Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.
या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.
अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295
अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229
अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हा धागा बोकलताच्या पांचट
हा धागा बोकलताच्या पांचट प्रतिसादांनी फालतूपणाकडे चालला आहे. आपण खूप मोठे कॉमेडियन आहोत नी पांचट स्टोऱ्या लिहून किती मोठा विनोद करतोय असा त्यांचा आविर्भाव असतो. ह्या असल्या फालतूपणा मुळे ह्या धाग्याची मजा गेली आहे. पहिला अमानवीय धागा छान होता. पुढचे धागे ह्या बोकलतच्या पंचाटपणामुळे अवाचनीय झाले आहेत.
भूतांच्या खाऱ्या खोट्या
भूतांच्या खाऱ्या खोट्या गोष्टी कशा ओळखायच्या हं कशा ओळखायच्या कोई मेरे कान मे आके सांगोका?
भुताच्या खोट्या गोष्टी कशा
👂 भुताच्या खोट्या गोष्टी कशा ओळखायच्या ते नाही सांगू शकत, पण गोष्टी ऐकताना खारे शेंगदाणे खात राहायचं, जर खारे शेंगदाणे खायची मजा आली नाही तर समजायचं १००% खाऱ्या गोष्टी होत्या.
(No subject)
(No subject)
बाय द वे, हा धागा अनेक
बाय द वे, हा धागा अनेक वर्षांनी वर आलेला पाहून अलीकडेच ऐकण्यात आलेला किस्सा शेअर करतो. मी आधी जिथे राहत होतो त्या सोसायटीत पंधरा ते सतरा वर्षांपूर्वी एका मुलीने आत्महत्या केली होती. दिल्ली का कुठली मुलगी होती आणि एक मुलगा असे दोघे राहत होते. तर त्यांच्यात वाद का काय झाला. नक्की काय झाले ते तपशील कधीच समोर आले नाहीत. पण हिने त्या रात्री पाचव्या मजल्यावरून उडी मारली ती थेट खाली सोसायटीची अशी एक जागा आहे जिथे फार वर्दळ नसते, तिथे फरशीवर पडली! जाग्यावरच गेली होती म्हणे. तिथे पीठगिरण आहे. दुसऱ्या दिवशी तिथे काय पाहिले त्याच्या आठवणी तो गिरणीवाला नंतर कित्येक वर्षे लोकांना सांगत असे. तर मग मुलीचे मुलाचे पालक आले. पोलीसकेस वगैरे बऱ्याच झंझटी झाल्या. सोपस्कार पार पडले. तेंव्हा ती बातमी पेपरलाही बरीच ठळक आली होती. त्या फ्लॅटवर सुद्धा नंतर कोणीही राहत नव्हते. ना विकला जात होता. पण काळ कोणासाठी थांबत नाही. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. त्यांनतर तो गिरणीवाला आणि इतर लोकांनाही रात्री तिथे कसले भास होत होते म्हणतात.
तर परवा अनेक वर्षांनी तिकडे जुन्या मित्रांना भेटायला गेलो. तर त्यांनी हा पुढील किस्सा सांगितला. तो फ्लॅट अलीकडे म्हणे एका व्यापाऱ्याने घेतला होता. अर्थातच त्याला यातली काही कल्पना नव्हती. आणि आता इतक्या वर्षात आसपासचे जग बरेच बदलले होते. त्यामुळे इतके जुने कधी काय घडले ते कोण कशाला त्याला सांगेल? राहायला जाण्यापूर्वी पन्नास का साठ लाख रुपये खर्च करून भरजरी इंटिरियर सुद्धा करून घेतले. आणि राहायला गेल्यावर म्हणे, बायको आणि छोटी मुलगी दोघीच घरी असायच्या दिवसभर. त्यांना कसले कसले भास होऊ लागले. तरुण मुलीच्या रडण्यासारखा आवाज येतोय वगैरे वगैरे. म्हणजे हे सारे त्याची पत्नी त्याला सांगती आहे बरं का! त्यांच्यापैकी कुणालाच पूर्वी कधी असं काही घडलंय हे काहीच माहिती नाही. सतत व्हायला लागल्यावर. मग मात्र त्यांनी आसपास चौकशी वगैरे केली. तेंव्हा त्यांना हि माहिती कळली. इतका सारा खर्च, मोठा फ्लॅट, नवे कोरे इंटिरियर वगैरे सगळे सोडून ते कटुम्ब तिथून दुसरीकडे रहायला गेले! पुन्हा तो फ्लॅट रिकामा पडून आहे.
ओह..
ओह..
बरेच दिवसांनी विषयाला धरून असलेली पोस्ट आली इथे.
>>>>>>बरेच दिवसांनी विषयाला
>>>>>>बरेच दिवसांनी विषयाला धरून असलेली पोस्ट आली इथे.
कल्जि करु नये. लवकरच विषयाला न धरुन फालतू पोस्टस येतील.
