अमानवीय...? - ३

Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44
halloween bates hotel

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.

या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.

अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295

अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229

अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हा किस्सा मिरजच्या वानलेस हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या फार सिनियर डॉक्टरनी दापोली कृषी विद्यापिठात एका संवाद मालिकेमध्ये सांगितला होता. मी माझ्या शब्दांची गुंफण करून थोडा फुलवला. आज रात्री पुढचा भाग टाकतो.

किस्सा पुढे चालू...
डॉक्टरांच्या वेगवेगळ्या टीम्स करून आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांमध्ये पाठवण्यात आल्या. त्यातल्यात्यात जास्त प्रादुर्भाव असलेल्या वाड्यांमध्ये टीम्स मुक्कामी राहून तिथे तात्पुरते दवाखाने उभा करतील अशी व्यवस्था केली गेली. शहरातल्या लोकांना माहीत नसेल पण राज्यांच्या सीमेवर असलेल्या गावांची सरकार आणि सरकारी कारभारावर खप्पा मर्जी असते. सरकारी कर्मचार्यांबद्दल ( पोलीस, पोस्ट खाते, सरकारी रुग्णालये) जबरदस्त रुक्षपणा असतो. ह्या गावाच्या आसपास असलेल्या वाड्यांमध्ये तपासणी आणि रुग्ण सेवा करायला आलेल्या डॉक्टर आणि वेटर्नरी टीमला याचा अनुभव आला. बऱ्याच गावातल्या लोकांचे टीमला आजिबात सहकार्य मिळत नव्हते. लेप्टो हा आजार गुरांच्या विष्टेतुन पसरतो म्हणून मग गुरांची पण तपासणी होणे गरजेचे होते. पण स्थानिक गावकऱ्यांचा ह्याला विरोध होता. काही लोक हिंसक पण होत होते.
अशातच एक टीम मुख्य गावापासून थोडी दूर असलेल्या एका वाडीमध्ये पोचली. टीम मध्ये डॉक्टर्स आणि काही वेटर्नरी पण होते. त्यांच्या मध्ये पण गट करून कोणी वस्तीमधल्या रुगणांची तपासणी, कोणी अत्यवस्थ रुगणांची देखभाल वगैरे जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. मुक्कामी आलेल्या एका डॉक्टरला सकाळी ताप भरला. त्याने झोपून रहायचे ठरवले. इतर सारी मंडळी कामे करण्यासाठी बाहेर पडली. साधारण ४ वाजता एक एक टीम मुक्कामाच्या ठिकाणी परत यायला सुरुवात झाली. आजारी असलेल्या डॉक्टरची कॉट रिकामी होती. आजूबाजूला कुठे गेला असेल असे म्हणून प्रथम दुर्लक्ष करण्यात आले. आजारी डॉक्टरचा जवळचा मित्र थोड्या वेळाने त्याचे काम संपून आला आणि आजारी डॉक्टर जाग्यावर नाही हे पाहून अचंबित झाला. त्याने एकट्याने प्रथम आजूबाजूला शोधाशोध सुरू केली. तोपर्यंत कोणी हे प्रकरण फार गंभीरपणे घेतले नव्हते. साधारण दिवेलागणीच्या वेळी टीम मधला एक डॉक्टर गायब झाला आहे असे सर्वांच्या लक्षात आले. मग धांदल उडाली. शोधाशोध सुरू होतीच. गावकऱ्यांचे फार सहकार्य नव्हते. ते उडालेली धांदल तटस्थपणे पहात होते. पोलीस पाटील, ग्रामसेवकांना वर्दी देण्यात आली. ते घटना स्थळी पोचले. एकूण स्थानिकांचा सूर - इकडे तिकडे गेला असेल येईल रात्रीतून - असा होता. टीमने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रात्रीतून मिरजला घडल्या घटनेची खबर दिली. सकाळ पर्यंत वाट बघून पोलीस कंपलेंट करू असे मिरज वरून सांगण्यात आले. आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये असलेल्या टीम्सला पण निरोप कळवण्यात आला. एकूणच प्रसंग बाका होता. तो डॉक्टर जाऊ शकेल अशा आसपासच्या सर्व जाग धुंडाळण्यात आल्या. एक तरुण दिवसाढवळ्या गावातून गायब झाला होता.
सकाळ पर्यंत डॉक्टरचा काहीच तपास नाही लागला. मिरज वरून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगून स्थानिक पोलिसांना तात्काळ घटना स्थळी पोचून तपास करण्यास सांगण्यात आले. इकडे गावकऱ्यांमध्ये पोलीस येणार म्हणून प्रचंड अस्वस्थता पसरली. ग्रामसेवका मार्फत पोलीस गावात येण्याबद्दलची नाराजी गावकऱ्यांनी टीमला कळवली. एकंदरीतच गावकरी आणि टीम यांचे एकमेकांबद्दल पहिल्या दिवसापासून मत चांगले नव्हते. ह्या प्रसंगातून एकमेकांबद्दलची दुही अजून तीव्र झाली. टीम मधल्या काही समंजस डॉक्टर्सनी काही वयस्कर गावकऱ्यांना विश्वासात घेऊन परस्थितीचे गांभीर्य पटवून द्यायचा प्रयत्न केला. त्यावर त्या गावकऱ्यांचा सूर - तुमचा सहकारी संध्याकाळ पर्यंत परत येईल. गावात पोलीस नको - असा दिसला. एकंदरीत त्यांना काही तरी माहीत होते पण ते सांगायला तयार नव्हते असे तिथल्या डॉक्टर्सला वाटले. पोलीस आले आणि त्यांनी गावकऱ्यांना दमात घ्यायला सुरुवात केली. इथे परत पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये असलेले पूर्वग्रहदूषित मते ठळकपणे स्पष्ट झाली. झाल्या प्रकरणाने टीमचे मनोबल खचले होते. एव्हाना त्यांचा सहकारी गायब होऊन २० तास झाले होते. अपहरण , खंडणी, नरबळी अशी वेगवेगळी शक्यता मनात येत होत्या.
क्रमशः

