Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05
क्रिकेटवरील पहिले पाच धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
https://www.maayboli.com/node/67443
भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
१ चेंडू हवा! ३६ चेंडू बाकी!
१ चेंडू हवा! ३६ चेंडू बाकी!
किवींनी सामना वाचविला!!!
ग्रेट मॅच ! ग्रेट टेस्ट
ग्रेट मॅच ! ग्रेट टेस्ट क्रिकेट !! न्याय्य निकाल !!!
मूड गेला. निकाल लागायला हवा
मूड गेला. निकाल लागायला हवा होता. बॅडलाईटचे लफडे नसते तर अजून तीन ओवर झाल्या असत्या. रोजच सामना लवकर संपत होता. पिचही रटाळ होता. स्लो अँड लो. त्यामुळे चांगले शॉटही बघायला मिळाले नाहीत. पण किमान सामना तरी निकाली व्हायला हवा होता. बोअर झाले एकाच फटक्यात. पाच दिवस पाण्यात गेल्याचा फील आला.
लास्ट विकेट काढता आली नाही
लास्ट विकेट काढता आली नाही तेव्हा कोहली हवा होता आपल्या बॉडीलँगवेजने दबाव टाकायला असे वाटले.
रहाणेने आता लास्ट विकेट काढता न आल्याची जबाबदारी घेत बाहेर पडावे जेणेकरून कोहली आल्यावर कोण जाणार हा प्रश्न सुटेल.
पुजारा आणि रहाणे यांना आता एकत्र खेळवणे रिस्की झालेय. ब्रेकची गरज आहे त्यांच्याच भल्यासाठी. मिडल ऑर्डरला अय्यर खेळला हे एक छान झाले या सामन्यात.
सामना चांगला झाला!
सामना चांगला झाला!
आपल्यापाशी चांगल्या हमखास शेपूट गुंडाळू शकेल असा जलदगती गोलंदाज नव्हता. इशांत अजिबात प्रभाव पाडू शकला नाही संपूर्ण सामन्यात!
*पाच दिवस पाण्यात गेल्याचा
*पाच दिवस पाण्यात गेल्याचा फील आला.* - स्पीनला अनुकूल पीचवर तीन चांगले स्पीनर्स क्षेत्ररक्षकांचं कडं लावून गोलंदाजी करत असताना, प्रचंड दबावाखाली आदर्शवत बचाव करत फलंदाजांना सामना वाचवताना पहाणं, ही तर कसोटी क्रिकेटची मेजवानीच म्हणायला हवी ! निदान मला तरी आज एक अविस्मरणीय कसोटी सामना पाहिल्याचं समाधान मिळालं. न्यूझीलंडच्या रविंद्रला तर सलाम !!
अर्थात, कोण कसोटी सामने काय अपेक्षा ठेवून पहातो यावर त्याची प्रतिक्रिया अवलंबून असणं स्वाभाविकच आहे .
ही तर कसोटी क्रिकेटची
ही तर कसोटी क्रिकेटची मेजवानीच म्हणायला हवी ! निदान मला तरी आज एक अविस्मरणीय कसोटी सामना पाहिल्याचं समाधान मिळालं. >>>
भाऊ, प्रचंड सहमत!
क्रेडिट टू न्यूझिलंड! इतक्या
क्रेडिट टू न्यूझिलंड! इतक्या चिवटपणे टेस्ट मॅच वाचवण्याचं इतक्यात पाहिलेलं हे दुसरं उदाहरण (पहिलं भारताने ऑस्ट्रेलियात वाचवलेली टेस्ट). बर्याच काळानंतर भारतात अशी विकेट तयार केली गेली जी अगदी एकतर्फी नव्हती (लो आणि स्लो होती. पण तरी टिच्चून खेळणार्यांच्या पदरात पूरेपूर माप घालणारी होती).
