क्रिकेट विश्वचषक ट्वेंटी २० - वर्ष २०२१

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 October, 2021 - 14:57

आयपीएल संपली आणि वर्ल्डकप आला वर्ल्डकप.. चला माहौल बनवूया
दुनिया हिलाs देंगे हम, व्हिसलपोडू आणि कोरबो लोरबो जितबो रे.. सारे एक होऊया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ता तरी स्पर्धेतील कमीत कमी 6 टिम्स स्पर्धा जिंकणं
' डिझर्व्ह' करतात . मग स्पर्धेच्या सुरवातीलाच आपण कां ठरवायचं कोण खरंच डिझर्व्ह करतो/ करेल तें . तें ठरवायलाच तर बाकीचे सामने आहेत ना. देखो आगे आगे होता है क्या ! Wink
.

शुभ बोल रे नार्‍या!>>> सत्य परिस्थिती काय आहे हे मनाला समजावून सांगितले की त्या घटनेचा मनावर आघात कमी होतो.

आत्ता तरी स्पर्धेतील कमीत कमी 6 टिम्स स्पर्धा जिंकणं
' डिझर्व्ह' करतात .
>>>>>>
आत्ता तर मी सुद्धा भारत डिजर्व्ह करते म्हणत आहे. न्यूझीलंडशी सुद्धा जर या कंडीशनमध्ये हरले, तर मात्र त्यानंतर डिजर्व्ह करत नव्हते असे समजा Happy

बहुतेक वेळा अशा मॅचेस मधे किवीज नी आपल्याला हरवले आहेत गेल्या काही वर्षांचा इतिहास बघितला तर.
>>>>
पाकिस्तानचा वर्ल्डकप ईतिहास तर यापेक्षा बेकार होता.
या कंडीशनमध्ये तरी आपण फेव्हरेट असायला हवे. सुरुवातीच्या तीनचार ओवर सांभाळल्यास Wink

तरी चला एक आशादायी स्टॅट्स सांगतो,
आपण गेल्या वर्षाच्या सुरुवातीलाच २०-२० मध्ये कोहलीच्याच कप्तानीत न्यूझीलंडला त्यांच्याच देशात ५-० ने व्हाईटवॉश दिला आहे. जिथे राहुल मालिकावीर होता Happy

बाकी किवीजनी आपल्याला गेल्या वन डे विश्वचषकात आणि कसोटी फायनलला हरवले आहे ते योग्य डावपेच वापरल्याने.
त्यामुळे बोकलत म्हणतात तसे कोहलीच्या कप्तानीला विल्यमसनची कप्तानी भारी पडणे हेच आपल्याला हरवू शकते.

तरी चला एक आशादायी स्टॅट्स सांगतो, >> बहुतेक वेळा अशा मॅचेस मधे ह्या शब्दांमधून (नि माझ्या पोस्ट मधल्या आधीच्या वाक्यांमधून) तुला काय अर्थबोध होतो नक्की ? पाकिस्तान ही अतिशय unpredictable टीम आहे त्याची कंसिस्टंट किवीज शी तुलना कोणीही शहाणा माणूस करणार नाही. परत एकदा तुझ्या नसलेल्या वाचनावर येत - किवीज चा कोच नि त्याच्या गेल्या सहा महिन्यांमधल्या मुलाखती वाचून बघ.

या कंडीशनमध्ये तरी आपण फेव्हरेट असायला हवे. सुरुवातीच्या तीनचार ओवर सांभाळल्यास >> ह्या लॉजिक ने (ह्याला लॉजिक म्हनायला माझी जीभ धजावत नाही पण तुझ्या डोक्यात हे लॉजिक आहे असे भरलेले असल्यामूळे ) - तू म्हणालास "पाकिस्तानचा वर्ल्डकप ईतिहास तर यापेक्षा बेकार होता." पण आपण तरीहि हरलो. किवीज बद्दल आपण हरत आलोय तेंव्हा जिंकू. ह्याच लॉजिक ने कोहली जो कधीच वर्ल्ड कप जिंकला नाहीये तो ह्यावेळी जिंकेल . गो फिगर ! Wink

