क्रिकेट विश्वचषक ट्वेंटी २० - वर्ष २०२१

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 October, 2021 - 14:57

आयपीएल संपली आणि वर्ल्डकप आला वर्ल्डकप.. चला माहौल बनवूया
दुनिया हिलाs देंगे हम, व्हिसलपोडू आणि कोरबो लोरबो जितबो रे.. सारे एक होऊया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"I heard Virat Kohli's statement that day. He said when we lost two wickets, we fell behind in the match against Pakistan. I was disappointed with that," Jadeja said on Cricbuzz.

"When a player like Virat Kohli is out there in the middle, there is no way the match has ended. He had not played even two balls and was thinking like that. So, it shows India's approach," he further added.

हा जडेजा म्हणजे अजय जडेजा बर का!

कुणीतरी कोहलीच्या नेमक्या कोणत्या चुकांमुळे आपण ( किंवा आरसीबी) जिंकण्याऐवजीं हरतो, हें सांगेल का ?

*He said when we lost two wickets, we fell behind in the match against Pakistan* - काय गैर व आक्षेपार्ह आहे या विधानात ? चांगली सुरवात न मिळणे व दोन भरवशाचे फलंदाज अगदींच लवकर बाद होणे, हा कोणत्याही संघासाठी मोठा झटका नाहीं ठरत ? तरीही 150ची मजल मारली आपण व त्यात कोहलीचा महतवाचा सहभाग होताच ना ? उगीचच धोपटायचाच म्हणून धोपटायचं का कोहलीला ?

कोहली माझा खास आवडता कर्णधार नसूनही, चर्चेत त्याची बाजू घेवूनच मला उतरावं लागतंय, ही माझी पंचाईत झालीय ! Wink

कुणीतरी कोहलीच्या नेमक्या कोणत्या चुकांमुळे आपण ( किंवा आरसीबी) जिंकण्याऐवजीं हरतो, हें सांगेल का ?
>>>

सर्वात पहिले आणि महत्वाचे म्हणजे कुठल्या प्लेअरची भुमिका काय आहे हे त्याच्या संघात कधीच ठरलेले नसते. त्याने काही ठरवले तरी ते प्लेअरपर्यंत पोहोचलेले नसते.
त्यामुळे त्याला जगातले बेस्ट गोलंदाज द्या बेस्ट फलंदाज द्या. एखादा धोनी तुलनेत दुय्यम रिसोर्सेसही उत्तम प्रकारे वापरूनही त्याच्या संघाला हरवू शकतो.

१. सर्वात पहिला प्रश्न, रोहित, कोहली मधे धोनी कुठून आला ?
>>>>>
रोहीत, कोहली नाही मी कप्तानीबद्दल बोलत होतो. मग जगातल्या सर्वोत्तम कर्णधाराचा उल्लेख होणारच ना Happy

२. आता हे तुझे काही लॉजिक असेल असे धरून आणलाच आहेस तर - आणि जेंव्हा कोहलीला कप्तान बनवा असे सांगत धोनीने भर दौर्‍याच्या मधे अंग काढून घेतले तेंव्हा धोनी नि निवडसमिती ने त्याला किती कप्तानीचा अनुभव होता. त्याच्यातील नेतृत्वगुण कोणी कश्याच्या आधारे हेरले होते असे तुम्हाला वाटते ?
>>>
अहो, मीच तुम्हाला हे सांगतोय की सँपल साईज वगैरे काही नसते. प्रत्येक कर्णधार पहिल्यांदा कर्णधार होताना नवखाच असतो Happy

३. सगळेच जर फक्त तुला वाटते, मला वाटते, ह्याला वाटते, त्याला वाटते ह्यावरच अवलंबून असेल तर "धोनी ग्रेट फिनिशर आहे " ह्यात आकडे का वापरत होतास नक्की ? तेंव्हा सांघिक खेळ नव्हता का ?
>>>>
छे छे, आकडे दाखवून त्या जीवावर च कुठे धोनी ग्रेट फिनिशर आहे असे म्हणतोय. आकडे कौतुकाने आणतो आपण. क्रिकेट बघणार्‍या प्रत्येकाला हे माहीत आहे की धोनी ग्रेट फिनिशर आहे. जसे की सचिन महान फलंदाज आहे. म्हणून त्याची शंभर शतके आहेत त्याचे कौतुक करायचे नाही का. त्याची शंभर शतके आहेत म्हणून तो महान आहे असे कोणी ठरवायला गेले नाही.

