Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आधीची छानच होती एका सीनमध्ये
आधीची छानच होती एका सीनमध्ये प्रभाव सोडून गेली. >>> अगदी अगदी. दुसरीचे तसं फर्स्ट इंप्रेशन पडले नाही. समहाऊ तिलाच बघायची इच्छा होती मनात कुठेतरी. फार गोड वाटलेली. असो सीझन बघितल्यावर कळेल दुसरी कशी वाटली ते.
असं वाटतं ह्यांनी पहिलीचा चेहेरा आपल्याला न दाखवता डायलॉगज ऐकवले असते तर चालले असतं, मग काही वाटलं नसतं.
(No subject)
तीच आहे का आता.
तीच आहे का आता. इथे सेम दिसतेय.
पंचायत फक्त भारतातच आहे का?
पंचायत २ फक्त भारतातच आहे का?
पंचायत २ फक्त भारतातच आहे का?
पंचायत २ फक्त भारतातच आहे का? >>नाही. अमेरिकेत प्राईमवर दिसते आहे.
इथे सेम दिसतेय.>>> तिच ही. हीच ती.
मला वेगळी का वाटली, नावंही
मला वेगळी का वाटली, नावंही वेगळी. तिच असेल तर बेस्ट.
गेल्या दोन महिन्यात hbo max
गेल्या दोन महिन्यात hbo max वरच्या काही वेबसीरीज संपवल्या आणि ह्या दोन मला फार आवडल्या .
टोकियो vice - jake adelstein ह्या अमेरिकन पत्रकाराच्या अनुभवांवर लूसली आधारित आहे.
jake adelstein हा टोकियो शिबून ह्या नामांकित जपानी वर्तमानपत्रात काम करणारा पहिला परदेशी पत्रकार होता आणि त्याचे जवळ पास सगळे काम crime beat var होते .
flight attendant - मला बिग बँग थेअरी वाली kaley cuoco अभिनेत्रीं म्हणून काही फारशी आवडायची नाही. पण या वेबसीरीज मध्ये तिने धमाल acting केली आहे
भारतात ह्या वेबसीरीज हॉटस्टार वर available असल्या पाहिजेत.
प्राईम व्हिडीओ वर लॅपटॉपवर
प्राईम व्हिडीओ वर लॅपटॉपवर कर्सर उजवीकडे नेला कि नावे येतात. त्या नावावर क्लिक केले की त्या कलाकाराचा इतिहास येतो. सीझन वन मधे पूजा सिंह असे नाव दिसते. आता सानविका असे नाव येते. दोघी एकच असतील कदाचित. तेव्हढा भाग बदलला असेल तर कल्पना नाही.

तीच आहे का आता. इथे सेम
तीच आहे का आता. इथे सेम दिसतेय. >> मला नाही फरक वाटला , इथं बदललीय वाचून परत पहिली बघितली तरी सारखीच वाटली. तेव्हा टीनेज मध्ये असेल . दोन वर्षात थोडी मोठी झाली ना.
महेशकुमार +1
त्या रिंकीला किती बरं वाटेल
त्या रिंकीला किती बरं वाटेल इथली चर्चा वाचून
द बॉईज सिझन ३ च्या प्रतीक्षेत
द बॉईज सिझन ३ च्या प्रतीक्षेत आहे.
इथे कोणी ब्लॅकलिस्ट सिरीज बघत
इथे कोणी ब्लॅकलिस्ट सिरीज बघत का ? ९ वां सिझन चालू आहे. मुख्य हिरणवीच्या exist नंतर थोडी ढेपाळली होती
पण आता ट्रॅकवर आलीय .
पियू, प्रणयदृष्यांबद्दल तुझा
पियू, प्रणयदृष्यांबद्दल तुझा मुद्दा पटला.
पण आपल्याकडे त्यांतला हळूवारपणा इत्यादी दाखवतात का, तो उद्देश असतो का, हा प्रश्न आहे.
उदा. - 'आश्रम' सीरीजमधले सीन्स. त्यातला एक गुंगीचं औषध देऊन केलेल्या बलात्काराचा आहे, एक हनी-ट्रॅपचा आहे, एक रोमॅन्टिक आहे. पण तिन्हींतले कॅमेरा अॅन्गल्स तेच, जसेच्या तसे. सीननुसार, सिच्युएशननुसार, पात्रांनुसार काही वेगळा विचार दिसतो का? तर नाही!
प्रकाश झांसारख्यांनाही हे करता येत नाही, तर बाकीच्यांचं काय, असंच म्हणावंसं वाटतं.
