Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05
क्रिकेटवरील पहिले पाच धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
https://www.maayboli.com/node/67443
भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
थोडक्यात काय तर मराठी माणूस
थोडक्यात काय तर मराठी माणूस आहे म्हणून जगातले सगळे कारभार सुरळीत सुरू आहेत. मधमाशा आणि मराठी माणूस नष्ट झाला तर जगाचा विनाश अटळ आहे.
मयंक फोकस नसल्यासारखा आऊट
मयंक फोकस नसल्यासारखा आऊट झाला. हकनाक विकेट गेली. टेस्ट ओपनर कडून अशा परिस्थितीत पेशन्स, फोकस ची अपेक्षा आहे. असो. उद्या इंडियाला काहीतरी क्रिएटीव्ह आणि आक्रमक प्रयत्न करावे लागतील (परत पाचव्या दिवशी पाऊस आगे). रिझल्ट काहीही लागो, पण पॉझिटीव्ह इंटेंट बघायला आवडेल.
आजची शमीची बॉलिंग जबरदस्त
आजची शमीची बॉलिंग जबरदस्त होती. विशेषतः पहिला स्पेल अगागा होता. काल अपडलेल्या पावसाचा पुरेपूर फाय्दा दोन्ही बाजूंच्या बॉल्र्स नी घेतला असे म्हणू शकतो. पाचव्या दिवशी अधे मधे पाऊस आहे म्हणे त्यामूळे बॉल वळायच्या ऐवजी स्विंग होईल का ? तसे झाले तर धमाल येईल.
आजचा राहुला ने सोडलेला कॅच महागात पडला
ऑसी नी इंग्लंड ची केलेली ससेहोलपट बघून आपल्या टीम चा शेवटचा विजय किती जबरदस्त होता ह्याची कल्पना येते. ती इंग्लंड ची पाचवी कसोटी आपण च जिंकली असती ह्याविष यी मला तरी अजिबात शंका नाही.
ऑसी नी इंग्लंड ची केलेली
ऑसी नी इंग्लंड ची केलेली ससेहोलपट बघून आपल्या टीम चा शेवटचा विजय किती जबरदस्त होता ह्याची कल्पना येते. ती इंग्लंड ची पाचवी कसोटी आपण च जिंकली असती ह्याविष यी मला तरी अजिबात शंका नाही.
>> नि:संदेह
राच्याकने
राच्याकने
पंत हा याष्टीमागे बळीं च शतक सर्वात जलद पूर्ण करणारा भारतीय कीपर झालाय.
यापूर्वी ही कामगिरी करणारे कीपर्स:
महेंद्र सिंग धोनी : ३६ सामने
रिधिमन साहा : ३६ सामने
किरण मोरे : ३९ सामने
नयन मोंगिया : ४१ सामने
आणि
ऋषभ पंत : २६ सामने
“ ऑसी नी इंग्लंड ची केलेली
“ ऑसी नी इंग्लंड ची केलेली ससेहोलपट बघून आपल्या टीम चा शेवटचा विजय किती जबरदस्त होता ह्याची कल्पना येते. ” - नक्कीच!! भारताची दुसरी, तिसरी फळी तयार करण्याची सिस्टीम अफलातून आहे.
“ पंत हा याष्टीमागे बळीं च शतक सर्वात जलद पूर्ण करणारा भारतीय कीपर झालाय.” - पंत चं अभिनंदन आणि कौतुक. तितकंच श्रेय भारताच्या तगड्या बॉलिंग युनिटला. धोनी, साहा, मोरे, मोंगिया हे विकेटकीपर्स म्हणून चांगलेच स्किल्ड होते/आहेत. पण त्या स्किलला भेदक बॉलिंगची साथ मिळाली हे सुद्धा छान झालं.
*पण त्या स्किलला भेदक
*पण त्या स्किलला भेदक बॉलिंगची साथ मिळाली हे सुद्धा छान झालं.* - +1. आपल्याकडे प्रतिभावान खेळाडू नेहमीच होते पण 'सर्वांगसुंदर' म्हणतां येतील असे संघ मात्र हल्लींच पहायला मिळतात.
