क्रिकेट विश्वचषक ट्वेंटी २० - वर्ष २०२१

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 October, 2021 - 14:57

आयपीएल संपली आणि वर्ल्डकप आला वर्ल्डकप.. चला माहौल बनवूया
दुनिया हिलाs देंगे हम, व्हिसलपोडू आणि कोरबो लोरबो जितबो रे.. सारे एक होऊया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विंडीज आफ्रिका
आज एक संघ बाहेरच्या रस्त्यावर फेकला जाईल, एकासाठी दरवाजे उघडतील
मला वाटते आफ्रिका जिंकेल .. पैसे लावायचे झाल्यास आफ्रिकेवर !

आजचा सामना हरले आणि पुढे जाऊन विंडीज बाहेर पडले तर सिमन्सची आजची खेळी विंडीज क्रिकेटप्रेमी कधी विसरणार नाहीत

वर्ल्ड कप सामने बघून बरं वाटतंय. आयपीएल सारखी अतिशयोक्ती नाही इथे. खरं क्रिकेट बघितल्याचं फील येतंय. आयपीएल मध्ये खरोखरच फिक्सिंग असल्याप्रमाणे विनाकारण ओढून ताणून शेवटच्या बॉलपर्यंत आणतात सामना.

बोकलत +१
स्क्रिप्टेड चुरशीचे सामने बघण्यापेक्षा खरेखुरे दर्जेदार क्रिकेट बघणे केव्हाही चांगले.

पुन्हा एकदा गोलंदाज MoM
>>>>>

चांगले आहे. नाहीतर बिचारे धोपटलेच जातात.

त्या दिवशी सामनावीर बघताना पाकिस्तानच्या सईद अजमल बद्दल रोचक माहीती समजली.

The Pakistani off-spinner took 184 wickets in 113 ODIs but that was not enough for him to win even a single man of the match award. Happy

पाकिस्तान हारली तर आपण बाहेर गेल्यात जमा.
>>>
ते कस.. फक्त न्यूझीलंडशी जिंकूनही रनरेट वगैरेच्या भानगडी सांभाळाव्या लागल्या असत्या.. आता न्यूझीलंडशी जिंकणे आणि अफगाणसोबत गाफील न राहणे पुरेसे ठरेल.. पण कुठल्याही स्थितीत न्यूझीलंडशी हरायला नको. अन्यथा मग अफगाणने न्यूझीलंडला हरवायची वाट बघावी लागेल.. जी मॅच त्याच्याही पुढच्या संडेला असेल..

असामी, फरक जाणवतोय का आयपीएल आणि ईंटरनॅशनल सामन्यांमध्ये?
रोज ते अमुकतमुक कसे घडले, असे घडूच कसे शकते, मग अमुकतमुक कारणामुळे अमुकतमुक घडले असावे दर सामन्याला काहीतरी अदभुत घडणार, एक नवा चमत्कार आणि तो कसा घडला याची चर्चा.. क्रिकेटचा खेळखण्डोबा केलेला आयपीएलने. आता खरेखुरे क्रिकेट बघतोय असे वाटतेय. माहौल तयार होतोय. न्यूझीलंडशी जिंका यार कसेही. अन्यथा बाकीच्यांचे सामने बघायचाही मूड ऑफ होईल..

असामी, फरक जाणवतोय का आयपीएल आणि ईंटरनॅशनल सामन्यांमध्ये? >> 'सगळे फिक्सिंग असते, स्पॉट फिक्सिंग असते, काहीच फिक्सींग नसते, फिक्स असले तरी त्यातली कॅप्टन्सी ग्रेट आहे, गरीब बिचारा अंबानी चार दमड्या मिळाव्या म्हणून प्रिती झिंटा,शिल्पा शेट्टी नि शाहरुख खान ह्यांच्याकडून पैसे घेऊन मॅच फिक्स करतो', अशा कोलांट्या उड्या दर दिवसागणीक (नि कधी पोस्टआड सुद्धा) बिनधास्त मारू शकणार्‍याला तूला नि तुझ्या डु आयडी फौजेला 'निव्वळ अशक्य आहात' ह्यापलीकडे काय बोलणार रे आम्ही पामर !

आईपीएल फिक्स असते?? तरीच धोनी अणि शर्मा जिंकतात...
के एल राहुल अणि विराट सारखे कप्तान असूनही त्यांची टीम का हारते हे आता कळले...

