Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.
या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.
अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295
अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229
अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हडळीचा आशिक यांनी पण
हडळीचा आशिक यांनी पण पॅटर्निटी लिव्ह घेतली असेल मग.
हडळीचा पाळणा
हडळीचा पाळणा
जो जो रे जो पिल्ला, जो जो रे जो
भुतुंच्या जगात स्वागत तुझे, दात विचकत हसतात सारे
देते मी तुला खेळणे हाडांचे, भेसुर रडु नको
जो जो रे जो
बोकलत आहेत मामा तुझे, जावळ काढण्या येतील पुढे
टकलावर तुझ्या सध्या तरी दिसत नाही केसांचे फडे
जो जो रे जो
पहाता तुझे अमानवी रुपडे, मानव काका चक्कर येऊन पडे
आत्या तुझ्या नावासाठी रश्मी आणी मृणाल पुढे
जो जो रे जो ....
सर्वांना

(No subject)
बोकलत आहेत मामा तुझे > ऑ?
बोकलत आहेत मामा तुझे > ऑ? हाडळीचा भाऊ करून टाकला तुम्ही त्यांना
आता हडळीचे लग्न जर तिच्या
आता हडळीचे लग्न जर तिच्या आशिकाबरोबर झाले असेल, तर बोकलत मामाच होणार ना.
अय्यो आणि मी आत्या
अय्यो आणि मी आत्या
आणि आम्ही भोचक शेजारी..
आणि आम्ही भोचक शेजारी..
अय्यो आणि मी आत्या>>
अय्यो आणि मी आत्या>> सोन्याची अंगठी घ्यावी लागेल तुम्हाला हडळबाळासाठी.
भुतं सोने वापरतात काय ?
भुतं सोने वापरतात काय ? मृणाली नाहीतर हाडाची माळ घेऊन जा..सगळं कुटुंब आपापल्या सोयीनुसार वापरू शकेल..
अहो बोकळतमामा तुम्हीही
अहो बोकळतमामा तुम्हीही काहीतरी चांगलेसे घेऊन जा .. नाहीतर घेऊन जाल कांदा आणि चपाती..
कांदा राहु द्या. बाळाला पाहुन
कांदा राहु द्या. बाळाला पाहुन मानव काका चक्कर येऊन पडले आहेत. त्यांच्या उपयोगात येईल.
पाळणा
पाळणा
कहर आहे!
कहर आहे!


आमच्या बाळाचा पाळणा, बारसं वगैरे आणि आम्हालाच कल्पना नाही.
यानिमित्ताने श्री बोकलतजी यांना 'मामा' बनवल्याबद्दल रश्मीजी यांचे जाहीर आभार.
पण बोकलजी आहेत कुठे.
पण बोकलजी आहेत कुठे.
बोकलत, बारश्याला सहकुटुंब
बोकलत, बारश्याला सहकुटुंब येण्याची तयारी करायला गेलेत.
हो श्रवु, सोने नसले तरी हाडांची माळ चालेल.
महिनाभर मी जरा महत्वाच्या
महिनाभर मी जरा महत्वाच्या दौऱ्यावर आहे. त्यामुळे जास्त लक्ष द्यायला वेळ नाही मिळत. तुमचं चालू दे. मी येईन लवकरच.
रश्मी, मस्त चालु आहे धागा.
रश्मी,
मस्त चालु आहे धागा.
केव्हाचा भूतमुहुर्त काढला मग?
केव्हाचा भूतमुहुर्त काढला मग??? हाडांची माळ अवघड आहे ब्वा मिळणे..सोन्याची अंगठीच परवडेल..
मृणालिनी झाली कि नाही तयारी.
मृणालिनी झाली कि नाही तयारी..बाळंतविड्याचीं..
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका....
एक घडलेली गोष्ट...
१९७९ सालची सत्यघटना .
सकाळची वेळ होती.. त्रिवेंद्रमचा समुद्र किनारा शांत वाटत होता. फारशी गर्दी नव्हती. काही लोकांचीच ये-जा होती.
एक बऱ्यापैकी वृद्ध गृहस्थ किनाऱ्यावर आसन टाकून एकाग्रतेने श्रीमद् भगवत गीता वाचत होते.
तेवढ्यात एक उच्च शिक्षित पण देव धर्म न मानणारा तरुण तिथे येऊन त्यांच्याजवळ मुद्दाम टिंगल करण्याच्या उद्देशाने बसला, आणि त्या तरुणाने टोमणे मारायला सुरुवात केली. गीता वाचणारी व्यक्ती मात्र शांत होती.
तो तरुण म्हणाला, एवढा वेळ जर अभ्यास करून देशासाठी काही केले असते तर आज देश कुठल्या कुठे प्रगती पथावर उंच गेला असता.
त्या व्यक्तीने ते एक पान वाचून पूर्ण केले व त्या तरुणास अगदी शांतपणे माहिती विचारली की कुठून आलास, शिक्षण किती , व पुढे काय करणार आहेस ? इ.
