क्रिकेट विश्वचषक ट्वेंटी २० - वर्ष २०२१

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 October, 2021 - 14:57

आयपीएल संपली आणि वर्ल्डकप आला वर्ल्डकप.. चला माहौल बनवूया
दुनिया हिलाs देंगे हम, व्हिसलपोडू आणि कोरबो लोरबो जितबो रे.. सारे एक होऊया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिल्लीचं 'एशियाड' बघायला आम्ही तीन मित्र गेलो होतो. तेंव्हा हाॅकी फ़ायनलला झालेल्या जखमेवरची खपली इतक्या वर्षांनी आज परत निघाली. तिथे पाकने आपला 7-0 असा पराभव केला होता !!! Sad

आपण आपल्या आपल्यात भांडायला लागल्यापासून हरायला लागलो आहोत ,पूर्वी संघ भावना जास्त दिसायची.
आता चाहते देखील व्यक्ती पूजेत बुडून आपापसात भांडताना दिसतात.
आयपीएल चालू झाल्यापासून हे जास्तच झाले आहे.
आयपीएल चे शेर जागतिक मध्ये ढेर.

हा कोहली चक्क एक दशक rcb संघाचा फज्जा उडवतोय. आणि त्याच्या चातुर्याने प्रत्येक वर्षी त्या संघाला बॉटम दोन तीनमध्ये आणून ठेवतोय हे bcci याची देही याची डोळा पाहत होती. तरीपण हा पाच दहा रन्स जास्त काढतो या बेसिसवर त्याला इंडियाच्या कर्णधारपदी कायम ठेवत होते. आता याने इंडियाची फज्जा उडवायला सुरवात केली आहे.

भारत वर्ल्ड कप जिंकू शकत नाही कारण कोहली कॅप्टन आहे. >> +१.

प्रश्न फक्त हार-जितचा नाही. प्रश्न क्रिकेटचा कोणता फॉर्म आहे याचा देखील नाही. प्रश्न t-२० मध्ये भाकिते करू शकत नाही याचाही नाही. आज चुरस होऊन हारले असते तर काहीही वाईट वाटायचे कारण नव्हते. यांचे प्रयत्नच दिसत नव्हते. आदिम भारतीय दुखणे. आताचे प्लेअर आणि सगळाच संघ सेलिब्रिटींनी जास्त भरला आहे आणि खेळाडू कमी आहेत. हा संघ एक्झाटली धोनी कप्तान होण्या आधी जसा होता तसा आहे. कधेमधे फटाके फोडतील आणि हे सेलिब्रिटी दमलेले असले की नवीन पोरं ऑस्ट्रेलियात जशी यादगार सिरीज खेळले तसे चुकून उच्च खेळतीलही पण यांच्याकडून कोणतीही मोठी सिरीज किंवा ट्रॉफी जिंकणे शक्य नाही.

धक्क्यातून जरा सांवरलो आहे, म्हणून-
1) पाकचं अभिनंदन.
2) सुरवातीलाच एवढी पडझड होवून 150 धांवसंख्या गाठणं आशादायक. पडझड होण्यात प्रथम फलंदाजी करावी लागली हें एक कारण होतं का, हें माहित नाहीं. रोहित शर्मा बाद झाला तो चेंडू खेळणं स्थिरावलेयला चांगल्या फलंदाजालाही कठीण होतं.( Left arm genuinrly fast bowler bowling over the wicket, wide from stumps, and straghtening the angular delivery as in- swinger !!)
3) पांडया केवळ फलंदाज म्हणून खरंच राष्ट्रीय संघात येवूं शकतो, याबद्दल शंका आहे.
3) पहिलयाच सामनयावरून कोणतयाच संघाबददल मत बनवणं टाळलेलंच बरं; मागच्या अनेक मोठया स्पर्धात हें सिद्ध झालंय.
4) याच स्पर्धेत आजच्या पराभवाचं उट्ट॔भारताने काढलं तर आनःदाला पारावार नसेल व ती शक्यता आहेच आहे.
भारताकडून खूप चांगलया कामगिरीची रास्त अपेक्षा व तशा शुभेच्छा !

आताचे प्लेअर आणि सगळाच संघ सेलिब्रिटींनी जास्त भरला आहे आणि खेळाडू कमी आहेत. हा संघ एक्झाटली धोनी कप्तान होण्या आधी जसा होता तसा आहे.
>>>>>>>
@ फिल्मी
तुम्हाला १०० गावे ईनाम !

