Submitted by ऋन्मेऽऽष on 18 October, 2021 - 14:57
आयपीएल संपली आणि वर्ल्डकप आला वर्ल्डकप.. चला माहौल बनवूया
दुनिया हिलाs देंगे हम, व्हिसलपोडू आणि कोरबो लोरबो जितबो रे.. सारे एक होऊया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नामिबिया न्यूझीलंड कोणी बघतेय
नामिबिया न्यूझीलंड कोणी बघतेय का...
६.२ ओवर ४३-२ न्यूझीलंड
कोहलीने टॉस जिंकला. आता आपले
कोहलीने टॉस जिंकला. आता आपले निधड्या छातीचे दोन ओपनर वाघ दहा ओव्हरमध्ये सामना फिनिश करणार. #दहावीvsपहिली
पाकिस्तान आणि न्यूझीलँड त्या
पाकिस्तान आणि न्यूझीलँड त्या ग्रुपमध्ये पाहिजे होते आणि त्यांच्यातले श्रीलंका बांगलादेश आपल्या ग्रुपमध्ये पाहिजे होते मग अजून मजा आली असती.
रनरेट अफगाणिस्तानच्या वर नेत
रनरेट अफगाणिस्तानच्या वर नेत भारताचा स्कॉटलंड विरूद्ध विजय ! अभिनंदन.
नवरामुलगा लग्नाचे कपडे, फेटा, बाशिंग चढवून आतां सज्ज आहे. फक्त, मुलीकडून होकार यायचा तेवढा बाकी आहे !!!
दणक्यात विजय
दणक्यात विजय
आता फक्त अफगाणिस्ताने आपले काम चोख बजावावे!
पयलीतल्या पोराने दहावीच्या
पयलीतल्या पोराने दहावीच्या पोराला मारणे अशक्य आहे. नामीबिया सोबत राखीव खेळाडूंना स्थान द्यावे. मॅच संपल्यावर कोलीला बळेच खांद्यावर उचलून ग्राऊंडला एक राउंड मारावा, प्रेक्षकांचे अभिवादन करावे, आणि त्याला नारळ शाल द्यावी. जमल्यास राउंड मारता मारता जास्तीत जास्त भारतीय प्रेक्षकांचे फोन नंबर घ्यावेत आणि त्यांना तिकिटाचे पैसे परत द्यावे.
भारत अफगाणिस्तान सामन्यात
भारत अफगाणिस्तान सामन्यात fixing झाले असावे अशी शंका यावा असा विडिओ उपलब्ध आहे. टॉस वेळी कोहली नबीला तू बॉलिंग घे असे सांगताना स्पष्ट ऐकू येतंय.
हा हा.. फेक विडिओ असेल.
हा हा.. फेक विडिओ असेल.
फिक्सिंग होते तेव्हा असे कोणी टॉसच्या वेळी नाही सांगत
बाकी मी सुद्धा या फिक्सिंगच्या न्यूज पाहिल्या फेसबूकवर. पण एकाही लिंकवर क्लिक करायला गेलो नाही. कारण सामना पुर्ण पाहिलेला. एकूणच वर्ल्डकप पुर्ण बघतोय. फिक्सिंगची जराही शंका नाही डोक्यात. न्यूज फक्त टीआरपीसाठी असतात. आपण सामना बघावा आणि आपली अक्कल वापरावी
मला पण वाटलं की फेक व्हिडीओ
मला पण वाटलं की फेक व्हिडीओ असेल आणि तो आवाज नन्तर दिला असेल म्हणून hotstar वर जाऊन बघितलं तर तिथे पण तेच आहे. कोहलीने त्याला बॉलिंग घ्यायला सांगितली हे स्पष्ट ऐकू येतंय. असं असेल तर अफगाणिस्तान जिंकणार न्यूझीलँड सोबत. अरे देवा इथे पण फिक्सिंग.
आजच एकाने फेसबूकवर लिहिलेले
आजच एकाने फेसबूकवर लिहिलेले की बीसीसीआयच्या दबावामुळे न्यूझीलंड मुद्दाम हरेल असा आरोप केलेला त्यावर मी खालील रिप्लाय दिलेला.