टिच्चून फलंदाजी करून वाचवलेले
टिच्चून फलंदाजी करून वाचवलेले सामने आवडतातच, पण ते अश्या रटाळ खेळपट्ट्यांवर नाही. चांगले शॉट नाही, चांगले विकेट टेकींग बॉल नाहीत. एक विकेट तर अशी जोकरसारखी पडली की बॉल मारल्यावर रफमध्ये पडून स्टंपवर गेला आणि बोल्ड
जर सामना अश्या खेळपट्टीवर होणार असेल तर निदान निकाल तरी लागायला हवा ही माफक अपेक्षा..
आठवा आपण ऑस्ट्रेलियात ड्रॉ केलेली मॅच. असा सामना मजा देतो.. वैयक्तिक मत, वैयक्तिक आवड, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडीचा आदर आहे.
बर्याच काळानंतर भारतात अशी
बर्याच काळानंतर भारतात अशी विकेट तयार केली गेली जी अगदी एकतर्फी नव्हती >> +१. पाचही दिवस बॅड लाईट मूळे लवकर सामना लवकर थांबवावा लागला. असे असतानाही सामना लवकर सुरू का करत नाहीत अशा व्हेन्यूवर ? अश्व्नि नची पहिल्या इनिंगमधली तिसर्या दिवसाची सकाळची बॉलिंग अगदीच भारी होती. विकेट न मिळताही एव्हढा लाँग स्पेल ज्या ईंटेसीटीला नि वैविध्यपूर्ण होता कि बस्स !
*आठवा आपण ऑस्ट्रेलियात ड्रॉ
*आठवा आपण ऑस्ट्रेलियात ड्रॉ केलेली मॅच.* - आठवायचाच म्हटलं तर पहिल्या दिवसापासून हातभर चेंडू वळणारया पीचेसवर पाहुण्या संघाना तीन-तीन दिवसात हरवून आपण केलेला जल्लोषही आठवतोच !! निदान या कसोटीत सर्व प्रकारची गोलंदाजी व फलंदाजी बहरताना 5 दिवस पहायला मिळाली !
अश्व्नि नची पहिल्या इनिंगमधली
अश्व्नि नची पहिल्या इनिंगमधली तिसर्या दिवसाची सकाळची बॉलिंग अगदीच भारी होती.
असो, पण त्या माणसाचे खरेच कौतुक वाटते. तो बॉलिंगला आला की मी मॅच बघतो, त्याचा स्पेल उरकला की ईतर कामे करतो.
>>>>
+७८६
या सामन्यात आपल्या स्पिनरकडून मला तोच स्पेल आवडला. त्यातही उगाच तो वादात सापडला आणि काही लोकं आश्विनला स्पिरीट घालवतोय म्हणून शिव्याही घालू लागले
आठवायचाच म्हटलं तर पहिल्या दिवसापासून हातभर चेंडू वळणारया पीचेसवर पाहुण्या संघाना तीन-तीन दिवसात हरवून आपण केलेला जल्लोषही आठवतोच !!
>>>>
तो जल्लोष विजयाचा होता. चांगले क्रिकेट बघितल्याचे नाही. तेच तर मी म्हणतोय, एकतर चांगले क्रिकेट बघितल्याचे समाधान द्या किंवा निर्णायक सामन्याचा आनंद. ईथे सामना अनिर्णित झाल्याने दोन्ही नाही मिळाले. हल्ली गचाळ खेळपट्ट्या बनवतात आणि त्यांना स्पिनर पिच म्हटले जाते. जडेजाबद्दल पुर्ण रिस्पेक्ट ठेऊनही म्हणावेसे वाटते की तो देखील आश्विनच्याच तोडीस तोड वर्ल्डक्लास लिंजंड गोलंदाज वगैरे वाटतो अश्या खेळपट्ट्यांवर भारतात खेळताना. कारण यात खेळपट्ट्यांचा वाटा मोठा असतो जो या दोघांमधील फरक मिटवून टाकतो. विचार करा सचिन आणि शेन वॉर्न द्वंद अश्या खेळपट्ट्यांवर झाले असते तर आपण कुठल्या आनंदाला मुकलो असतो. मला तरी ते आवडले नसते.