असो,
न्यूझीलंडने वर्ल्डकपला आपल्याला जसे सेमीला हरवले तसेच आज पाकिस्तानने हरवले. नवीन बॉल स्विंग करा. पुढे टाका. टॉप ऑर्डरला घ्या. सामना खिश्यात.
पण आज सुरुवातीला विकेट जाऊनही जेव्हा चौथ्या विकेटला पार्टनरशिप झाली आणि पंतने मारायला घेतलेले तेव्हा तो बाद होईपर्यंत १६५ बोर्डवर दिसत होते. प्रेडीक्टेड स्कोअरसुद्धा जो पहिला चेंडू टाकायच्या आधी १६६ दाखवत होते तो १६७ झाला होता. पण मागे मात्र विकेट हातात राहूनही हवे तसे मारता आले नाहीत. कोहली आधी छान खेळला, आफ्रीदीला सरसावत एक अप्रतिम सिक्स मारला. पंत आल्यावर एकबाजू स्ट्राईक रोटेट करत लाऊन धरली आणि गेअर चेंज करायचे काम जे पंतलाच शोभते ते त्यालाच करू दिले. मात्र शेवटी गरज होती तेव्हा त्याला स्वतःला अ‍ॅक्सलरेट करता आले नाही.
होते, जमत नाही कधी कधी, त्याचे काय वाटत नाही. पण तीनेक ओवर शिल्लक असताना तो अर्धशतकाकडे बघून तेव्हाही रिस्क फ्री धावा घ्यायला बघतो, सिंगल - डॉट - डॉट - सिंगल - डबल असे करत अर्धशतकाला गवसणी घालतो आणि मग अर्धशतक होताच लगेचच पुढच्याच बॉलला उचलून चौकार मारतो. मित्रा काय आहे हे. म्हटले तर छोटी गोष्ट वाटेल एखाद्याला. पण हाच फरक आहे जे मग तुम्ही जिंकणे डिजर्व्हच करत नाही असे वाटते.

चला पाकिस्तानशी तर हरलो. आता पुढे काय?
पुढचा सामना ईथेच आहे. आणि आता न्यूझीलंडशी हरलो तर घरीच जाऊ. अन्यथा अफगाण वा स्कॉटलंडने न्यूझीलंड-पाकपैकी कोणाला तरी धक्का द्यावा वगैरे वाट बघावी लागेल.
त्यामुळे पुढचा सामना जवळपास मस्ट विन आहे.
जर संघात बदल करायचा असेल तर आताच !

काय बदल होऊ शकतील?

१. पांड्याच्या जागी शार्दुल - आज तीन विकेट लवकर पडूनही पांड्या शेवटालाच आला. मग तिथे शार्दुलही चालू शकतोच.

२. सुर्याच्या जागी ईशान - खरे तर मी आजच्या सामन्यातच सुर्याच्या जागी ईशान लिहिलेले. तेच हवे होते असे वाटले. कारण सुर्याने एकदोन फटके मारले तरी तो काही टचमध्ये दिसत नव्हता. ईशानचा काऊंटर अटेक कदाचित कामी आला असता. जे पंतने नंतर केले ते कदाचित इशानच्या रुपाने आधी झाले असते.

३. चक्रवर्तीच्या जागी आश्विन?? - खरे तर चक्रवर्तीने सुरुवातीच्या दोन ओवर छान टाकल्या. दोघे फलंदाज गोंधळात होते. पुढच्या दोन ओवर मात्र दोघे आरामात खेळले. जर विकेट पडली असती आणि पुढच्या ओवर त्याला वेगळ्या फलंदाजांना टाकावी लागली असती तर त्याचे आकडे नक्कीच वेगळे असते. त्यामुळे चक्रवर्ती न्यूझीलंड विरुद्ध असावा असे वाटते.

४. पण जर पांड्याच्या जागी शार्दुल घेतला तर भुवी वा शमीच्या जागी एखादा स्पिनर म्हणजेच आश्विन घेता येईल? भुवी वा शमी मिळून काही व्हरायटी आणत नाहीयेत असे वाटते.
बाकी शमी वा भुवी पैकी कोणाला खेळवावे याचा निर्णय कोहली-शास्त्री वर सोडूया. किंवा आपले मेंटरसिंग धोनी आहेतच Happy

मग साधारण अशी टीम खेळवता येईल ज्यात सहा गोलंदाजीचे पर्याय राहतील.