(हे मी मागेही कुठेतरी लिहिलं होतं.)
जाई, मी बघतेय ब्लॅक लिस्ट .
जाई, मी बघतेय ब्लॅक लिस्ट . सध्याचा ट्रॅक मस्त सुरू आहे.
दर आठवड्याला एक एपिसोड येतोय त्यामुळे अजून मजा येते आहे.
मी पण बघतेय ब्लॅकलिस्ट.
मी पण बघतेय ब्लॅकलिस्ट.
हिरविणीच्या एक्सिट च्या वेळचं रहस्य आवडलं होतं पण मध्ये मध्ये जरा बोअर होते , रोज तेच तेच काय असं वाटून. पण रेमंडची acting आणि डायलॉग छान असतात त्यामुळे बघितली जाते
हो प्राची , दर आठवड्याला नवीन
हो प्राची , दर आठवड्याला नवीन एपिसोड असतो ते मस्त आहे . मजा येते.
सावली,
रेमंडची acting आणि डायलॉग छान असतात
>>>> हो , विशेषत त्याचे सरकास्टिक डायलॉग डिलिवरी भारी आवडते
मागच्या आठवड्याच्या एपिसोडमध्ये एलिझाबेथ कीनला मर्विन जेरार्ड म्हंजे रेमंडच्या वकिलाने मारल अस दाखवलं. आता पुढे काय समांतर प्लॉट येतोय ह्याची उत्सुकता आहे.
रानबाजार बघतोय.. "गोमु"
रानबाजार बघतोय.. "गोमु" संगतीनं माझ्या तू येशील काय हे गाणं केलेली प्राजक्ता माळी आहे यात.
रानबाजार बघतोय.. कुठे????
रानबाजार बघतोय..
कुठे????
planet marathi
planet marathi
महाराष्ट्रातील विरोधी
महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या एका मोठ्या नेत्याचा आपत्तीजनक परिस्थितीत मृत्यू, मग सत्ताधारी पक्षातल्या तत्कालीन मुख्यमंत्र्याने सावरलेली परिस्थिती.
लप्रि.. तिन्ही बेडसीन्स
लप्रि.. तिन्ही बेडसीन्स एकसारखेच दाखवले आहेत हा मुद्दा पटला.
मुळात हळुवार बेडसीन्स दाखवणे हा वेबसिरीज बनवणाऱ्यांचा उद्देश नाहीच. (जर कथेची तशी गरज *नसेल* तर असे सीन्स टाकण्यामागे) त्यांचा उद्देश बेडसीन्स आवडणाऱ्या क्राऊडला attract करणे एवढाच. मी म्हणतेय तो साईड इफेक्ट आहे. सेक्स ही हळुवारपणे करण्याची गोष्ट आहे हे बघणाऱ्यांना नकळत जाणवलं तरी तेवढा इफेक्ट साधला जातो. फोरप्ले वगैरे नावाच्या गोष्टी आत्ताआत्ता बॉलिवूडच्या काही सिनेमांमध्ये दाखवू लागले आहेत. नाहीतर ती इंग्रजी सिनेमावाल्यांची मक्तेदारी होती.
अर्थात हनी ट्रॅप किंवा गुंगीचे औषध देऊन किंवा इतर एखाद्या सीनमध्ये अजून कोणत्यातरी अनैतिक / विनासंमती सेक्स त्यांच्या कथेची गरज म्हणून दाखवला तरी तो बरोबर ठरत नाहीच. खुद्द वेबसिरीज सुद्धा चुकीच्या व्यक्तीने हे कृत्य केल्याचे दाखवतात.
अवांतर : प्रणयदृश्यांचा अतिरेक झाला तर वेबसिरीज सिरीज न राहता सॉफ्ट पॉर्न होते. ज्यांना ते बघायचे आहे ते alt बालाजी वगैरे बघत असतील (कदाचित). मी जनरल वेबसिरीजमध्ये एखाद्या वेळेसच येणाऱ्या सीन्स विषयी बोलले होते.
'पंचायत 2' बघितली पूर्ण.
'पंचायत 2' बघितली पूर्ण. आवडली. शेवटचा भाग डोळयात पाणी आणणारा. बहुतेक आता पुढचा सिझन येणार नाही याचा संकेत शेवटच्या एपिसोडमध्ये मिळाला आहे.
या वेळी बरीच संथ वाटली सिरीज.
पंचायत आवडली, 7वा एपिसोड फारच
पंचायत आवडली, 7वा एपिसोड फारच बोर होता. पुढचा भाग लवकर येऊ दे.
