अमानवीय...? - ३

Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44
halloween bates hotel

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.

या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.

अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295

अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229

अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

जे लवकर जातात त्यांच्या पिंडाला शक्यतो कावळा शिवत नाही. कोरोनाकाळात एका ओळखीच्या व्यक्तीचे निधन झाले होते. वय चाळीशीच्या आसपास होते. त्यांच्या पण पिंडाला कावळा शिवला न्हवता.

एक अनुभव कावळा पिंडाला शिवायचा...

ओळखीतले एक जण ५५ ते ५८ दरम्यान वयाचे होते आणि अचानक हार्ट अ‍ॅटॅकने गेले. जेव्व्हा अ‍ॅटॅक आला तेव्हा ते द्राक्षे खात होते. त्यानंतर त्यांच्या दहाव्याला कावळा पिंडाला शिवत नव्हता. बरेच कावळे बसले होते तरी ते येत नव्हते. त्या ग्रुहस्थाच्या समाजात पिंडदानाच्या वेळी गेलेल्या माणसाच्या आवडीचे पदार्थ ठेवतात. त्यामुळे चिकन, मटण आणि बरीचशी फळे पण होती. असाच काही वेळ गेला आणि कुठूनतरी एक कावळा आला आणि चिकन मटण यांना स्पर्श न करता द्राक्षे ठेवली होती तिथे गेला आणि पहिली चोच एका द्राक्षावर मारली. त्यातले थोडेफार त्याने खाल्यावर मग इतर कावळे आले आणि बाकी पदार्थ खाऊ लागले.

ओळखीचे एक आजोबा दीर्घ आजारानंतर वारले. त्यांच्या मुलीच्या मनात नेहमी येई की बाबा आईला आजाराचे निमित्त करून खूप राबवून घेतात. त्यामुळे तिच्या मनात राग होता. नंतर कावळा शिवेना. शेवटी ती त्या जागी गेली आणि म्हणाली की बाबा, माझा आता तुमच्यावर राग नाही. .. पटकन कावळा शिवला.

अरेव्वा ! आज शिस्तीत सगळ्या कमेंट्स दिसतायेत. अजून विज्ञान-विवेकवादी तज्ञ कसे नाही आले कोणी कारणमीमांसा घेऊन ?

अरेव्वा ! आज शिस्तीत सगळ्या कमेंट्स दिसतायेत. >>> सर्वपित्री अमावास्येपर्यंत आम्ही असेच वेगवेगळ्या अमानवीय विषयांवर चर्चा करणार आहोत.

अजून विज्ञान-विवेकवादी तज्ञ कसे नाही आले कोणी कारणमीमांसा घेऊन ? >>>
कालच रात्री एका आत्म्याने येऊन मला ताकीद दिली. इथे लक्ष असते त्याचे. मी अजूनही घाबरलेलो आहे.

