Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.
या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.
अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295
अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229
अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
एक अफवा, लाख अफवा
एक अफवा, लाख अफवा.
---
चकवा वगैरेची शक्यता कमीच वाटते. अनुभव कमी पडला पोरांचा.
चकवा वगैरे उगीच भुताच्या
चकवा वगैरे उगीच भुताच्या नावाने उठवलेले गॉसिप्स आहेत. बिच्चारी भूतं !!
कॉलेज डेज मध्ये फ्रेंड पासून gf बनता बनता जे मुलांना बनवले / चकवले जाते त्यालाच खरा चकवा म्हणतात
https://youtu.be/5NsH9t-Lr8Q
https://youtu.be/5NsH9t-Lr8Q?si=ou5xUExMw-mw8hvt
शेवटचं गाणं मस्त आहे एकदम.
मागे एकदा आम्ही चार पाच मित्र
मागे एकदा आम्ही चार पाच मित्र फिरायला गेलो होतो. आम्हाला फिरायची खूप आवड आहे. खास करून मे महिन्यात आम्ही वेगवेगळ्या गावी फिरायला जातो. वन डे ट्रीप असते आमची. जाणार त्या गावात लग्न असेल तरच जातो म्हणजे तिथेच जेवायची पण सोय होते आणि जरा मूड रिफ्रेश होतो, आजूबाजूला काय चाललंय समजतं आणि स्वस्तात मस्त ट्रीप होते. तर असेच आम्ही एकदा फिरायला निघालो. खूप वेळ फिरलो पण लग्न असलेलं गाव काही दिसत न्हवतं. बऱ्याच वेळाने एक गाव दिसलं तिथे लग्नाची गडबड सुरू होती ते बघून आम्ही खुश झालो. आता मस्त जेवणावर ताव मारू, जिलेब्या लाडू आईस्क्रीम खाऊन संध्याकाळी परतीच्या मार्गाला लागू असा मनातल्या मनात विचार करत आम्ही त्या गावात दाखल झालो. सगळ्या गावकऱ्यांची गडबड सुरू होती. जो तो कोणत्या ना कोणत्या कामात अडकला होता, एकमेकांशी अजिबात बोलत न्हवता. आम्ही तिथे असलेल्या खुर्च्यांवर बसलो. यथावकाश आम्हाला चहा लाडू शेवेचा नाश्ता दिला गेला. नाश्ता केल्यावर आम्हाला जरा बरं वाटलं. गावकऱ्यांशी गप्पा माराव्यात म्हणून मी बाजूला गेलो पण मला बघून सगळे लांब पळत होते तसेच सगळे आमच्या चार पाच जणांना बघून कुजबुजताहेत असं जाणवलं. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे जेवणाची तयारी कुठे दिसत न्हवती. बाजूला एखादा माणूस मावेल एव्हढी पाच सहा भली मोठी भांडी ठेवली होती, ही गोष्ट मला जरा विचित्र वाटली. मी परत खुर्चीवर येऊन बसलो आणि सहज चाळा म्हणून गुगल मॅप ओपन केला आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आम्ही जिथे होतो ते सगळं जंगल होतं. क्षणभर डोळ्यावर विश्वास बसेना. दोन चार वेळा मोबाईल रिस्टार्ट केला पण लोकेशन तेच जंगल. आता माझ्या सगळा प्रकार लक्षात आला, ही सगळी माणसं न्हवती आणि ती मोठाली भांडी आमच्यासाठीच होती. मित्रांना बोललो उठा आणि पळा हे सगळं अमानवीय आहे, पण मित्र काय ऐकण्याच्या तयारीत न्हवते उलट मलाच दोन शब्द बोलायला लागले. मग मी पण नाईलाजाने गप्प बसलो. दुपारी जेवण सुरू झालं अपेक्षेप्रमाणे आम्हा मित्रांनाच जेवण दिलं बाकीचे सगळे गावकरी आजूबाजूला उभे राहून आम्ही कसे जेवतोय हे पाहत होते. माझ्या गळ्यातून घास काय उतरत न्हवता पण माझे हावरे मित्र कधी मिळत नाही असं त्या जेवणावर तुटून पडले होते. जेवल्यावर आम्हाला आराम करण्यासाठी एक खोली दिली. पोट भरलेलं होतं त्यामुळे सगळ्यांना झोपा लागल्या. संध्याकाळी