डुआयडी फौज.. असामी मुद्दे खोडा. मी कुठलाही ईतर आयडी वापरत नाही. ज्यांना माझे मुद्दे खोडता येत नाही ते याचा आधार घेता. तुम्ही तरी तसे करू नका _/\_
किंबहुना हा काही वाद नाहीये. पण प्रामाणिकपणे सांगा. दोन्हीकडे जसा खेळ घडतोय त्यात फरक वाटत नाही का.. आयपीएल सामन्यांमध्ये जे नाट्य घडायचे त्यातला फोलपणा अजूनही लक्षात येत नाहीये का Happy

पाकिस्तानने मिडल ऑर्डरला जावईबापू आणि मो हाफिज हे चाळीशीतले प्लेअर आणले आहेत. त्यांच्याकडे मिडल ऑर्डरला बेंच स्ट्रेंथ नाहीये का? की ऑलराऊंडर ऊपयुक्तता अजूनही यांना सरस बनवतेय?

आज रेकॉर्डला दाखवत होते की गेले काही काळ पाकिस्तानचे ४-७ फलंदाजांचा एवरेज ईतर संघांच्या तुलनेत सर्वात कमी आहे.

किंबहुना हा काही वाद नाहीये. पण प्रामाणिकपणे सांगा. दोन्हीकडे जसा खेळ घडतोय त्यात फरक वाटत नाही का.. > मी तुला आयपील बाफावरच उत्तर दिले होते तसे आयपीळ इतर टी २० टूर्नामेंट पेक्षा अधिक नाट्यमय वाटली नाही. (फॉर दॅट मॅटर इथल्या लोकल टूरनामेंट मधेही असे टोकाचे चढ उतार बघितलेत आहेत जे बघून बुचकळ्यात पडायला होते ) कमी ओव्हर्स चा फॉर्मॅट असल्यामूळे चूका सुधारण्याचा वाव फार कमी असतो त्यामूळे चांगले नावाजलेले खेळाडू सुद्धा घोडचूका करताना दिसतात. तिथे दुसर्‍या, तिसर्‍या टीयर मधल्या व/किंवा अननुभवी खेळाडूंकडून बेसिक चूका होणे फारसे चकित करणारे नाही. सतत टेंशन यशस्वीपणे हाताळणे प्रत्येकाला जमतेच असे नाही . त्यामूळे ह्या चूका अधिक ढोबळ वाटतात. तू थोडा विचार केलास तर हे ही जाणवेल की ह्या प्रायवेट स्पर्धा बर्‍याच खेळाडूंच्या रोजगारीचा मुख्या हिस्सा आहेत. ह्या मुद्द्याचे पण टेंशन असू असते. अगदी टी ट्वेंटी कप मधे आयपील पेक्षा नाट्ञमय गोष्टी घडलेल्या आहेत. तुला सांगायला नकोच. प्रत्येक वेळी आपल्या अंदाजापेक्षा वेगळी गोष्ट घडली कि फिक्सिग हे माझ्या समजूतीपलीकडे आहे. व्बर वर फिक्सींग आहे म्हणायचे नि तरीही महिनाभर रात्र-बेरात्र जागवत तीच स्पर्धा बघायची, तेच मुद्दे परत उगाळायचे, ते कमी पडतेय म्हणून, परत ह्याच फिक्स्ड स्पर्शांचे यश हा क्रायटेरिया खेळाडू नि कप्तान बनवाताना धरा म्हणून मुद्दे मांडायचे हे सगळेच माझ्या साठी भयंकर अम्युझिंग आहे रे बाबा.

चुका घडणे एक झाले....
त्या घडवून आणने किंबहुना कित्येक वेळी काही एफर्टच न करणे वा काही वेळा डावपेचच मुद्दाम चुकीचे वापरणे वा जे समोरच्या संघाच्या फायद्याचे आहे तेच करणे, ते ही अगदी हास्यास्पद वाटावे याप्रकारे, समोरच्या संघाला धावांची लयलूट करू देणे, वा धावाच न काढणे ना प्रयत्न करणे, तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे कर वगैरे वगैरे ..
अच्छा चला राहू द्या.. आपापली मते आपल्याकडे .. पुढच्या आयपीएलला खेळू हा खेळ.. वर्ल्डकपबाबत आपले एकमत आहे हे पुरेसे आहे.. शुभरात्री Happy

पाकीस्तान जिंकले. Sad
आता काय?
न्यू झिलँड व अफगाणिस्तान दोघांनाहि हरवावे लागेल नाहीतर भारत बाहेर!!!