आणि हो, मीं पुजारासाठीं मनापासून प्रार्थना करतोय. त्याने स्वताचो अशी दयनीय प्रतिमा ठेवून बाहेर पडूं नये असं तीव्रतेने वाटतं; कारण, त्याच्या गुणवत्तेशीं तें विसंगत होईल असा माझा ठाम विश्वास आहे.
पुजारा/ रहाणेच्या फॉर्म बाबत
पुजारा/ रहाणेच्या फॉर्म बाबत चर्चा खूप होते पण कप्तान कोहलीच्या फलंदाजीचे काय? ह्या सामन्यातही दोन्ही डावात फार काही करू शकला नाही!
पुजारा बाद! १०९ धावा फलकावर
पुजारा बाद! १०९ धावा फलकावर अर्धा संघ तंबूत.
अजून किमान ७०-८० धावा करायला हव्यात. आफ्रिकेवर दडपण ठेवण्यासाठी!
आज ऑल आउट झाला पाहिजे. उद्या
आज ऑल आउट झाला पाहिजे. उद्या झाला तरी कमी वेळ खेळ होइल.
बरेच भारतीय अमेरिकेच्या संघात पण आहेत. ५ तर पटेलच आहेत.> त्यात एक पराडकर असला तर तो आमचा नातू आहे.
श्रेय भारताच्या तगड्या बॉलिंग
श्रेय भारताच्या तगड्या बॉलिंग युनिटला. धोनी, साहा, मोरे, मोंगिया हे विकेटकीपर्स म्हणून चांगलेच स्किल्ड होते/आहेत. पण त्या स्किलला भेदक बॉलिंगची साथ मिळाली हे सुद्धा छान झालं. >> एकदम पटले. विशेषतः शेवटच्या दोघांच्या विकेट्स अशा बॉलिं गवर किती वाढल्या असत्या ह्याची कल्पना च करू शकतो फक्त. पंत ने किपिंग मधे कमालीची सुधारणा दाखवली आहे हे ही खरय.
त्याने स्वताचो अशी दयनीय प्रतिमा ठेवून बाहेर पडूं नये असं तीव्रतेने वाटतं; कारण, त्याच्या गुणवत्तेशीं तें विसंगत होईल असा माझा ठाम विश्वास आहे. >> मला वाटते की कोहली ला पुजारा ची उपयुक्तता पटली आहे. द्रविड ला नक्की कल्पना असावी कि असा फलंदाज का त्या स्थानावर जरुरी आहे. त्यामूळे मला हा प्रत्येक टेस्ट सिरीज मधे येणारा मधला गॅप नि डोमेस्टिक क्रिकेट अजिबात नसल्यामूळे असलेला बॅड पॅच वाटतोय.
“ प्रत्येक टेस्ट सिरीज मधे
“ प्रत्येक टेस्ट सिरीज मधे येणारा मधला गॅप नि डोमेस्टिक क्रिकेट अजिबात नसल्यामूळे असलेला बॅड पॅच वाटतोय.” पटतंय.
उद्या २११ रन्स करायचे आहेत अफ्रिकेला. एल्गर, बवुमा, डी-कॉक आणि वेदर हे निर्णायक फॅक्टर्स ठरतील. डी-कॉक ची एखादी क्विकफायर हाफ सेन्च्युरी पटकन मॅच चा बॅलन्स बदलू शकते.