Bhadipa ची बेरोजगार नावाची सइ ताम्हणकरची वेबसिरीज सुरू झाली आहे, दर शुक्रवारी एक भाग. पहिला भाग छानच होता, पुढेही चांगली असेल अशी अपेक्षा.
पुढचा भाग येणार या नोटवर
पुढचा भाग म्हणजे सीझन येणार, या नोटवर संपवली का.
त्या रींकीचं लग्न हिरोशी करावं असं पहील्या सीझनमधे प्रधान नवरा, प्रधानला सांगत असतो ना. मग यावेळी करुन द्यायचं लग्न.
पुढचा सीजन अंजू. नक्कीच येईल
पुढचा सीजन अंजू. नक्कीच येईल असे वाटत आहे.
पुढचा भाग म्हणजे सीझन येणार,
पुढचा भाग म्हणजे सीझन येणार, या नोटवर संपवली का.
>> नाही. उलट शेवटच्या एपिसोडमध्ये दाखवलेली हिंट खरी असेल तर पुढचा सिझन येणार नाही याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
रिंकीचं लग्न >> हम्म.. :मोठ्ठा सुस्कारा टाकणारी बाहुली: मे बी तेच दळण या सीझनमध्ये नको इतकं संथपणे चालू होतं. एव्हढ्यातल्या एवढ्यात बऱ्याच वेगवान सिरीज बॅक टू बॅक पाहिल्याने असेल.. पण मला 'आता एकदाचं त्यांचं लग्न.. किमान प्रेमप्रकरण सुरू करा' असं झालं. प्रधानजी आणि त्याच्या बायकोला हा अनुरूप जावई आहे असं का बरं वाटत नसावं? किंवा स्ट्राईक का होत नसावं?
अवांतर: जे लोक्स याला हळूहळू प्रेम फुलतंय म्हणून ते हळूहळू दाखवत आहेत' असं म्हणणं असेल त्यांच्या मताचा आदर आहे.
आता लवकर बघायला हवा हा सीझन.
आता लवकर बघायला हवा हा सीझन. पंचायत पहिला सीझन आम्ही दोघांनी बघितला होता म्हणून परत दूसरा दोघांना वेळ असेल तेव्हा बघायचा आहे म्हणून लांबतोय बघायचा.
प्राईमवरची गिल्टी माइंड्ज
प्राईमवरची गिल्टी माइंड्ज बघून संपवली. मस्त आहे. श्रिया पिळगावकरने वकीलाची भूमिका सुरेख केली आहे. तिची कलीग झालेल्या सुगंधा गर्गनेही छान काम केलंय. (रोडीजच्या रघु रामची बायको बहुतेक). सिरीजमध्ये कुणीतरी गे/लेस्बो दाखवण्याचा टिकमार्क इथेही आहेच पण ठीके, इग्नोरेबल. प्रत्येक भागात एक नवीन केस आहे आणी कधी ती जिंकते तर कधी नाही. कोर्टरुम ड्रामा बोरिंग असेल असं वाटलं होतं पण इथे केसेस, त्यांबद्दलचं डिस्कशन, पुरावे गोळा करणे, कोर्टातील सवाल जबाब रंजक आहेतच पण वकीलांचे समांतर पर्सनल आयुष्य आणि त्यातल्या घडामोडी आणि त्यांचा परिणाम हेही छान दाखवलेय.
----स्पॉयलर----
शेवटच्या भागात मुख्य केसचा निकाल दाखवला नाहीये. कुणाला कळलं का काय झालं ते? अर्धवट सोडल्यासारखे वाटले. भल्ला दोषी ठरतो की नाही ते कळले नाही.
तसंच अधेमधे ती एक साउथ इंडीयन बाई दाखवलीय ती काय प्रायवेट डीटेक्टीव असतात तशी दाखवली आहे का?
भल्ला दोषी ठरतो की नाही ते
भल्ला दोषी ठरतो की नाही ते कळले नाही.
>>>> टीव्ही वर मुलाखत आल्याने केसची अजून चौकशी करण्याचे आदेश कोर्ट देत. Open end आहे
तसंच अधेमधे ती एक साउथ इंडीयन बाई दाखवलीय ती काय प्रायवेट डीटेक्टीव असतात तशी दाखवली आहे का?
>>>हो, दीपक राणा साठी काम करतं असते
तिसरा सिझन नक्की येणार. अरे
तिसरा सिझन नक्की येणार. अरे तो विधायक काय बोल्ला ते आठवा की!
Pages