क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

खोटीं कारणं देण्याची गरजच नसावी. > एकीकडे संशयाचा फायदा द्यावाच म्हटल्यावर हे विधान कितपत योग्य आहे हे तुम्हीच ठरवा भाऊ. "त्यांना ऑप्शन दिसला नि आहे त्या लिमिटेशन मधे आपण तसा प्रयत्न करून बघू" असे म्हणत त्यांनी केला एव्हढे साधे सरळ असू शकत नाही का ? समोरची टीम त्या प्लॅनमधे सामील नाही हा कॉमन सेन्स त्यांनाही असेल असे न धरण्यासारखे काय समोर आहे नक्की ? शाळा कॉलेजांपासून मुख्य परीक्षेंच्या आधी लोक प्रॅक्टिस टेस्ट्स घेत आले आहेत च ना मॉक म्हणून ? आर्थिक नुकसानी सारख्या हास्यास्पद कारणांवर तुम्ही तरी विश्वास ठेवू नका कृपया.

ईमॅजिनरी प्रेशर घ्यायचे हे मानवी मनाला तरी शक्य नाही.. >> बाबा, असेल तसे. तू म्हणतोस तर तसेच असेल. भारतीय संघाचे कर्णधार नि कोच सामना अडीच दिवसात संपल्याने होणारे आर्थिक नुकसान बघून निर्णय घेत असणार ह्यात शंकाच नसावी. कसे सुचते रे तुला हे सगळे !!! निव्वळ ब्रिलियंट !!! तूच हे त्यांना सुचवले असेल अशी शंकाही माझ्या मनात चाटून जात आहे.

मला नाही सुचले ते. एक मतप्रवाह तसा आहे. मला ते शक्य वाटले.

तुम्हाला तो १९९२ चा वर्ल्डकप आठवतोय का ज्यात एका टुक्कार नियमामुळे १ बॉल २२ होत आफ्रिका बाहेर गेलेली.

तो नियम टुकार होताच पण मुळात एक्स्ट्रा वेळ का मिळाला नाही सामन्यांना यामागेही ब्रॉडकास्टरच होते हे ठाऊक आहे का?
हे तेव्हाचे.. आज तर क्रिकेट म्हणजे पैसा हे समीकरण झालेय. अनिर्णित सामने रटाळ होत क्रिकेटचे नुकसान करतात तसेच दोन अडीच दिवसात संपणारे सामनेही आर्थिक नुकसान करतात.
जर क्युरेटर गोलंदाजांना सहाय्यक पिच बनवून सामना निकाली ठरवत असतील. तर सामन्याचा निकाल न बदलणारे निर्णय आर्थिक बाबींचा विचार करता आणि एकूणच कसोटी क्रिकेटच्या फायद्याचा विचार करता घेणे यात मला तरी काही गैर वाटत नाही.

बाकी लोकं आयपीएल खेळतात. फ्रॅंचायजी क्रिकेट खेळतात. तिथे दमतात. मरतात. दुखापतग्रस्त होतात. आणि त्यानंतर जो काही जीव बाकी राहतो तेव्हा देशासाठी खेळतात. अन्यथा विश्रांती घेतात. हे सारे वैयक्तिक आर्थिक गणित जुळवूनच घेतले गेलेले निर्णय असतात. अति क्रिकेटमुळे कधी आयपीएल थांबवली जाणार नाही. किंबहुना ईण्टरनॅशनल क्रिकेट अति होतेय तिथेही बीसीसीआयने सांगितले आहे की झेपेल तेवढे खेळा अन्यथा आराम करा. दोन संघ एकाच वेळी खेळतील एवढे प्लेअर आहेत आपल्याकडे. सारे पैश्याचेच गणित आहे. आपण ईंग्लंड दौरा न लांबवता झटक्यात परत आलो यामागेही त्यानंतर सुरू होणारी आयपीएल हे कारण होते. सगळ्याच गोष्टी ना तुम्हाला माहीत असतील ना मला माहीत आहेत. पण जे चालते ते बघून अंदाज येतोच थोडाफार. नाकारण्यात अर्थ काय...

