अमानवीय...? - ३

Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44
halloween bates hotel

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.

या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.

अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295

अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229

अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

कारण पौर्णिमेला नाही, अमावस्येला भूत येतात नाचायला. पौर्णिमेच्या लख्ख उजेडात भुतांना नीट मेकप करता येत नाही. अमवस्येचे बरे असते चेहेर्‍यावर आधी क्रीम, मग फाउंडेशन, मग त्यावर हलकिशी पावडर, मग गालाला रुज असा अर्धा १ किलोचा थर लावता येतो. मग अंधारात तो चकाकतो. ते पाहुन बायकांना न्युनगंड येतो नी पुरुषांना लोभ सुटतो. मग अश्या हेवे दावे, लोभ, मोह, माया , मत्सर यातुन अनेक बाया बापडे भुतांच्या तावडीत अलगद सापडतात.

अरे वा वा वा !
माझ्यासाठी घर पण बांधलं मायबोलीवर. लाल सरबत पाजतो सर्वांना.या.

ही बातमी वाचली का?

https://www.hindustantimes.com/brand-post/india-s-first-paranormal-helpline-receives-over-10-calls-daily/story-xeu1E9TuTldoVk1E9F64aL.html

मुळात भारतात अशा सेवेसाठी हेल्पलाईन नंबर आहे हेच माहीत नव्हतं. हेल्पलाईन ऑपरेटर व्हायला काय पात्रता लागत असेल? कुंडलीत बाराव्या स्थानात नेपटुन ग्रह असलेले लोक घेत असतील बहुदा असल्या कामासाठी.

मी २ दिवसांपासून अमानवीय चे धागे वाचतेय. अमानवीय २ संपवून तिसरा धागा शोधायला घेणार तर हा धागा वर आलेला... माझी इच्छा या धाग्याने ओळखली का Uhoh
याला पण अमानवीय म्हणावे का? Lol

काही नाही.
नवीन झपाटलेला किस्सा आलाय का ते बघायला आले होते.

काल रात्रीचा आणि आज सकाळचा दोन्ही किस्से भारी आहेत एकदम. मजा आली वाचायला.>>> +१११ सुप्पर किस्से आहेत दोन्ही Happy

ही खूपच जुनी गोष्ट आहे. आजोबांनी सांगितलेली. आजोबांना त्यांच्या आजोबांनी, आजोबांच्या आजोबांना त्यांच्या आजोबांनी. अशी अनेक पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही खरी गोष्ट आहे. त्या काळी आमचं गाव साधारण तीस पस्तीस घरांचं होतं. खूपच लहान गाव होतं. त्या काळी भुतांचा सगळीकडे सुळसुळाट असायचा. रात्रीचे सात वाजले की सगळे घरी बसत. कोणीही घराबाहेर पडत नसे. अमावास्या पौर्णिमेला तर सहा साडेसहा वाजल्यापासून लोकं घरी बसायची. तर त्या काळी गावच्या बाहेर साधारण एक किलोमीटरवर माळरान होतं. त्या माळरानावर एक पडका बांगला होता. आमचं गाव उंचावर असल्याने गावातून माळरान आणि तो बंगला दिसत असे. संध्याकाळी तो बंगला खूपच भेसूर दिसायचा. त्या बंगल्यात एक दुष्ट शक्ती वास करत होती. त्यामुळे भर दिवसाही लोकं तिथे जायला घाबरत असत. तो बंगला बांधताना तिथे एका स्त्रीचा उंचावरून पडून मृत्यू झाला होता. तेव्हापासून त्या जागेत लोकांना भयानक अनुभव यायला लागले होते. त्यामुळे तो बंगला पडीक होता. संध्याकाळी त्या बंगल्यात कोणीतरी आहे हे जाणवायचं. कधीतरी त्या बंगल्यात दिवा पेटवलेला दिसायचा, कधीतरी चक्क त्या स्त्रीचा आत्मा दिसायचा. बंगल्याच्या बाल्कनीत उभी राहून ती गावकडेच पाहत असायची. यामुळे सगळे लोक्स भयभीत झाले होते.
गावकऱ्यांनी या त्रासातून सुटण्यासाठी एक मांत्रिक बोलवला. तो मांत्रिक खूपच धीट होता. अमावसेच्या रात्री मशाल घेऊन तो त्या बंगल्याकडे जायला निघाला. बंगल्याच्या जवळ पोहचण्याआधी त्याच्यावर वेशीवर असणाऱ्या साध्या भूतांनी हल्ला चढवला. पण मांत्रिक खूपच डेंजर असल्याने त्या भूतांना त्याने एका मंत्रातच बाटलीबंद केलं. तर तो जसा जसा त्या बंगल्याच्या जवळ पोहचायला लागला तसा वाऱ्याचा वेग अचानक वाढला. ती दुष्ट शक्ती फुंकर मारून मशाल विझवत होती पण मांत्रिक आपल्या सामर्थ्याने ती मशाल पुन्हा प्रज्वलित करत होता. मांत्रिक बंगल्याच्या आवारात पोहचताच त्या दुष्ट शक्तीने आकाशात झेप घेतली आणि भेसूर हसू लागली. मंत्रिकही हिमालयात तपश्चर्या करून आला होता त्यामुळे त्यानेही आकाशात झेप घेतली आणि दोघांचे तुंबळ युद्ध सुरू झालं. वीजा चमकायला लागल्या, जोरात वारा सुटला, लोकांची कौलं उडाली, सगळेच घाबरून गेले. त्या दुष्ट शक्तीला समजून चुकलं की तिचा शेवट जवळ आलाय. शेवटी त्या दुष्ट शक्तीने गावाकडे पाहून शाप दिला की या गावात जी मुलगी लग्न होऊन येईल त्या मुलीचा उंचावरून पडून मृत्यू होईल. या शापामुळे आजही आमच्या गावातले लोक दुमजली घर बांधत नाहीत.

या शापामुळे आजही आमच्या गावातले लोक दुमजली घर बांधत नाहीत.>>> मग विहीर, खोल खड्डा पण नसेल ना तिथे.

अगदीच लेच्यापेच्या (की सात्विक??) दुष्ट शक्ती तुमच्या बुवा, बोकलत राव ज्यांना कुणाचे वाईट स्वहस्ते करता येत नाही नी शापवाणी चा आधार घ्यावा लागतो...ये सब छोडो ओर कोई अच्छा माल दिखावो भाई... Lol

..ये सब छोडो ओर कोई अच्छा माल दिखावो भाई...>>उसके लिये उनको प्रोफाइल फोटो में, पैरोमेंसे शूज निकालकर तपश्चर्या करनी पडेगी.... Lol

आहे मानवीय धागा मला आठवतोय. पण तो मानवांसाठीच आहे Lol बहुतेक कृष्णा असा काहीतरी आयडी आहे त्यांनी काढला होता. सापडला कि लिंक देतो.

ओके. सापडला:
https://www.maayboli.com/node/57549

Pages