झम्पुजी जबरदस्त.
वेगळी कथा म्हणुनच प्रसिध्द केली तर जास्त वाचक वाचु शकतील.

वेगळी कथा म्हणुनच प्रसिध्द केली तर जास्त वाचक वाचु शकतील.>>> खरोखरच इंटरेस्टिंग आहे आणि छान लिहित आहात. किस्सा पूर्ण करून नविन धाग्यावर चिकटवुन टाका.

क्रमशः किस्सा वेगळा धागा काढून पूर्ण केला आहे. लाभ घ्यावा

https://www.maayboli.com/node/80579

यदाकदाचित माझा आयडी मायबोलीवरून उडालाच तर मी ह्या धाग्यारूपी इथेच असेन Wink

ही घटना माझ्यासोबत घडली आहे. काही वर्षांपूर्वी सुट्टीत मी मामाच्या घरी गेलो होतो. मामाचा एका शहरात फ्लॅट होता. बिल्डिंग नवीनच होती आणि एका बाजूला होती. मी पहिल्यांदा तिथे गेलो तेव्हाच मला एकदम अस्वस्थ वाटायला लागलं. काहीतरी अमानवीय असल्याचा भास होत होता पण मी कोणाला काही बोललो नाही. दोन तीन दिवस मजेत गेले पण रात्री सारखं आजूबाजूला कोणी वावरतंय असं वाटायचं. मामाचा फ्लॅट पाचव्या मजल्यावर होता. एका रात्री मी पुस्तक वाचत असताना मला खिडकीत एक बाई दिसली पण मी दुर्लक्ष केलं, म्हणजे तिला दाखवलं नाही कि मी तिच्याकडे बघतोय पण तिरक्या नजरेने मी तिच्याकडेच बघत होतो. ती हळूहळू तरंगत खिडकीजवळ यायला लागली. तिचा चेहरा खूपच भीतीदायक होता. ती माझ्याकडे खुनशी नजरेने बघत होती. मी पुस्तकातून नजर न हटवता बोललो 'या घरी चहा कॉफी प्या नुसतं खिडकीत कशाला उभ्या राहताय'. हे ऐकताच ती जरा गोंधळून गेली आणि गायब झाली. नंतर काही दिवसांनी शेजारी आजी राहायच्या त्यांच्या मुलाचं लग्न झालं. त्याची बायको हि अमानवीय शक्ती होती. मी एकदा मामासोबत पिक्चर बघायला गेलो होतो. रात्री जेवून येईपर्यंत उशीर झाला होता. बिल्डिंगजवळ आलो तर मला बिल्डिंगच्या भिंतींवर कोणीतरी चढत असल्याचं दिसलं. मी मामला बोललो अरे ते बघ कोण चढतंय. मामाने वर बघितलं तर ती चढणारी व्यक्ती पटकन आजीच्या घरी शिरली. मी एकदा त्यांच्याकडे गेलो तर आजीनी मला चहा दिला आणि गप्पा मारायला लागल्या. चहा पिऊन झाल्यावर कप ठेवण्यासाठी सुनेला हाक मारली तर सून खूप उशिरा बाहेर आली. आजी जरा चिडल्याच