>>>>
हे असे होत असते तर वन डे वर्ल्डकप, कसोटी चॅम्पियनशिप फायनल, आणि आतापर्यंतच्या प्रत्येक २०-२० वर्ल्डकप सामन्यात जे न्यूझीलंडने आपल्याला हरवलेय ते झाले नसते.
आपण पोस्ट मजेत लिहिली आहे मान्य. पण हेच पकडून काही लोकं जे भारत हरल्यावर शिव्या घालायला पुढे असतात आणि जिंकल्यावर फिक्सिंग फिक्सिंग करत थयथयाट करतात, अश्यांचा हातात कोलीत देऊ नये.
>>>>
आयपीएलने विश्वासार्हता घालवली आहे. पण आपल्याला ईंटरनॅशनल क्रिकेट आणि आयपीएल वेगवेगळे ठेवणे जमायला हवे.
खतरनाक रण रेट विराट सेनेचा...
खतरनाक रण रेट विराट सेनेचा... आपल्या ग्रुप मध्ये सगळ्यात भारी... विराट आगे बढो.. हम तुम्हारे साथ है...
फिक्सींग- ज्या देशांचे संघ व
फिक्सींग- ज्या देशांचे संघ व क्रिकेट बोर्ड जागतिक क्रिकेटमधे अजिबात दबदबा नसणारे होते, तेव्हा अकल्पित असे निकाल लागून भारत, श्रीलंका व पाकिस्तान एकदिवसीय विश्वचषक जिंकले. त्यामुळे, केवळ अनपेक्षित निकाल लागण्यावरुन ( किंवा बीसीसीआय आतां खूप प्रभावी झालंय म्हणून ), अशा जागतिक स्पर्धांत फिक्सींगचीच शंका घेणं तितकंसं समर्थनीय नसावं.
द.आफ्रिका आणि 'विश्वचषक'
द.आफ्रिका आणि 'विश्वचषक' यांचं काहीतरी हाडवैर असावं. बिचारे रनरेटमुळे या स्पर्धेतूनही बाद !
आज देव पाण्यात ठेवून पहिली मॅच बघायची पाळी आलीय आपल्यावर ! असो, मनाची तयारी आहे , धक्का तरी बसणार नाहीं निकाल नको तो लागला तरीही. शुभेच्छा, अफगाणिस्तान व भारताला !!
अफगाणिस्तान जिंकेल असं कोणाला
अफगाणिस्तान जिंकेल असं कोणाला कसं वाटू शकतं. न्यूझीलँड स्ट्रॉंग आहे कितीतरी पटीने. उद्या आपली नामीबियासोबत शेवटची मॅच आहे. ती व्यवस्थित खेळून बाहेर जाणं हाच पुढचा मार्ग आहे.
*अफगाणिस्तान जिंकेल असं
*अफगाणिस्तान जिंकेल असं कोणाला कसं वाटू शकतं.* -
'जिंकेल' असं कुणालाच नसेल पण ' जिंकावं ' असं कुणाला तरी वाटायला काय हरकत असावी ! याहीपेक्षा कितीतरी पटीने अनपेक्षित निकाल वेगवेगळ्या विश्वचषकात पहायला मिळालेच आहेत ना !
मला तर अफगाणिस्तान स्ट्राँग
मला तर अफगाणिस्तान स्ट्राँग वाटतेय. फक्त त्यांचा तो मुजीबही परत यायला हवा. म्हणजे स्पिन स्ट्रेंथ वाढेल न्यूझीलंडसमोर.
सगळा मोठ्या फटक्यांचा खेळ आहे. जे बिनधास्त न कचरता मोठे शॉट खेळणार ते गेममध्ये पुढे राहणार. अफगाणच्या विकेट नाही फसल्या तर ते तसेच खेळणार ही आशा. आणि न्यूझीलंड अफगाण स्पिनरसमोर कचरले मोठे फटके खेळायला तर त्यांचा स्कोअर कमी पडणार ही आशा..
आज अफगाणिस्तान न्यूझीलँडला
आज अफगाणिस्तान न्यूझीलँडला धूळ चारून भारत सेमित प्रवेश करणार आणि वर्ल्ड कप जिंकणार.