४. " पण हरताना, समोरचे भारी पडताना, सामना हातातून निसटतोय असे वाटताना तुम्ही काय करता हे मॅटर करते" इथे सँपल साईज बघणे मह्त्वाचे असते. १० सामन्यांमधले ५ हरताना काय केले नि ५० मधले २५ हरताना काय केले ह्यांची तुलना करून अमका ग्रेट नि तमक फक्त टीम च्या जीवावर जिंकतो धासे बोलणे किती योग्य असेल असे वाटते तुला ?
>>>
पुन्हा तेच, शर्माबाबत शितावरून भाताची परीक्षा होते. त्याचे मेंटल कॅरेक्टर दोन चार सामन्यातूनही समजून येते. भले ते सामने हरले असले तरी समजून येते.
आणि सँपल साईज कोहलीची तर मोठी आहे ना. दरवेळी मोक्याला धोकाच दिला आहे.

५. तू रोहित च्या आयपील चे एव्हढे उदाहरण दिले आहे म्हणून - एकदा त्या टीम चे कोचेस कोण होते नि त्यांना बाहेरच्या लीग्स मधे काय स्थान मिळते ते बघून घे. त्यातून पण श्रेय फक्त रोहीतचेच होते कि त्यात कोच, चांगली टींम, डेटा स्टॅटीस्टियन्स, ह्यांचा वाटा होता हे पण कळेल.
>>>>>>
देऊया की, बाकीच्यांनाही श्रेय देऊया. पण जेव्हा शर्मा, कोहली, रोहीत असा सिनिअर खेळाडू कप्तान असतो तेव्हा त्यांचा सहभाग मोठा असतो. जेव्हा पंतसारखा नवखा कर्णधार असतो तेव्हा तुलनेत सपोर्ट स्टाफचा सहभाग मोठा असतो.

६. "पण प्रेशर सिच्युएशनमध्ये हे सगळे स्टॅट्स फोल ठरतात. कारण त्या नर्वस मोमेंट्स तुमचा नेहमीचा खेळच बदलतात" >> हा साक्षात्कार तुला आत्ता झा ला का ? आम्ही इतके दिवस आयपील मधे तुझ्या मानासारखे होत नसेल तेंव्हा फिस्किंग पुढे अजून काही घटक असू शकतो ह्याबद्दल घसा फोडून बोंबलत होतो तेंव्हा काय झाले होते ?
>>>>>>
प्रेशर सिच्युएशनमध्ये खेळ बदलतो हे जग मान्य आहे. हा कॉमनसेन्स आहे. पण आयपीएलमध्ये कसले डोंबल्याचेही प्रेशर नसतानाही ते लोकं धमाल उडवतात. जसे ती राजस्थान मुंबई सामना. मुंबईला मोठ्या फरकाने जिंकू द्यायचे म्हणून ते धावाच मारत नव्हते. अ‍ॅप्रोचच असा होता की बॉल बॅटला लागल्यावर पायाशीच लोळण घेईल Lol या गोष्टी पुस्तकात वाचून कळत नाही. निरीक्षण लागते Happy

कोहली हा संघातील खेळाडूंसोबत रोहित इतका खेळीमेळीने, मोकळा वागताना दिसत नाहीं, हें जाणवतं. पण फक्त त्यावरुन ' सर्वात पहिले आणि महत्वाचे म्हणजे कुठल्या प्लेअरची भुमिका काय आहे हे त्याच्या संघात कधीच ठरलेले नसते. त्याने काही ठरवले तरी ते प्लेअरपर्यंत पोहोचलेले नसते.' हा निष्कर्ष (इतर कांही आधार न देतां) निघतो का, याबद्दल मीं खरंच साशंक आहे.

भाऊ, आज जेसन होल्डर खेळतोय विंडीजकडून.

वेस्ट इंडीज वि. बांग्लादेश मॅच रंगतीय असं वाटतंय, ३६ बॉल्स ५० अवघड नसले तरी विंडीज डिफेंड करू शकतील इतपत आहेत.

पुढची मॅच चुरशीची होईल असं वाटतंय. विकेंडला हवी होती Sad आत्तापर्यंत ह्या वर्ल्डकप मधला खेळ पहाता, पाकिस्तान आणि इंग्लंड स्ट्राँग फेव्हरेट्स वाटतायत. (अजून बराच खेळ शिल्लक आहे).

