क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

ॲशेस सुरू होऊन तीन दिवस नाही झाले की सहा वेळा कॉमेंटेटर्सनी ऋषभ पंतचे नाव घेतले. असे काल वाचण्यात आले होते. आज किती वेळा घेतले माहीत नाही. पण गाब्बा का गुरूर ईंग्लंड नाही तोडू शकली. तो मान आपल्याकडेच अबाधित राहिला.

रोहित शर्मा इंज्युरीमुळे द. अफ्रिकेविरूद्ध टेस्ट्स खेळणार नाही. मयंकला अजून एक संधी. होपफुली रोहित वन-डेज पर्यंत परत येईल.

ईंग्लंडला सलामीने तारले आणि जिंकवूनही दिले. शर्माचा आधीचा आफ्रिका रेकॉर्ड काहीही असो पण सध्या ज्या डेडीकेशनने खेळत होता ते पाहता आफ्रिकेतही ईतिहास रचायची संधी होती. त्यात बहुधा आफ्रिकेची आजवरची कमजोर फलंदाजी यंदा आपल्यासमोर होती. गरज होती ते त्यांच्या गोलंदाजांना खेळायची. त्यातला महत्वाचा खेळाडूच बाहेर पडला असे झालेय..

शर्मा दुखापतीमुळे टेस्ट खेळणार नाही, तर कोहली मुलीच्या पहिल्या वाढदिवसासाठी वनडे सिरीजवर पाणी सोडणार.

मी शर्माचं कारण समजू शकतो. त्याच्या फिटनेसचा इश्यू पहिल्यापासूनच आहे. त्यात हॅमस्ट्रिंग हा प्रकार उशिराच डिटेक्ट होणार्‍यातला आहे.
पण कोहलीच्या प्रिऑरिटीज नक्की काय आहेत याबद्दल एकदा बीसीसीआयनी आणि त्यानी बसून चर्चा करायला हवी.

मला हवं तेवढंच आणि हवं तेंव्हा मी खेळणार या अ‍ॅटिट्यूड करता जे फॉर्म अन धावांचं बॅकिंग लागतं ते सध्या कोहलीकडे नाही.
नुकताच त्यानी एक ब्रेक घेतला होता, गेल्या वर्षीही मुलीच्या जन्माच्या निमित्तानी तो एक फार महत्वपूर्ण सिरीज सोडून परतला होता. जर धावा होत असत्या तर यातल्या कशानीच काहीही फरक पडला नसता, परंतू हरवलेला फॉर्म परत मिळवण्याच्या दृष्टीनी काही ठेस प्रयत्न होताना दिसत नाहियेत. देशांतर्गत विजय हजारे एकदिवसीय स्पर्धा चालू आहे, (शिखर धवन खेळतोय, गायकवाडनी ५ समन्यांमधे ४ शतकं ठोकली आहेत आणि टोटल ६००+ धावा जमवल्या आहेत) पण कोहलीला त्यातही खेळायची गरज वाटत नाहीये.
म्हणजे स्वतःच्या फॉर्मला तो टोटल गृहित धरून चालला आहे (गेल्या २-२.५ वर्षातली त्याची कामगिरी त्यानी अभ्यासली नसेल का? असेल तर जी जिगर दिसायला हवी ती का दिसत नाही?)

गेट वेल सून वि को. द टीम नीड्स यू बॅक...

कोहलीबाबत सहमत
मुलीचा वाढदिवस हे काही कारण असू शकत नाही.
त्यातही त्याच्या मुलीचा वाढदिवस ११ ला आहे आणि तिसरी कसोटी ११ ला सुरू होतेय. त्याला ब्रेक हवाय नंतरच्या वन डे साठी. यावरून मार्केटमध्ये मीम्स फिरत आहेत.
नक्कीच काहीतरी नाराजगी आहे. सॉरी, काहीतरी कसले. कप्तानी गेल्याचीच. पण अजून एकदिवसीय मालिका सुरू व्हायला वेळ आहे. त्या आधी ती नाराजगी मिटेल आणि असे काही नव्हतेच मुळात वगैरे स्टेंटमेंट बोर्ड आणि कोहली दोघांतर्फे येऊन वातावरण बिघडणार नाही हे बघितले जाईल अशी आशा...