१. रोहीत
२. राहुल
३. ईशान
४. कोहली
५. पंत
६. जडेजा
७. शार्दुल
८. आश्विन
९. शमी / भुवी
१०. चक्रवर्ती
११. बुमराह

रोहित शर्मा बाद झाला तो चेंडू खेळणं स्थिरावलेयला चांगल्या फलंदाजालाही कठीण होतं.( Left arm genuinrly fast bowler bowli over the wicket, wide from stumps, and straghtening the angular delivery as in- swinger !!) >> Beg to differ भाऊ. आफ्रिदी ह्या बॉलवर पहिल्या दोन ओव्हर मधे विकेट घेतोच हे जनरल क्नॉलेज आहे. पीएस्ल बघणार्‍यांना हे सर्वज्ञात आहे. absolutely no surprise there. विलो वर मॅच सुरू व्हायच्या आधी पण ह्यावरच चर्चा झाली होती. त्याच्या पहिल्या दोन ओव्हर्स सांभाळल्या की पुढे मजा करता येते. हे अ‍ॅनालिस्ट कडून कळवलेले गेलेले दिसत नाही. राहुल नि रोहित दोघेही जसे बाद झाले त्यातून ते उघड होते आहे.

पहिलयाच सामनयावरून कोणतयाच संघाबददल मत बनवणं टाळलेलंच बरं; >> +१. किवीज बरोबर आपल्याला क्वार्टर फायनल खेळावी लागणार आहे पुढच्या सामन्यामधे.

Pakistan outplayed India. भारतीय टीम वाईट खेळली असं नाही वाटलं (ड्यू इफेक्ट होताच) पण पाकिस्तानी टीम चा क्लिनिकल परफॉर्मन्स होता. कोहली एक खूप चांगली इनिंग खेळला आणि शेवटपर्यंत एका बाजूने उभं रहायचा त्याचा प्लॅनसुद्धा योग्य होता पण आज सर्वच बाजूने पाकिस्तानची टीम भारताला वरचढ ठरली.

“किवीजबरोबर क्वार्टर फायनल खेळावी लागणार आहे” - येस्स! काय होईल हे प्रेडिक्ट करता येत नसलं तरी ह्या टीमचं कॅरेक्टर खूप स्ट्राँग आहे. ह्या टीमकडून जबरदस्त कमबॅक च्या अपेक्षा जास्त आहेत.

विश्वचषकामध्ये पाकिस्तान विरुद्ध पहिल्यांदा हारुन कोहलीच्या करिअरला मोठा डाग लागला आहे. आत्ता तो विश्वचषक जिंकूनच पुसला जाऊ शकतो. पंड्या लयीत नसल्यामुळे आपल्याला एक पावर हीटर ची कमतरता जनावण्याची आहे. का पंत त्याची कमतरता पूर्ण करेल? माझ्यामते कालच्या सामन्यातील top 4 हे ईंनीग्स बिल्ड करणारे खेळाडू आहेत, आपल्याला स्फोटक खेळी करणारा एखादा खेळाडू वरच्या फळीत पाहिजे. पुढच्या सामन्यात सूर्या च्या जागी ईशान ची निवड नक्की वाटतेय तर पंड्या च्या जागी शार्दूल.

*पीएस्ल बघणार्‍यांना हे सर्वज्ञात आहे. * - मीं इतर स्पर्धा फारशा पहात नाहीं. त्यामुळे मला माहित नव्हतं. तरीही हया वेगाने असा चेंडू टाकण्यात तो इतका पारंगत असेल, तर खरंच कौतुकास्पद ! ( आपल्याकडे करसन घावरी हा गोलंदाज असे चेंडू टाकत असे. पण त्याच्या चेंडूचा वेग अगदींच सौम्य असे. तरीही गावस्कर त्याचा अचूक उपयोग करून घेवून भल्या भल्या फलंदाजांना हैराण करत असे ).
*हया टीमकडून जबरदस्त कमबॅक च्या अपेक्षा जास्त आहेत.* +1
काल विकेट मिळण्याची सर्वाधिक शक्यता चक्रवर्तीच्याच गोलंदाजीवर वाटत होती. शार्दुलसहीत 3 पेस बोलर्स व चक्रवर्ती, अश्विन हे दोन स्पीनर्स खेळवले जातील ही योग्य शक्यता.