रोहित शर्माने आपल्या ७४
रोहित शर्माने आपल्या ७४ धावांच्या खेळीच्या जोरावर एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे
आता तो आयसीसीच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे
त्याने, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, वनडे वर्ल्डकप, चॅम्पयिन्स ट्रॉफी, टी-२० वर्ल्डकप मिळून आतापर्यंत तब्बल ३ हजार ६८२ धावा ठोकल्या आहेत
या बाबतीत हिटमॅन रोहित शर्माने इंग्लंडचा कर्णधार जो रूटलाही मागे टाकले आहे त्याने आतापर्यंत आयसीसी स्पर्धेत ३ हजार ६६२ धावा केल्या आहेत.
तर याबाबतीत विराट कोहली ३ हजार ५५४ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Rohit sharma made the biggest record
अफगाणिस्तान 34-3 ! देव
अफगाणिस्तान 34-3 ! देव पाण्यात, पण आशेवर पाणी ! !
मागच्या पानावर:
मागच्या पानावर:
आपल्याला वैयक्तिक विक्रम नकोत नुसते Happy
या पानावर:
Rohit sharma made the biggest record
अफगाणिस्तान- 124 ! शेवटच्या
अफगाणिस्तान- 124 ! शेवटच्या तीन षटकांत न्यूझीलंडची अप्रतिम गोलंदाजी व क्षेत्ररक्षण !
@ स्वरूप,
@ स्वरूप,
आपल्याला वैयक्तिक रेकॉर्ड नकोत नुसते यामधील नुसते हा शब्द महत्वाचा आहे
जेव्हा एखादा खेळाडू देशाला जिंकवायला खेळतो तेव्हा साईड बाय साईड रेकॉर्ड होत राहतात. त्यांचे कौतुकच राहील.
पण जेव्हा खेळाडू रेकॉर्ड करण्यावर फोकस ठेऊन खेळतो तेव्हा जिंकणे दुय्यम होते.
मग ते सचिनच्या शंभराव्या संथ शतकामुळे बांग्लादेशशी पत्करावा लागलेला पराभव असो वा लाराच्या ४०० धावांच्या विक्रमाच्या हव्यासापोटी अनिर्णित राहिलेला सामना असो.
(हे दोघे ऑलटाईम लिजण्ड आहेत आणि यांच्या ईतर कैक खेळींचे कौतुक आहे)
आणि हो, तो शर्माचा वर्ल्डकपमधील धावांचा विक्रम आहे. या प्लॅटफॉर्मवर मारलेल्या धावांचे कौतुकच आहे. या धावांनी भारताला सेमीला पोहोचवले आहे. जे यावेळी धावा आल्या नाहीत तर झाले नाही.
न्यूझीलंडच्या फिल्डींगने २०
न्यूझीलंडच्या फिल्डींगने २०-२५ धावांचा फरक पाडला. अखेरच्या ओवरला वाचवलेला सिक्स अप्रतिमच होता. अफगाणला सिंगलचे डबल करायलाही जमत नव्हते.
खतम टाटा बाय बाय. मी
खतम टाटा बाय बाय. मी बोलल्याप्रमाणे उद्याची मॅच व्यवस्थित खेळून बाहेर पडणे.
आज अफगाणिस्तान न्यूझीलँडला धूळ चारून भारत सेमित प्रवेश करणार आणि वर्ल्ड कप जिंकणार.
Submitted by बोकलत on 7 November, 2021 - 14:55>>>> मी जेव्हा हे लिहिलं तेव्हा कोणीच या पोस्टला +1111 किवां आमीन लिहिलं नाही. भरोसा असणे महत्वाचं आहे. पाऊस पडेल या भरोषाने जसा तो लहान मुलगा एकटाच छत्री घेऊन आला तसं मी पण अफगाणिस्तान जिंकेल या आशेवर पोस्ट केली होती. देव तेव्हा पण हसला होता आणि देव आता पण हसला. भरोसा असणे महत्वाचे आहे.
