क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

* सर्व विकेट्स पटेलनेच घेतल्या आहेत. * - एजाज पटेल प्रमाणे अक्षर पटेलही करामत करेल ?

*हा सामना अनिश्चिततेने पछाडलेला असणार असं दिसतंय.* -
न्यूझीलंड 62 ऑल आऊट !!
>>
आणि आपले ६९ बिनबाद...

मॅचमधे राहिलेला वेळ पहाता, कोहली, गिल, अय्यरने थोडी बॅटींग प्रॅक्टीस करून घेतली, थोडे रन्स करून घेतले तर आश्चर्य वाटायला नको.

*कोहली, गिल, अय्यरने थोडी बॅटींग प्रॅक्टीस करून घेतली, थोडे रन्स करून...* - सर्वांत महत्वाचं पुजाराचं नांव राहिलं !
Wink

Happy मी पोस्ट टाकायच्या आधीच पुजारा आऊट झाला असल्यामुळे त्याचं नाव राहिलं. मस्त खेळला पुजारा. मयंक तर कमाल खेळलाय. आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या सेशन्सपैकी ह्या तिसर्या दिवशीच्या दुसर्या सेशन चा अपवाद वगळता सगळ्या सेशन्समधे बॅटींग केलीय मयंकने!

फेसबूकवरून साभार..
मागच्या येथील चर्चेची आठवण झाली Happy

IMG_20211205_141220.jpg

गिलचा टेंपरामेण्टचा प्रॉब्लेम आहे. पुन्हा बाद व्हायचे मार्ग शोधतोय असे वाटले. आधी एक रिव्हर्स स्वीपही मारून झालेला.

रोहीत शर्माने स्वत:चे एक पुस्तक लिहावे. गिलसारख्यांना प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल..

कोहलीच्या खेळीतही आज वा आजही आत्मविश्वास दिसत नव्हता.. तसे तो धावा बनवतो पण ती कमांड ते डॉमिनेशन त्याने गमावलेय असे वाटते.

*ती कमांड ते डॉमिनेशन त्याने गमावलेय असे वाटते.* - ज्यांची कारकिर्द दीर्घ असते, त्यांच्या बाबतीत ' बॅड पॅचेस ' येणं नवीन नाहीं. माझी खात्री आहे फलंदाज म्हणून कोहलींच्या सर्वोत्तम खेळी अजून यायच्या आहेत.

*गिलसारख्यांना प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल..* त्या पातळीवर पोचलेलया गिलसारख्यांना पुस्तकाशिवायही तें उमजत असतं . पण आपल्या खेळाशी निगडीत मानसिकता उशीरा बदलणं हें सराव व अनुभवानेच शक्य होत असावं.

Inside Edge season3 बघून संपवला आज!!
खुप दिवसांनी बिंज वॉचिंग केले Happy

दुसरी इनि>ग खेळताना जर असा चेस चौथ्या इनिंगमधे करायची वेळ आली तर कसा करायचा ह्याचा सराव होता असे द्रविड ने म्हटलय . चांगला प्रयत्न होता.

आफ्रिकेचे वेध लागले आहेत. मजा येईल असे वाटते आहे.

दुसरी इनि>ग खेळताना जर असा चेस चौथ्या इनिंगमधे करायची वेळ आली तर कसा करायचा ह्याचा सराव होता असे द्रविड ने म्हटलय . चांगला प्रयत्न होता.
>>>>>>>>>>

हे कळले नाही. आपण फॉलोऑन न देता पुन्हा फलंदाजी केलीय याबद्दल हे म्हटले आहे का??
तसे असल्यास असा कसा काय सराव होऊ शकतो. ती प्रेशर सिच्युएशनच वेगळी असते तसेच समोरच्या गोलंदाजांची मानसिकता आणि डावपेचही कुठेच त्या सिच्युएशनशी मॅच होत नाही. उगाच काहीतरी म्हणायचे म्हणून म्हटलेय. नुसते बॅटींग प्रॅक्टीस म्हणने पुरेसे होते.

फॉलोऑन न देता सामना वाढवण्यामागे हल्ली अजून एक कारण असते ते म्हणजे सामना अडीच दिवसांतच संपल्यावर होणार्‍या आर्थिक नुकसानीचे. हल्ली तर आर्थिक बाबींचा विचार पहिल्यांदा केला जातो. त्यावरच सारा डोलारा ऊभा आहे.

*तसे असल्यास असा कसा काय सराव होऊ शकतो. ती प्रेशर सिच्युएशनच वेगळी असते...* पूर्णपणे सहमत !
*नुसते बॅटींग प्रॅक्टीस म्हणने पुरेसे होते* - पण तेंही तितकंसं योग्य नसावं. सराव कसोटी सामन्यांसाठी असतो, कसोटी सामने सरावासाठी नाहीं. तूम्ही कसोटीत एखाद्या संघाला तीन दिवसांत हरवूं शकत असाल, तर त्याला दोन दिवसांत हरवायचा प्रयत्न करणं ही खरी टेस्ट मॅच खेळण्याची मानसिकता हवी. मला वाटतं गावसकरने असं मत मांडलंय व तें मला योग्य वाटतं .

