क्रिकेट विश्वचषक ट्वेंटी २० - वर्ष २०२१

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 October, 2021 - 14:57

आयपीएल संपली आणि वर्ल्डकप आला वर्ल्डकप.. चला माहौल बनवूया
दुनिया हिलाs देंगे हम, व्हिसलपोडू आणि कोरबो लोरबो जितबो रे.. सारे एक होऊया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच्या वॉर्म अप सामन्यानंतर (मला) क्लीअर झालेल्या गोष्टी:

१. शर्मा राहुल कोहली हे फलंदाज फिक्स आहेत.
२. विकेटकीपर आज सिक्स मारून फिनिश करणारा पंतच असणार
३. ईशान किशन की सुर्या हा प्रश्न तुर्तास सुटला आहे.
४. पांड्या गोलंदाजी करो वा न करो तो सहाव्या क्रमांकावर हार्ड हिटर फिनिशर म्हणून खेळणारच.
५. सर जडेजा यांनी फलंदाजी/गोलंदाजी/क्षेत्ररक्षण यापैकी कुठल्याही दोन गोष्टी केल्या तरी ते अष्टपैलू म्हणूनच गणले आणि खेळवले जातील.
६. वरून चक्रवर्ती हा आपला ट्रंप कार्ड आहे जो आज वॉर्म अप सामन्यात एक्स्पोज न करणे योग्य समजले असावे. अर्थात, त्याचीही जागा पक्की वाटत आहे.
७. बुमराह सोबत वेगवान गोलंदाज म्हणून पहिला मान शमी पटकावणार.
८. हार्दिक पांड्या गोलंदाजी टाकणार नसेल तर तिसरा स्पिनर नाही तर वेगवान गोलंदाजच खेळवला जाईल. म्हणजेच आश्विन आणि राहुल चहर दोघांचा पत्ता कट.
९. भुवनेश्वर विशेष फॉर्मात नसल्यास तिसरा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला खेळवले जाईल.
१०. चिंतेची बाब एकच. पांड्याने खरेच गोलंदाजी न टाकल्यास आपल्याला पाच गोलंदाजांनीच खेळावे लागेल. शार्दुलला भुवीच्या जागी खेळवता येईल पण पांड्याच्या जागी ऑलराऊंडर म्हणून खेळवणे भरवश्याचे नाही वाटत. कारण त्याला स्वत:ची फलंदाजी सिद्ध करायला आयपीएलमध्ये विशेष संधी मिळालीच नाहीये.

संघ साधारण खालीलप्रमाणे राहील.
१. शर्मा
२. राहुल
३. ईशान
४. कोहली
५. पंत
६. पांड्या
७. जडेजा
८. शार्दुल / भुवनेश्वर
९. वरून चक्रवर्ती
१०. शमी
११. बुमराह

काय बोलता! Happy

सर्वसाधारण संघ तसाच असेल - शास्त्रीने आधीच सांगितले आहे की दवावर बॉलिंग चा मेक ठरेल. कुठे तरी स्काय आत येईल असे वाटते. लेफ्ट राईट काँबो नि टेंपो सेट करायचा ह्या द्रुष्टीने बघता किशन नि राहुल ओपन असावे नि अर्थात त्यामूळे कोहली तीन नंबर वर नि शर्मा एक नंबर वर हे रीडंडंट वाटतात.

"संघ साधारण खालीलप्रमाणे राहील." - ह्यात फारसा बदल होईल असं वाटत नाही. पंड्या बॉलिंग करत नसणं भारताच्या टीम बॅलन्स च्या दृष्टीनं त्रासदायक ठरतंय. आजच्या मॅच मधे तरी भुवनेश रस्टी वाटला. पण परवा कोहलीने भुवनेश आणि अश्विन च्या अनुभवाची पाठराखण केलीय. आज अश्विन ने बॉलिंग ही चांगली केली. त्यामुळे त्या दोघांना पाकिस्तान वगैरे हाय प्रोफाइल मॅचेस मधे खेळवतील का असा प्रश्न मला पडलाय.