कोहली पनौती भारतीय क्रिकेटपासून लांब राहील तेव्हडं बरं आहे. मी तर बोलतोय त्याला सगळ्याच क्रिकेटमधून निवृत्त करा. हा खार खाऊन आहे कॅप्टनशीप गेली म्हणून. महत्वाचे सामने मुद्दामून हारवायचा.आयपीएल मध्ये पण खेळवू नका. त्याची सावली भारतीय क्रिकेटवर पडणार नाही अशा लांब ठिकाणी त्याची रवानगी करा.

"कोहली मुलीच्या पहिल्या वाढदिवसासाठी वनडे सिरीजवर पाणी सोडणार." - कोहलीने ह्या अफवेचं खंडन केलंय आणि आपण वन-डे सिरीज साठी उपलब्ध असल्याचं सांगितलंय.
"I have not had any communication with the BCCI to say that I want to rest. There were a few things that came out in the past as well, that it was said I was attending some events or something which was absolutely not true either. All these people who are writing these things and their sources, to me they're absolutely not credible." - विरात कोहली चं वक्तव्य.

त्याच वक्त्यव्यामधे त्याने गांगूलीने मला कधीच काँटॅक्ट केला नव्हता हेही सांगितलय. गांगूली रेकॉर्ड वर आहे त्याबद्दल. सगळाच सावळा गोंधळ आहे. हशर्मा नि कोहली च्या दोघांच्या खांद्यावरून कोण तीर चालवत आहे देव जाणे . चांगले चाललेले बघवत नाही का लोकांना.

" सगळाच सावळा गोंधळ आहे. " -खरंय. हे सगळं संपून क्रिकेट सुरू व्हावं लवकर.

आज अ‍ॅशेसमधली दुसरी टेस्ट - डे अँड नाईट. अँडरसन, रॉबिन्सन, ब्रॉड, स्टार्क, रिचर्डसन, कमिन्स - तगडी स्वीम्ग बॉलिंग बघायला मजा येईल.

विजय हजारे ट्रॉफीमधे ऋतुराज अप्रतिम खेळला. दुर्दैवानं महाराष्ट्र क्वालिफाय नाही झाले नॉक-आऊट्स साठी. नाहीतर त्याला आणखी रन्स करायची संधी होती. व्यंकटेश अय्यर पण जबरदस्त फॉर्म मधे आहे. मुंबईचा परफॉर्मन्स अगदीच रसातळाला गेलाय यंदा. सूर्यकुमार यादव चा फॉर्मसुद्धा गंडला होता.

सगळाच सावळा गोंधळ आहे.
>> अगदी

विजय हजारे ट्रॉफीमधे ऋतुराज अप्रतिम खेळला. दुर्दैवानं महाराष्ट्र क्वालिफाय नाही झाले नॉक-आऊट्स साठी.
>> साऊथ अफ्रिकेफिरुद्धच्या वन-डे सिरीजमधे त्याला संधी मिळायला हवी (जबरदस्त फॉर्म मधे आहे गडी)
पण आपल्या एकूण परंपरेला बघता अवघड आहे.
शर्मा, राहुल नंतर धवन, किशन, व्यंकटेश हे तीन जण त्याच्या आधी लाईनमधे असणार...