अनेकोनेक धाग्यांवरच्या
अनेकोनेक धाग्यांवरच्या अनेकोनेक पोस्ट्स:
सचिन द्विशतकाच्या जवळ असताना डाव घोषित केला म्हणून द्रवीडला केलेले बॅशिंग
या धाग्याच्या या पानावर:
जेव्हा एखादा खेळाडू देशाला जिंकवायला खेळतो तेव्हा साईड बाय साईड रेकॉर्ड होत राहतात. त्यांचे कौतुकच राहील.
पण जेव्हा खेळाडू रेकॉर्ड करण्यावर फोकस ठेऊन खेळतो तेव्हा जिंकणे दुय्यम होते.
सचिन द्विशतकाच्या जवळ असताना
सचिन द्विशतकाच्या जवळ असताना डाव घोषित केला म्हणून द्रवीडला केलेले बॅशिंग
>>>>>
मी त्या निर्णयाबद्दल कधीच द्रविडला नाव ठेवणार नाही. कारण माझ्यामते ती दादाने द्रविडच्या खांद्यावर बंदूक ठेऊन चालवलेली गोळी होती. मागेही मी जेव्हा हे म्हटलेले तेव्हा ईथे वाद झालेला भरपूर. म्हणून मग म्हटले चला द्रविडचा निर्णय तर द्रविडचा निर्णय, कारण सांगायचा मुद्दा हा होता की निर्णय कोणाचाही असो, ते द्विशतक सचिनचे होऊ द्यायचेच होते. अजून दोन ओवर खेळल्याने निकालावर काही फरक पडणार नव्हता हे कोणीही सांगू शकेल.
लाराच्या ४०० धावांच्या विक्रमी हव्यासाला मात्र हे लागू नाही होत.
नंतर मी स्कोअरबोर्ड आणतो त्या सामन्याचा...
तर चला मी मागे
तर चला मी मागे म्हटल्याप्रमाणे मी आज क्रिकेटला कायमचा रामराम ठोकतोय. अति क्रिकेटमुळे क्रिकेट पहायची ईच्छा मरून गेले. माझ्या ईथल्या पोस्टिंमुळे जर कोणाला काही ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. जाता जाता एक गोष्ट बरेच दिवस माझ्या मनात खदखदत होती ती म्हणजे माझा क्रिकेटमधील इंटरेस्ट संपण्यामागे अति क्रिकेट हे कारण आहेच पण त्याच्या सोबतीला प्रगत तंत्रज्ञानाचा क्रिकेमधील(जवळपास सगळ्यात खेळात) अतिवापर हे पण एक महत्त्वाचं कारण आहे. या तंत्रज्ञानाने क्रिकेटची सगळी मजा घालवली आहे. आज जर कोणीही चांगला बॅट्समन बॉलर उदयाला आला तर लगेच तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचे कच्चे दुवे शोधले जातात आणि त्याला निष्प्रभ केलं जातं. हे एव्हडं धोकादायक आहे की काही वर्षांनी सगळं यंत्रवत वाटायला लागेल. मैदानावर खेळाडू नसून रोबोट आहेत की काय असा प्रश्न पडेल. कोणत्याही खेळात तंत्रज्ञान किती वापरावे याची एक लक्ष्मणरेखा आखणे गरजेचे आहे. तर चला मित्रानो निरोप घेतो तुमचा. ईतर धाग्यांवर भेटू.
अहो बोकलत आता शर्मा कप्तान
अहो बोकलत आता शर्मा कप्तान होईल आणि तुम्ही क्रिकेट बघायचे बंद करत आहात...
रोहित जर पाच सहा वर्षे आधीच
रोहित जर पाच सहा वर्षे आधीच कॅप्टन झाला असता तर अजून मजा आली असती. पण आता मी थांबायचं ठरवलं आहे. क्रिकेट रोबोटिक्स झाल्यात जमा आहे.
या स्पर्धेत आपल्या ग्रुपमधून
या स्पर्धेत आपल्या ग्रुपमधून सर्वोत्तम खेळलेले दोन संघ सेमिला गेले. त्या दोन्ही संघांचं मनापासून अभिनंदन व त्याना शुभेच्छा !
अरे, नुसतं नियमावर बोट काय ठेवतोस. जरा 'पाॅईंटस टेबल'ही लक्षात घे ना !!
Pages