आणि हो, कमावताहेत तर कमाऊ द्या खेळाडूंना. त्यावरून त्यांची डिग्निटी आणि सो कॉलड देशप्रेम वगैरे जज करणारा मी तरी नाही Happy

पाक बांगला टेस्ट रोचक झालीय.
जो सामना अनिर्णित व्हायचा होता तिथे बांग्लादेशने हरायचा मार्ग शोधला आहे.

घ्या आली खबर ...
रोहीत शर्मा कसोटी उपकर्णधार
आणि वन डे कर्णधार Happy

वर्ल्डकप आला रे ...

बरं झालं कोहलीला काढला. परफॉर्मन्स झिरो देऊन टीमला हारवायचा आणि वरतून त्याचे फॅन्स तर गिरे तो भी टांग उपर या मोडमध्ये सगळ्यांशी भांडायचे. टीम हारल्याचं दुःख तर असायचंच सोबत याचे फॅन्स सावरासावरीचे पोस्ट टाकून नुसता उच्छाद मांडायचे.

मला नाही सुचले ते. एक मतप्रवाह तसा आहे. मला ते शक्य वाटले. >> "एक" मह्त्वाचा ह्यात. एकाचाच मतप्रवाह !

नाकारण्यात अर्थ काय... > क्रिकेट मधले पैशाचे स्थान नाकारले नसून 'डाव डिक्लेअर करणे कोच नि कप्तान पैशाकडे बघून ठरवतात' हे मत नाकारले आहे. हा मोठा फरक तुम्हाला कळत नसेल असे नाही. नाकारण्यात अर्थ काय...

अश्विन ला फायनली बाहेर सलग सामने स्पिनर म्हणून खेळायला मिळेल. जयंत यादव येण्याचे चान्सेस अगदीच कमी वाटतात. एकमेव स्पिनर अ‍ॅश असेल. गेल्या काही वर्षांमधे बाहेरसुद्धा तो एफेक्टिव्ह ठरू शकेल इतपत बदल त्याने केलेला आहे तेंव्हा उत्सुकता आहे काय होते त्याची.

रोहित नि राहुल इंग्लंड सारखेच सटकून खेळले तर सिरीज जिंकायचा जबरदस्त मौका आहे. आफ्रिका बॅटींगच्या बाबतीमधे प्रथमच एव्हढी कमकुवत वाटते आहे. रबाडा नि नॉकेये मूळे बॉलिंग तेव्हढीच धारदार वाटते आहे. एकूण सिरीज इंटरेस्टींङ होईल.

अ‍ॅशेस मधे इंग्लंड बॉलर्स काय कमाल करतात का बघूया. कमिन्स ला कप्तान म्हणून जबरदस्त डॅब्यू मिळाला. अँडरसन ला पहिल्या टेस्ट मधे न खेळवणे अननेसेसरी गँबल वाटते. ब्रिस्बेन मधे क्लाऊड कव्हर मधे धमाल केली असती त्याने.

अर्रर्र... कोहलीला काढला कॅप्टनशीप वरून मग आम्ही फॅन्सनी काय करायचं???? पण कोहली अजूनही rcb चा कप्तान आहे/असावा. तिथे त्याचे कॅप्टनशीप स्किल्स आम्ही फॅन्स पाहू शकतो. मला वाटतं कोहली हा तारे जमीन पर पिक्चरमधला तो लहान पोरगा आहे त्याला अक्षर उलटे दिसायचे तसे कोहलीला पण टेबल उलटा दिसतो म्हणून नेहमी तो संघाला शेवटच्या चारमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. जर आमीर खानला rcb चा कोच केला तर तो कोहलीला योग्य ती ट्रेनिंग देऊन संघ टॉप फोरमध्ये आणण्याचा प्रयत्न करेल. तिथे एकदा टॉप फोर मध्ये यायला लागला की द्यावी त्याला इंडिया कॅप्टनशीप पुन्हा. तोपर्यंत आम्ही फॅन्स आहोत सोशल मीडिया सांभाळायला.