धवन कुठे आता... आणि किशन वन डे ओपनर / टोप ऑर्डर म्हणून नाही येत.. व्यंकटेश अय्यर येस्स. तो सुद्धा चांगला खेळलाय या स्पर्धेत.. त्याच्यासह रुतुराज दोघे लवकरात लवकर वन डे मध्ये यायला हवेत. पण येते वर्ष २०-२० चे आहे.. वन डे कमी

धवन कुठे आता...
>>
गेल्या ११ इनिंग्जमधे (२०२०-२१ मधल्या) ६ अर्धशतकांसह ~५९च्या सरासरीनी अन ९१+ स्ट्राईकरेटनी ५८७ धावा
आतापर्यंत अफ्रिकेत १२ इनिंग्जमधे २ शतकं अन २ अर्धशतकांसह ~५० च्या सरासरीनी अन १०० स्ट्राईकरेटनी ५४४ धावा

या आकड्यांनंतरही अफ्रिकेतल्या वनडेज साठी धवन ला कन्सिडर न करणं आपल्या निवड समितीला अवघड आहे
आपली निवड समिती अजूनतरी रेकॉर्ड्स बघूनच घेते, फ्यूचर प्लॅन बघून नाही. हा अप्रोच बदलला तर ते खरंच सुखवाह असेल.

विजय हजारे ट्रॉफीमधे ऋतुराज अप्रतिम खेळला >> एकदमच. खर तर ओडिआय नवीन खेळाडूंना चाचपडून बघायला वापरल्या पाहिजेत. चार वर्षांनंतर येणार्‍या वर्ल्ड कपसाठी दोन वर्षे सेट्ल्ड टीम बस्स झाली की.

तगडी स्वीम्ग बॉलिंग बघायला मजा येईल. >> बॉलिंङ चांगली होती पण कुठे तरी माशी शिंकली इंग्लंड साठी वॉर्नर फॉर्‍म मधे आलाय त्यामूळे अर्धे प्रॉब्लेम निकाली निघालेत.

रोहीत- कोहली वाद सध्या तरी वरकरणी मिटलेला दिसतोय. हरकत नाही. पर्फॉर्मन्स वर परिणाम होऊ नये म्हणजे झाल. शास्त्रीबुवांनी बरच पांघरूण घातल होत. द्रविड साहेब आता ही धेंड कशी संभाळतायत ते बघू. त्यांना ऑल द बेस्ट.
इशांतला कशाला घेतात आता मला समजत नाही. तो तरी का रिटायर होत नाही. ३५ वर्षे म्हणजे लिमिट पाहिजे.
त्या भारत ने मस्त किपिंग केली न्यूझिलंड विरूद्ध. तो, अय्यर आणि ॠतुराज लवकर टीम मधे यायला पाहिजेत.
परदेशी जेंव्हा जातो तेंव्हा पहिल्या टेस्ट पर्यंत कुणाला ड्रॉप करायचे हा आपला प्रॉब्लेम पहिली टेस्ट झाली की कुणाला घ्यायचे याच्यात कन्व्हर्ट होतो. Happy

नविन राजवटीमधे मधली फळी अस्थिर झाली होती त्याचे काय करायचे याचे उत्तर लवकर शोधायला लागणार आहे.
आपली पूर्वीची दुलिप ट्रॉफी खूप चांगला सराव द्यायची. तशीच पुन्हा सुरू करून १५ दिवस त्यासाठी राखिव ठेऊन सर्व कॉन्ट्रक्ट असलेल्या खेळाडूंनास दर वर्षी खेळवायला पाहीजे.

शास्त्रीबुवांनी बरच पांघरूण घातल होत.
>>>
मुळात पांघरूण घालायला त्याकाळी दोघांमध्ये काही विशेष वैयक्तिक वादच नव्हते. आता एकाची कतानी काढून दुसऱ्याला दिली की हुमायुन नेचरने जे वाटणार, जे दोघांमध्ये टेंशन तयार होणार त्याच स्वाभाविक भावना तयार झाल्या आहेत.

मूळ वाद शर्मा-कोहलीचा नसून कोहली-बीसीसीआयचा आहे हे लक्षात घ्या..

