क्रिकेट विश्वचषक ट्वेंटी २० - वर्ष २०२१

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 October, 2021 - 14:57

आयपीएल संपली आणि वर्ल्डकप आला वर्ल्डकप.. चला माहौल बनवूया
दुनिया हिलाs देंगे हम, व्हिसलपोडू आणि कोरबो लोरबो जितबो रे.. सारे एक होऊया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

One of the worst performances by WI today!!
अफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया मॅच अपेक्षेपेक्षा जास्त चुरशीची झाली.

पहिले दोन्ही सामने ऑस्ट्रेलिया ईंग्लंड सेमीला पोहोचणार या माझ्या अंदाजानुसार झाले..

आफ्रिका एक संघनिवडीचे राजकारण आणि भेदाभेद करणारा संघ झालाय. त्यांच्याकडून मला फार अपेक्षा नाहीत.

तर दुसरीकडे विंडीज संघात समतोल नाहीये. आज एकाच छापाची असलेली फलंदाजी कोसळल्यामुळे सगळा फोकस तिथेच गेला. पण गोलंदाजीतही ते कमजोर वाटत आहेत. एखाद्या बॅटीग पिचवर फलंदाजी चमकून गोलण्दाजीत मार पडण्याची शक्यता आहे.

असो,
तर या दोन बाबी दोन्ही संघांना मारक होत्या आणि तेच आज प्रकर्षाने जाणवले.

आपल्या ग्रूपमध्ये फारसे धक्कादायक नाही घडले तर तिघातून दोन संघ निवडायचे आहेत. तिथे कंडीशन्स पाहता बहुतेकांची पसंती भारत-पाकलाच असावी. माझीही आहे. अर्थात न्यूझीलंडचे कॅरेक्टर पाहता ते फार मागे नसावेत.

उद्या भारत पाक सामना जो जिंकेल त्याला थेट शिडी मिळून नव्वदीच्या घरात पोहोचल्यासारखे वाटेल. जिथे एखादाच साप गिळायला टपला असेल.

अफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया मॅच अपेक्षेपेक्षा जास्त चुरशीची झाली. >> एकदमच. अजून ५-१० रन्स असते तर सांगता आले नसते. ऑसी टोप ऑर्डर अजून रस्टी वाटतेय.

विंडीज बॅटींग कागदावर नुसती वाचली तरी धडकी भरावी अशी आहे. प्रत्यक्षात अतिशय अनप्रोफेशनल वाटते. रसेल ने आल्या आल्या जो शॉट खेळायचा प्रयत्न केला तो बघितल्यावर ....

हुसैनने स्वत:च्या बोलींगवर घेतलेला आफलातून झेल ही एकमेव गोष्ट विंडीजच्या खेळात काल बघण्यासारखी होती. जेसन होल्डिंग विंडीजच्या संघात नसावा, हें खटकलं.. मला विंडीजचा तो एक खेळाडू खूप प्रतिभावान , mature व त्या संघातल्या लहरीपणाला आळा घालणारा वाटतो.

जेसन होल्डर हा सध्याचा सर्वात अंडर रेटेड ऑल राउंडर आहे, खरंतर त्याच्या तोडीचा इतर कोणताही खेळाडू विंडीज टीम मध्ये नाही आहे.

आज महिलामंडळात संध्याकाळीं 7 ते रात्री 11 पर्यंत आमची स्पेशल ' तणावमुक्ती ' पार्टी आहे ! नवरा किंवा क्रिकेटचा विषय काढेल, तिला रू. 500/_ दंड आहे !!!20190201_190648 (2).jpg

बांग्ला लंका सामन्यात राडा ..
हे नागीण लोकं प्रत्येकाशी लफडा करतात वाटते..
हरले तर बरे वाटेल.. पण स्लो पिचवर सुरुवात छान मिळालीय त्यांना..

