अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेऽऽष नवनवीन धागे काढण्यात पटाईत होता तसे आपण धाग्यांचे पुढील भाग काढण्यात पटाईत आहात!!

(मागील धाग्यावरून...)
>> ४-५ बायका बसमधे चढतात आणि शेवटच्या सीटवरुन सर्वात पुढे असलेल्या कन्डक्टरच्या तोन्डापर्यन्त हात आणतात, असे होते.

आणि ते दोघेही (कन्डक्टर ड्रायव्हर) घाबरूनच हार्टअटॅकने मरतात... असे का?

आणि ते दोघेही (कन्डक्टर ड्रायव्हर) घाबरूनच हार्टअटॅकने मरतात... असे का?>>>>>> मग ही स्टोरी हात लांब करणार्या भुतणीने सांगितली का लोकांना??

>> मग ही स्टोरी हात लांब करणार्या भुतणीने सांगितली का लोकांना??

अहो ते लांब हात वाले व्हर्जन बहुतेक असेच आहे Biggrin त्यांनी ऐकलेले तेच आहे का पाहत होतो

पार्ट-२ तरी धार्मिक मधून काढता येतो का पहा...>>> १+
विरंगुळा मध्ये ओके वाटेल हेमावैम
पण धार्मिकतेशी ह्या प्रकारांचा खरंच संबंध जोडू नए असे प्रांजलपणे वाटते.

आमचे फेबु मित्र विलास सातपुते यांचा एक अनुभव ...

आमच्या जवळीळ एका सिनेमाग्रहात ही घटना घडली आहे ..मुळात ति वास्तुच बाधित होति ..शेजारी महादेवाचे मंदिर होते . नित्य तेथे भटजी पूजेसाठी येत असत. रोज सकाळी तिथे थिएटर मध्ये मैनेजर नारळ ही फोडत असे. नंतरच तिथे दिवसातील सारे चित्रपटाचे खेळ होत असत ..त्या चित्रपटग्रहाच्या मागील बाजूस एक चित्रकार सिनेमाची पोस्टर्स काढ़ित (रंगवित) असे . मी पण त्यावेळी तिथे कधीकधी जात असे ..त्या चित्रकारा जवळ थांबत असे . पण तो परिसर हा भकास वाटे . चित्रपटग्रहामुळे तिथे वरदळ असे त्यामुळे काही वाटत नसे ..पण एकांत असला किंवा अंधार पडू लागला की मन अस्वस्थ होत असे काहीतरी भिती वाटे ..गणपती उत्सवात आम्ही सारी मित्र ( तरुणपणी ) दंगा मस्ती करीत असु . उत्सवात मंडळात रात्रीचे वेळी आरास करण्याच्या निमित्ताने थांबावे लागे . तिथेच झोपावे लागे ..पण सर्वांना तिथे जागा कमी असल्यामुळे झोपता येत नसे ..म्हणून एक दिवस रात्री २ वाजता आम्ही काही मुले त्या थिएटरच्या पडद्या जवळीळ प्लेटफ़ॉर्मवर झोपलो होतो .
पण अचानक तिथे कोणीतरी धुडगस घालते आहे , खुर्च्या वाजवत आहे , खुर्च्यावरुन पळते आहे ..तर समोरिल बालकनीत कुणीतरी कंदील घेवून फिरत आहे ..असा प्रत्यक्ष भास आम्हा मित्रांना झाला होता ..ते पाहुन आम्ही खुपच घाबरलो होतो .आणी क्षणात तिथुन जीव मुठित धरुन बाहेर पडलो आणी मंडळात आलो , तेंव्हा आमच्या पेक्षा मोठ्ठी असलेली काही तरुण मंडळी तिथे बसली होती .
त्यांना आम्ही हा प्रकार सांगितला तेंव्हा ते म्हणाले अरे कशाला गेलात तिथे आत कलमडायला . अरे त्या डोअरकीपर बल्या शितोळेला रात्री तो आत तो दारू पिऊन झोपला होता ,शुद्धित नव्हता तरी तरी त्याला बाहेर पैसेज मध्ये आणून टाकला होता . तुम्हाला माहिती नाही कां ? अरे या थेटरचा मालक इलेक्ट्रिक शॉक बसून आतच मेला आहे ..तो अजुन तिथे वावरतो .इथे सगळी कड़े त्याचा अतृप्त आत्मा फिरत असतो ..म्हणुन तर तिथे रोज नारळ फोडून थियेटरचे खेळ सुरु करतात ..आणी हा शेजारचा कुलुप लावलेला वाडा देखील त्याचा आहे .. त्याचे वारसदर पण तिथे त्यांना असेच अनुभव आल्यामुळे रहात नाहीत ..एवढा मोठा वाडा असून देखील आज दूसरीकड़े रहात आहेत . पेठेतील सर्व जूनी माणसे हे सर्व सांगत असतात .. लक्षात ठेवा .
ही गोष्टही ५० वर्ष्या पूर्वीची .आज ते थिएटर बंद पडक्या अवस्थेत आहे ..वास्तुत दूषित असली की असे अनुभव येतात ..हे मात्र खरे ..!