असामिजी, संघनिवडीबाबत तुमच्या बहुतेक पोस्ट रोहित शर्माला संघाबाहेर काढण्यावर केंद्रित कां असतात ? खरंच तुम्हाला नेमकं असं इतकं काय खूपतं त्याच्या खेळातलं ?

कालची भारत इन्ग्रज सरावाची मॅच फिक्स होती असे दिसते! Wink
तुम्हि भरपूर सरावा करा आणि आम्हालाही करू द्या! Happy

रोहित शर्माला सरावाची संधी नाकारली! आसामीजी, तुम्ही होता तिथे कुणाला सराव द्यायचा हे ठरवायला?? Wink Light 1

जे फलंदाजीत सहाव्या क्रमांकावर पांड्या करू शकतो ते सुर्या नाही करू शकत. ईतर कोणी नाही करू शकत.
जे सुर्या करू शकतो ते करायला कोहली आणि कंपनी आहे.
त्यामुळे टीम कॉम्बिनेशननुसार पांड्याच्या फलंदाजीची गरज आहेच. त्याचे बॉलिंग न टाकणे फटका ठरू शकते. तरी गरजेला एक्स्ट्रा एफर्ट घेत टाकेल असे वाटतेय. दुसरा निव्वळ फलंदाज घेतला तर गरजेलाही कोणी नसेल.
शेवटी वर्ल्डकप आहे. थोडे एक्स्ट्रा पांड्यानेही द्यायलाच हवे. नंतर हवे तर बस चार महिने घरी

पंड्याची २०-२० सरासरी ३३ डावात २० च्या खाली आहे! एकदोन सामन्यात चुणुक उपयोगी नाही सातत्य हवे. पंत आहेच त्यासाठी संघात आणि आतातर धोनी मनोबल वाढवायला आहे पंताचे. त्यामुळे पंड्याची भुमिका पंत पार पाडेल. कवळी ३ र्‍या क्रमांकावरच खेळणार आघाडीसाठी ३ खेळाडू असल्याने. ४ थ्या क्रमांकासाठी सुकुया किंवा श्रेयस सारखा खेळाडू हवा. ( श्रेयस राखिव आहे) त्यामुळे सुकुया पेक्षा चांगला पर्याय नाही. ६ व्या क्रमांकावर पंताला ठेवावे.

माझा संघ :

रोहित
राहुल
कोहली
किशन
सूर्या
पंत
सर
लॉर्ड
अश्विन / भुवनेश (पिच नुसार)
शमी
बुमरा
बारावा : पांड्या

किशन / सूर्या / श्रेयसला आलटून पालटून चेक करून त्यातले २ कंटिन्यू करायला आवडेल.

बारावा : पांड्या

किशन / सूर्या / श्रेयसला आलटून पालटून चेक करून त्यातले २ कंटिन्यू करायला आवडेल.>+१११

अँकी, बर्‍यापैकी समतोल आहे संघ.

कारण निव्वळ ५ गोलंदाजांच्या भरवश्यावर २०-२० खेळता येत नाही. बदली गोलंदाज एखादा चालला नाही तर हवाच! नाही तर मग कोहलीने स्वतः गोलंदाजी करायला हवी.

भारत वर्ल्ड कप जिंकू शकत नाही कारण कोहली कॅप्टन आहे. कोहली कॅप्टन म्हणून अजिबात लकी नाही. वेळ आली पाकिस्तान बरोबरची मॅच हरू शकतो. माझं ऐका अजूनही वेळ गेलेली नाही. bcci वर दबाव टाकून रोहितला कॅप्टन करा.

प जिंकू शकत नाही कारण कोहली कॅप्टन आहे. >>>

काल सराव सामन्यात नाणेफेक जिंकली कवळीने आणि सामनाही. धोनी इफेक्ट आहे आता! Wink

मलापण ॲंकी नी निवडलेला संघ आवडला.... पांड्या कंफर्म बॉलिंग करणार नसेल तर निव्वळ बॅट्समन म्हणून मी सुर्या किंवा श्रेयसला जास्त पसंती देईन..... पंत, जडेजा, शार्दूल मिळून वेळेला स्लॉगिंग करु शकतील!!