पण तेंही तितकंसं योग्य नसावं
>>>
हो. मी त्यालाही योग्य म्हटले नाहीयेच. पण सरावाचे कारणच द्यायचे होते तर तितके पुरेसे होते. त्यास चौथ्या इनिंगचा चेस सराव वगैरे ठिगळ जोडायची गरज नव्हती. आश्चर्यकारक वाटले म्हणून असेच म्हणायचे होते का हे कन्फर्मही केले.

बाकी पुन्हा कलकत्ता कसोटी होऊ नये अशी भिती असेल तर ती देखील प्रामाणिकपणे कबूल करायला हरकत नव्हती Happy

चॅम्पियन बॉलर आश्विनचे नऊ मालिकावीर झाले. कलिससोबत आता तो दुसरा आहे. मुरलीचे अकरा मालिकावीर आहेत. याने बारा केले तर नवल वाटणार नाही. भारतात आपण सध्या जश्या खेळपट्ट्या बनवून जिंकतोय ते पाहता जडेजा आणि अक्षर वगैरे गोलंदाजही मस्त हात धुवून घेणार. आणि त्यांच्यात सरस असलेला आश्विन मालिकावीर मिळवत राहणार.कारण हा भारतातल्या सर्व कंडीशनमध्ये चालतो. नवा बॉल जुना बॉल, लो बाऊन्स एक्स्ट्रा बाऊन्स, पहिला दिवस ते शेवटचा दिवस, त्याकडे ईतके वेरीएशन आहे आणि तो ते सेट अप करायला ईतके स्मार्टली वापरतो की बस्स! कायम विकेटचे खाते भरलेलेच राहणार. वरचेवर मालिकावीर होत राहणार..

यादव पटेल यांचा सामना.
भारतातर्फे दोन यादव संघात तर एक बारावा गडी.
आपला अक्षर पटेल तर त्यांचा अझाझ!
भारत वि न्यूझीलंड का आय पी एल?

त्यास चौथ्या इनिंगचा चेस सराव वगैरे ठिगळ जोडायची गरज नव्हती ... बाकी पुन्हा कलकत्ता कसोटी होऊ नये अशी भिती असेल तर ती देखील प्रामाणिकपणे कबूल करायला हरकत नव्हती > मी काय म्हणतो, द्रविडला जो थोडाफार क्रिकेट खेळला आहे, थोडीफार कॅप्टन्सी केली आहे, थोडाफार कोचिंगचा अनुभव आहे , त्याला क्रिकेटमधले किंचितसे तरी कळत असेल असे समजून त्याला संशयाचा फायदा देउया का ? तू किती वेळा भारतीय संघाला एव्हढ्या आक्रमकपणे किंवा किमान पॉझीटीव्ह पणे खेळताना पाहिले आहेस ? बॉलिंग तशी नसेल तरी स्वतः मानसिक कंडीशन ठेवून खेळता येतेच ना ?

तर त्याला दोन दिवसांत हरवायचा प्रयत्न करणं ही खरी टेस्ट मॅच खेळण्याची मानसिकता हवी. मला वाटतं गावसकरने असं मत मांडलंय व तें मला योग्य वाटतं . >> भाऊ पण दोन दिवसांमधे हरवले तर तुम्ही पिच ला दोष देता , हे काय बरोबर नाही बुवा Lol

"आफ्रिकेचे वेध लागले आहेत. " - येस्स! एक कठीण पेपर सोडवायची तयारी चाललीय.

मला ते चौथ्या इनिंग चा चेस सिम्युलेट करायची कल्पना आवडली. तसाही भरपूर वेळ होता मॅच मधे. मुंबईचं पीच हे भारतातल्या बाकीच्या पीचेसपेक्षा वेगळं (लाल माती) आहे. त्यावर तिसर्या इनिंगमधे साऊदी आणि जेमिसन ने बाऊन्सर्स वर एक सेशन पुजारा, मयंक आणि गिल ला चांगलं टेस्ट केलं. गावसकर चं 'टेस्ट मॅचेस प्रॅक्टीससाठी नसतात' हे मत तात्विक दृष्ट्या बरोबर असलं तरी प्रत्यक्षात हे कितीतरी वेळा घडत असल्यामुळे 'कॉमेंट्री जुमला' वाटला (तो अधून मधून असं पिल्लू सोडतो)