आणि सँपल साईज कोहलीची तर मोठी आहे ना. दरवेळी मोक्याला धोकाच दिला आहे. >> तुला सँपल साईज म्हणजे काय ते माहित आहे का ? तुझ्या कुठल्याच पोस्ट वरून तसे जाणवत नाही. रोहित ने (तुझ्या मते फिक्स्ड असलेल्या आयपील सोडून - हेही तूच काल म्हणाला होतास सोडून देऊया असे ) कॅप्टन म्हणून जिंकून दिलेल्या टूर्नामेंट्स कुठल्या आहेत ? कोहलीच्या शून्य आहेत हे मान्य पण शर्माच्याही शून्यच आहेत. नुसते फुटकळ सामने बघायचे तर कोहलीचे विनिंग परेसेंएज ह्या क्षणी सर्वात अधिक आहे. शर्माची भलावण करताना तू नीट पिकिंग करतोस नि कोहलीवर फक्त करायची म्हणून टीका करतोस हा मुद्दा आहे. अगदी तुझ्या मते जगातल्या बेस्ट कर्णधारानेसुद्धा कोहलीचेच नाव सुचवले होते रोहित चे नव्हते ह्यातच आले. ( बेस्ट कॅप्टन हे भयंक धाडसी आहे. लॉईड, बॉबी सिंप्वे, रणतुंगा हे नावे ऐकले नसशीलच) . बाकीच्या मुद्द्यांना तू माझ्याच आधीच्या पोस्ट मधले माझीच उत्तरे फिरवून मला देत असल्यामूळे मी दुर्लक्ष करतो आहे, असो.

मॅच चुरशीची होईल असं वाटतंय. विकेंडला हवी होती Sad आत्तापर्यंत ह्या वर्ल्डकप मधला खेळ पहाता, पाकिस्तान आणि इंग्लंड स्ट्राँग फेव्हरेट्स वाटतायत. (अजून बराच खेळ शिल्लक आहे). >> मी ऑस्ट्रेलिया पण टाकेन त्यात. विशेषतः वॉर्नर फॉर्म मधे आल्यामूळे.

आज अफगाण पाक मजा आली. दोनचार वीक लिंक आहेत ज्या अफगाणला महागात पडल्या. त्यांना हिशोबाने वापरावे लागणार. कारण त्यातल्या एका वीक लिंकने तर मोक्याच्या क्षणी गेमच केला. आपला मेंटर तिथे पाठवायला हवा.

असो, पाकिस्तान सेमीला पोहोचली.
स्पर्धा सुरु व्हायच्या आधीच मी जो अंदाज मांडला होता भारत-पाक, ईंग्लंड-ऑस्ट्रेलिया यापैकी पहिला संघ आज पोहोचला.
उद्या ईंग्लंड-ऑस्ट्रेलिया या दोन्ही सेमीला जाणार्‍या संघांचीच आपसात मॅच आहे.
रविवारी मात्र भारताने जिंकून एक मोट्ठे पाऊल पुढे टाकावे

*असो, पाकिस्तान सेमीला पोहोचली.* - पाकिस्तानला बेसावध करायला हवं तर असं म्हणा. पण, थिऑरिटीकली, भारत, न्यूझीलंड व अफगाणिस्तान अजूनही 8/6 गुण मिळवूं शकतात व पाकला अडचण निर्माण करूं शकतात ( हें भाकित अजिबात नाहीं पण हें अगदींच अशक्य पण नाही )

साऊथ आफ्रिका जिंकायला पाहिज असं वाटतंय कारण त्यांच्यात दोन मराठी खेळाडू आहेत. कॅप्टन टेंबे आणि केशव महाराज.

द. अफ्रिकेनं अक्षरशः लंकेच्या खिशातली मॅच काढली. हसरंगा ची हॅटट्रीक आणि मिलरच्या त्या दोन सिक्सेस मॅचचे हायलाईट्स होते.

इंग्लंडने ऑस्ट्रेलियाची पहिल्या हाफमधेतरी अवस्था बिकट केलीय. ऑस्ट्रेलिया बॉलिंगमधे कसं प्रत्त्युत्तर देतात ते बघू.

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला सुरुवातीच्या ओवर टेस्ट मॅच कंडीशन वाटत होत्या. बॉल स्विंग सीम टर्न सारे होत होता.
आता ईंग्लंडच्या फलंदाजीला ते न दिसल्यास एकतर्फी सामना होईल.
ईथे टॉस खूप महत्वाचा झालाय. हि सहावी मॅच दुबईची. सर्व चेस करणारेच जिंकलेत.
उद्या फर्स्ट सेकंड इनिंगच्या कंडीशनमध्ये ईतका फरक नको. आणि असलाच फरक तर टॉस जिंकू दे आपण. नाहीतर मजा जाईल.