फक्त वरुणला आत घेऊन शार्दूलला बाहेर ठेवायची वेळ येईल तेंव्हा आपल्या संघाचे शेपूट खुप मोठे होईल

*अँकी, बर्‍यापैकी समतोल आहे संघ.* +1
पीचनूसार वरूणला संघात स्थान आहेच असं समजूनच संघाची योग्य अशी पुनर्रचना करून ठेवणंही हितावह.

मला वाटतंय आपण यावेळेस वेगळा प्रयोग केला पाहिजे. जे बॉलर आहेत त्यांना ओपनिंग करायला लावायची आणि सगळे मेन बॅट्समन खाली ठेवायचे म्हणजे शेपूट खूप स्ट्रॉंग होईल.

पंड्याची २०-२० सरासरी ३३ डावात २० च्या खाली आहे! एकदोन सामन्यात चुणुक उपयोगी नाही सातत्य हवे. पंत आहेच त्यासाठी संघात
>>>>
सातत्य हवे आणि त्यापुढे पंत आहे त्यासाठी संघात हे वाक्य जरा धाडसी वाटले Happy

पांड्याची सरासरी २० च्या खाली म्हणजे १९.३६ आहे. पण २०-२० मधील तळाच्या फलंदाजांचे एवरेज आणि स्ट्राईकरेट आकडेवारी फसवी असू शकते. कारण तुम्ही कोणत्या सिच्युएशनला येतात त्यानुसार ते ठरते. पंतचा उल्लेख करत आहात पण त्याचेही आकडे काही विशेष नाहीत. २९ डावात २१ ची सरासरी आणि १२३ चा स्ट्राई़करेट. तिथेच पांड्याचा स्ट्राईकरेट १४५ आहे.
पण या दोघांची क्षमता आपल्याला माहीत आहे. आणि पांड्याचे म्हणाल तर नुकतेच ऑस्ट्रेलियात जाऊन आपण जो २०-२० मालिकाविजय मिळवला त्यात मालिकावीर हार्दिक पांड्याच होता.

शेपूट खूप स्ट्रॉंग होईल.>>>
बोकलत ते तुमच्या भूत / वेताळाचे शेपूट आहे का स्ट्राँग करायला!

असाच प्रयोग लंकेने जयसुर्या ह्या फिरकी गोलंदाजाला आघाडीला पाठवून केलेला रणतुंगा कर्णधार असताना! आणि कमालीचा यशस्वी झाला. की पुढे कायम जयसुर्याच आघाडीला.

भारत वर्ल्ड कप जिंकू शकत नाही कारण कोहली कॅप्टन आहे. >> +१.
>>
अ‍ॅक्चुअली यात तथ्य आहे आणि ही एक चिंतेची बाब आहे खरे. पण सध्या ज्या ऑफफिल्ड घडामोडी घडत आहेत त्या पाहता कोहलीची सद्दी संपत आलीय असे वाटते. प्लेअर आता कोहलीचा लोड न घेता खुलून खेळतील असे वाटतेय.

पंतचा उल्लेख करत आहात पण त्याचेही आकडे काही विशेष नाहीत. २९ डावात २१ ची सरासरी आणि १२३ चा स्ट्राई़करेट>>

पंताचा उल्लेख केला कारण तो संघात असणारच आहे! यष्टीरक्षक म्हणून त्यामुळे त्याला गरज भासल्या आडवी तिडवी फटकेबाजी करायला ६ क्र हरकत नाही. उगा पंड्याला घेऊन एक गोलंदाज कमी करणे म्हणजे पायावर धोंडा टाकण्यासारखे आहे.