"बॉलिंग तशी नसेल तरी स्वतः मानसिक कंडीशन ठेवून खेळता येतेच ना ?" - +१

*भाऊ पण दोन दिवसांमधे हरवले तर तुम्ही पिच ला दोष देता , हे काय बरोबर नाही बुवा* - माझ्या दोष देण्याला घाबरून जर मॅच लांबवली असेल, तर तेंच कारण सांगावं ना. भलतंच कारण कां ! Wink ( आणि हो, पाहुणे संघ एजाज पटेलसारखे गोलंदाज घेवून यायला लागले, तर आपण दोष देण्यासारखं पीच बनवणंही बंद करूंच ! Wink )

*बॉलिंग तशी नसेल तरी स्वतः मानसिक कंडीशन ठेवून खेळता येतेच ना ?" - पण जिंकणं जवळ जवळ निश्चित आहे हें माहित असतांना टेंशनखाली खेळण्याची मानसिक कंडीशन कशी ठेवतां येईल ? कितीही 'नेट प्रॅक्टीस ' केली तरीही ' मॅच प्रॅक्टीस' अत्यावश्यक त्याकरतांच तर मानली जाते ना !

( *त्याला संशयाचा फायदा देउया का ? * - द्यावाच! पण त्याकरतां आमच्याही मताच्या प्रामाणिकपणाबद्दल संशय न घेतां !! Wink )

चौथ्या डावात अगदी छोट्या लक्षाचाही पाठलाग करायची वेळ येऊ नये हेच कारण असावे पण क्रिकेटमध्ये सहसा असे कबूल करत नाहीत त्यामुळे बॅटींग प्रॅक्टिसचे कारण दिले यातपण काही चुकीचे वाटत नाही..... कोण कबूल करेल आमच्या फलंदाजाना चौथ्या डावात एजाज पटेल समोर खेळवण्यात रिस्क वाटली? आणि असे उघड कबूल करावे ही अपेक्षाच चुकीची आहे!!

बाय द वे त्या फेसबुकवरुन साभार पोस्टवरुन नावडतीचे मीठ अळणी हाच मुद्दा परत एकदा सिद्ध होतो..... मागे म्हंटल्याप्रमाणे हे असे महत्त्वाचे निर्णय सोयिस्करपणे कधी कॅप्टनचे असतात तर कधी कोचचे Wink

पण जिंकणं जवळ जवळ निश्चित आहे हें माहित असतांना टेंशनखाली खेळण्याची मानसिक कंडीशन कशी ठेवतां येईल ?
>>>>
+७८६ .. ईमॅजिनरी प्रेशर घ्यायचे हे मानवी मनाला तरी शक्य नाही..
आणि समोरच्या गोलंदांजाच्या ईंटेंटचे काय.. त्यांनाही तेच ईमॅजिन करायला सांगायचे का..

असो, स्वरुप यांनी म्हटले तसे, कोण कबूल करेल आमच्या फलंदाजाना चौथ्या डावात एजाज पटेल समोर खेळवण्यात रिस्क वाटली? हेच बरोबर आहे.
तसेच सामना अडीच दिवसात संपल्याने होणारे आर्थिक नुकसानीच्या मुद्द्यातही मला तथ्य वाटते.
मी भारतीय संघाचा कर्णधार वा कोच असतो तरी दोन्ही मुद्द्यांचा विचार करून हाच निर्णय घेतला असता.

*चौथ्या डावात अगदी छोट्या लक्षाचाही पाठलाग करायची वेळ येऊ नये हेच कारण असावे * +1 शेवटीं फलंदाजी करताना आपणही ' 62 ऑल आऊट ' होणं अशक्य नव्हत॔! पण , शेवटची फलंदाजी नको म्हणून शक्य असूनही 'फाॅलो ऑन' न दिल्याची अनेक उदाहरणं आहेत. खोटीं कारणं देण्याची गरजच नसावी.

आता द्रविड कोच झाल्यावर आफ्रिकेत टीम कॉम्बिनेशन काय राहील हे बघणे रोचक.

जर एक स्पिनर खेळवायचा झाल्यास फलंदाजी बघता जडेजाला खेळवले ईंग्लंडला तसे होईल का....
तिथे जडेजाच्या फलंदाजीवर यासाठी अवलंबून राहावे लागत होते की मिडल ऑर्डरचे तिघे जण गेले वर्ष दोन वर्ष २५-२६ च्या सरासरीने खेळत आहेत. जर फलंदाज चांगल्या फॉर्मला असतील तर जडेजाच्या जागी आश्विनला खेळवण्यात येईल का...
किंबहुना तुम्ही पाच बॉलर खेळवणे जर पॉजिटीव्ह ॲप्रोच समजत असाल तर त्यात आश्विनला टाळत जडेजाला फलंदाजीचा विचार करून घेणे हे पुन्हा डिफेन्सिव्हच झाले असे मला वाटते

मला वाटतं, बूमराह व अश्विन हे कसोटी सामन्यांसाठी आपले हुकमी गोलंदाज समजूनच आपली संघनिवड निश्चित करणं हितावह..

Pages