असामी, मी जे लिहायला आलो होतो, ते सगळंच (ऑल्मोस्ट) तू लिहून टाकलंस Happy असो.. उरलेला एक मुद्दा लिहीतो.

रहाणे साठी ही कदाचित शेवटची संधी असेल. त्याला करियर-सेव्हिंग मोठे परफॉर्मन्सेस देण्याची गरज आहे. इंग्लंड सिरीजच्या वेळी ही चर्चा इथे झाली होती की न्यूझिलंड विरूद्ध होम सिरीज त्याच्यासाठी मेक ऑर ब्रेक असेल. पण इन्ज्युरीने (त्याच्या आणि गिल च्या) त्याला अजून एक संधी दिली असावी. एका परफॉर्मन्स मुळे अय्यर रहाणे ला लगेच रिप्लेस करणार नाही कदाचित, पण आता रहाणे ने मोठ्या / इंपॅक्ट इनिंग्ज खेळल्या नाहीत तर शुभमन गिल ला त्याच्या जागी संधी मिळेल असं मला वाटतं.

एका परफॉर्मन्स मुळे अय्यर रहाणे ला लगेच रिप्लेस करणार नाही कदाचित, पण आता रहाणे ने मोठ्या / इंपॅक्ट इनिंग्ज खेळल्या नाहीत तर शुभमन गिल ला त्याच्या जागी संधी मिळेल असं मला वाटतं.>> अरे हो राहाणे राहिलाच. हि अगदी शेवटची संधी नसली तरी तो आता तळ्यात मळ्यात ह्या मोड मधे जाईल असे वाटतेय. गिलचे नाव पुढे यायला लागलाय (डिसर्वींगली) नि श्रेयस , सूर्या पण प्रेशर टाकू लागले आहेत. विहारी चा एकंडत आफ्रिका अ मधला खेळ बघता तो पण 'हवाच असेल तर सहावा ' ऐवजी 'नक्कीच पाचवा' बनू शकतोय. आफ्रिका अ मधे खेळ विहारी वगळता एकदम हा प्रमोट व्हायला हवाच असे कोणीच खेळले नाही, वाईटही कोणी खेळले नाही. एकंदर सगळेच मधे मधे नीट खेळले असे वाटले.

शेवटच्या संधी वरून इशान चा हा शेवटच्या काही दौर्‍यांमधला असेल असे वाटतेय. विशेषतः सिराज इंप्रोव्ह्याईज्ड असल्यामूळे डीफॉल्ट तीन बुमरा, शमी, सिराज अशी पेकिंग ऑर्डर होईल असे दिसतय. इशान इंजरी /बदल// रोटेशन मूळे आत येईल.

"एक" मह्त्वाचा ह्यात. एकाचाच मतप्रवाह ! >>>> छे हो, मी कित्येक सामान्य क्रिकेटप्रेमींचे ट्विट्स आणि फेसबूक पोस्ट आणून दाखवू शकतो या आशयाचे. पण असो, आपल्याला सचिन द्रविड आदी म्हणतात तेच पटणार. कारण सामान्य क्रिकेटप्रेमींना थोडी ना त्यांच्याईतके क्रिकेट कळते Happy

कोहलीचा वन डे आणि २०-२० आणि कसोटीसुद्धा.. सारेच रेकॉर्ड जबरदस्त आहेत.. पण ते एक असते ना, आयसीसी टूर्नामेंट जिंकता येत नाही त्याला म्हणून हा कप्तान बदल झालाय. आणि ते योग्यच झालेय. कारण बदल हा झालाच पाहिजे. स्पेशली तुमच्याकडे द ग्रेट शर्मा असताना ज्याने कप्तानीत आशियाकप डॉमिनेट करत जिंकला आहे. गेल्या वर्ल्डकपला पाच शतके मारत एकहाती भारताला सेमीला पोहोचवले आहे. जो आजच्या तारखेला आपला ऑल फॉर्मेटचा विचार करता सर्वोत्तम फलंदाज आहे, मोठ्या स्पर्धात खेळणारा आहे, आणि नेतृत्वगुणही असणार आहे. अश्याला तुम्ही पुर्ण कारकिर्द एकही संधी न देणे अन्यायकारक ठरले असते. स्पेशली तेव्हा जेव्हा तुम्ही धोनीनंतर आयसीसी टूर्नामेंट जिंकायला अपयशी ठरत आहात.

