Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्राची +१
प्राची +१
सगळ्यांचीच कामं चांगली झाली आहेत
अॅनाटॉमी ऑफ अ स्कँडल -
अॅनाटॉमी ऑफ अ स्कँडल - सगळ्या पोस्टींना +१
रुपर्ट फ्रेंडचा पीटर क्विन लैच आवडता आहे, त्यामुळे ही देखील पाहिली.
भूतकाळ-वर्तमानकाळ उड्या आणि मिक्सिंग खूप छान आहे.
(पहिल्या एपिसोडचा पहिला सीन पाहताना मला उगीच पिरियड ड्रामा, ५०-६०च्या दशकातलं लंडन असेल असं वाटलं आधी)
------------------
हॉटस्टारवर 'द ड्रॉपआऊट' नक्की बघा लोकहो. सत्यकथेवर आधारित.
त्या स्टोरीवरचं पुस्तकही मी घेऊन ठेवलं आहे. गेल्या वर्षी त्याची डॉक्युमेंट्रीही पाहिली आहे. तरी तो विषय डोक्यातून जात नाही.
वेबसिरीज बीबीसी पॉडकास्टवर आधारित आहे.
गिल्टी माइंड्स अधूनमधून एखादा
गिल्टी माइंड्स अधूनमधून एखादा एपिसोड बघते.
श्रि.पि. मला आवडते. ती काम छान करते. वरुण मित्राही यात आवडला.
------------------
अधूनमधून टाइमपास म्हणून नेटफ्लिक्सवरची 'शिट्स क्रीक' पण छान आहे. छोटे-छोटे एपिसोड्स, क्रेझी पात्रं, सिटकॉम, डोक्याला ताप नाही - मजा येते बघायला.
हॉटस्टारवर 'द ड्रॉपआऊट' नक्की
हॉटस्टारवर 'द ड्रॉपआऊट' नक्की बघा लोकहो. सत्यकथेवर आधारित. >>> बघायला हवी.
@अंजू , पंचायत 2 येत आहे 20
@अंजू , पंचायत 2 येत आहे 20 मे ला
हो , चातकासारखी वाट बघणाऱ्या
हो , चातकासारखी वाट बघणाऱ्या माझ्यासहित सर्व चाहत्यांचे अभिनंदन !!!
हो लंपन, वाट बघतच होते.
हो लंपन, वाट बघतच होते. तारखेसाठी धन्यवाद.
प्राजक्ताने पण लिहिलं आहे कुठेतरी, येतेय ती. तिलाही थँक्स.
प्राईम व्हिडीओ वर पंचायत चा
प्राईम व्हिडीओ वर पंचायत चा दुसरा सीझन मे २० पासून येतोय.
https://www.youtube.com/watch?v=vG1614YSCPk
ओझार्क बघून झाले का कोणाचे?
ओझार्क बघून झाले का कोणाचे?
बाकी लिहिले तर स्पॉयलर होईल.
सी४ पार्ट २ संपवला. हाच फायनल आहे का?
सी ४ छान होता पण मला शेवट नाही पटला.
स्लो हॅार्सेस - बर्याच
स्लो हॅार्सेस - बर्याच दिवसांनी एक चांगली स्पाय थ्रिलर बघायला मिळाली. गेरी ओल्डमन सन्कि चिफच्या भुमिकेत अगदि फिट. ॲपल टिवीवर आहे…
ओझार्कबद्दल +१.
ओझार्कबद्दल +१.
हाच फायनल आहे का?>> वाटत नाही.
हाच फायनल आहे का?>> वाटत नाही
हाच फायनल आहे का?>> वाटत नाही.>>>हो हाच फायनल आहे. A farewell to Ozark असा त्यातल्या सगळ्या कलाकारांच्या मुलाखतीचा एक भाग आहे नेटफ्लिक्सवर.
मलाही Ozark शेवट अजिबात पटला
मलाही Ozark शेवट अजिबात पटला नाही. Barach kahi out of character वाटले. Specially Ruth che. Disappointed. Season 4 part 1 चा शेवट जबरदस्त होता. मी शेवटची 5 मिनिटे कितीतरी वेळा पाहिली. हे दोन एपिसोड रॉबिन राइट ne दिग्दर्शन केलेले.
इथे outlander कोणी पाहिली आहे
इथे outlander कोणी पाहिली आहे का? Crown चा Tobias म्हणजे prince Philip ahe. मी baghtey. छान वाटतेय so far
मला तरी सिरीज संपल्यासारखी
मला तरी सिरीज संपल्यासारखी वाटली. कोठे ओपन धागे ठेवलेले नाहीत. जो शेवट आहे तो आवडला नाही हे खरे. आउट ऑफ कॅरेक्टर करण्याचे कारणही एपिसोड मधे कळते. बर्याच सिरीज मधे लेखकांना ही खोड असते. यापेक्षा जास्त लिहीले तर स्पॉइलर होईल
सोनी लिव्ह वर पेट पुराण (सई
सोनी लिव्ह वर पेट पुराण (सई ताम्हणकर, ललित प्रभाकर) वेब सिरीज चांगली आहे कळलंय. पण मी ज्या साईटवर ऑनलाईन बघते (अपनेटीव्ही.कॉम) तिथे हिंदी मधे डब आहे. मजा येत नाहीये तशी बघायला.
ओझार्क दुसरा सिझन चालु आहे.
ओझार्क दुसरा सिझन चालु आहे.
outlander बघुन बरेच दिवस झाले ... खुप आवड्लेली.
अंजली +१ हिंदी डब लावली आणि
अंजली +१ हिंदी डब लावली आणि बंद केली. अगदीच बेकार वाटतं बघायला.
इथे outlander कोणी पाहिली आहे
इथे outlander कोणी पाहिली आहे का?
