Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05
क्रिकेटवरील पहिले पाच धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
https://www.maayboli.com/node/67443
भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पहिला ब्रेकच डिनर असतो का ?
पहिला ब्रेकच डिनर असतो का ? मला वाटलं पाहिला टी आणि दुसरा डिनर.
तळाच्या फलंदाजांवर बॉडीलाईन
तळाच्या फलंदाजांवर बॉडीलाईन बॉलिंग टाकून त्यांना जायबंदी करायचा प्रयत्न करायचा आणि त्यांची बॉलिंग दुबळी >> सॉरी मला नाही वाटत की इंग्लंड च्या हरण्याचे हे कारण आहे. आपला ह्या पेक्षा अननुभवी सांघ ह्यपेक्षा अधिक चांगल्या ऑसी बॉलिंग ला पुरून उरला होता. इंग्लंड प्लॅनिंगमधे कमी पडतेय हे उघड आहे. टीम सिलेक्शन फॉल्टी आहे. ब्टलर ला खेळवण्याचा अट्टाहास समजू शकतो पण तो निव्वळ बॅट्समन म्हणून खेळू शकतो नि चांगला कीपर कीपर म्हणून खेळू शकतो. स्टोक्स पूर्ण फिट नाही हे उघड दिसतेय पण त्याला जबरदस्ती खेळवलय. बॅटींग वाढवन्ञासाठी वूडच्या जागी वोक्स ची वर्णी लागली आहे. एकही स्पिनर नाही. रोरी बर्न चा स्टान्स बघून तो इंग्लिश बॅट्समन आहे ह्यावर विश्वास ठेवणे कठीण वाटते. पूर्ण संघ ग्रिट दाखवण्यामधे कमी पडलाय. ऑसीज बुली आहेत हे नवीन नाही.
राहाणे/ विहारी नि अय्यर
राहाणे/ विहारी नि अय्यर ह्यांपैकी कोण दोघे संघामधे असतील ? मला पहिले दोघे असतील असे वाटते आहे. विहारी तरी नक्कीच हवा - त्याला म्हणूनच आधी पाठवण्यात आले होते.
"मला पहिले दोघे असतील असे
"मला पहिले दोघे असतील असे वाटते आहे." - स्टार्टर्स तरी ते दोघंच असतील असं वाटतंय. विहारी ला पुढे पाठवून तसे संकेत दिले आहेत. तसंच वेळेनुसार तो थोडीशी ऑफ-स्पिन बॉलिंग सुद्धा करू शकतो. रोहित च्या अनुपस्थितीत राहूल ला व्हाईस कॅप्टन केल्यावर रहाणेला 'get your act together....quick!' हा मेसेज गेला असावा
"पूर्ण संघ ग्रिट दाखवण्यामधे कमी पडलाय" - रूट आणी थोडाफार मलान चा अपवाद वगळता, इंग्लिश टीम पूर्ण गंडलीय. पण ह्यात नविन काही नाही. ऑस्ट्रेलियात गेले दहा वर्षं त्यांचं रेकॉर्ड यथा-तथाच आहे. (न्यूझिलंड, भारत, ऑस्ट्रेलिया - गेल्या दोन वर्षांतल्या तिन्ही दौर्यांचे रिझल्ट पहाता, इंग्लिश टीमला 'poor travelers' म्हणायला हरकत नाही.
- ). फ्लेचर - फ्लॉवर प्रभृतींच्या कोचिंग च्या काळात इंग्लिश बॉलर्स डिसिप्लिन्ड होते. नो-बॉल्स वगैरे अगदी क्वचित पडायचे. ह्या दौर्यात alarming rate आहे नोबॉल्स चा.
कॉफी टाईम पण चालेल की!!
कॉफी टाईम पण चालेल की!!
ह्या दौर्यात alarming rate
ह्या दौर्यात alarming rate आहे नोबॉल्स चा. >> हो नि फिल्डींग पण गचाळ होती. मेंटली रेडी वाटतच नाहीत. आताच एक स्टॅट्स वाचले की इंग्लंड चा ह्यावर्षीच्या सत्तावीस इनिंग्स मधल्या दोनशे च्या आतल्या आकरा इनिंग्गच्या स्कोर ची बेरीज रूट च्या ह्या वर्षीच्या स्कोर पेक्षा कमी आहे.