उद्या टॉस पुरतं कोहलीने काहीतरी कारण सांगून शर्माला पाठवलं पाहिजे. जेव्हा प्रत्यक्ष खेळाला सुरवात होईल तेव्हा कोहलीने धोनीचा मुखवटा घातला पाहिजे म्हणजे खेळाडूंचे मनोबल उंचावेल.

दुबईला सहाचे सहा सामने चेस विजयी
आयपीएलपासून गेले १५ पैकी १४ चेस विजयी
त्यामुळे टॉस हरलो आणि मॅच हरलो तर वाईट वाटणार नाही.
मला वेगळीच भिती आहे
टॉस जिंकूनही चेस करताना हरलो तर तो धक्का सहन नाही होणार Sad

टॉस जिंकूनही चेस करताना हरलो तर तो धक्का सहन नाही होणार>>> मला तर जेवण जाणार नाही दोन चार दिवस. उद्या सात वाजल्यापासून आपण सगळ्यांनी मायबोलीवर एकत्र जमून इथे भारतीय संघाच्या समर्थनार्थ प्रतिसाद दिले पाहिजेत. न भूतो न भविष्य चार पाच तासात 1000 प्रतिसाद पूर्ण करू उद्या. भारतीय संघाच्या समर्थनार्थ मायबोली दणाणून सोडू.

मी पाच पाच मिनिटांनी ज्या संघाच्या समर्थनार्थ प्रतिसाद देतो तो संघ जिंकतो हा इतिहास आहे. #comeonindia

पाकिस्तान अफगाणशी हरता हरता वाचली. ते सुद्धा दुबईला चेस करत असताना. आणि अजूनपर्यंत त्यांना डिफेंड करावे लागले नाहीये. त्यामुळे ईतक्यात ते काही भारी आहेत वगैरे वाटत नाही.
ईंग्लंड येस, जर आपण सेमीला गेलो तर ते नको आपल्यासमोर अशी प्रार्थना करतोय. अर्थात आपला संघही तुल्यबळ आहे ईंग्लंडला. पण सध्याच्या फॉर्मला ते सरस वाटत आहेत.

मला तर जेवण जाणार नाही दोन चार दिवस.
>>>
हा छान सल्ला दिलात. उद्या साडेसहा ते सातच्या दरम्यान तुडुंब जेवून घेतो. सातला टॉस हरलो हे समजले तरी तिथपासूनच काही खायला होणार नाही Happy

न्यू जीलैंड जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत... आपले बॉलर्स फॉर्म मधे नाहियत...
>>>>
हो याचीच भिती आहे. आपली पहिली फलंदाजी आली तर त्यांचे गोलंदाज फायदा उचलतील.
पण त्यांची फलंदाजी आली तर सध्या भरवसा एक बुमराहवरच आहे. पण त्यालाही कोहली पॉवरप्लेमध्ये एकच ओवर देईल ती सुद्धा तिसरी जर भुवी शमीने काही केले नाही तर. त्यामुळे नुसते टॉस जिंकून चालणार नाही. भुवी आणि शमीने जोर लावायला हवा. आज ईंग्लंडचा वोक्सचा स्पेल मस्त होता. ती लाईन अ‍ॅण्ड लेंथ पकडायला हवी.

*England and Pakistan are the teams to beat in this World Cup.* - as on to-day ! विश्वचषकांचा इतिहास पहातां स्पर्धेदरम्यानच फाॅर्मने अचानक उलट्या उड्या मारणं मुळीच नवीन नाही . Wink

आज खास करून नाणेफेकीपासून मॅचचा शेवटचा चेंडू फेकला जाईपर्यंत भारतीय संघाला मनापासून जोरदार शुभेच्छा !

अफगाण आज पुन्हा एका मोठ्या विजयाकडे.
जिथे आपण नाणेफेक महत्वाची म्हणून रडतो तिथे ते नाणेफेक जिंकून बिनधास्त पहिली फलंदाजी घेतात.
दोन सामने दणकून जिंकतात तर पाकिस्तानशी जिंकता जिंकता राहतात.
जर आपण आज जिंकलो नाही तर सेमीला अफगाणला बघायला आवडेल. त्यासाठी अफगाणने आपल्याला हरवले तरी चालेल.

भारत आणि न्यूझिलंड - दोन्ही टीम्स साठी महत्वाची मॅच. भारतीय टीमला घसघशीत आणि जोरदार शुभेच्छा!! हर्दिक बॉलिंग करणार का? शार्दूल, अश्विन, चहर पैकी कुणी खेळेल का ह्याची उत्तरं थोड्याच वेळात मिळतील.

Pages