>>>> पहीले २ सिजन मस्त आहेत.
नेफिवर "द लिंकन लॉयर" नावाची
नेफिवर "द लिंकन लॉयर" नावाची सिरीज आली आहे. दोन भाग बघितले. चांगली इंटरेस्टिंग आहे. बॉस्टन लीगल सारखी "लाइट लीगल" म्हणता येइल अशी. म्हणजे लीगल थीम असते पण सिरीज लाइट असते. थोडीफर कॉमेडी वगैरे. छोट्या मोठ्या केसेस मधे या लॉयरची अचानक ट्यूब पेटणे व त्यामुळे केस सुटणे, किंवा काही अनऑर्थोडॉक्स पद्धतीने विरूद्ध बाजूला कचाट्यात पकडणे वगैरे अशा सिरीज मधले नेहमीचे प्रकार आहेत पण तरीही बघणेबल आहे. बाकी डायव्होर्स, ड्रग्ज्स यूज वगैरे अमेरिकन नायकाचे सगळे "चेक मार्क्स" लागू आहेतच.
द प्रॅक्टिस, बॉस्टन लीगल, अॅली मॅक्बील वगैरे चा दिग्दर्शक डेव्हिड केली याचाही दिग्दर्शक आहे बहुधा. तसेच "द गुड वाइफ" बनवणाराही एक आहे.
याच नावाचा एक पिक्चर पूर्वी येउन गेला. तो ही चांगला होता. या सिरीजचा लीड अॅक्टर मला माहीत नाही. पण तो लाइकेबल आहे. त्याच्याबरोबर काम करणारी त्याची एक एक्स-वाइफ - ती अग्ली बेटी मधली एक अॅक्ट्रेस आहे.
फारएण्ड, ती कारणे मला तरी
फारएण्ड, ती कारणे मला तरी flimsy वाटली. जास्त लिहिले तर spoilar होईल
outlander हळू हळू बघणे चालू आहे. इंग्लिश, स्कॉटलंड चा इतिहास नेहमीच fascinating वाटतो.
पेट पुराण पाहिली, आवडली.
पेट पुराण पाहिली, आवडली.
पंचायत येतेय याबद्दल धिंका
पंचायत येतेय याबद्दल धिंका चिका धिंका चिका !!!
अंजली +१ मीही पीकशॉ वर हिंदी डब बघितली आणि तिसऱ्या मिनिटाला बंद केली. डिझनेच्या सिनेमात असतं तश्या आवाजात आणि टोन मध्ये डबिंग केलंय.
प्राईमवर 'मॉडर्न लव्ह मुंबई' ही सिरीज बघितली. वेगवेगळ्या ६ प्रेमकथा आहेत. एकदा बघायला नक्की छान आहे. यात शेफ रणवीर ब्रार, इंडियन आयडॉल मधला तो चायनीज गायक मेयांग चँग पासून मसाबा कलेक्शन वाली फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता पर्यन्त अनेक या क्षेत्रात नसलेल्या लोकांनी अभिनय केला आहे. सगळ्याच स्टोरीज "जरा पटकन संपल्या.. अजून थोड्या दाखवायला हव्या होत्या" असं वाटतं यातच त्यांचं यश आहे.
मॉडर्न लव्ह मुंबई >>>> बघतेय
मॉडर्न लव्ह मुंबई >>>> बघतेय
बघायला हवी.
बघायला हवी.
मी नेहेमीच असं लिहून जाते, मुहुर्त लवकर काढत नाही, हाहाहा.
पंचायतसाठी मात्र काढायला हवा, २० मे लगेचचा मुहुर्त.
वर्किन मॉम्स बघतं का कुणी
वर्किन मॉम्स बघतं का कुणी नेफ्लि वर? त्याचा ६ वा सीझन आलाय! माझी आवडती सीरीज आहे. मला ५ वा एवढा नव्हता आवडला पण ६ वा मस्त आहे!!
शेफ रणवीर ब्रार>>> बघायला हवी
शेफ रणवीर ब्रार>>> बघायला हवी.
मसाबा गुप्ता नीना गुप्ताची मुलगी.
पंचायत 2.ने बराच वेळ घेतला यायला.
सीझन 1 परत पटकन बघुन टाकावी असं वाटतंय
गिल्टी माइंड्ज चे दोन एपि.
गिल्टी माइंड्ज चे दोन एपि. बघितले (प्राईम). चांगली आहे. श्रिया पिळगावकरचा अभिनय पहिल्यांदा बघितला. छान केले आहे काम तिने.
मॉडर्न लव्ह मुंबई >>> बघून
मॉडर्न लव्ह मुंबई >>> बघून संपवली . सगळ्या कथा आवडल्या आणि पटल्या असच नाही पण ओव्हरऑल छान आहे .
कलाकार एकूण एक आवडले .
शेफ रणवीर , प्रतिक गांधी , मियान्ग , फतिमा शेख , तलत अजिझ , मानसी रॉय , सारिका , दिलिप प्रभावळकर , ती चायनीज आई - सगळेच.
चित्रांगदा खूप सुन्दर दिसते , प्रत्येक अवतारात . अर्शद वारसी - नेहमीप्रमाणे सुखद वावर.
मला सग्ळ्यात जास्त - चायनीज कथा आवडली आणि त्यातलं गाणं पण गोड आहे.
गिल्टी माईंडस भयंकर आवडली.
गिल्टी माईंडस भयंकर आवडली.
खूप दिवसांनी इतकी छान आणि वेगवान आणि शेवटपर्यंत पकड असणारी सिरीज बघितली.
हिंदीत / मराठीत इतकी छान होल्ड ठेवणारी अजून एखादी कोर्टरूम द्रामा सिरीज आहे का बघायला?
Pages