हाय व्होल्टेज मॅच थोड्याच वेळात सुरू होणार आहे Happy . ही मॅच काल पाहिजे होती. पहिल्या दिवशी मॅच बघायला आणि दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर मिम्स, त्यांनी फोडलेले टीव्हीचे व्हिडीओ, त्यांच्या न्यूज अँकरची चर्चा बघायला असे दोन दिवस सुट्टी टाकायला लागते Rofl .

*त्यांनी फोडलेले टीव्हीचे व्हिडीओ...* -
'पाकिस्तानची तयारी ' म्हणून एक फोटो व्हायरल होतोय. रस्त्यावर उंच ठिकाणी मोठ्ठा टीव्ही उभारलाय व त्याच्या भोंवती लोखंडी जाळी लावली आहे. भारत वि. पाकिस्तान विटीदांडूची मॅच ठेवली तरी ती हाय व्होल्टेज मॅचच होणार !

निदान सगळ्याच मॅचेस 100च्या आसपासच होणार नाहीत अशी आशा मनात निर्माण झाली. बांगलादेश- 171 !
>>>>
चांगला पिच आहे आज. लंकेचे फलंदाज आतापर्यंत तरी मस्त टाईम करत आहेत.
७ ओवर ६७-१

श्रीलंकेने मोठ्या धांवसंख्येचा सुरेख पाठलाग करत सामना जिंकला ! अभिनंदन.
आपल्या मॅचचं रणशिंग फुंकलं गेलय. पाकने टाॅस जिंकून आपल्याला प्रथम फलंदाजी दिलीय. ( दंव असणयाची शक्यता ). धोनी मेंटाॅर म्हणून प्रत्यक्ष संघाच्या सरावातही सहभागी होतोय, हें विशेष. हार्दिक पांडया फलंदाज म्हणून संघात आहे.
चला, रणक्षेत्रावर काय होतंय बघायला!

>>पांड्या कंफर्म बॉलिंग करणार नसेल तर निव्वळ बॅट्समन म्हणून मी सुर्या किंवा श्रेयसला जास्त पसंती देईन..... पंत, जडेजा, शार्दूल मिळून वेळेला स्लॉगिंग करु शकतील!!

आजच्या मॅचनंतर हे मत अजुनच पक्के झाले..... पांड्या बिलकुलच टचमध्ये वाटला नाही!

ह्या पिच वर 165-170 हा चांगला score ठरला असता, आता कठीण आहे , पिच फार स्लो नाही, आपण 3 विकेट्स फार लवकर गमावल्या तेच फार महागात पडले

नॉट ए बॅड स्कोर आफ्टर बॅड स्टार्ट. पण आज त्यांचा मौका दिसतोय एकूण.
तसंही ते टेन्शन, तेवढी मजा येत नाहीये बघायला.

या पराभवाला bcci जबाबदार आहे. रोहितचे कॅप्टनशीप स्किल्स ओळखून दोन तीन वर्षे आधीच त्याला कॅप्टन बनवलं असतं तर आज जिंकलो असतो. विनाकारण कोहलीचे इगो सांभाळत बसले.

बोकलत किती विराट द्वेष अणि ते रोहित प्रेम... हगलाय आज तो ... त्याला प्लेयिंग 11 मधेच घेतला नाही पाहिजे...रोहित चा वेळ गेलाय

अरेरे काय ही विराट फॅन्सची भाषा. अगदी त्याच्यासारखीच. राहिला प्रश्न रोहितचा तर रोहित लवकर आऊट झाला तर भारतीय टीम हारल्यात जमा असते. आठवा वर्ल्ड कप सेमी फायनल. त्याला घेतला नाही तर जास्तीत जास्त स्कॉटलंड अफगाणिस्तान बरोबर जिंकाल. कोहलीच्या फॅन्सनी आज सोशल मीडियावर येऊच नये. काय दिवे लागले त्याच्या कॅप्टनशीप मध्ये हे जगजाहीर आहे. अर्थात भक्तांना काही फरक नाही म्हणा.

Pages