"हो नि फिल्डींग पण गचाळ होती"
"हो नि फिल्डींग पण गचाळ होती" - अरे हो.. ते विसरलो होतो. दोन मॅचेस मधे मिळून १२ कॅचेस सोडले आहेत इंग्लंड ने. ऑस्ट्रेलिया ने २.
"कॉफी टाईम पण चालेल की!!" - चालेल की. बाकीची नावं जशी ब्रिटीश कल्चरमधली आहेत, त्या अनुशंगानं म्हटलं मी. पण काहीतरी वेगळं हवं टी टाईम सोडून.
सॉरी मला नाही वाटत की इंग्लंड
सॉरी मला नाही वाटत की इंग्लंड च्या हरण्याचे हे कारण आहे. >> सॉरी, मी अस लिहिल नव्हत की इंग्लंड त्या टॅक्टिक मुळे हरतेय.
मला फक्त ऑस्ट्रेलियाच्या वृत्ती बद्दल लिहायचे होते.
रोरी बर्न चा स्टान्स बघून >>
रोरी बर्न चा स्टान्स बघून >> अगदी अगदी. खूपच विचित्र आणि अवघडलेला.
ऑस्ट्रेलियातल्या पिचेससाठी इंग्लंडचे सध्याचे बॉलर स्लो आहेत. १३०-१३५ बँडवाले. इंग्लंडमध्ये स्विंग मुळे ते इफेक्टिव असतात.
वुड आहे १४० + वाला. पण त्याला ड्रॉप केला. बटलर अफलातून कॅचेस पकडतो पण सोपे सोडतो. मटका आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इनिंगमधे तर फक्त रूट विकेट घेउ शकेल अस वाटत होत.
मी अस लिहिल नव्हत की इंग्लंड
मी अस लिहिल नव्हत की इंग्लंड त्या टॅक्टिक मुळे हरतेय.
मला फक्त ऑस्ट्रेलियाच्या वृत्ती बद्दल लिहायचे होते. >> हो गडबड झाली माझी तसे समजण्यात. तुमची भूमिका समजली . अर्थात मला त्या टॅक्टिक्स बद्दल फारसे वावगे वाटत नाही कारण
१. मॉडर्न क्रिकेट च्या नियमानुसार अंपायर ला अशी बॉलिंग जर डेंजरस वाटली तर थांबवता येते.
२. शॉर्ट पिच्ड बॉलिंग हा बॉलिंग चा अविभाज्य हिस्सा आहे नि नियमानुसार आहे.
३. मुख्य म्हणजे जर लोवर ऑर्डर च्या विकेट्स ना अप्पर ऑर्डर च्या विकेट्स एव्हढेच महत्व आहे. इक्वल अँड ऑल. किव्जी विरुद्ध शेवटची विकेट न घेता आल्यामूळे आपण पहिला सामना जिंकू शकलो नव्हतो. जर लोअर ऑर्डर खेळाडूंना हवे ते शॉट्स खेळण्याचा हक्क असेल तर बॉलर्स ना सुद्धा त्यांच्या भात्यातले सर्व आयुधे वापरण्याचा अधिकार हवा.
४. सर्व प्रकारची प्रोटेक्टिव्ह साधने सध्या उपलब्ध आहेत जी बॉडीळाईन च्या वेळी नवह्ते. पिचेस सुद्धा कव्हर्ड असतात.
रोरी बर्न्स चा स्टान्स त्याने
रोरी बर्न्स चा स्टान्स त्याने नंतर च्या काळात (सिनियर लेव्हल ला खेळायला लागल्यावर) डेव्हलप केलाय. तो त्याचा नॅचरल स्टान्स नाहीये असं वाचलं होतं. त्याची डावी आयसाइट डोमिनंट असल्यामुळे असं उभं राहून तो स्वतःला बॉल बघण्यासाठी फ्रॅक्शन ऑफ सेकंद अधिक देतो असं त्याचं लॉजिक आहे. nonetheless, अत्यंत चमत्कारिक स्टान्स आहे ह्यात दुमत नाही.
बॉक्सिंग डे आला. आधी अॅशेस
बॉक्सिंग डे आला. आधी अॅशेस आणि नंतर भारत वि. द. अफ्रिका!! यंदा न्यूझिलंड चा मुहूर्त हूकला.