चुका घडणे एक झाले....
त्या घडवून आणने किंबहुना कित्येक वेळी काही एफर्टच न करणे वा काही वेळा डावपेचच मुद्दाम चुकीचे वापरणे वा जे समोरच्या संघाच्या फायद्याचे आहे तेच करणे, ते ही अगदी हास्यास्पद वाटावे याप्रकारे, समोरच्या संघाला धावांची लयलूट करू देणे, वा धावाच न काढणे ना प्रयत्न करणे, तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे कर वगैरे वगैरे .. >> जोवर तुला वाटते हा तुझा पुरावा असेल तोवर माझे अम्युजमेंट कायमच राहील. वाचनाचे वावडे आहे नि कोपर्‍यावरच्या टपरीवरचे मित्र , सोशल मिडीया हे तुझे सोर्स हे तूच कबूल केले आहेस त्यामूळे तुझ्या आरोपांची क्रेडीबिलिटी शून्य. त्यामूळे तुझ्या पोस्ट्स सिरीयसली घेता येणे मला शक्य नाही.

>>असामी, फरक जाणवतोय का आयपीएल आणि ईंटरनॅशनल सामन्यांमध्ये
फरक फक्त तुझ्या प्रतिसादांचा सूर बदललाय इतकाच आहे..... बाकी क्रिकेट आहे तिथेच आहे आणि आहे तसेच आहे Wink

कोपर्‍यावरच्या टपरीवरचे मित्र , सोशल मिडीया हे तुझे सोर्स हे तूच कबूल केले आहेस
>>>>
अहो हे कुठे कबूल केले Proud किंबहुना त्यांना कुठे माझे सोर्स म्हणालो.. माझे आरोप वा माझे संशय माझ्या निरीक्षणातून आले आहेत.
बाकी वाचनाचे वावडे.. तर वाचन करून कसे कळते सामना सेट असतो की नाही.. ऊंदराला मांजराची साक्ष Happy

न्यू झिलँड व अफगाणिस्तान दोघांनाहि हरवावे लागेल नाहीतर भारत बाहेर!!!
>>>>
एकाला हरवणेही पुरेसे ठरू शकते. फक्त ज्याच्याशी आपण जिंकू त्याने दुसऱ्याला हरवायला हवे. आणि अफगाणसुद्धा पाकिस्तानशी हरायला हवे. म्हणजे अफगाण भारत न्यूझीलण्डचे पॉईंट सेम होतील. आणि रनरेट हिशोबात येईल.

बाकी वाचनाचे वावडे.. तर वाचन करून कसे कळते सामना सेट असतो की नाही. >> हे ही वाचलस तरच कळेल. स्वतःचे सोर्स आठवत नाहीत हे साहजिक आहे कारण रोज तुझा सूर बदलतो.

स्वरुप तू योग्य होतास असे म्हणण्याच्या भूमिकेवर येत चाललो आहे मी. Happy

जर न्यूझीलंडशी हरलो तर आपण वर्ल्डक जिंकणे डिझर्व्हच करत नव्हतो असे म्हणून वाईट वाटून घ्यायचे नाही.
मला तर पाकिस्तानसोबत आता अफगाणिस्तान सेमीला गेलेले बघायला आवडेल. जर भारत नाही गेली तर.

त्यातही ती ईंग्लंड समोरून पहिली आली आणि आपल्याला सेमीला भेटली तर नेहमीसारखे आपले आव्हान सेमीलाच संपुष्टात येऊ शकते.
आपल्याला ईंग्लंण्डपेक्षा ऑस्ट्रेलिया अफ्रिका वगैरे परवडेल सेमीला

किवीज साठी पण आपली मॅच हि की-मॅच आहे. बहुतेक वेळा अशा मॅचेस मधे किवीज नी आपल्याला हरवले आहेत गेल्या काही वर्षांचा इतिहास बघितला तर. असे नाही की ती टीम आपल्यापेक्षा फारशी वरचढ आहे. फक्त ते की-मोमेंटस मधे ते बाजी मारून जातात. त्यामूळे मी तरी फारसा आशादायी नाहीये. जिंकलो तर मलाही अर्थातच आवडेल.

T20 मध्ये पाकिस्तान बाबतीतही आपला रेकोर्ड चांगलाच होता आणि अजूनही आहे, त्यामुळे किवीबरोबर काहीही होऊ शकते. पण समजा हरलो तर मात्र आपण सेमी फायनल साठी डिझर्व्हच नाही हेच accept करणे योग्य होईल. दव पडणार असेल तर टॉस जिंकणे महत्वाचे आहे आणि कोहली चा टॉस च्या बाबतीतला रेकॉर्ड अतिशय खराब आहे.

Pages