Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05
क्रिकेटवरील पहिले पाच धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
https://www.maayboli.com/node/67443
भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
* आपलीच फलंदाजी गंडलीय. * -
* आपलीच फलंदाजी गंडलीय. * - आपली गंडली स्विंगविरूद्ध, त्यांची स्पीन विरूद्ध !
>>>>
स्विंग काही फारसा नव्हताच, जर पहिले दोन दिवस जशी खेळपट्टी होती ते पाहता आपण फक्त ३४५ धावा मारत असू तर फलंदाजांनी शंभरेक धावा कमी मारल्या यात त्यांचे अपयश कबूल करायला कमीपणा वाटू नये. आपल्या स्पिनसमोर त्यांचे काय झाले याच्याशी त्याचा काही संबंध नाही
चेंडू खूप खालीं रहातोय ( Low bounce ). कुणाचीही मोठी धांवसंख्या होणं आतां कठीणच ! >>>> हो, आता
हा गिल कसा बाद झाला आजही.
हा शुभमन गिल कसा बाद झाला आजही. काही शिकतोय की नाही हा..
बरे झाले याचे नाव शुभमन शर्मा नाहीये
*स्विंग काही फारसा नव्हताच,*
*स्विंग काही फारसा नव्हताच,* - वेग, अचूकता व कल्पकता यामुळे 'स्विंग गोलंदाजी भेदक ठरते, फार मोठा स्विंग केल्याने नाहीं, असा माझा समज आहे. आजची गिलची विकेट बघितली असेलच.
*अपयश कबूल करायला कमीपणा वाटू नये.* - स्विंग खेळण्याच्या आपल्या तंत्रातील कमतरता मींच अधोरेखित केलीय व द्रविडसर त्यावर लक्ष देतीलच असंही म्हटलंय. यात आणखी कमीपणा/ मोठेपणा वाटण्याचा काय संबंध ?
एक गंमत, त्यांच्या टीममध्ये
एक गंमत, त्यांच्या टीममध्ये एक विल, एक विल्यम आणि एक विल्यम्सन आहे.
मी आधी लिहिले की पहिले दोन
मी आधी लिहिले की पहिले दोन दिवस खेळपट्टी फलंदाजीला पोषकच होती त्याला दर्शवलेली असहमती आणि वरची पोस्ट विरोधाभास दर्शवत आहेत
एक गंमत, त्यांच्या टीममध्ये
एक गंमत, त्यांच्या टीममध्ये एक विल, एक विल्यम आणि एक विल्यम्सन आहे.



>>>>
आमच्या ऑफिसमध्ये माने, देमाने, अदमाने आणि राजमाने हे एकाच टीममध्ये आहेत
आणि यातील पहिले तिघे गेल्यावर्षीपर्यंत शेजारी शेजारी एकाच ओळीत याच चढत्या क्रमाने बसायचे.. त्या गल्लीला मानेगल्ली म्हटले जायचे
इतकी भेदक ठरत असतांना 9 विकेट
इतकी भेदक ठरत असतांना 9 विकेट गेल्यावर अचानक उमेश यादवला गोलंदाजी देण्याचं कारण कळलं नाहीं).>>>>
माझ्या मते वेळ घालविण्यासाठी दिली असावी जेणेकरून भारतीय फलंदाजांना दिवस अखेर कमी षटक खेळावी लागावी तरी शेवटी एक बळी गेलाच त्या ४ षटकात..
*माझ्या मते वेळ घालविण्यासाठी
*माझ्या मते वेळ घालविण्यासाठी दिली असावी* +1. माझ्या लक्षात यायला हवं होतं हें, विशेषतः रहाणे हा विचारपूर्वकच निर्णय घेणारा कर्णधार आहे म्हणून.
५ बाद ५१
५ बाद ५१
वाईट अवस्था केली स्विंग गोलंदाजींनी.
रहाणे ला खेळवण्यात काहीच अर्थ
रहाणे ला खेळवण्यात काहीच अर्थ नाही
अय्यर व साहा यांची दमदार,
अय्यर व साहा यांची दमदार, प्रसंगोचित फलंदाजी व नाबाद भागीदारी ! अय्यरचं बहुमोल नाबाद अर्धशतक !! एकंदर आघाडी 200+ . कसोटी रंजक होण्याच्या वाटेवर.
हो.... मस्त खेळतोय अय्यर!!
हो.... मस्त खेळतोय अय्यर!!
आणि अजुन अक्षर पटेल आहे..... २५०+ लीडला सामना चुरशीचा होऊ शकतो!!
अय्यर बाद तरी २५० धावांची
अय्यर बाद तरी २५० धावांची आघाडी मिळू शकेल प्रयत्न केल्यास....
आपण डिक्लेअर करायच्या
आपण डिक्लेअर करायच्या पोजिशनला आलो आहोत
रहाणे ला खेळवण्यात काहीच अर्थ
रहाणे ला खेळवण्यात काहीच अर्थ नाही
>>>>>
अर्थ आहे. सामना चुरशीचा होतो. आपण न्यूझीलंडला एकतर्फी मात देण्यातही मजा नाही. थरार हवा. अज्जी आणि पुज्जी अपयशी ठरले म्हणून तर अय्यरची कामगिरी ऊठून दिसतेय.