*तो जल्लोष विजयाचा होता.
*तो जल्लोष विजयाचा होता. चांगले क्रिकेट बघितल्याचे नाही.* आज जिंकलो असतो तर ' पाच दिवस पाण्यात गेल्याचा फील आला ' , ही काॅमेंट आली नसती का ?
"अश्व्नि नची पहिल्या
"अश्व्नि नची पहिल्या इनिंगमधली तिसर्या दिवसाची सकाळची बॉलिंग अगदीच भारी होती. विकेट न मिळताही एव्हढा लाँग स्पेल ज्या ईंटेसीटीला नि वैविध्यपूर्ण होता कि बस्स !" - इन्टेन्सिटी - यू नेल्ड इट!! असा इन्टेन्स स्पेल बघायला मिळाला कि अक्षरशः अंगावर काटा येतो. स्टेन वि. तेंडुलकर, वहाब वि. वॉटसन ड्युएल्सची आठवण झाली.
"असे असतानाही सामना लवकर सुरू का करत नाहीत अशा व्हेन्यूवर ?" - हो ना. अशा वेळी क्रिकेटमधे थोडी फ्लेक्झिबिलिटी हवी असं वाटतं.
कानपूरला धुकं आणि प्रदूषण
कानपूरला धुकं आणि प्रदूषण सध्या इतकं असतं की सूर्य कासराभर वर येईपर्यंत संध्याकाळसारखाच बॅड लाईट प्रॉब्लेम होतो, असं आयआयटी कानपूरमधल्या मित्राकडून ऐकून आहे.
आश्विनच्या स्पेलबद्दल अनुमोदन. खूप हुशार गोलंदाज आहे तो. हरभजननंतर लगोलग आश्विन ही आपल्या दृष्टीने फार चैन झाली.
हरभजननंतर लगोलग आश्विन ही
हरभजननंतर लगोलग आश्विन ही आपल्या दृष्टीने फार चैन झाली. >> हो त्या पुढचे क्लोसेट रिकामे दिसतेय
सूर्य कासराभर वर येईपर्यंत संध्याकाळसारखाच बॅड लाईट प्रॉब्लेम होतो, >> लाईट्स लावून संध्याकाळ वाढवायला हवेत मग. नियमच पाळायचे असतील , विशेषतः आजच्या जमान्यामधे जिथे स्लो ओव्हर रेट हा गुन्हा धरला जातो, अशा वेळी तरी ९० ओव्हर्स हव्यातच.
आज जिंकलो असतो तर ' पाच दिवस
आज जिंकलो असतो तर ' पाच दिवस पाण्यात गेल्याचा फील आला ' , ही काॅमेंट आली नसती का ? Wink
>>>
जिंकलोच का. हरलो असतो तरी नसती आली. उलट त्या केसमध्ये आणखी थरारक सामना बघायला मिळाला असता. पण आजची खेळपट्टी अशी होती की दिवसभर खेळून ड्रॉ करणे शक्य होते पण तीनच्या धावगतीने धावा मारणे नाही.
टेस्ट बघताना काही क्लासिकल शॉट आणि तितकेच दर्जेदार गोलंदाजीचे स्पेल बघायला मिळेल ही अपेक्षा असते. पण नुसते फलंदाजांचे, गोलंदाजांचे आणि सोबत प्रेक्षकांचेही टेंपरामेंट टेस्ट होणार असेल तर त्यात काही अर्थ नाही.
त्यात ना विकेट पडल्यावर चित्कारायला कोहली होता ना विकेटमागून कॉमेंटरी देणारा पंत.. त्यामुळे माहौलही बनत नव्हता आज. रहाणेची बॉडी लॅंगवेजही कमालीची बोअरीग असते. ती देखील बघवत नाही. अर्थात हा गौण मुद्दा असेलही. तरीही. आज ऑफिसला न जाता वर्क फ्रॉम होम करत सहा तास हे बघत होतो. काय बघितले हा प्रश्न पडला शेवटी..