पण असो, आपल्याला सचिन द्रविड आदी म्हणतात तेच पटणार. कारण सामान्य क्रिकेटप्रेमींना थोडी ना त्यांच्याईतके क्रिकेट कळते >> तर आपल्या मते सामान्य क्रिकेटप्रेमींना सचिन द्रविड आदी पेक्षा अधिक कळते ? आपण म्हणता तर नक्कीच असेल . शेवटी फुकट मिळणार्‍या सोशल मिडिया वर मतांच्या पिंका टाकणे हे प्रत्यक्ष क्रिकेट खेळणे, जगणे अधिक कठीण आहे.

कोहलीचा वन डे आणि २०-२० आणि कसोटीसुद्धा.. सारेच रेकॉर्ड जबरदस्त आहेत.. पण ते एक असते ना, आयसीसी टूर्नामेंट जिंकता येत नाही त्याला म्हणून हा कप्तान बदल झालाय >> हे मान्य आहे तर डु आयडी वापरून दर दोन पोस्ट्स आड कोहली बद्दल पिंका टाकण्याची गरज का भासते कोण जाणे तुला ? प्रश्न 'रोहित कप्तान होणे योग्य कि नाही' हा नाही तर टूर्नामेंट न जिंकल्यामूळे 'कोहली कप्तान म्हणून फडतूस आहे' हे सांगण्याच्या प्रवृत्तीचा आहे. फक्त टूर्नामेंट न जिंकणे म्हणून कप्तान फडतूस हा क्रायटेरिया किती योग्य हे तूच ठरव. किमान अ‍ॅप्रोचेबल नाही वगैरे तरी वापरायचे .

सोशल मीडियावर कोहली फॅन्स सापाच्या शेपटीवर पाय पडल्यागत चवताळलेत. जीवाचं बरं वाईट करून घेतली की काय अशी भीती वाटायला लागले मला Lol

तर आपल्या मते सामान्य क्रिकेटप्रेमींना सचिन द्रविड आदी पेक्षा अधिक कळते ? >>>> सुंदर अर्थ काढलात Happy

हे मान्य आहे तर डु आयडी वापरून दर दोन पोस्ट्स आड कोहली बद्दल पिंका टाकण्याची गरज का भासते कोण जाणे तुला ? >>> छे हो, माझा कोणताच ड्युआयडी नाहीये जो मी कुठल्याही अश्या कामासाठी वापरतो. हे बळच काहीही आरोप करायचा आणि मी मात्र क्रिकेटमधील फिक्सिंगबद्दल काही म्हटले की प्लेअर्सच्या डिग्निटीवर शंका वगैरे म्हणायचे Happy

अवांतर - कोहलीवर टिका करायला ड्युआयडी वापरणे हे वाचून मला हसावे की रडावे कळत नाहीये. म्हणजे या कामासाठी कोणी डु आयडी का वापरेल Proud

ओ बोकलत, लोकं तुमचा राग माझ्यावर काढत आहेत. कोहलीला काही बोलू नका आता Happy

प्रॉब्लेम आहे आहे की आपण खेळाडूंना देव दैवते बनवून ठेवलेय. मग सचिन द्रविड यांच्या एखाद्या निर्णयाबद्दल आणि खेळीबद्दल कोणी काही शंका घेतली की मग त्याचे ज्ञान काढायचे असे होतेय Happy