माझ्या मते संघ असा हवा
1 रोहित
2 राहुल
3 ईशान
4 विराट
5 पंत
6 पंड्या
7 जडेजा
8 शार्दूल
9 शमी
10 बुमराह
11 चक्रवर्ती

पंड्या अजिबात गोलंदाजी करणार नाही असे वाटत नाही. 2 तरी ओव्हर्स टाकेल. वरुण powerplay, death ओव्हर्स कुठेही गोलंदाजी करू शकतो. भुवी पेक्षा सध्या शमी बरा वाटतोय.

पंताचा उल्लेख केला कारण तो संघात असणारच आहे! >>> असणारच आहे असे गरजेचे नाही. ईशान किशन वा राहुलही यष्टीरक्षण करू शकतोच. आधीही हे झाले आहेच. भले ऑस्ट्रेलिया दौर्‍यापासून तो सातत्याने संघासोबत असला तरी अजूनही त्याने शर्मा, कोहली बुमराह सारखी जागा १०० टक्के पक्की केलेली नाहीये. असो, पण सांगायचा मुद्दा हा की पंतच्या फिनिशिंग सातत्यावर भरवसा टाकावा असा विश्वास त्याने अजून बराच कमवायचा आहे. त्यामुळे कोहली, राहुल असताना अजून एक स्ट्राईक रोटेट करणारा आणि तुर्तास फॉर्म गडबडलेला सुर्या भरण्यापेक्षा त्याऐवजी पंतच्या जोडीला पांड्या द्यावा असेच वाटते.
आणि हो, गरज पडलीच, म्हणजे टॉपला मिडलला कोलॅप्स झालेच तर पंतही मिडल ओवर्सना एक बाजू लाऊन खेळू शकतो. दिल्लीत साधारण तशीच भुमिका वठवायचा तो. त्यानंतर जे हेटमायर करायचा ते पांड्या करू शकतो.

*भारत वर्ल्ड कप जिंकू शकत नाही कारण कोहली कॅप्टन आहे. >>* जिंकणं वा न जिंकणयाचं कर्णधार हें एकमेव , किंवा महत्वाचं तरी , कारण खरंच होवूं शकतं व तेंही टी-20 स्पर्धेत ? मलाही कर्णधार म्हणून कोहली खास वाटत नाहीं पण त्यामुळेच आपण विश्वचषक जिंकू शकणार नाही, असं मात्र नाहीं वाटत. कुणी सांगावं, फलंदाज म्हणून त्याला सहजशक्य अशी भरीव कामगिरी करून तो विशवचषक जिंकणयात मोलाची मदतही करूं शकेल ! कां आशावादी राहूं नये आपण.

असामिजी, संघनिवडीबाबत तुमच्या बहुतेक पोस्ट रोहित शर्माला संघाबाहेर काढण्यावर केंद्रित कां असतात ? खरंच तुम्हाला नेमकं असं इतकं काय खूपतं त्याच्या खेळातलं ? >> हा विनोदाचा निष्फळ प्रयत्न आहे का ? असेल तर पूर्ण पणे फसलेला आहे असे मी म्हणेन. त्याच पोस्ट मधे कोहलीचा उल्लेख आहे. तेव्हढा वगळला गेला का नि का ? कोहली नि रोहित दोघेही ज्या तर्‍हेने खेळतात ती पद्धत टी २० साठी कालबाह्य होत चालली आहे असे माझे मत आहे. मागे मी ह्याबद्दल एक चांगले आर्टिकल वाचले होते जे ह्या दोघांनाही चपखल लागू होते.
https://www.espncricinfo.com/story/do-you-really-want-virat-kohli-in-you...
मला सुरूवातीला ह्यातले मुद्दे खटकले होते त्या नंतर जनरल मी ह्या दोघांच्या बॅटींग पॅटर्न वर लक्ष दिल्यावर त्यातले तथ्य जाणवले. गेल्या वर्षी इतर टी २० स्पर्धा बघितल्यावर डेडिकेटेड हिहि, एक्स्ल्पोसिव्ह ओपनर नि तिसर्‍या क्रमांकावर अधिक स्ट्राईक रेट असणारा बॅत्समन असण्याची गरज लक्षात आली. दोघांपैकी फक्त एकच अ‍ॅफोर्डेबल आहे जो अ‍ॅम्कर म्हणून असावा. किशन, राहुल ज्या रेटने सुरूवातीला खेळत आहेत नि रोहित, कोहलीचा सध्याचा फॉर्म बघता त्यामूळे ह्या लेखातले मुद्दे अधिकच अधोरेखीत होतात. ( आता तुम्ही हे विधान खास मला उद्देशून केले आहे म्हणून तुम्हाला एक प्रश्न - काही महिन्यांपूर्वीच्या माझ्या नि तुमच्या व माझ्या नि हाय्झेन्बग बरोबर झालेया वादांमधे रोहित संघामधे का असावा ह्या बद्दल मी लिहिलेल्या पोस्ट्स वाचलेल्या आठवतात का ? )