कशीही टीम असूदे. जोपर्यंत सहावा बोलर न वापरण्याचं व्रत शास्त्री अन कोहली सोडत नाहीत तोपर्यंत बाकी कशानीही फरक पडत नाही.
काल इनिंग्ज ब्रेक मधे कोहली बोलिंग प्रॅक्टिस करत होता, पण मॅचमधे गरज असूनही केली नाही.
पाकिस्ताननी दव असूनही एका बाजूनी फास्ट अन दुसर्‍या बाजूनी स्पिन घेऊन सुरवात केली. आपण तीन पेसर्स घेऊन खेळत असल्यानी असलं काही आपल्या प्लॅन मधे बसतंच नाही. चक्रवर्तीनी ४थी ओव्हर टाईट टाकूनही ६वी ओव्हर त्याला दिली नाही. पॉवरप्ले मधे ती एक ओव्हर वगळता आपण त्यांच्यावर काहीही प्रेशर टाकू शकलो नाही तिथेच सामना हातून गेला.
पाच मेन बोलर्सना विकेट घेण्यात सपशेल अपयश येत असतानाही सहावा बोलर कन्सिडर होत नाही. स्पिनर्सनी पहिल्या काही ओव्हर्स मधे त्यातल्या त्यात दबाव टाकायचा प्रयत्न केला अन तो चालला पण तरीही कोहली सहावा बोलर म्हणून स्वतः एक दोन ओव्हर्स टाकणार नाही. आणि संघाला गरज असताना (बॅटिंग काँट्रिब्यूशन ० असतानाही) शर्मा अन पांड्या चेंज म्हणूनही बॉल हातात घेणार नाहीत.

थिंक टँक बदलण्याची नितांत गरज आहे.
अन नॉन फ्लेक्सिबल प्लेअर्सना थोडा डोस द्यायचीही.

एके काळी सचिन, सौरव, सेहवाग, युवराज हे चौघं गरजेप्रमाणे बोलिंग करायचे. द्रविड गरजेनुसार कीपिंग करायचा.
मी बॅट्समन आहे, मी बोलिंग करणारच नाही हा अ‍ॅटिट्यूड कुठून आला?

*शर्मा अन पांड्या चेंज म्हणूनही बॉल हातात घेणार नाहीत.* - त्याची कारणं पटोत वा ना पटोत, पण हे दोघेही निश्चितपणे गोलंदाजी करणार नाहींत हें पक्कं होतः व त्या ठाम समजूतीवरच त्याना संघात घेतलं होतं. मग त्यानी गोलंदाजी केली नाहीं म्हणून त्याना दोष देणं योग्य आहे का ? ज्या सामन्यात नियमित गोलंदाज एकही विकेट घेवूं शकले नाहींत, निदान त्या सामन्यापुरतं तरी सहाव्या गोलंदाज न वापरणं हा मुद्दा कारण म्हणून मांडणं अनुचित वाटतं.

हार्दिक गोलंदाजी करू शकत नसल्यामुळे आपला टीम चा बॅलन्स पूर्ण पणे गंडला आहे, सहा गोलंदाज हवेतच ,पण शार्दूल ला 7 व्या क्रमांकावर खेळवणे फलंदाजी कमकुवत करते, कोहलीने गोलंदाजी केली असती तर काही फरक पडला नसता. हार्दिक गोलंदाजी करू शकणार नाही हे माहीत झाल्यावर निवड समितीने थोडे धाडस दाखवून वेंकटेश अय्यर आणि दीपक चहर ची निवड 15 मध्ये करायला हवी होती असे वाटते.

त्या ठाम समजूतीवरच त्याना संघात घेतलं होतं. मग त्यानी गोलंदाजी केली नाहीं म्हणून त्याना दोष देणं योग्य आहे का ?
>>

घराला आग लागली आहे, बाकी लोकांना पाण्याची मोटर सुरू करता येत नाहिये. अशावेळी मी सध्या फक्त कुक आहे / सिक्युरिटी गार्ड आहे, मी पाण्याच्या मोटरला हात लावणार नाही (जरी मी पूर्वी या गोष्टी केल्या असल्या तरीही सध्या माझा मूड नाही) घर जळून गेलं तरी ठीक... ही भूमिका जितकी योग्य आहे, तितकंच पांड्या, रोहित अन कोहलीचं बोलिंग न करणं...