राहूलचं अभिनंदन व त्याला
राहूलचं अभिनंदन व त्याला सलाम !
कोहलि टचमधे आहे हे दिसत होते
कोहलि टचमधे आहे हे दिसत होते नि बाद झाला. राहाणे पण टच मधे वाटतो आहे , तो राहुलसारखा स्कोअर करेल अशी आशा बाळगतो. राहुल नेहमीपेक्षा कमी फ्ल्युएंट वाटला - विशेषतः मयांक खेळत असताना पण त्याने जिद्दीने बाजू लावून धरली खरी. पाऊस स्पॉईल स्पोर्ट ठरणार
भारताच्या पहिल्या तिनही
भारताच्या पहिल्या तिनही विकेट्सपैकी कोहलीची विकेट ‘बॅट्समन ने दिलेली विकेट‘ वाटली. ९०+ बॉल्स खेळल्यावर तो शॉट अपेक्षित नव्हता. ओपनिंग पार्टनरशिपमधे मयंक जास्त फ्लुएंट वाटला ह्याविषयी असामीशी सहमत. तिसर्या दिवशी भारत जास्त आक्रमक बॅटींग करेल असा अंदाज आहे. रहाणे साठी डू ऑर डाय परिस्थिती आहे. अजूनपर्यंत तरी तो चांगला खेळलाय. hope he makes it count.
बोक्सिंग डे अॅशेस टेस्ट अगदीच एकतर्फी झाली. २६७ मध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला इनिंग्ज डिफीट दिला.
*रहाणे साठी डू ऑर डाय
*रहाणे साठी डू ऑर डाय परिस्थिती आहे. अजूनपर्यंत तरी तो चांगला खेळलाय. *-
रहाणेने पहिल्याच चेंडूवर मारलेला फ्ल्युएंट चौकार व दुसर्या षटकात सचिनची आठवण करून देणारी याॅरकर चेंडूला मारलेली flick, यावरून ' hope he makes it count ' ला दुजोरा मिळतोय.
पावसाने एक दिवस वाया गेला हे
पावसाने एक दिवस वाया गेला हे सकारात्मकली घ्यायचे झाल्यास ईथून आता आपले हरण्याचे चान्सेस फार कमी झालेत.
स्कोअर जितका चांगला वाटतोय तितकी खेळपट्टी सपाट नाहीये. काल आपण चांगली फलंदाजी केली, आफ्रिकेची गोलंदाजीही तितकी दमदार नव्हती, आणि आपल्याला स्पेशली राहुलला नशीबाचीही पुरेशी साथ मिळाली. त्यामुळे आज अगदीच कोलॅप्स नाही झालो तर आपण या सामन्यात कायम पुढेच राहू असे वाटतेय. आणि आज पंत-शार्दुलपैकी एकाने फटकेबाज अर्धशतक झळकावले तर त्यांचे मॉरलही डाऊन होईल. तर ४२५-४५० मारायला बघावेत आणि आफ्रिकेला २०० च्या फरकाने गुंडाळून फॉलोऑन देता येईल का हे बघावे.. शेवटच्या दिवशी पाऊसाची शक्यता असल्याने तिसर्या इनिंगच्या भानगडीत पडू नये. अन्यथा ज्या ओवर कॅलक्युलेट करून डिक्लेअर करू त्या होतीलच असे नाही..
२६७ मध्ये ऑस्ट्रेलियाने
२६७ मध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला इनिंग्ज डिफीट दिला. >> ईसीबी ने बीसीसीआय कडे ८- १० खेळाडू लोन वर मागावेत. आपल्या बी टीमचे गेल्या वर्षीचे कर्तृत्व किती मोठे होते हे लक्षात येतय.
परदेशात पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगला तेही पहिल्या दिवशी आपली मंडळी दृष्ट लागण्यासारखी खेळली. द्रविड साहेबांचा शुभारंभ झाला. चांगली लक्षणे.
रहाणे चांगला खेळत असताना कारण
रहाणे चांगला खेळत असताना कारण नसताना वाइट फटका मारून आउट झाला.
बरं झालं काल पाऊस पडला.