अर्थात विराट कितीही आव आणत असला की त्याच्याशी कोणी काही बोलले नाही तर त्याने एकदा फेसबूकवर चक्कर टाकली असती तरी त्याला आधीच समजले असते की त्याची कप्तानी जाणारच होती. ईथल्या कधीही हातात सीजनचा बॉल न पकडलेल्या शेमड्या पोरालाही हे कळले होते की वर्ल्डकपनंतर २०-२० सोबत त्याची वन डे कप्तानी सुद्धा जाणार. त्यालाही हे माहीत होतेच. त्याने पालीने जीव वाचवायला शेपटी तोडावी तशी २०-२० कप्तानी सोडून बीसीसीआय शांत होतेय का हे बघायचा प्रयत्न केला. पण बीसीसीआयमध्ये दादा आहे. तुमच्याकडे एक ॲटीट्यूड आहे तर त्याच्याकडे गोडाऊन आहे. त्याने जे करायचे ते केलेच. उलट मस्त रेड बॉलला एकच कप्तान हवा हे कारण मिळाले. जणू हे आधी कोणाच्या लक्षातच आले नव्हते.

वाईट एका गोष्टीचे वाटतेय की यात बिचाऱ्या शर्माचे मरण होतेय. सोशलसाईटवर विराट चाहते खवळले आहेत आणि शर्माच्या मागे लागलेत.

जर आपण हा आफ्रिका दौरा हरलो तर त्याच तापल्या तव्यावर कोहलीची कसोटी कप्तानीही काढून घेतली गेली तर आश्चर्य वाटणार नाही. जर त्याने बीसीसीआयशी पंगा घेणे आता थांबवले नाही तर...

ईतकेच नाही तर त्याच्यावर त्यानंतर संघातली जागा वाचवायचे टेंशनही वर्ष दोन वर्षात येऊ शकते.. सचिनला १९४ वर थांबवणाऱ्या लोकांशी त्याने पंगा घेतलाय. विराट काही त्यापेक्षा मोठा खेळाडू नाही Happy

"आपली पूर्वीची दुलिप ट्रॉफी खूप चांगला सराव द्यायची. " - दुलीप आणि इराणी ट्रॉफी दोन्ही बंद झाल्या. इराणी ट्रॉफीनंतर तर वन-डे साठी टॉप टियर ची कुठलीच स्पर्धा उरली नाही. रणजी आणि हजारे मधून निवडलेल्या टॉप टियर प्लेयर्स ना अनुक्रमे टेस्ट्स आणि वन-डे साठी निवडायच्या आधी दुलीप आणि इराणी च्या चाळणीतून जावं लागे. आता ए टीम्स च्या दौर्यातून मिळणारी संधी हा एक मार्ग आहे. पण त्यात कमी खेळाडूंना संधी मिळते.

"भारत ने मस्त किपिंग केली न्यूझिलंड विरूद्ध. तो, अय्यर आणि ॠतुराज लवकर टीम मधे यायला पाहिजेत." - तिघंही छान खेळले हजारे मधे. बॉलिंगमधे कुणी फारसं लक्षात येईल असं काही केलं नाही. महाराष्ट्राचा नवीन ओपनर यश नहार सुद्धा मस्त बॅट्समन आहे. आयपीएलमधे दिसला तर आश्चर्य वाटणार नाही.

परदेशी जेंव्हा जातो तेंव्हा पहिल्या टेस्ट पर्यंत कुणाला ड्रॉप करायचे हा आपला प्रॉब्लेम पहिली टेस्ट झाली की कुणाला घ्यायचे याच्यात कन्व्हर्ट होतो >> हे आवडले.

फे फ. इराणी तर पारच विसरून गेलो होतो रे. मधे ते इंडिया रेड , ग्रीन, ब्ल्यू प्रयोग केले होते ते तरी सुरू ठेवायला हवे होते.

विक्रमसिंह, बरोबर. इराणी पाच दिवसांची असायची. रणजी विजेते वि. रेस्ट ऑफ इंडिया.

असामी, तू एन के पी साळवे चॅलेंजर ट्रॉफी बद्दल बोलतोयस. आणि मी सुद्धा त्याविषयीच बोलत होतो.