स्पोर्टींग विकेटबाबत बाकी ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्यांना मानतो मी.. अगदी बालपणापासून
आज आपल्याला ४ पॉईंटच मिळाले.
आज आपल्याला ४ पॉईंटच मिळाले.
ड्रॉ झाली की ६-६ पॉईंट न मिळता ४-४ पॉईंट देणे हे फेअर वाटत नाही. तसेच स्लो ओवररेटला पॉईंट कट करायला नको. वन डे वा २०-२० वर्ल्डकपला तर असे करत नाहीत. जिथे वेगवान गोलंदाज जास्त वापरले जाणार तिथे स्लो ओवररेट असणार स्पिनरफ्रेंडली विकेटच्या तुलनेत.
हे दोन नियम नसते तर आता आपले ३६ पॉईंट असते आणि ६० परसेंट असते.
हरभजननंतर लगोलग आश्विन ही
*हरभजननंतर लगोलग आश्विन ही आपल्या दृष्टीने फार चैन झाली.* - सहमत. व, एकही प्रभावी लेगस्पीनर मिळूं नये, ही आपल्यासाठी हलाखीची परिस्थिती आहे, हेंही खरं ! काल तर तीव्रतेने ही कमतरता जाणवली , कारण चांगल्या wrist spinnerला कालच्या विकेटवर बचावात्मक खेळणं कितीतरी पटीने अधिक कठीण होतं ( काल अश्विनने मधेच बेमालूम टाकलेला एक चांगला 'लेगब्रेक' बघून खूप बरं वाटलं होतं ) !
८३ चे ट्रेलर आलेय:https:/
८३ चे ट्रेलर आलेय:
https://youtu.be/QHdkC6Kn0Io
ट्रेलर बोहोत हार्ड है..
ट्रेलर बोहोत हार्ड है.. थिएटरलाच बघण्यात मजा आहे. मोठ्या पडद्यावर .. स्टेडीयमचा फील यायला हवा..
*थिएटरलाच बघण्यात मजा आहे.*
*थिएटरलाच बघण्यात मजा आहे.* +1.
'मध्यंतरी 'कपिल शर्मा शो'मधे पूर्ण 83 ची टीम आली होती, आपले त्या स्पर्धेचे अनुभव सांगायला. सर्वांनी एकमताने कपिल देवच्या खेळाला, नेतृत्वाला व प्रेरणेला तो कप जिंकल्याचं श्रेय जल्लोष करत दिलं होतं ! भारतीय क्रिकेट इतिहासातलं सुवर्ण पान !! पुन:प्रत्ययासाठी सिनेमा पहाणं आलःच, जरी तो थरार 100% उतरवणं सिनेमा माध्यमालाही अशक्यच !
'मध्यंतरी 'कपिल शर्मा शो'मधे
'मध्यंतरी 'कपिल शर्मा शो'मधे पूर्ण 83 ची टीम आली होती....
>>>>>>
हो, पाहिलेला तो एपिसोड. कपिल देवच्या नेतृत्वाबद्दल आदर स्पष्ट दिसत होता प्रत्येकाच्या मनात. याआधी अक्रमला असे इम्रान खान बद्दल बोलताना पाहिलेले. दोघांचाही एक दबदबा आपल्या संघात असाच असावा असे वाटले. प्रत्यक्षात त्यांचा काळ मी अनुभवला नाही. मी क्रिकेट बघायला सुरुवात केली तेव्हा कपिल रडतखडत वर्ल्ड रेकॉर्ड करायला खेळत होता. त्यामुळे तो काय प्लेअर होता वा असावा हे समजायला काही काळ जावा लागला.
