अमानवीय...? - ३

Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44
halloween bates hotel

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.

या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.

अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295

अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229

अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

डेन्जर अनुभव बोकलत!
पण बरं झालं, जत्रेतल्या भुतांची-तुमची मैत्री झाली Wink

त्या धाग्यावरचा भुताचा किस्सा इकडे पण टाकते.

माझ्या लहानपणी आम्ही एका नवीन घरी शिफ्ट झालो होतो.
एके दिवशी दुपारी घरात मी एकटीच टिव्ही पाहत बसले होते रिमोट घेऊन, तेवढ्यात टेलिफोन वाजला म्हणून सोफ्यावर रिमोट ठेवून उठून गेले.परत आल्यावर पाहिले तर रिमोट जागेवर नव्हता. मागे कोपर्यातल्या एका खुर्चीवर रिमोट ठेवलेला सापडला.तो मीच ठेवला कि कुणी ठेवला काही कळेना.
मग टिव्ही बंद केला तर त्याच टिव्ही स्क्रीनमधे मागच्या त्या खुर्चीवर एक म्हातारे आजोबा बसलेले दिसले. मागे वळून बघितले तर कुणीही नव्हते.
नंतर कळले मला दिसलेले आजोबा आधी त्या घरात राहायचे.ते वारले होते आणि ते जीवंत असताना नेहमी त्याच खुर्चीत बसायचे.

छान.
सगळ्यांना ठाऊकच असेल की भुतांना मृत्यू नसतो. मुक्ती मिळेपर्यंत ते हजारोवर्षे पृथ्वीतलावर वावरू शकतात.

दरम्यान इथे बरीच प्रगती होत असते, नवनवीन शोध लागतात, आपण वेगवेगळी साधने, उपकरणे वापरू लागतो. जसे की बस, रेल्वे, रेडिओ, टीव्ही, मग रिमोटवाले टीव्ही, कॉम्प्यूटर, स्मार्टफोन इत्यादि.

भुतांना या सगळ्या नव्या गोष्टी नक्की काय आहेत, त्यांचा वापर कसा करायचा इत्यादि माहिती मिळणे कठीण होऊन बसते. त्यासाठी आमच्या खापर पणजोबांनी भूत प्रशिक्षण संस्था सुरू केली जी आम्ही अजूनही चालवत आहोत.
रिमोट कसा वापरायचा, सेल फोन कसे काम करतात, व्हॉइस कमांड कशा द्यायच्या, किंडल डिव्हाईस मध्ये कसे शिरायचे, मायक्रोवेव्ह, एसी, इंडक्शन स्टोव्ह कसे वापरायचे सगळे प्रशिक्षण आम्ही त्यांना देतो आणि त्यांना अद्ययावत ठेवतो.

हे सर्व आम्ही भूतदया म्हणून करतो, कसलाही मोबदला न घेता, कसलीही अपेक्षा न ठेवता.

मृणाली जबरी !

दरम्यान इथे बरीच प्रगती होत असते, नवनवीन शोध लागतात, आपण वेगवेगळी साधने, उपकरणे वापरू लागतो. जसे की बस, रेल्वे, रेडिओ, टीव्ही, मग रिमोटवाले टीव्ही, कॉम्प्यूटर, स्मार्टफोन इत्यादि. >>>>>>> पण असही होऊ शकत ना, की भुतान्ना मरण्याआधीच ही उपकरणे वापरता येत असतील.

कसलाही मोबदला न घेता, कसलीही अपेक्षा न ठेवता. >>>>>>>>> चान्गल केलत, नाही तर तुमच काही खर नव्हत. वाचलात!

तस झालं तर सर्व ग्रुप मेंबरना माझ्या तर्फे पार्टी >>>>>>> ++++++११११११

"अमानवीय" वर नोंद घेण्यासारखे आहे. जे धागा फॉलो करतात त्यांनी नक्की पहा:
राज ठाकरे यांनी सांगितला 'शिवनेरी'वरील शहारे आणणारा प्रसंग
https://www.youtube.com/watch?v=HlinYIsQAoc

हा।व्हिडीओ पाहुन खरा महाराजांचा पक्ष कोणता, कोणाला कौल मिळाला आहे हे ठसवायला अशा किस्यांची चढाओढ लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

.

scary-ghost.gifscary-ghost.gif

चकवा लागल्याने हरिश्चद्रगडावर एकाचा मृत्यू.>>>
अफवा पसरवू नका. अननुभवी लोक गिरिभ्रमणाला गेल्याने हा अपघात घडला आहे.

Pages