साळवे चॅलेंजर ट्रॉफी म्हणजे तेव्हाची आयपीएल होती. आपले प्लेअर आपसात खेळताना बघायचा आनंद. लाईव्ह प्रक्षेपणही व्हायचे, त्यामुळे बघितली जायची. सुरुवातीला बहुधा सिनिअर टीम स्ट्राँग करून ए टीम बी टीम नवोदितांच्या असल्याने तुलनेत कमकुवत असायच्या. त्यामुळे सिनिअरच जिंकायचे. मग ही चूक लक्षात आल्याने मुख्य प्लेअर विभागून तिन्ही टीम थोड्याफार तुल्यबळ केल्या जाऊ लागल्या. ब्ल्यू रेड ग्रीन अशी नावेही पुढे बदलली.

मटाच्या शेवटच्या पानावर या सगळ्याचे सविस्तर वृत्तांत यायचे आणि मग संक्षिप्त धावफलक..... कितीतरी खेळाडूंची नावे तोंडपाठ पण चेहरे माहित नाही अशी अवस्था असायची तेंव्हा!!

तळाच्या फलंदाजांवर बॉडीलाईन बॉलिंग टाकून त्यांना जायबंदी करायचा प्रयत्न करायचा आणि त्यांची बॉलिंग दुबळी ही ऑस्ट्रेलियाची सध्या क्रिकेट खेळायची रीतच झाली आहे. त्यांनी भारता विरूद्ध ते केले आणि आता इंग्लंड विरूद्धही तेच करत आहेत. अतिशय खुनशी आणि गुन्हेगारी जमात.

अतिशय खुनशी आणि गुन्हेगारी जमात.>>>

जेफ बॉयकॉट म्हणायचे ऑसी म्हणजे इंग्रज जगभर राज्य करीत होते तेंव्हा गुन्ह्यात शिक्षा झालेल्या लोकांना शिक्षा म्हणून ह्या निर्मनुष्य बेटावर सोडून द्यायचे त्याच गुन्हेगारांची वस्ती पुढे ऑस्ट्रेलिया म्हणून उदयास आली!

त्याच गुन्हेगारांची वस्ती पुढे ऑस्ट्रेलिया म्हणून उदयास आली!
>>
हो, हे मागे माझ्याही वाचनात आलेले. जेव्हा ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले होत होते

जेफ बॉयकॉट म्हणायचे ऑसी म्हणजे इंग्रज जगभर राज्य करीत होते तेंव्हा गुन्ह्यात शिक्षा झालेल्या लोकांना शिक्षा म्हणून ह्या निर्मनुष्य बेटावर सोडून द्यायचे त्याच गुन्हेगारांची वस्ती पुढे ऑस्ट्रेलिया म्हणून उदयास आली!>>करेक्ट .
एकदा मुथय्या मुरलीधरनने पण त्याला चकर म्हणणार्‍या रेसिस्ट ऑस्ट्रेलियन्सना
"I Know your roots and from where you come from" म्हणून गप्प केले होते.

अ‍ॅशेस च्या दुसर्या मॅचमधे बटलर ने एक बाजू लावून धरत २०७ बॉल्स खेळून काढले (२६ रन्स) आणि शेवटी हिट-विकेट झाला. Uhoh

डे-अँड नाईट टेस्ट ला पहिल्या आणि दुसर्या सेशन च्या मधल्या ब्रेक ला डिनर ब्रेक म्हणतात (डे मॅच च्या लंच ब्रेक ऐवजी), तर दुसर्या आणि तिसर्या सेशन च्या मधल्या ब्रेकला परत टी टाईम म्हणण्याऐवजी, डिझर्ट टाईम, मिड-नाईट स्नॅक टाईम, ब्रँडी टाईम वगैरे का नाही म्हणत? अगदीच unimaginative आहेत क्रिकेट अ‍ॅडमिनिस्ट्रेटर्स. Happy

Pages