>>>>>इतका सारा खर्च, मोठा फ्लॅट, नवे कोरे इंटिरियर वगैरे सगळे सोडून ते कटुम्ब तिथून दुसरीकडे रहायला गेले! पुन्हा तो फ्लॅट रिकामा पडून आहे.
अरेरे!!! सहसा माझ्या माहीतीप्रमाणे, या अश्या कोंडीत सापडलेल्या आत्म्यांना मुक्ती हवी असते म्हणुन ते त्रास देतात. दत्त संतपरंपरेत अशी उदाहरणे, दाखले मिळतात. (टेंबे स्वामी, गुरुचरित्र, चिले महाराज, रंगावधूत स्वामी) पण असे संत मिळणार कुठे आणि आपण त्यांच्या मुक्तीकरता, विष्णू सहस्रनाम म्हणावे अशी आपली हिंमत नसते. प्रभावक्षेत्रापासून, दूर जाउन, त्या व्यक्तीकरता प्रार्थना करावी. म्हणजे विष्णु सहस्रनाम त्या वक्तीच्या गतीप्रीत्यर्थ म्हणावे.
इतका सारा खर्च, मोठा फ्लॅट,
इतका सारा खर्च, मोठा फ्लॅट, नवे कोरे इंटिरियर वगैरे सगळे सोडून ते कटुम्ब तिथून दुसरीकडे रहायला गेले! पुन्हा तो फ्लॅट रिकामा पडून आहे.
>> रोचक किस्सा function at() { [native code] }उल सर.
तिथे पुढचं गटग ठेवा, नक्की येईन.
गटग कल्पना चांगली आहे. पण
गटग कल्पना चांगली आहे.
पण आता मी त्या सोसायटीत रहात नाही. त्यामुळे कठीण आहे. पण मला एक 'बाधा असलेली' अजून एक प्रसिद्ध जागा माहिती आहे. तिथे नक्कीच 'अमानवीय प्रेमींचे' गटग करू शकतो. ती जागा म्हणजे तळजाईचा भुतबंगला. माबोवर त्यावर धागाही आहे.
https://www.maayboli.com/node/79712
आणि मी जाऊनही आलोय तिथे. फार अस्वस्थ वाटते. फार काळ थांबवत नाही.
फार अस्वस्थ वाटते. >> ओह !
फार अस्वस्थ वाटते. >> ओह ! जायला पाहीजे.
भारी किस्सा अतुलदा !
भारी किस्सा अतुलदा !
ओह ! जायला पाहीजे. >>>> +१११
धनश्री , हे धागे स्ट्रेसबस्टर
धनश्री , हे धागे स्ट्रेसबस्टर वाटतात. किस्से विश्वास असोकि नसो,मनोरंजक असतात.
आणि विषयाला सोडून असलेला बोकलत यांचा टीपी पण मस्त असतो.
हेल्दी ह्युमर .
>>>>>>>बोकलत यांचा टीपी पण
>>>>>>>बोकलत यांचा टीपी पण मस्त असतो.
काही विविक्षित ठिकाणी विनोद अनाठायी व रसभंग करणारे असतात. आणि त्यांचीही लिमिट असते. असे माझे मत आहे. तुझ्या मताचा आदर आहे.
मी बाकीचे धागे नाहीत वाचलेले.
मी बाकीचे धागे नाहीत वाचलेले. पण तसे असेल तर मम.
(No subject)
ओह्हो..thrilling story Atul.
ओह्हो..thrilling story Atul.
आता नवीन गटग च्या लोकेशन वर ghost busters ना घेऊन जा
बोकलत.....ओ बोकलत.....कुठे
बोकलत.....ओ बोकलत.....कुठे आहात???
अतुलदा डेंजर किस्सा.
अतुलदा डेंजर किस्सा. बाकीच्या लोकांना अजून येतात का अनुभव तिथे
खरंच बरेच दिवसांनी विषयाला धरून असलेली पोस्ट आली इथे.
बोकलत.....ओ बोकलत.....कुठे आहात??? >आधीच या चांगल्या धाग्याची वाट लावली आहे त्यांनी कशाला मुद्दाम बोलवता. चांगले किस्से एकत्र झाले होते. नशीब म्हणायचे खूप उशिरा एन्ट्री झाली बोकलत या ID ची
सामी + १
सामी + १
आधीच या चांगल्या धाग्याची वाट
आधीच या चांगल्या धाग्याची वाट लावली आहे त्यांनी कशाला मुद्दाम बोलवता. >>> मी नाही बोलावले म्हणून ते यायचे थांबणार आहेत थोडेच...
मी आधी जिथे राहत होतो त्या
मी आधी जिथे राहत होतो त्या सोसायटीत पंधरा ते सतरा वर्षांपूर्वी एका मुलीने आत्महत्या केली होती.
अतुल भाऊ - अंधेरी पश्चिमला आहे का ही सोसायटी?