बरं झालं काल पाऊस पडला. आता अनिर्णित तरी राखता येईल नाहीतर हारलोच असतो.
ठाकूर भी गयो.. काय धपाधप
ठाकूर भी गयो.. काय धपाधप विकेट पडताहेत.. मजा येतेय
विकेट फेकल्यासारखे बाद झाले
विकेट फेकल्यासारखे बाद झाले अचानक!
बरं झालं काल पाऊस पडला. आता
बरं झालं काल पाऊस पडला. आता अनिर्णित तरी राखता येईल नाहीतर हारलोच असतो.>> नाही हो. त्यांना चौथी इनिंग खेळायचीय. विकेट बाउन्सी आहे.
आज ७ बळी केवळ १५. ३ षटकात ५५
आज ७ बळी केवळ १५. ३ षटकात ५५ धावात गेले भारताचे. हे काही चांगले लक्षण नव्हे खेळपट्टी एकाएकी एवढी काही बदलली नसावी!
पुढच्या सामन्यांमध्ये ह्याच गोष्टी लक्षात ठेवून आफ्रीकी गोलंदाज गोलंदाजी करतील!
खेळपट्टी एकाएकी एवढी काही
खेळपट्टी एकाएकी एवढी काही बदलली नसावी!
>>>>
थोडीफार अनियमित उसळी. आपल्या गोलंदाजीच्या वेळीही जाणवतेय. शमी खतरनाक वाटतोय त्यामुळे... (हे टाईप करतानाच विकेट :))
पण आपल्या फलंदाजांनी निग्रह नाही दाखवला. अन्यथा थोड्या धावा वाढल्या असत्या.. असो, पुरेश्या वाटत आहेत सध्या
घ्या अजून एक.. ३२-४ .. भारत
घ्या अजून एक.. ३२-४ .. भारत मालिका विजयाच्या दिशेने
दोन मराठी माणसं टेंबे आणि
दोन मराठी माणसं टेंबे आणि केशव महाराज खेळायला पाहिजे असं वाटतंय. अनेक वर्षांपूर्वी भारताचा दक्षिण भाग आफ्रिकेजवळ होता त्यामुळे आपल्यात आणि त्यांच्यात साम्य आहे. जे तिकडे राहिले ते टेंबा आणि इकडे आले ते टेंबाचे टेंबे झाले.
अनेक वर्षांपूर्वी भारताचा
अनेक वर्षांपूर्वी भारताचा दक्षिण भाग आफ्रिकेजवळ होता त्यामुळे आपल्यात आणि त्यांच्यात साम्य आहे. जे तिकडे राहिले ते टेंबा आणि इकडे आले ते टेंबाचे टेंबे झाले.>>
त्यांचा कर्णधार एल्गार, ज्याचे पूर्वज पूर्वी एल्गार परिषदेचे काम बघायचे. ज्याची बा उमा आहे त्याला तिकडे बाउमा म्हणतात. तो भारतीयच आहे.
तिकडे मकर राशीत जन्मलेल्यांना मकरान म्हणतात. तसेच रबाडाचे पूर्वज बारामतीत राडा घालायचे त्यावरून त्यांचे नाव रबाडा पडले. तोही भारतीयच आहे. जनसेन तर चक्क सीतेच्या वडिलांच्या जनकवंशातला आहे हे त्याच्या नावावरूनच समजून येते. असे आमचे अनेक भारतीयच सध्या जिकडे तिकडे क्रिकेट खेळत असतात.
बरेच भारतीय अमेरिकेच्या संघात
बरेच भारतीय अमेरिकेच्या संघात पण आहेत. ५ तर पटेलच आहेत. डाफाबेट या मालिकेत एकूण ३, २०- २० सामने आहेत, यु एस ए संघाने पहिला सामना जिंकला. फ्लॉरिडा मधे चालू आहेत सामने.
मयंक फार खराब खेळला आज.
मयंक फार खराब खेळला आज. आधीच्या ओवरलाही सगळे बॉल स्क्वेअरऑन होत होता. आणि तसाच गेला. चिंताजनक वाटला त्याचा आताचा खेळ. एक बरेय, लीड खूप मोठा आहे आपल्याकडे. तरीही सामना आश्वासकपणे जिंकायला ३०० चे टार्गेट गाठायला हवे..
Pages