तिच्यावर. मला बोलल्या हि अचानक कुठेही गायब होते. तेव्हाच मी ओळखलं कि हिच ती भिंत्यांवर चढणारी अमानवीय शक्ती आहे. मध्यंतरी मी एक शिरेल बघितली त्यात एक अमानवीय शक्ती किचनच्या छताला जाऊन टांगते आणि माणसांना न्याहाळते. आजीची सून पण त्यातलाच एक प्रकार होता. मी बाहेर निघताना आजींना बोललो आजी काळजी घ्या आणि वर बघत जाऊ नका. आजी जरा गोंधळल्या. मी तसाच घरी आलो. एका रात्री मला एक वाजता जाग आली. बाहेर बघतोय तर चक्क जत्रा भरली होती. मी लगेच ओळखलं कि भुतांची जत्रा बोलतात ती हीच. मी खाली जाऊन त्या जत्रेत सामील झालो. सगळं खूपच भीतीदायक होतं. कोणीच कोणाशी बोलत न्हवतं. मूक विचारांची देवाणघेवाण सुरु होती. मी त्यांच्यात गेलो याचा त्यांना राग आला न्हवता उलट ते सगळे खूपच उत्साही दिसले. काहींनी तर मला उत्साहाच्या भरात जत्रेतील वस्तूही दिल्या. जत्रा म्हणजे आनंद. त्या सगळ्या वस्तू घेऊन मी वर आलो आणि झोपी गेलो. सकाळी उठलो तेव्हा अर्थातच त्या सगळ्या वस्तू गायब झाल्या होत्या. असे अनेक अनुभव त्या बिल्डिंगमध्ये आले. मध्यंतरी मामाने दुसरीकडे घर घेतलं त्यामुळे पुन्हा तिथे जाणं झालं नाही.

एकदम बोअर प्रतिसाद... बोकलत तुमच्या विषयी आदर आहे पण या अमानविय धाग्याची जी काय तुम्ही वाट लावली तेव्हा पासून लोकं किस्से, अनुभव टाकत नाहीत. या एका धाग्यासाठी मला तुम्ही आवडत नाहीत. बाकी अनेक ठिकाणी तुमचे प्रतिसाद चांगले असतात.

बोकलत - तुम्ही खरं तर भामरागढला किंवा तत्सम जागी जाऊन तिथे २-३ रात्र काढून मग सगळं वृत्तांत सविस्तर लिहला पाहिजे इथे. तुमच्या धाडसाला हे नक्कीच शोभेल. नाहीतर सगळा जन्म धाग्याची वाट लावण्यात जायचा.

जहिरात

बरं Lol

एके ठिकाणी वाचण्यात आलेला हा किस्सा शेयर करते आहे..
.
.
.
a1.JPGa2.JPGa3.JPG

मामाचा फ्लॅट पाचव्या मजल्यावर होता. एका रात्री मी पुस्तक वाचत असताना मला खिडकीत एक बाई दिसली >>>>>>>> फक्त हेच वाक्य वाचून टरकली माझी. अस होऊ शकत. पण बोकलत ने ह्या वाक्यानन्तर जे काही लिहिलय ते 'विनोदी कॅटेगरीत' मोडत.

Pages