पण तरी चित्रपट मात्र कपिलवरच फोकस ठेऊन आहे असे ट्रेलरवरून वाटते ते किंचित खटकलेच, पुर्ण चित्रपटात ते तसे नसले तर बरे.. जेणेकरून एक भारतीय क्रिकेटप्रेमी म्हणून त्या विजयाशी आणखी जोडता येईल स्वतःला...
धोनीला तब्बल १२ करोड मोजत
धोनीला तब्बल १२ करोड मोजत रिटेन करण्यात आले. विचार करा का?
विचार करा का? >> त्यांना १६
विचार करा का? >> त्यांना १६ कोटीला ठेवायचा ह्पोता त्याला. पण धोनीला चौथा रीटेंशन क्रमांक हवा होता. सुपर किंग चे लॉजिक होते, उद्या रीटायर झाल्यावर मोठा हिस्स नवीन प्लेयर्स साईन करायला मिळेल. त्याला रीटेन करणे ब्रँड नेम च्या द्रूष्टी ने कॉमन सेन्स आहे.
राहुल, रशिद खान, हर्शद पटेल, चहल , इशान किशन, चहर बंधू छापणार आहेत. राहुल तर नक्की नविन दोन संघांपैकी एकाचा मेन होणार हे नक्की आहे. वेंकटेश अय्यर ने ऑप्ट आऊट करायला हवे होते. तो राहुल, रशिद खान च्या लेव्हल ला बिड झाला असता नक्कीच. पोराने स्वतःचे मोठे नुकसान करून घेतले. निव्वळ दुसरा ऑप्शन नाही ह्या कारणामूळे पांड्ञा पण जरुरीपेक्षा अधिक पैसे घेऊन जाईल.
मुंबईने सुर्याला ठेवलं. इशान
मुंबईने सुर्याला ठेवलं. इशान, सुर्या आणि केपी पैकी दोन निवडणं हे अवघड काम होतं खरं !
राहुल, रशिद खान, हर्शद पटेल,
राहुल, रशिद खान, हर्शद पटेल, चहल , इशान किशन, चहर बंधू छापणार आहेत. >> वॉर्नरही ॲड करा.
इशान, सुर्या आणि केपी पैकी
इशान, सुर्या आणि केपी पैकी दोन निवडणं हे अवघड काम होतं खरं ! >> जनरली मुंबई ला ऑल राऊंडर आवडतात हे बघता सूर्याला इशान च्या जागी उचलले हे थोड आश्चर्यचकित करणारे आहे. कदाचित्त्याच्या चौफेर खेळाचा प्रभाव अधिक असेल.
वॉर्नरही ॲड करा >> वॉर्नर ला नवीन फ्रँचाईझी घेईल असे वाटते. राहुल नि वॉर्नर.
जोफ्रा आर्चरचे काय होईल च्या उत्सुकता आहे.
कदाचित्त्याच्या चौफेर खेळाचा
कदाचित्त्याच्या चौफेर खेळाचा प्रभाव अधिक असेल. >>>> स्पेशालिस्ट मिडल ऑर्डर हवा म्हणून सृर्याला घेतलं असेल.
एकंदरीत सिद्धेश लाडचा अमोल मुझुमदार होणार की काय अशी भिती वाटायला लागली आहे मला आता. आयपीएलमध्येही संधी मिळत नाही त्याला.
ईशान किशनला रिटेन न
ईशान किशनला रिटेन न करण्यामागे त्याचीच वाढलेली किंमत असेल. भारतीय विकेटकीपर फलंदाज म्हणून जर पंत आणि सॅमसन अनुक्रमे १६ आणि १४ करोड मिळवत असतील तर आता तो का स्वस्तात मुंबईकडे राहील, त्याऐवजी लिलावात ऊतरून छापेल.
राहुल मात्र कमालीचा छापणार आहे. बेस्ट २०-२० फॉर्मेट ओपनर + कीपर + कॅप्टन आणि ईंडियन प्लेअर म्हणजे फुल्ल पॅकेज आहे. सर्वाधिक किंमत त्याचीच होईल असा अंदाज
Pages