ज्या सामन्यात नियमित गोलंदाज एकही विकेट घेवूं शकले नाहींत, निदान त्या सामन्यापुरतं तरी सहाव्या गोलंदाज न वापरणं हा मुद्दा कारण म्हणून मांडणं अनुचित वाटतं.>>
सहाव्या गोलंदाजाची खरी गरज याच सिच्युएशन ला पडते ना...??

सौरवच्या संघात आपण द्रविडला कीपर करून ७ फलंदाज अन ४ नियमीत गोलंदाज घेऊन खेळायचो. त्यावेळी ७ पैकी किमान ३ जण गरजेनुसार बोलिंग करायचे.
आज आपण ४ फलंदाज, ४ गोलंदाज, १ कीपर (जो बर्‍यापैकी बॅटिंग करतो) अन २ ऑलराऊंडर्स (ज्यातला एक बरी बॅटिंग अन एक चांगली बोलिंग करतो) घेतो.
ऑन पेपर हे बॅलन्स्ड आहे. पण जर १ ऑलराऊंडर पूर्णपणे काँट्रिब्यूट करणार नसेल तर हा बॅलन्स गंडतो हे मान्य करण्यात काय प्रॉब्लेम आहे?
आणि जर कालच्यासारखी परीस्थिती आली तर मग मॅच हरली तरी चालेल पण आम्ही आमचा ठरलेला रोल सोडून बाकी काहीही करणार नाही हा अ‍ॅटित्यूड बरोबर वाटतो का?

एका पारड्यात कोहलीची खराब कॅप्टन्सी, खेळाडूंशी गैरवर्तणूक आणि बॅड लक तर दुसऱ्या पारड्यात धोनीची + रोहितची मेंटॉरशिप, स्किल्स, लक, मैदानातील वावर, खेळाडूंसोबत असलेली वर्तणूक आणि अजूनही तुम्हाला काही आठवत असेलेल्या प्लस गोष्टी टाकल्या तरी कोहलीचं निगेटिव्ह गोष्टीचं पारडं जड असेल. टीम बदलून काही होणार. कोहली कॅप्टन असेलेल्या संघात बाकीचे १० सुपरमॅन जरी खेळवले तरी पण तो संघ सामना हारेल.

आता एव्हढ्यात मी पुन्हा या धाग्यावर येणार नाही. ईथे आलो तर न्यूझीलँडबरोबर सामना कधी आहे ते समजेल आणि मग तो सामना बघावासा वाटेल. त्या सामन्यात पण कोहली आपले स्किल्स वापरून तो सामना हरणार आणि हार्ट ब्रेक होणार . त्यापेक्षा अज्ञानाच्या जगातच मला राहू दे, तुम्ही पण राहा. अज्ञानात सुख असते या म्हणीचा अर्थ आज मला समजला. टाटा बाय बाय.

*आमचा ठरलेला रोल सोडून बाकी काहीही करणार नाही हा अ‍ॅटित्यूड बरोबर वाटतो का?* - जॅकीजी, हा ॲटिटयूड आहे कीं त्यांची खरीखुरी मजबूरी ? माझ्या माहितीनुसार रोहित व पांडया वैद्यकीय सल्लयानुसार गोलंदाजी करत नाहींत व अर्थातच खेळाडूंची वैद्यकीय तपासणी नियमितपणे करून घैणार्या टीम मॅनेजमेंटला हे पटलेलं आहे. मीं तरी ह्याला 'ॲटिटयूड'चं लेबल लावणार नाहीं.
*सहाव्या गोलंदाजाची खरी गरज याच सिच्युएशन ला पडते ना...??* - जेव्हा एखाद दुसरा नियमित गोलंदाज अजिबात चालत नाहीं (किंवा गोलंदाजीत अधिक वैविध्य असावं म्हणून) , तेव्हा सहाव्या गोलंदाजाची खरी गरज असते. 5ही नियमित गोलंदाज चालत नसतील, तर सहावा नव्हता हया मुद्द्याला फक्त लंगडी सबबच म्हणावं लागेल.

एके काळी सचिन, सौरव, सेहवाग, युवराज हे चौघं गरजेप्रमाणे बोलिंग करायचे. द्रविड गरजेनुसार कीपिंग करायचा.
मी बॅट्समन आहे, मी बोलिंग करणारच नाही हा अ‍ॅटिट्यूड कुठून आला?>>>>>>+१ अझहरने पण बर्‍याच वेळा बॉलिंग केलीय. विकेटस पण घेतल्यात. उलट मधूनच नवीन बॉलर उगवला तर सेट झालेल्या बॅटसमनला पण गोंधळायला होते.