असणारच आहे असे गरजेचे नाही. ईशान किशन वा राहुलही यष्टीरक्षण करू शकतोच. आधीही हे झाले आहेच. भले ऑस्ट्रेलिया दौर्‍यापासून तो सातत्याने संघासोबत असला तरी अजूनही त्याने शर्मा, कोहली बुमराह सारखी जागा १०० टक्के पक्की केलेली नाहीये. असो >> लेफ्टी असण्याचा फायदा मिळतो किशन नि पंत दोघेहीअ सतील तर पहिल्या पाचामधे. जर विकेट्स स्लो असतील तर लेल्फ्टी राईटी काँबो स्पिनर्स समोरे किती उपयोगी पडेल ह्याचा विचार कर.

*रोहित संघामधे का असावा ह्या बद्दल मी लिहिलेल्या पोस्ट्स वाचलेल्या आठवतात का ? * ' ऑस्ट्रेलियात रोहित दोन अंकी धांवसंख्याही ओलांडणं अशक्य आहे', असं कांहींसं आपण
म्हटलयाचं आठवतंय.

*रोहित संघामधे का असावा ह्या बद्दल मी लिहिलेल्या पोस्ट्स वाचलेल्या आठवतात का ? * ' ऑस्ट्रेलियात रोहित दोन अंकी धांवसंख्याही ओलांडणं अशक्य आहे', असं कांहींसं आपण म्हटलयाचं आठवतंय. बरोबर ?

* ' ऑस्ट्रेलियात रोहित दोन अंकी धांवसंख्याही ओलांडणं अशक्य आहे', असं कांहींसं आपण म्हटलयाचं आठवतंय. बरोबर ? >> परत विनोदाचा असफल प्रयत्न. एखाद्याच्या बाजूने लिहिताना तो दोन अंकी धावसंख्या ओलांडण अशक्य आहे असे लिहितात का ? असे लिहिणारे माझे पोस्ट दाखवता ? तुमचा दोन आयडी मधे गोंधळ होतोय का ? त्याच्या टेस्ट मधल्या ओपनिंग च्या दुसर्‍या संधीबद्दल बद्दल मी शंका व्यक्त केली होती नि इंग्लंड दौर्‍यादरम्यान मी तो त्या जागी लाँग टर्म सोल्ञुशन आहे का हे पुढच्या काही परदेश दौर्‍या नंतर स्पष्ट होईल असे म्हटले होते. नि ते माझे मत अजूनही कायम आहे. त्याच्या वन डे कामगिरीबद्दल तो नेहमीच माझा पहिला फलंदाज नि कोहली दुसरा असेल असे मी म्हटलय. वरचे पोस्ट वगळता ( ज्यातही कोहलीचे ही नाव रोहित बरोबर आहे) आधी मी कधीही रोहित टी २० मधे नसावा असे म्हटल्याचे आठवत नाही. तुम्ही कुठे पाहिलय ?

*पोस्ट दाखवता ?* - इतकं शोथत बसणं तेवढं महत्वाचं नाही. आपण नाहीं म्हणतां तर मीं दिलगिरी व्यक्त करून तें मान्य करतो.

Pages