>> धाग्याचा गृप बदलता येत नाहिये Sad

येईल ना... संपादन मध्ये जाऊन "Groups audience" मध्ये "विरंगुळा (1559)" पेस्ट करा आणि Save करा. (मी आत्ताच माझ्या एका धाग्याबाबत करून पाहिले)

माझ्या मित्राकडून ऐकलेली गोष्ट..
आमच्याच गावातला एक पोरगा भल्या पहाटे उठून, म्हणजे चार वाजताच जॉगिंगसाठी निघायचा. त्याला पोलिसभर्ती परीक्षा द्यायची होती म्हणे.

ज्या रस्त्यावर तो जॉगिंगला जायचा, तो रस्ता खूप वर्षांपूर्वी धरण बांधल्यामुळे बंद पडला होता, त्यामुळे वाहतूकीचा प्रश्नच नव्हता, रस्त्याच्या कडेला फक्त गावातल्या लोकांच्या तेवढ्या शेती आणि थोडंफार जंगल होतं तो रोज दीड दोन किलोमीटर जायचा आणि पुढे धरण असल्याने तिथून वळायचा.

एक दिवशी असंच जॉगिंग करत असताना त्याला समोरून येतांना एक स्त्री दिसली म्हणे, कुणी शेत कामगार महिला असेल म्हणून त्याने दुर्लक्ष केले. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते, त्याच्या मनात थोडी धास्ती निर्माण झाली पण त्यानं दुर्लक्ष केलं.

चांगले दहा पंधरा मिनिटे झाली तरी ती स्त्री त्याच्याजवळ काही येतच नव्हती म्हणे.. (ती स्त्री समोरून येत होती)

एकतर तो जॉगिंग करत होता आणि त्यात ती स्त्री त्याच्याच दिशेने येत होती, त्याला हे सगळं विचित्र वाटल्यामुळे तो तिथेच थांबला, आणि नंतर जे झालं त्याने तो जीवाच्या आंकाताने पळत सुटला म्हणे..

त्या स्त्रीने त्याला हाक मारली होती म्हणे आणि बोलली, "काऊन रे बाबूऽऽऽ, काऊन थांबलाऽऽ..??"

येईल ना... संपादन मध्ये जाऊन "Groups audience" मध्ये "विरंगुळा (1559)" पेस्ट करा आणि Save करा. (मी आत्ताच माझ्या एका धाग्याबाबत करून पाहिले) > > अतुल धन्यवाद, केलंय मी, बघा जमलंय का?