त्या तरुणाने थोडेसे गुर्मीतच उत्तर दिले की तो कलकत्याहून आला आहे. सायन्सचा उच्च शिक्षित आहे आणि भाभा अॕटोमिक रिसर्च संस्थेत पुढील संशोधन करण्यासाठी आला आहे..
पुढे मोठ्या तुसडेपणाने - तुम्ही बसा इथे पोथ्या पुराणे वाचत, तुम्हाला देशाची काळजी नाही, वगैरे वगैरे त्याने बरीच मुक्ताफळे उधळली. तरीही ती व्यक्ती शांतच होती,,,
थोड्या वेळाने - त्या गीता वाचणाऱ्या व्यक्तीने उठून आसन गुंडाळले तसे एकदम ४ दणकट कमांडो बॉडीगार्ड धावत त्या व्यक्तीजवळ आले व एक मोठी मजबूत शासकीय लाल दिवा असलेली कार एक ड्रायव्हर घेऊन आला व आदबीने सलाम करून दार उघडून उभा राहिला.
हे सगळं पाहिल्यावर मात्र तो तरुण पुरता गोंधळून गेला व त्या व्यक्तीची क्षमा याचना करू लागला.
त्याने घाबरत घाबरत ओळख विचारली, तेव्हा ती व्यक्ती शांतपणे स्मितहास्य करून म्हणाली की, "ज्या संस्थेत तू संशोधन करण्यास आला आहेस ना त्या भाभा अॕटोमिक रिसर्च संस्थेचा मी चेअरमन आहे... डॉ. विक्रम साराभाई ."
मग मात्र तो नास्तिक , देवा धर्माची टिंगल करणारा तरुण ओशाळला व चक्क रडू लागला, माफी मागू लागला...
तरीही डॉ, साराभाई शांतच..
ते म्हणाले, जर या जगात एखादी गोष्ट आहे , तर नक्कीच त्याचा कोणीतरी निर्माता आहे, मग ती आजची असो की महाभारत कालीन असो .
आणि हे त्रिकालाबाधित सत्य ही गीता सांगते. तेंव्हा - *टिंगल करण्यापूर्वी वाचून पहा, सर्व सायन्स देखील यातच आहे .*
ही गोष्ट घडली तेव्हा भारतीय पातळीवरच्या विविध १३ संशोधन संस्था या डॉ. साराभाईंच्या नांवावर होत्या.
तर तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी अणू संशोधन मंडळाचेही अध्यक्ष म्हणून डॉ. साराभाई यांची नियुक्ती केली होती.
चालू वर्ष हे डॉ. विक्रम साराभाई यांचे 100 वे जयंती वर्ष आहे...
म्हणून एक आठवण ...
त्या थोर राष्ट्रभक्त शास्त्रज्ञास विनम्र अभिवादन !
आता तुम्ही म्हणाल यात अमानवीय
आता तुम्ही म्हणाल यात अमानवीय काय?
तर या थोर शास्त्रज्ञाचा मृत्यू ३० डिसेंबर १९७१ रोजी झाला होता.
कोणत्याही थोर शास्त्रज्ञाच्या
कोणत्याही थोर शास्त्रज्ञाच्या नावाने खपवता येईल.
एक मोठी मजबूत शासकीय लाल दिवा
एक मोठी मजबूत शासकीय लाल दिवा असलेली कार > हे वाचता क्षणी माझ्या डोळ्यासमोर पोलिसांचा जाळीवाला टेम्पो आला
नशीब ते शास्त्रज्ञ फक्त गीताच
नशीब ते शास्त्रज्ञ फक्त गीताच वाचत होते. चेटूक, जादूटोणा करत बसले नव्हते.
गल्ली चुकली वाटत ??
गल्ली चुकली वाटत ??
चुकीच्या नावाने होणारे फॉरवर्ड्स चुकीच्या बोळात शिरले .
घटना केव्हा घडली आणि घटनेतील
घटना केव्हा घडली आणि घटनेतील शास्त्रज्ञाचा मृत्यू केव्हा झाला हे बघा. आणि त्यांना न्यायला येणारे कमांडोज, लाल दिव्याची गाडी. केवढा अमानवीय किस्सा आहे हा.
हो ना अमानवीय किस्सा आहे हा
हो ना अमानवीय किस्सा आहे हा तर
>> मग मात्र तो नास्तिक , देवा
>> मग मात्र तो नास्तिक , देवा धर्माची टिंगल करणारा तरुण ओशाळला व चक्क रडू लागला, माफी मागू लागला...
हो रडणारच, मग काय तर. जाम तंतरली असेल त्याची. देवावर विश्वास नसणाऱ्याला भुतावर सुद्धा विश्वास ठेवायची वेळ आली.
(No subject)
तसंच पाहिजे देवावर विश्वास ठेवत नाहीस काय !
तरीही साराभाई शांत होते असं किती वेळा आलयं, शांत ,शांत , बुद्धाची आठवत आली. नऊ वर्षांंच्या भुताला शोभत नाही हे ! त्या वयात आम्ही कसे अवखळ होतो.
मी पण या वेळी जागी असते.
मी पण या वेळी जागी असते.
दिवसा माणसं त्रास देतात.
Pages