284चं लक्ष्य देवून डाव घोषित.
284चं लक्ष्य देवून डाव घोषित. चेंडू खूप वळतो आहे, खालीं रहातो आहे. न्यूझीलंड फलंदाजांसाठीं उद्या तीन चांगल्या भारतीय स्पीनर्सना या पीचवर खेळणं ही अग्निपरिक्षाच ! तरी पण.......क्रिकेट आहे हें !!
पहिल्याच षटकापासून फलंदाजाभोवतीं क्षेत्ररक्षकांचं कडं लावून केलेली फिरकी गोलंदाजी पहाणं, याची आगळीच गंमत असते. आज ती आनुभवतां आली, हें खरः.
अक्षर पटेलला मीं पूर्वी ' बेरकी ' खेळाडू म्हटलं होतं. He is proving to be a street smart player !
साहाने ' तुम्ही मला दुर्लक्षित करूं शकत नाहीं ' ,असं बजावलंय.श्रेयस अय्यर तर कसोटी खेळाडूची परीक्षा पहिल्या वर्ग मिळवून उत्तीर्ण झालाय ! निवड समितीचं काम खरंच कठीण होतंय.
उद्या पूर्ण मॅच पहाणं आलंच !
आता पुढच्या कसोटीत कोहलीसाठी
आता पुढच्या कसोटीत कोहलीसाठी कोण बाहेर जाणार ते बघायच!!
आपण तीन फॉर्मेट मिळून दणदणीत
आपण तीन फॉर्मेट मिळून दणदणीत क्रिकेट खेळणार आहोत पुढचे वर्षभर, एकापाठोपाठ एक मालिका आहेत नुसत्या. त्यामुळे आलटूनपालटून विश्रांती देत संधी मिळत राहील जो जसे चमकत राहील त्याला.
न्यूझीलंड मस्त झुंज देताहेत
न्यूझीलंड मस्त झुंज देताहेत . लंच होत आला तरीही आज एकही बळी मिळालेला नाहीं भारताला ! 76-1 !!
मला तर वाटतंय ते जिंकतील आता.
मला तर वाटतंय ते जिंकतील आता. द्रविड आणि राहणेला वाटतं सारं जग यांच्यासारखं टुकूटुकू आणि फॉर्म गेलेलं क्रिकेट खेळतात.
गेली एक विकेट लंच नंतर.. नाईट
गेली एक विकेट लंच नंतर.. नाईट वॉचमन तर नाईट वॉचमन. पण आता जरा बरे वाटतेय. अन्यथा एक भिती आहेच की कोणीतरी पंतगिरी करून गेले तर सामना धोक्यात येईल..
एक दोन बळी लवकर मिळाले तर
एक दोन बळी लवकर मिळाले तर येणारा दबाव उर्वरीत संघ बाद करण्यास मदत करेल!
अर्थात ५ दिवशीची खेळपट्टी आहे त्यामुळे जलद धावाकरणे तितकेसे सोपे नसणार चेंडू बर्यापैकी खाली राहतोय.
* मला तर वाटतंय ते जिंकतील
* मला तर वाटतंय ते जिंकतील आतां * - अनिर्णित ठेवला सामना, तरिही जिंकल्यासारखंच आहे ! पण... क्रिकेट आहे, आणखीन दोन-तीन विकैट पटकन गेल्या तर प्रचंड दबाव येवूं शकतो न्यूझीलंडवर .
चहापाण्याच्या वेळेवर शिंपी
चहापाण्याच्या वेळेवर शिंपी बाद झाला. आता ३१ किमान षटके आहेत उर्वरीत ६ बाद करायला. न्युझिलंड जिंकायची शक्यता धूसर होत चालली आहे!
चहापाण्याच्या वेळेवर शिंपी
चहापाण्याच्या वेळेवर शिंपी बाद झाला. >>> हा धागा क्रिकेटचा आहे हे बरे आहे. नाहीतर या जातीवाचक उल्लेखावरून गदारोळ उठला असता
पिचमध्ये अजूनही तितकीशी जान
पिचमध्ये अजूनही तितकीशी जान वाटत नाही. एका सेशनला सहा विकेट काढणे तितकेसे सहज नाही. पण दबाव बडी कुत्ती चीज होती है
*आता ३१ किमान षटके आहेत
*आता ३१ किमान षटके आहेत उर्वरीत ६ बाद करायला.* - स्पीनर्सना चेंडू वळताहेत पण संथपणे. कदाचित, अक्षरचे आर्मर प्रभावी ठरूं शकतील. या पीचवर स्पीन खेळत धांवा काढून जिंकणं कठीण वाटतं पण सामना अनिर्णित ठेवणं शक्य आहे. विल्यमसन टिकणं मात्र त्याकरतां अत्यावश्यक असावं.
घुसायला लागलेत बॉल..
घुसायला लागलेत बॉल..
आता अवघड आहे न्यूझीलंडचे..
विल्यमचामुलगा बाद झाला! आता
विल्यमचामुलगा बाद झाला! आता अवघड आहे किवींना!
७-१३८
७-१३८
केवळ १०० शिल्लक चेंडूतील तीन चेंडू बाकी आता !!! बघुया काय होतयं ते!
Pages