"आफ्रिका अ मधे खेळ विहारी वगळता एकदम हा प्रमोट व्हायला हवाच असे कोणीच खेळले नाही, वाईटही कोणी खेळले नाही. एकंदर सगळेच मधे मधे नीट खेळले असे वाटले." - हो. खरंय. इशान किशन चांगला खेळला. पण टेस्टपर्यंत पोहोचायला त्याला बराच अवकाश आणि मधे बरेच खेळाडू आहेत. (तुझ्या पोस्टमधे तू इशांत शर्माविषयी लिहीत असताना 'इशान' असं लिहील्यामुळे जरा गोंधळ झाला होता Happy ). इशांतच्या बरोबरीनं उमेश यादव चं ही भवितव्य डळमळीत वाटतंय. पण कदाचित इशांतच्या पुढे त्याचा नंबर (पेकिंग ऑर्डर मधे) असू शकतो. ह्या सगळ्यात एक मस्त लेग-स्पिनर हवा होता असं फार वाटतं. चांगल्या लेग स्पिनरची बॉलिंग बघणं म्हणजे निव्वळ आनंद असतो. (पर्सनल बायस असू शकतो).

मग सचिन द्रविड यांच्या एखाद्या निर्णयाबद्दल आणि खेळीबद्दल कोणी काही शंका घेतली की मग त्याचे ज्ञान काढायचे असे होतेय >> तुझ्या ज्ञानावार शंका घ्यायची माझी काय बिशाद रे बाबा ! आयपील च्या मॅचेस घरबसल्या फिक्स करणारा तू , सचिन, द्रविड पेक्षाही तुला जास्त कळते ह्याची जाणीव आहे मला. तू डिग्निटी बद्दल बोलावे ह्या पेक्षा अधिक विरोधाभास काय असावा *सेल्फ म्यूसिंग*.

. ह्या सगळ्यात एक मस्त लेग-स्पिनर हवा होता असं फार वाटतं. चांगल्या लेग स्पिनरची बॉलिंग बघणं म्हणजे निव्वळ आनंद असतो. (पर्सनल बायस असू शकतो). >> इशान बद्दल गडबड झाली रे. शर्माबद्दलच बोलत होतो. इशान किशन दोन चांगल्या इनिंग्स खेळला बहुतेक आठवतेय त्याप्रमाणे. लेग स्पिनर आफ्रिकेमधे मजाच आली असती पण बिश्नोई वगळता असे कोणी लक्षात आले नाही . तोही फक्त व्हाईट बोलपुरताच माहित आहे. अर्थात रेड बॉल डोमेस्टीक क्रिकेट फारसे होत नाहीये त्यामूळे नवीन कोणी येणे पण शक्य नाही.

बोकलत, हे उलटेही असू शकते. म्हणजे वरचे खरे घडलेले आणि खालचे कोहली ज्यांना आवडत नाही त्यांना वाटणारे

सत्य काय आहे हे सामान्य लोकांना कळत नाही. आपले काम तर्क लावणे Happy

बाकी ज्याप्रमाणे २०-२० वर्ल्डकपच्या आधीच कोहलीने राजीनामा दिला. जे करणे चुकीचे होते. तसेच एकदिवसीयबाबत मात्र त्याने राजीनामा दिला नसून तो निर्णय मग बीसीसीआयने वर्ल्डकपनंतरच्या पहिल्याच मालिकेत घेतला हे पाहता या प्रकरणात बॉस बीसीसीआयच होती हे उघड आहे.

त्यात वर्ल्डकपचा संघही असा होता की शर्माच्या आयपीएल संघातील मुंबई ईंडियन्सचा त्यात भरणा होता. २०-२० मध्ये ज्याला कोहलीने कधी खेळवले नाही तो आश्विन अचानक वर्ल्डकपच्या संघात आला. मुंबई ईंडियन्सचा राहुल चहरही होता पण त्याचवेळी चहलसारख्याला डावलले गेले. धोनीला अचानक भयानकमध्ये मेंटर म्हणून डोक्यावर आणून बसवले. हे सारे काही आलबेल नसल्याची लक्षणेच होती.

Sourav Ganguly, the BCCI president, has confirmed that the board had requested Virat Kohli to continue as India's T20I captain, but once he decided to step down, the selectors decided to remove him from the ODI captaincy and install Rohit Sharma in his place to avoid "too much of leadership" in India's short-format squads.

