क्रिकेट विश्वचषक ट्वेंटी २० - वर्ष २०२१

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 October, 2021 - 14:57

आयपीएल संपली आणि वर्ल्डकप आला वर्ल्डकप.. चला माहौल बनवूया
दुनिया हिलाs देंगे हम, व्हिसलपोडू आणि कोरबो लोरबो जितबो रे.. सारे एक होऊया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपली पहिली फलंदाजी!
सूर्यकुमार व भुवी ऐवजीं इशान किशन व शार्दुल ठाकूर. पांडया संघात आहे व कदाचित गोलंदाजी करेल.
मोठी धांवसंख्या उभारून किवीजवर दबाव टाकणं अपरिहार्य.
शुभेच्छा.

नाणेफेक आणि कोहली ह्यांचे विक्रम वेतळाच्या गोष्टी सारखे झालेय नाणेफेक होते आणि प्रतिस्पर्धी जिंकतो वेताळ पुन्हा झाडाला जाऊन लटकतो..

किशन आणि राहुल ओपनिंग. कोहलीची अजून एक खराब खेळी. रोहित शर्मा पाहिजेच ओपनिंगला.

१० ओवर ४८-३
ईथून सामन्यात परत येणे औघड वाटत आहे Sad
न्यूझीलंड पुन्हा डावपेचात आपल्याला भारी पडतेय
हा सामना लास्ट असता तर बरे झाले असते. जर हरलो तर वर्ल्डकप संपल्यात जमा आहे आपल्यासाठी. बाकीच्यांचे सामने बघायचाही मूड जातो.

Uhoh मी मॅच सुरु केली ३ विकेट हा बोर्ड वाचून लगेच बंद केली. आता अफगाणिस्तानशी सुद्धा हरावे. एक आगळे वेगळे रेकॉर्ड तरी होईल.

चला भारताची पहिली फलंदाजी जेमतेम 100 धावा दुसरा डाव पाहायला नको जागरण टळले.

पाकसोबत पण दुसरा डाव पहिला नव्हता.

आयपीएलमुळे सर्व भारतीय खेळाडूंचे कच्चे दुवे प्रतिस्पर्धी संघाला तोंडपाठ आहेत त्यामुळे कश्या चेंडूवर कुठं फटका कसा मारतील हे सगळ्यांना ठाऊक आहे.

*आयपीएलमुळे सर्व भारतीय खेळाडूंचे कच्चे दुवे प्रतिस्पर्धी संघाला तोंडपाठ आहेत त्यामुळे ..* +1

पाकिस्तान विरूद्धचा पराभव दुःखद होता तर कालचा पराजय नामुश्कीचा व हताश करणाराच म्हणावा लागेल. At no stage of the match, we looked a champion team. एकच गोष्ट बरी वाटली - इशानला सलामीला पाठवणं व सुरवातीलाच फिरकी गोलंदाजी वापरणं , हे प्रयोग फार यशस्वी झाले नसले तरीही ते करून पहाण्याची वृत्ती कौतुकास्पद.
कोणतीही सबब न देतां, हार पत्करून न्यूझीलंडचं मनापासून अभिनंदन !

कोहलीने अत्ता लवकरात लवकर एकदिवशीय आणि कसोटी च्या captain पदाचा राजीनामा देऊन फक्त आणि फक्त batting वरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे. कोहलीच्या नेतृत्वाखाली मोठ्या स्पर्धा जिंकणे हे भारताच्या आवाक्याबाहेर दिसू लागले आहे.

खरंतर राष्ट्रीय टीम मधील सर्व खेळाडूंना (टेस्ट / वन डे / २०-२०) आयपीएल खेळण्यास सक्त मनाई असावी. त्यांना इतर सर्व बाबतीत पुरेसे एक्सपोजर मिळते / आर्थिक फायदे देखील पुरेसे मिळतात पण दम छाक जास्त होते. आयपीएल मध्ये इतर सर्व खेळाडू असावेत. तरच राष्ट्रीय खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळून अशा मुख्य आंतर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये चांगले परिणाम दिसतील.

कालचा पराजय नामुश्कीचा व हताश करणाराच म्हणावा लागेल. At no stage of the match, we looked a champion team. एकच गोष्ट बरी वाटली - इशानला सलामीला पाठवणं व सुरवातीलाच फिरकी गोलंदाजी वापरणं , हे प्रयोग फार यशस्वी झाले नसले तरीही ते करून पहाण्याची वृत्ती कौतुकास्पद. >> +१. बरीच कारणे आहे शोधायचीच म्हटली तर ....
https://www.espncricinfo.com/story/t20-world-cup-2021-sidharth-monga-luc...

Pages