ही नुकतीच लॉकडाऊनमध्ये माझ्या दोन मित्रांसोबत घडलेली खरी कथा आहे. माझा एक मित्र गेल्या पावसाळ्यात त्याच्या मामाच्या घरी जात होता. म्हणजे मामाची तब्येत अचानक बिघडल्याने जावं लागलं. बाईकवर साधारण तासाचा प्रवास होता आणि काळोख पडला होता म्हणून एका मित्राला बरोबर घेतलं होतं. हे दोघे अर्ध्या रस्त्यात गेल्यावर मुसळधार पाऊस सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली म्हणून यांनी गाडी एका शॉर्टकट्ने न्यायची ठरवली. पण त्या शॉर्टकटवर पावसाने यांना गाठलंच. त्या रस्त्यावर आडोसा घेण्यासाठी एखादं झाड पण न्हवतं आणि हे रेनकोट न घेताच निघाले होते. रस्ता सुनसान होता. थोडं पुढे गेल्यावर यांना एक माळरान लागले आणि सुदैवाने त्यावर एक झोपडी पण होती. यांनी गाडी बाजूला लावून त्या झोपडीकडे धाव घेतली. झोपडीचा दरवाजा वाजवला तर एक म्हातारा बाहेर आला. यांनी त्याला सांगितले की पाऊस थांबेपर्यंत आसरा द्या नंतर निघून जाऊ. म्हाताऱ्याने यांना खुणेनेच आत बोलावले. हे आत गेले तर झोपडीची रचना यांना जरा वेगळी वाटली. तसेच त्या झोपडीत ज्या वस्तू होत्या त्या यांनी कधीही पाहिल्या न्हवत्या. यांनी म्हाताऱ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला पण याची भाषा त्यांना समजत न्हवती आणि तो काय बोलतोय हे यांना समजत न्हवतं. म्हाताऱ्याचा पेहराव कपडे पण विचित्र होते.
शेवटी ते तसेच पाऊस कधी संपतोय याची वाट बघत बसले. मधल्या काळात म्हाताऱ्याने यांना कसलं पेय बनवून दिलं. त्याचा रंग आणि चव पण वेगळी. थोड्या वेळाने पाऊस थांबला तसे हे त्याचे आभार मानून पुढच्या प्रवासाला लागले. गावी पोहचल्यावर यांची चर्चा सुरू झाली त्या झोपडी आणि म्हाताऱ्याबद्दल. यांना वाटलं गावच्या लोकांना काही माहीत असेल म्हणून यांनी गावातल्या लोकांना विचारलं तर कोणालाही काही माहीत न्हवतं. लोकांच्या मते तिथे माळरानंच नाही तर झोपडी कुठून येणार. यांना वाटलं की कदाचित ती झोपडी नवीन असावी म्हणून गावकऱ्यांना माहीत नसेल. परतताना ते मुद्दामून त्याच रस्त्याने जाऊ लागले पण यांना ती झोपडी आणि तो म्हातारा दिसला नाही. ते ज्या ठिकाणी थांबले होते त्या ठिकाणी माळरान नसून शेती होती. गावी आल्यावर सगळ्या गावी या प्रसंगाची चर्चा सुरू झाली. प्रत्येक जण आपआपले तर्क लावत होता. माझा तर्क असा होता की ते थोड्या वेळासाठी पॅरलल युनिव्हर्समध्ये जाऊन आले होते. त्यामुळे त्यांना तो म्हातारा, त्याच्या वस्तू, झोपडीची रचना,भाषा वेगळी वाटत होती. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात पॅरलल युनिव्हर्समध्ये जाण्याची घटना कधी न कधी घडत असते तेव्हा आपल्याला वाटतं आपण दुसऱ्या जगात आलोय. पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तुम्हाला काय वाटतंय?

कावळा शिवने न शिवने प्रकार मी सुध्दा अनेकदा बघितलाय. त्यामागील कारणमीमांसा काय असेल ती असेल पण खालील प्रकार मी बघितलेत
१. आजूबाजूला माणसांची गर्दी असूनही नेवैद्य ठेवणारीव्यक्ती थोडी मागे हटली की कावळे त्या अन्नावर झडप घेतात
२. आजूबाजूला एकही कावळा दिसत नाही पण नेवैद्य ठेवल्यानंतर मात्र कुठून कसा पण एक कावळा येतोच आणि खाऊ लागतो
३. भरपूर कावळे असतात, माणसं फार फार लांब उभी असतात. तरीही एकही कावळा खाली येत नाही. नेवैद्याकडे पाहत ओरडत बसतात.
४. एका घटनेत तर गाय सुद्धा नेवैद्य खात नव्हती. जवळ जाऊन बुजल्यासारखं करून मागे यायची.

असो. वरचे एकेक किस्से रोचक.

३. भरपूर कावळे असतात, माणसं फार फार लांब उभी असतात. तरीही एकही कावळा खाली येत नाही. नेवैद्याकडे पाहत ओरडत बसतात.>>>>हे प्रकार जे लवकर/ तरुण वयात जातात त्यांच्याबाबतीत सर्रास पाहायला मिळतो. कावळ्यांना त्यांचा अतृप्त आत्मा दिसत असतो.

भरपूर कावळे असतात, माणसं फार फार लांब उभी असतात. तरीही एकही कावळा खाली येत नाही. नेवैद्याकडे पाहत ओरडत बसतात. >> आजूबाजूच्या पिंडाला शिवतात परंतु एखाद्या पिंडाला मात्र शिवता शिवत नाहीत हे मी देखील पहिले आहे .

Pages