"We had requested Virat not to step down as T20 captain but he didn't want to continue as captain," Ganguly told PTI. "So, the selectors felt that they cannot have two white-ball captains in two white-ball formats. That's too much of leadership."

हे गांगुली ने स्पष्ट केलेले आहे पण अर्थात गांगुलीलाही काय घंटा कळते असे आपण म्हणू शकतो. होपफुली वर्ल्ड कप इवेंट्स जिंकणे हा तुझ्या कॅप्टन्सिचा क्रायटेरिया असेल असे नकळत सुचवून रोहित वर गरज नसलेले टेंशन लादले नसेल अशी आशा ठेवूया.

ट्रॅविस हेड कसला जबरदस्त खेळला आज. मजा आली एकदम. इंग्लंद एव्हधी चांगली बॉलिंग करूनहि एकदम बॅकफूटवर गेलेय त्यामूळे.

जितकी मॅच बघता आली त्यात हेड आणि लबुशेनचीच बॅटींग बघताना टेस्ट मॅच बघतोय असं वाटलं. बाकी सगळे ऑसी बॅट्समेन एक्स्टेंडेड टी ट्वेंटी खेळतायत असं वाटत होतं. अँडरसन आणि ब्रॉड दोघांनाही विश्रांती देण्याचा निर्णय बॅकफायर झाला. इंग्लंडची प्लेयर्स ना रेस्ट करण्याची स्ट्रॅटेजी एग्झिक्यूट करणारी जी कुणी मंडळी आहेत त्यांना कुणी काही फीडबॅक देतात का नाही काय माहीत? इंडिया टूरमधे सुद्धा काही अनाकलनीय निर्णय घेतले होते.

हे गांगुली ने स्पष्ट केलेले आहे पण अर्थात गांगुलीलाही काय घंटा कळते असे आपण म्हणू शकतो.
>>>>

हे गांगुलीने स्पष्ट केले यातच कळते की दादा वस्ताद आहे. त्याला काही कळत नाही असे कसे म्हणेन. Happy

जणू विराटने २०-२० कप्तानी सोडताना असे आता वन डे आणि २०-२० दोन वेगळे कप्तान नको हे त्यावेळी कोणाच्याही लक्षात आले नाही आणि आता अचानक साक्षात्कार झाला Happy
बीसीसीआयच्या अध्यक्षांना साजेसेच स्टेटमेंट दिले आहे ते...

https://www.espncricinfo.com/story/rohit-sharma-i-want-middle-order-to-p...
>>
शर्मा म्हणतो की मधल्या फळीनी १०/३ सारख्या स्कोअर्सवरूनही चांगला खेळ दाखवण्यासाठी तयारी करायला पाहिजे.
अप्रोच चेंजच्या दृष्टीनी चांगलं पहिलं पाऊल.

आगे आगे देखेंगे होता है क्या...
सध्या कॅप्टन शर्मा अन बॅट्समन कोहलीला चांगल्या परफॉर्मन्स साठी शुभेच्छा...

शर्मा म्हणतो की मधल्या फळीनी १०/३ सारख्या स्कोअर्सवरूनही चांगला खेळ दाखवण्यासाठी तयारी करायला पाहिजे.
अप्रोच चेंजच्या दृष्टीनी चांगलं पहिलं पाऊल. >> दुसरे पाउल म्हणजे मूळातच महत्वाच्या सामन्यांमधे १०/३ अशी वेळ येऊच देऊ नये ह्यासाठी प्रयत्न करावा म्हणजे बॅकफूटवर सुरूवात करावी लागणार नाही Happy

*दुसरे पाउल म्हणजे मूळातच महत्वाच्या सामन्यांमधे १०/३ अशी वेळ येऊच देऊ नये ह्यासाठी प्रयत्न करावा* - वास्तविक, हें पाऊल पहिलं असणं अधिक औचित्यपूर्ण !! Wink

")

अ‍ॅशेस एकदम इंटरेस्टींग झाली एका इनिंगमूळे.

मला वाटत होत मलान आणि रूट, द्रविड आणि लक्ष्मण करतील. आज थोडे टिकले असते तर मॅच मधे मजा आली असती.

Pages