पण एनीवे, पाकीस्तानी बॉलर्स छा गये. फिल्डिंग पण चांगली होती.

काल एका मुलाखतीत ' रोहितला आतां डच्चू देणार का ?' असं विचारणारया पत्रकाराची कोहलीने टर उडवली. ' रोहित टी20 मधला जगातील अव्वल फलंदाज आहे', असं जाहिरपणे सांगत त्याने निवडसमितीचा रोहितबाबतचा कल स्पष्ट केलाय. रोहित तो समर्थनीय ठरवेल अशी रास्त अपेक्षा !

" ' रोहितला आतां डच्चू देणार का ?' असं विचारणारया पत्रकाराची कोहलीने टर उडवली." - प्रश्नच बिनडोक होता तो. प्रिंट मिडीयामधून जसं 'प्रूफ रीडर' ही पोस्ट गायब झालीय तशी प्रशिक्षीत पत्रकार ही जमात सुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे असं वाटतं कधी कधी. कट्ट्यावर गप्पा माराव्या अशा कॅज्युअली प्रश्न विचारतात काही काही पत्रकार. सनसनीखेच ब्रेकिंग न्यूज हाच एक अट्टहास. असो.. कोहलीने चांगलं उत्तर दिलं (आणि चांगल्या प्रकारे दिलं).

सहाव्या गोलंदाजाची खरी गरज याच सिच्युएशन ला पडते ना...?? >> हे बरोबर आहे पण रोहित पाठदुखीमुळे नि पांड्या काही गुप्त कारणामूळे बॉलिंङ करत नाहीत. पांड्या ला वर्ल्ड कप साठी फ्रेश ठेवायचे ह्या कारणासाठी आयपील मधे बॉलिंग दिली नाही असे जयवर्धने नि रोहित ह्यांनी सांगितलेले. गेल्या आठवड्यात पांड्या बॉलिंग करेल असे रोहित म्हणाला होता. नेमके घोडे कुठे पेंड खाते देव जाणे. सध्याच्या फॉर्मच्या जीवावर पांड्या बॉलिंग बिना संघात असणे झेपत नाही. शार्दूल त्याच्या जागी खूपच वर येतो (जाडेजा सहाव्या क्रमांकावर चैन वाटते). किशन ला आत आणून ओपन करायला लावणे (लेफ्टी राईटी - हार्ड बॉल वर तो कत्तल आहे) नि राहुल ला ५-६ वर खाली खेचणे (तो फ्लेक्सीबल आहे म्हणून) हा एक ऑप्शन आहे (पण जो सहावा बॉलर हा प्रश्न सोडवत नाही ) अय्यर हा पर्याय वापरायला बोल्ड निर्णय घ्यावा लागेल.

कोहलीने चांगलं उत्तर दिलं (आणि चांगल्या प्रकारे दिलं). >> इथे लिहिणारे काही विशिष्ट लोक अशा गोष्टींकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात Happy

इथे लिहिणारे काही विशिष्ट लोक अशा गोष्टींकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात
>>>>
कदाचित त्यांनी ते पाहिले नसेल. मी सुद्धा पाहिले नाही. मॅच हरल्यावर मूड असा ऑफ होतो की पुढे काही बघावेसेच वाटत नाही .. बाकी काय सीन झाला नक्की.. काय ऊत्तर दिले कोहलीने? थट्टा उडवली असेल तर छानच आहे. नाहीतर पुढची मॅच हरता कोहलीलाच तू कधी बाहेर पडतोयस असा प्रश्न असता Happy

बाकी आज अफगाण मस्त मारतेय. यांचे बॅटसमन जर ईतर मुख्य संघांच्या क्वालिटी बॉलिंगलाही असे मारू शकले तर गोलंदाजीत यांच्या एक्स फॅक्टर आधीपासून आहेच.. मजा आणनार आहे अफगाण... फक्त आपल्याला धक्का बसू नये म्हणजे झाले Lol

२८-० ते २८-३ मुजीबने एकाच ओवरला ३ काढल्या
आणि आता ३०-४ ..
अजून राशीद आलाच नाही.
अफगाण नेट रनरेटमध्येही कोणाच्या मागे राहणार नाही वाटते..

Pages