आणि मी जाऊनही आलोय तिथे. फार
आणि मी जाऊनही आलोय तिथे. फार अस्वस्थ वाटते. फार काळ थांबवत नाही.>>या बद्दल काय मत असेल तुमचे? TBH Simply Idiotic stunt.
https://youtu.be/4b0v8fnLz24?si=QFkzmihQawOMPP_T
टीप: @बोकलत request to be courteous to the unfathomable misery of this incident, & please maintain decorum in context with this case....no jokes please.
>> बाकीच्या लोकांना अजून
>> बाकीच्या लोकांना अजून येतात का अनुभव तिथे
अनुभव तर ऐकिवात नाही, पण त्या फ्लॅटवर पुढे अनेक वर्षे कोण राहत नव्हतं. किंवा कोणी आले तर सोडून जात होते.
>> अंधेरी पश्चिमला आहे का ही सोसायटी
नाही. पुण्यातील. पुण्यात राहतो मी.
>> TBH Simply Idiotic stunt.
ओह्ह!
Painful to see. इथं यांना सोडलं कुणी असेल शूटिंग करायला. आणि ते कॉलेज पुर्णच बंद झालेलं दिसतंय. कुणीही नाही! बापरे...
धागा चालतोय तर बोललो चालू दे.
धागा चालतोय तर बोललो चालू दे. कशाला आपण जा आणि चांगल्या चाललेल्या धाग्याची वाट लावा :|
आज माहीत आहे ना काय आहे?
आज माहीत आहे ना काय आहे? दुर्गाष्टमी.आज रात्री माहीत आहे ना कोण येणार? मंजुलिका.
या धाग्यामुळे मिडनाईट
या धाग्यामुळे मिडनाईट स्नॅकिंग आपोआप कमी झालेले आहे. जाग आली तरी किचनपर्यंत जायची हिंमत होत नाही.
Copied:
Copied:
मी दिल्लीला एका जुन्या बिल्डिंगमध्ये छोटंसं भाड्याचं फ्लॅट घेऊन राहतोय. फार मोठं नाही, भिंतींवरची रंगपपडी सोललेली, कोपऱ्यात बुरशीचं डाग. भाडं इतकं कमी की पहिल्यांदाच पाहिलं तेव्हाच वाटलं, काहीतरी गडबड आहे इथं.
मालकाने सांगितलं होतं, वरचा फ्लॅट रिनोवेशनमध्ये आहे. पहिले दोन महिन्यांपर्यंत रात्री दोन-तीन वाजता हातोड्याचे आवाज यायचे, कधी काही ओढल्यासारखं, कधी कुणी दाबून बोलतंय असं भासतंय.
मग एक दिवस ते सगळं अचानक थांबलं. एकदम शांतता.
एका रात्री ऑफिसवरून परत आलो तर बघतो, जिन्यावरून वरच्या मजल्याकडे हलकासा टॉर्चसारखा झळकणारा उजेड. मनात आलं, "बहुतेक मजूर परत आले असतील."
पण खाली मजल्यावर ओल्या पावलांचे ठसे दिसले! टॉर्च लावून पाहिलं, ते ठसे जिन्यावरून वर जात होते... सरळ वरच्या फ्लॅटच्या दारापर्यंत, आणि तिथेच थांबले.
मी हळूच दार ठोठावलं, काहीच उत्तर नाही. पुन्हा ठोठावलं आणि दार आपोआप थोडं चर्रकन उघडलं.
आत काळोख. फक्त एक बल्ब दोरीवर लटकत होता, हलत होता वाऱ्याने. आत काही फर्निचर नाही... फक्त एक वास. ओली भिंत आणि कुजलेल्या गोड फळासारखा.
तेवढ्यात... मला श्वास घेण्याचा आवाज आला. पण खोलीतून नाही... माझ्या मागून!
मी वळलो. कोणीच नाही. पण दार बंद झालं होतं!
फोनची टॉर्च लावली तर भिंतीवर खुरचून लिहिलं होतं:
“खालचा माणूस फारसा त्रास देत नाही. फार शांत असतो.”
मी धावत खाली आलो, दार बंद केलं, आतून कडी लावली. संपूर्ण रात्र डोळा लागलाच नाही.
सकाळी मालकाला सगळं सांगितलं. तो काही क्षण माझ्याकडे टक लावून पाहत राहिला, आणि म्हणाला
"तुम्ही स्वप्न बघितलं असेल. वरचा फ्लॅट तर २०१९ पासून सील आहे."
मी थक्क झालो. म्हटलं, “पण तिथं तर उजेड होता, आवाज आले!”
तो म्हणाला, “हो... पोलिसांनाही आले होते, जेव्हा वरच्या भाडेकरून तक्रार केली होती की खालच्या खोलीत राहणारा त्याला रात्रभर त्झोपू देत नाही...”
मी गप्प बसलो.
कारण खाली... राहतो तर फक्त मीच!!!
माझ्या भयकथेची जाहिरात करत
माझ्या भयकथेची जाहिरात करत आहे - अंधारी रात्र - भयकथा (संपूर्ण)
https://maharashtratimes.com
https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-...
Pages