हा आफ्रिकेचा आजवरचा सर्वात
हा आफ्रिकेचा आजवरचा सर्वात कमजोर संघ आहे. तो देखील बरेच मोठ्या फरकाने. तो डोनाल्ड पोलॉक फॅनी डिविलिअर्स एनतिनी कलिस कलिनन कर्स्टन क्लूजनर क्रोनिए वगैरेंचा काळ तर सोडाच. पण स्टेन फिलांडरसारखे गोलंदाज आणि फाफ, एबीडी, आम्लासारखे फलंदाजही मिसिंग आहेत या संघात. त्यात नॉर्कियाचे बाहेर जाणे दुष्काळात तेरावा महिना. अन्यथा न्यूझीलंडच्या जेमिन्सनने जे आपले केले ते करायची क्षमता त्याच्या सध्याच्या फॉर्ममध्ये होती. हा आपला मालिका जिंकायचा बेस्ट चान्स आहे. येत्या सामन्यात आफ्रिका नक्कीच मुसंडी मारायला बघणार. त्यामुळे ईतके जवळ आल्यावर उद्याचा सामना पावसाने हातातून जायला नको. पुरेसा वेळ मिळता आपले बॉलर जिंकवतील यात जराही शंका नाही. शमी बुमराहच्या जोडीला सिराज या तिघात लपायला बिलकुल जागा नाही. उद्या पुन्हा ताज्या दमाचे यांचे पहिले स्पेलच आफ्रिकेचे कंबरडे मोडत निकाल ठरवतील असे वाटतेय. तरी ४० ओवर झाल्यात. म्हणजे अजून ४० ओवरनंतर गरज पडल्यास नवा बॉल आहेच.
दक्षिण अफ्रिकेची आजची सुरुवात
दक्षिण अफ्रिकेची आजची सुरुवात पाहता ते विजयासाठी प्रयत्न करत आहेत असे दिसतेय! परंतु एल्गर नुकताच बाद!
कोहलीला कॅप्टनशीप वरून काढलाय
कोहलीला कॅप्टनशीप वरून काढलाय तरी कॅप्टन कसा?
मजा आहे कोहलीची. एव्हडा खराब
मजा आहे कोहलीची. एव्हडा खराब खेळ खेळून पण कॅप्टन आहे.
सातवा गेला. आता फक्त पाउसच
सातवा गेला. आता फक्त पाउसच वाचवू शकतो आफ्रिकेला.
मला टेंबेची भीती वाटते. मराठी
मला टेंबेची भीती वाटते. मराठी माणूस जिंकवून देऊ शकतो.
९ आटोपले एकच राहिला!
११३ नी जिंकली कसोटी!
तामिळ माणसाने शेवटचे दोन बळी घेऊन जिंकून दिली!
अभिनंदन !!
अभिनंदन !!
*तामिळ माणसाने शेवटचे दोन बळी घेऊन जिंकून दिली! * - कोणाच्याही कोंबड्याने कां होईना, उजाडल्याशी कारण !
कोणाच्याही कोंबड्याने कां
कोणाच्याही कोंबड्याने कां होईना, उजाडल्याशी कारण ! >>>
भाऊ, ते बोकलतांच्या मराठी माणसासाठी लिहलयं!
काय कृष्णा सर. मराठी
काय कृष्णा सर. मराठी वेबसाईटवर मराठी माणसाचं कौतुक काय केलं लगेच तुम्हाला खटकलं आणि मुद्दामून तामिळ माणसाचं उदाहरण दिलंत. खूप वाईट वाटलं मला. मायबोली मराठी माणसासाठी राहिली नाही.
सॉरी मला नव्हते ठाऊक बाऊमा
सॉरी मला नव्हते ठाऊक बाऊमा मराठी आहे! मिरजेतला आहे का मुळचा?
पूर्वी आफ्रिका आणि कोकण जवळ
पूर्वी आफ्रिका आणि कोकण जवळ जवळ होतं त्याकाळी जे आफ्रिकेत राहिले ते टेम्बा आणि भारतात आले ते टेम्बे.
*तें बोकलतांच्या मराठी
*तें बोकलतांच्या मराठी माणसासाठी लिहलयं!* - कृष्णाजी, कळलंय मला व मीं पण मजेतच लिहीलंय.
"आणि भारतात आले ते टेम्बे." -
"आणि भारतात आले ते टेम्बे." - गोविंदराव टेंब्यांचा लांबचा नातू च तो.