दक्षिण मुंबईच्या अभिजात उच्चभ्रू सौदर्य आणि दिमाखापाठी लपल्यात काही भयानक आणि अमानवी गोष्टी. आणि एकदा उच्च वर्तुळाचा आणि श्रीमंतीचा शिक्का बसला की भूत प्रेत, सुपर नॅचरल या बाबत बोलणं म्हणजे खुळकट पणा होतो... पण दैवी असो वा सैतानी, अशा शक्ती मानवांच्या आटोक्यात कधीच नसतात. मग तिथं बेहरामपाड्याची बकाल झोपडपट्टी असो वा मलाबार हिल्सच्या अतिश्रीमंत गगनचुंबी इमारती...

ग्रँड पराडी टॉवर्स. १९७६ ला बांधलेली तीन २८ मजल्यांच्या उंच इमारतींची सोसायटी. पर स्क्वेअर फुटाच्या भावात एक स्कुटी येईल इतकं महाग रहाणीमान. अशा या तालेवार बिल्डिंगच्या आठव्या मजल्यावर राहणाऱ्या एक वृध्द दाम्पत्य वासुदेव आणि तारा दलाल यांनी जून १९९८ मध्ये बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली. त्या पूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्या दांपत्याने त्यांचा मुलगा बाळकृष्ण दलाल, त्याची पत्नी यांच्यावर आपला छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केले असा आरोप केला होता. सुमारे सात वर्ष चाललेल्या कोर्ट केसचा निकाल ज्या दिवशी लागणार होता त्याच दिवशी बाळकृष्ण दलाल यांनी आपली पत्नी व १९ वर्षाच्या मुलीला घेऊन त्याच बाल्कनीमधून उडी टाकून आत्महत्या केली. किती भीतीदायक योगायोग. अर्थात याला धास्तावून ग्रँड पराडीच्या रहिवाशांनी प्रेतात्मा निवारणार्थ एक पूजाही घातली.

पण दुर्दैवानं आत्महत्यांचा सिलसिला चालूच राहिला. ग्रँड पराडीच्या इतर काही रहिवाशांनी ही आत्महत्या केल्या, त्याही दलाल कुटुंबीय सारख्याच उंच मजल्यावरून उडी टाकून. एका ग्रँड पराडीच्या रहिवासी तरुण मुलीने वालकेश्र्वरच्या दुसऱ्या एका इमारतीवरून जीव दिला. तिथल्या एका नोकराने भ्रमिष्ट होऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण सुदैवाने त्याला वाचवण्यात आलं. या व्यतिरिक्त तिथं घरकाम, ड्रायव्हिंग इत्यादी करणाऱ्या स्त्री पुरुषांनाही विचित्र अपघातांना सामोरं जावं लागलं आहे. त्यात भर म्हणजे ही सोसायटी अनधिकृत बांधकामांना मुळे मुंबई महानगरपालिकेच्या निशाण्यावर होती. एकंदरीतच कितीही पैसेवाले रहिवासी असूनही, या बिल्डिंग अनाकलनीय, नकारात्मक वलयात आहेत असं वाटतं. ग्रँड पराडी मधले फ्लॅट्स आता चटकन विकले जात नाहीत. एक कुजबुजत आवाजातली सावध चर्चा असते इथं ग्रँड पराडी भवती असलेल्या अतींद्रिय शक्तिंबद्दल... पण नेमकं आहे तरी काय ग्रँड पराडी भोवती?

टॉवर ऑफ सायलेन्स

मलाबार हिल्स म्हणजे तिरप्या करंगळी सारखा मुंबईच्या नैऋत्येला चिंचोळा होत गेलेला भाग. इथेच जवळपास सोफाया कॉलेज, त्याचं कुप्रसिद्ध हॉस्टेल जे आपण मागच्या भागात पाहिलं.. ग्रँड पराडी ज्याला आत्महत्यांचे मनोरे ही म्हटलं जातं...शिवाय हँगिंग गार्डन ज्याच्या दंतकथा फक्त तिथल्या रहिवाशी लोकांना माहीत आहेत...आणि मुंबईत दुर्मिळ असणारी हिरवीगार गर्द वनश्री. यातच वसला आहे पारसी धर्मियांचा, मृत्यूनंतरच्या प्रवासाचा दरवाजा..... टॉवर ऑफ सायलेन्स.

