुसडल्यासारखे वाटले...
अगदी असेच वाटले. फक्त बाबा निरालाने जबरदस्तीने अनैसिर्गिक रित्या संबंध ठेवले हे सांगण्यासाठी या लोकांना कथेत आणल्यासारखे वाटतेय. बाकी ते तीन कलाकार (आई, वडील व मुलगी) कोण आहेत ते कोणी सांगू शकेल का?

कोणी voot वरची yellowjackets (यलो जॅकेट्स) पाहिली आहे का?
१९९६ मध्ये सॉकर खेळाडूंचा एक संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी सिएटलला जातो. त्यांचे विमान पहाडात खोलवर कोसळते. काही खेळाडूंचा मृत्यू होतो. काही सदस्य एकोणीस महिने जंगलात टिकून राहतात. २५ वर्षांनी जे जगले वाचले त्यांचे २०२१ मधील आयुष्य आणि १९९६ मधील फ्लॅशबॅक यावर आधारित web series आहे. पहिल्या season मध्ये नक्की कळले नाहीये पण असे सूचित केले आहे की ते cannibal होतात.
दुसरा season अजून आला नाहीये.

@ praju93 >> 'सत्तर दिवस' नावाची रविंद्र गुर्जर यांनी अनुवाद केलेली कादंबरी वाचली होती. चिलीचे खेळाडू ऍंडीज पर्वतात विमान कोसळून अडकतात. सुरुवातीला त्यांना विमानातले चॉकलेट बार्स वगैरे मिळतात ते रेशनिंग करून जगतात. पण नंतर नाईलाजाने त्यांना इतर मृत प्रवाशांचे मांस भक्षण करावे लागते. त्यातील २ प्रवासी बाहेर पडून काही दिवस चालून मदत मिळवतात. फार थरारक गोष्ट होती ती.

voot वर "बंदो मे था दम" पाहतय का कोणी ?
ind - Aus २ वर्ष पूर्वी झालेल्या टेस्ट सिरीज वरती आहे
ट्रेलर पण मस्त होते आणि पहिला भाग पण छान वाटलं
अजिंक्य राहणे आधी पासून impressive होता , ह्यात त्याचे शांत पणे सांगणे सुद्धा फार आवडले
राहणे - विराट रन आऊट खूप चांगल्या पद्धतीनी दाखवला

voot वर "बंदो मे था दम" पाहतय का कोणी ? >>> आली का? पाहायची आहे. मस्त सिरीज होती ती.

एचबीओ वर "We Own This City" नावाची लिमिटेड सिरीज आहे. खिळवून ठेवते. साधारण "द वायर" सारखाच फील आहे. पण एकदम नवीन आहे. बॉल्टिमोअर शहरातील पोलिस खात्याने गन कंट्रोल करता उभा केलेला टास्क फोर्स व त्यातील पोलिसांबद्दल आहे. डॉक्युमेण्टरी नाही - पण ट्रीटमेण्ट वायर सारखी आहे. द वॉकिंग डेड मधे "शॉन" चे काम केलेला जॉन बर्न्थाल, द गुड वाइफ मधे "विल" चे काम केलेला जॉश चार्ल्स व द वायर मधले बरेच लोक यातही आहेत. त्यात काही ड्रग्जच्या धंद्यात असलेले यात पोलिस आहेत.

डेव्हिड सायमन - वायरचा लेखक या सिरीज चा लेखक नाही पण त्याचे नाव टायटल्स मधे दिसते.

चिलीचे खेळाडू ऍंडीज पर्वतात विमान कोसळून अडकतात. >> यावर इथान हॉकचा एक चित्रपट आहे. >>> "अलाइव्ह" - मलाही तेच डोक्यात आले होते वाचताना.

mazeman, filmy, farend ,
हो. वाचलंय मी पण सत्तर दिवस. वाचताना काटा येतो अंगावर.

पण या वेब सिरीज मध्ये, नंतर ते वाचलेले लोक कसे वागतात, कसे घडतात .
त्यांनी जगापासून कसे कसे आणि काय काय लपवलेले असते. त्यांचे आयुष्य कसे घडते या गोष्टी पण दाखवल्या आहेत.

असे दाखवले आहे की इतर लोकांना शंका आहे की त्या १९ महिन्यांमध्ये खूप काही घडलंय. पण जगलेल्या लोकांनी एकमेकांना वचन दिलेले असते की आपण जे काही घडले ते सिक्रेट ठेवायचे.

मला तरी आवडली. इंटरेस्ट असेल तर जरूर पहा.

सध्या बघायला काहीच नाही म्हणून प्राईम वर " covert affairs" बघतेय .
परत तेच CIA आणि त्यांच्या कथा Happy . केसेस एक्दम बालीश आहेत . कै च्या कै बादरायण संबंध आहेत .
एकच व्यक्ती मला त्यात आवडते - ऑगी . त्याच्यासाठी मी बघतेय .
तो लिंकन लॉयर मधला ट्रेवर आहे - ज्याच्यावर बायकोच्या खूनाचा आरोप होता . यात खूप तरूण आहे .
तो एक आंधळा टेक ऑपरेटर आहे आणि त्याची आणि हिरॉईनची मैत्री मस्त दाखवली आहे .
बाकी सगळा आनंद !

झी फाईव्ह वर द ब्रोकेन न्यूज आलीये. पाहिली का कुणी?
सोनाली बेंद्रेची पहिली वेब सिरीज आहे. मुख्य भूमिकेमध्ये श्रेया पिळगावकर आणि जयदीप अहलावत पण आहेत.

Pages