काल इंडिया मस्तच जिंकली. ब्रिस्बेन च्या विजयानं सुरू झालेलं यशस्वी वर्षं लॉर्ड्स, ओव्हल मार्गे सेंच्युरियनमधे संपलं. पहिल्या इनिंगमधली भक्कम ओपनिंग, आणि संपूर्ण मॅचमधे टिच्चून केलेली भेदक फास्ट बॉलिंग हे ह्या विजयाचे शिल्पकार ठरले. पुढच्या दोन मॅचेसमधे मिडल ऑर्डर फॉर्मात येवो ही सदिच्छा!
*पुढच्या दोन मॅचेसमधे मिडल
*पुढच्या दोन मॅचेसमधे मिडल ऑर्डर फॉर्मात येवो ही सदिच्छा!* - आमेन !!!
(No subject)
ईथल्या सर्व क्रिकेटप्रेमींना..
कोहली वि. बीसीसीआय वादामधे
कोहली वि. बीसीसीआय वादामधे चेतन शर्माचे " वर्ल्ड कप च्या आधी जवळजवळ प्रत्येकाने कोहली ला पुन्रविचार कर असे सुचवले होते" हे वक्तव्य वाचून कोहली " माझ्याशी गांगूली ने चर्चा केली नाही " अचूक बोलला हे लक्षात येतेय. ( त्याचे विधान दादाच्या वक्त्य्व्यानंतर आले होते - अर्थात दादा त्याच्याशी वर्ल्ड कप नंतर बोलला असे त्याने ग्रूहित धरले आहे ह्याउलट दादा दादाने प्रकरण अजून चघळू नये म्हणून ' कोहलीला कप्तान पद सोडू नकोस असे सांगीतले होते' हे 'नरो वा कुंजरो वा' टाईप विधान -वर्ल्ड कप च्या आधीच्या वक्तव्याला धरून केले होते हे ही लक्षात येते आहे. एकूण मुख्य इश्यू क्लियर मिडिया मॅनेजमेंट न करणे हा आहे. सिलेक्शन कमीटी ला त्यांनी
अमूक तमूक का केले हे मिटींगनंतर मिडीया समोर प्रश्नोत्तरे करून स्पष्ट केले तर बरेच गॉसिप कमी होईल. बाकीचे देश हे करतात. प्रत्येकाला आवडेल अशी निवड दर वेळी होणार नाही हे उघड आहे पण एकूण समिटि चा कल नि विचार प्रवाह कसा होतोय हे सहज कळू शकते. थोडक्यात काय तर नोएल डेविड ला सिलेक्ट केले होते ह्याचे उत्तर द्यावे
राहुल उपकप्तान मला फारसे भावले नाही. राहूल अगदीच टिपीकल कप्तान आहे असे त्याच्या एकूण पंजाब च्या कप्तान म्हणून केलेल्या कामगिरीवरून वाटते. काही नवीन केले असे आठवत नाही. तो चांगला खेळलाय पण एक टीम म्हणून पंजाबची ग्रोथ झाली असे वाटले नाही. त्याच्याकडे कोहली सारखा ड्राईव्ह किंवा रोहित सारखा ईझीनेस किंवा धोनीसारखा वेगळे डावपेच वापरण्याचळे हातखंडा वाटत नाही. तसेच त्याने पंजाब ला डीच करणे - विशेषतः त्याला दोन सीझन टीम बिल्ड करायला पूर्ण सूट दिलेली असतानाही - मला फारसे आवडले नाही. भावी कप्तान म्हणून पंत कडे बघायला हवे होते असे वाटले. बु मराला उपक्प्तान करून पुजारा नि राहणे दोघांनाही नोटीस दिल्या असाव्या असे वाटतेय.
राहुलला कप्तान बनवण्यामागे
राहुलला कप्तान बनवण्यामागे निवडसमितीचे फार सिंपल लॉजिक आहे. सध्याच्या घडीला कोहली शर्मानंतर तो तिन्ही फॉर्मेट खेळणारा प्लेअर आहे. कप्तान म्हणून तो काही खास नाही हे तुर्तास गौण आहे.
Pages