इथं पारशी आणि फक्त पारशी लोकांना प्रवेश आहे, तो ही आप्त स्वकियांच्या मृत्यूनंतर, त्याच्या मृत देहाचे अंतिम संस्कार करण्याकरिता. दहन किंवा दफन न करता हे मृतदेह इथल्या एका सुक्या विहीर सदृश्य भागात ठेवले जातात म्हणे. आणि त्यांचं भवितव्य निसर्ग आणि पशू पक्ष्यांवर सोडलं जातं. असे टॉवर ऑफ सायलेन्स जिथं जिथं पारशी राहतात तिथं तिथं असतातच. इथे कुठल्याही धर्माच्या कसल्या ही चालिरितींबद्दल आक्षेप घेण्याचं कारण नाही. आपण वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरांमध्ये उगीच लुडबुड करू नये. त्यातून पारसी समाज हा अत्यंत शांतताप्रिय व मैत्रीपूर्ण आहे. मुंबईच्या प्रगतीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. फक्त त्यांची एकच विनंती आहे, शांतता पाळणे. टॉवर ऑफ सायलेन्स हा प्रचंड गूढ शांततेनं भारलेला प्रदेश आहे. तिथं आपल्या प्रियजनांना मृतदेह रुपी सोडून येणाऱ्या पारसी लोकांपैकी बऱ्याच जणांना जीवन आणि मृत्यू यातला फरक तिथल्या निरव विषण्णतेत सापडतो म्हणे. हीच विषण्णता हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या ग्रँड पराडीच्या रहिवाशांना आत्महत्येकडे घेऊन जाते का?

अरे हो, एक नमूद करायचं राहिलं. मलाबर टेकडीच्या दाट रानात शांत पहुडलेला हा टॉवर ऑफ सायलेन्स असा कुणाच्या नजरेत पडत नाही... फक्त एकाच जागेवरून तो दिसू शकतो.

ग्रँड पराडी टॉवर्स...

IMG_5973.JPGIMG_2214.JPGIMG_2215.JPGIMG_2216.JPG

वरील माहिती माझी नाही परंतु एका मित्राने दिली आहे ... सगळे क्रेडिट त्याचे आहे

हे अक्षरशः खर आहे.
तो टॉवर ऑफ सायलेन्स आता बंद झाला.
पुर्वी आजूबाजुच्या इमारतीत पक्षी अवयव आणून टाकायचे.

दोन तीन किस्से आहेत. ज्यांची दोन तीन रूपं ऐकलेली आहेत. मागच्या भागात अनेक पोस्टी आहेत. एव्हढे सगळे वाचलेले नाही. कदाचित त्यात येऊन गेले असेल म्हणून टाळले लिहायचे. (खांद्यावर बोकड घेऊन येणे / खवीसाशी कुस्ती आणि भूतांची पंगत )

टाईम्स ऑफ ईंडियावाली लिंक म्हणतेय की ९८ मध्ये एका वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केली आणि त्यांच्याच मुलाने कुटुंबासकट २००५ मध्ये आत्महत्या केली, तशाच पद्धतीने Uhoh भयंकर आहे हे वाचायला सुद्धा Sad

करिष्मा कडाकियाला डिप्रेशन ची हिस्ट्री होती पण मूळची ती ग्रँड पॅराडी चीच.

ही खालची लिंक वाचा. ग्रँड पॅराडीची सगळी कथा आहे.
http://hauntedindia.blogspot.com/2014/04/grand-paradi-towers-malabar-hil...

काऊन रे बाबूऽऽऽ, काऊन थांबलाऽऽ..??">> अरे देवा! राधिका सुभेदार तिकडे पण??>>>> Rofl

प्राजक्ता, क्या बात है! अगदी राधाक्काचा आवाज कानात घुमला. Lol

Pages