आम्ही उठलो तेव्हा बाहेर गडबड सुरू होती. ती भली मोठी भांडी आगीवर ठेवली होती आणि गावकरी त्याभोवती नाच करत होते. गावकरी आता त्यांच्या खऱ्या भुताळी रूपात आले होते तो सगळा प्रकार बघून मित्रांची पाचावर धारण बसली. त्यांच्या मूर्खपणावर मला चीड येत होती पण बाका प्रसंग ओढावला होता. मी मित्रांना बोललो सध्या इथून पळून जाणे अशक्य आहे कारण जायच्या रस्त्यावरच ते सगळे आपला कार्यक्रम करण्यासाठी उभे आहेत. त्यामुळे आपण इथून हळूच निसटून या खोलीच्या मागे जंगल आहे तिथे दबा धरून बसू आणि आपल्याला शोधायला जेव्हा हे इकडे तिकडे पांगतील तेव्हा मेन रस्त्याने धावत वेशीबाहेर पळू. सगळ्यांना हा प्लॅन मस्त वाटला. ठरल्याप्रमाणे आम्ही हळूच निसटून जंगलात लपलो. भुतांची पार्टी रंगात आली होती जशी जशी रात्र होत होती तसे तसे ते अजून चेकाळत होते. शेवटी आम्हाला त्या रुमधून बाहेर काढायची वेळ आली पण बघतात तर काय खोली रिकामी. सगळी भुतं सैरभैर झाली आणि आम्हाला शोधायला इकडे तिकडे पांगली. आम्ही झाडावर लपून बसलो होतो. भुतं शोधताना जमिनीवर शोधत होती कारण आम्ही झाडावर चढून त्यांच्याच घरात लपणार नाही ही त्यांची मेंटलिटी होती. काही वेळातच आम्हाला अपेक्षित होतं तसं घडलं आणि मेन रस्ता रिकामा झाला. मी बोललो पळा तसे सगळे झाडावरून उड्या मारून जीवाच्या आकांताने वेशिकडे पळत सुटले. आम्ही वेशीबाहेर जातोय हे त्या भूतांना समजलं आणि ते पाय वर डोकं खाली करून चक्क हातावर जोर जोरात धावायला लागले. पण आता भरपूर वेळ झाला होता. आम्ही सुखरुप वेशीबाहेर पडलो होतो.
दिवाळी फराळ दिला नाही म्हणून
दिवाळी फराळ दिला नाही म्हणून ते रागवले असणार. नाहीतर ती भूतांची स्पेसिस खुप फ्रेंडली असते. तरी नशीब त्यांचा शहरात शिकणारा चिंटू परिक्षेमुळे गावात पोचला नव्हता. नाहीतर चिंटूने लावलेल्या जीपीएस ट्रैकरमुळे जंगलातून सुखरूप बाहेर पडणे अजिबात शक्य नसते झाले तुम्हाला.
हनुमान चालिसा म्हटला असता तर
हनुमान चालिसा म्हटला असता तर तुम्हाला कसलीच पळापळ करावी लागली नसती. भुतेच पळून गेली असती.
हनुमान चालिसा पाठ असण्याची गरज नाही.
चार ओळी काहीतरी बडबडून शेवटी "इति हनुमान चालिसा!" असे धृपद लावावे. पण "इति हनुमान चालिसा संपूर्णम्" असे मात्र आपण सुरक्षीत ठिकाणी परत येई पर्यंत कधीच म्हणु नये.
भूत-पिशाच निकट नहीं आवे।
भूत-पिशाच निकट नहीं आवे। महावीर जब नाम सुनावे ।।
ही ओळ पुरेशी आहे.
भूत-पिशाच निकट नहीं आवे।
भूत-पिशाच निकट नहीं आवे। महावीर जब नाम सुनावे ।।
ही ओळ पुरेशी आहे.
आमच्या बाजूच्या बिल्डिंगमधली
आमच्या बाजूच्या बिल्डिंगमधली माणसं घाबरलेत. त्यांचा कचरेवाला काही दिवसांपूर्वी हार्ट अटॅकने गेला. तो नेहमी सकाळी सकाळी कचरा घ्यायला यायचा आणि कचरा बाहेर ठेवला नसेल तर माई कचरा दे दो अशी हाक मारायचा. आता दोन चार दिवस झाले ज्यांनी कचरा बाहेर ठेवला नसेल त्यांच्या दारावर मध्यरात्री थाप पडते आणि माई कचरा दे दो असा आवाज ऐकू येतो.
स्त्री मध्ये -ओ स्त्री कल आना
स्त्री मध्ये -ओ स्त्री कल आना- लिहून मंत्र बंधन केले होते तसे कचरावाल्यासाठी सुद्धा एक मंत्र आहे तो पांढऱ्या फळयावर काळ्या खडूने बरोबर १२ वाजता लिहिला तर हां त्रास सहज टाळता येऊ शकतो ह्याची त्या बिल्डिंगवाल्याना कल्पना देऊन ठेवा.
इंडीयन आयडॉलचे जज्ज असतात
इंडीयन आयडॉलचे जज्ज असतात तसेच अशा भूतांचे असते. हनुमान चालिसा पाठ आहे कि नाही हे आधी बघतात. जर पाठ आहे हे लक्षात आलं तर मग ते थांबत नाहीत. पण जर का त्यांच्या लक्षात आलं कि हा आपल्याला वेड्यात काढतोय तर ...
बाजूच्या बिल्डिंगमधले सगळे
बाजूच्या बिल्डिंगमधले सगळे घाबरून खाली एकत्र जमलेत. रात्री सगळ्यांना 'माई दिवाली दो' असा आवाज ऐकू येत होता. म्याटर सुरू आहे मोठा.
कचरावाल्यासाठी सुद्धा एक
कचरावाल्यासाठी सुद्धा एक मंत्र आहे तो पांढऱ्या फळयावर काळ्या खडूने बरोबर १२ वाजता लिहिला तर हां त्रास सहज टाळता येऊ शकतो >> मागे एका सोसायटीत असाच म्याटर झाला होता. त्यांनी रात्री १२ वाजता तो मंत्र लिहिला आणि सगळे आरामात घरी गेले. पण भुताला वाचता येत नव्हतं, त्याच्या बद्दल काही गॉसिप लिहून ठेवलंय सोसायटीवाल्यानी असं त्याला वाटलं. मग काय.. सगळे भाऊबंध बोलावले त्याने सोसायटीत. फुल्ल धिंगाणा..
रात्री बरोबर १२ वाजता
रात्री बरोबर १२ वाजता लिहिलेला असल्याने असा मंत्र अवश्यकतेनुसार ध्वनित परिवर्तित होतो आणि आपला हेतु साध्य करतो. मात्र ह्यासाठी फळा आणि खडू पवित्र असणे गरजेचे आहे.
बरोबर अमावस्या असली की हा
बरोबर अमावस्या असली की हा धागा वर येतो..
Calender reminder जबरदस्त आहे
बाजूच्या बिल्डिंगमधले लोकं
बाजूच्या बिल्डिंगमधले लोकं दुसऱ्या ठिकाणी राहायला जाताहेत. भूत हळूहळू उग्र रूप धारण करतंय.
फ्लॅट स्वस्तात विकतील आता.
फ्लॅट स्वस्तात विकतील आता. घेऊन ठेवा सगळे.
कोण राहायला येईल अशा
कोण राहायला येईल अशा पछाडलेल्या जागेत?
असतात माझ्यासारखे पुष्कळ.
असतात माझ्यासारखे पुष्कळ.
मला तिकडे नोकरी मिळाली चांगली तर मी लगेच आलो असतो.
सगळी तुमच्यासारखी धाडसी नसतात
सगळी तुमच्यासारखी धाडसी नसतात. क्वचित लाखातून एखादा निघतो.
<<<कोण राहायला येईल अशा
<<<कोण राहायला येईल अशा पछाडलेल्या जागेत?>>>
तुम्हीच घ्या की विकत. तसेच पण तुम्हाला भुते इ. इ. खूप घाबरून असतात ना? पळवून लावा त्यांना आणि घ्या घरांचा ताबा..
मी आजकाल या भुतांच्या भानगडीत
मी आजकाल या भुतांच्या भानगडीत पडत नाही. लहानपणी शक्तिमान लागायचं त्यात तो शक्तिमान लोकांची मदत करत असतो पण एक वेळ अशी येते की त्याला समजतं लोकं त्याच्यावरच अवलंबून आहेत आणि आळशी होत चाललेत. माझं पण तसच झालंय. मी लोकांची मदत करतो पण लोकं माझ्यावर अवलंबून असतात हे मला पटत नाही. त्यांनी स्वतः या अमानवीय शक्तिंविरोधात लढा द्यायला पाहिजे.
खरं आहे..मला आवडेल भुत हंटर
खरं आहे..मला आवडेल भुत हंटर चा कोर्स करायला.
Agro Tourism
Agro Tourism
Medical Tourism
Wildlife Tourism
.
.
.
.
Ghost Tourism
(No subject)
भुतांवर प्रेम करा राव
भुतांवर प्रेम करा राव
ते पाय वर डोकं खाली करून चक्क
ते पाय वर डोकं खाली करून चक्क हातावर जोर जोरात धावायला लागले. पण आता भरपूर वेळ झाला होता. आम्ही सुखरुप वेशीबाहेर पडलो होतो. >>>>>>>>> हा हा हा.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/84427
जाहिरात
बरोब्बर अमावस्येला धागा वर
बरोब्बर अमावस्येला धागा वर निघाला.
https://youtu.be/pcrP3WwDYUg
https://youtu.be/pcrP3WwDYUg?si=-qPQFjBaPaY9OxmJ
बोकलत हे खास तुमच्यासाठी
Pages