छे छे.. पुन्हा समजण्यात गल्लत.
आधी जे घडत आलेय त्याच्या उलट जसे पाकिस्तानबाबत झाले तसेच यावेळीही होईल असे मला बिलकुल म्हणायचे नाहीये.
तुम्ही मी आणि बोकलत शेवटी एकच म्हणत आहोत.
अश्या मॅचेसमध्ये गेले काही वेळा जे आपण हरलोय ते आपला संघ न्यूझीलंडच्या तुल्यबळ वा किंचित सरस असूनही हरलोय ते कप्तान कोहलीला कप्तान विल्यमसनने डावपेचात मात दिल्याने हे देखील मी कबूल केलेच आहे. आणि आताही मला ती भिती आहेच जी तुम्हाला आणि बोकलत दोघांना आहे. खरे तर ईथे आपले एकमत आहे.
मी तर फक्त तुम्ही तरीही आशा सोडू नये म्हणून एक सकारात्मक स्टॅट शेअर केले. कोहलीची कप्तानी आपल्याला हरवणार असे म्हणून आधीच हातपाय गाळून कसे चालेल Happy

कोहलीची कप्तानी आपल्याला हरवणार असे म्हणून आधीच हातपाय गाळून कसे चालेल > > जे तुला नि तुझ्या फौजेला वाटतेय ते मला तसे वाटत नाहीये. माझ्या वाटण्याचे कारण वेगळे आहे (हे मी आधी नमूद केलेले आहे ). कोहली कप्तान असल्यामूळे आपण हरणार असे बाळबोध विधान फक्त तेच लोक करू शकतात ज्यांना १. क्रिकेट मधे स्वारस्य नाही फक्त काड्या करायच्या आहेत २. क्रिकेट मधले काही कळत नाही पण मायबोलीवर फुकट लिहायला मिळते म्हणून जे सुचेल ते लिहीत सूटतात.

निव्वळ विल्ञिअम्सन हा कोहली पेक्षा चांगला कप्तान आहे ह्या निकषावर हैद्राबाद सन राईजर्स बंगलोरच्या च्या जागी प्लेऑफ मधे असते असते. गो फिगर ! Happy

या वर्ल्डकपमध्ये टॉस जिकला म्हणजे सामना जिंकला असं समीकरण आहे. कोहलीचा खराब रेकॉर्ड पाहता सगळे टॉस तो हारु शकतो. आता तुम्ही म्हणाल यात कसलं लक आलंय ही अंधश्रद्धा आहे. तर तुम्हला सांगू इच्छितो की प्रत्येक मटेरिअलची एक प्रॉपर्टी असते आणि ती प्रॉपर्टी समोरच्या मटेरिअल बरोबर तशीच रिऍक्ट होते जशी व्हायला पाहिजे. चुंबकीय साऊथ नॉर्थ पोल एकमेकांना आकर्षित करतात तर सेम पोल एकमेकांपासून दूर जातात. इथे कोहली आणि टॉस हे दोन वेगळे मटेरियल मानले तर कोहलीच्या प्रॉपर्टीमध्ये असं काहीतरी आहे की जे नेहमी त्याला टॉस हारवतं.

ह्याला लॉजिक म्हनायला माझी जीभ धजावत नाही पण तुझ्या डोक्यात हे लॉजिक आहे असे भरलेले असल्यामूळे
>>
Rofl

आसामी,
तुझ्या जिद्दीला अन पेशन्सला थम्स अप...

निव्वळ विल्ञिअम्सन हा कोहली पेक्षा चांगला कप्तान आहे ह्या निकषावर हैद्राबाद सन राईजर्स बंगलोरच्या च्या जागी प्लेऑफ मधे असते
>>>>

अरे देवा.. आयपीएल उदाहरणे नको. त्यांची विश्वासार्हता आधीच गंडली आहे.
आणि कप्तान चांगला म्हणजे जिंकायची शक्यता जास्त. शंभर टक्के खात्री नाही.
असे असते तर सर्व आयपीएल ट्रॉफी धोनीनेच जिंकल्या असत्या.

अरे देवा.. आयपीएल उदाहरणे नको. त्यांची विश्वासार्हता आधीच गंडली आहे. > असे कसे बाळा ? संपूर्ण नाही , थोडस फिक्स्ड असते . ओव्नर ना हवे तसे मिकाल हवे अशी अ‍ॅरँजमेंट असते वगैरे तूच लिहित होतास तुझ्या निरीक्षणांवरून ? बरं , हा तुझा मुद्दा असेल तर " रोहित सरस कॅप्टन आहे कारण त्याने पाच टायटल जिंकले आहेत " हे विधान आपोआपच बाद होते हा विरोधाभास लक्षात येत नाही कि तो पण ईग्नोर करायचा म्हणतोस ?

शंभर टक्के खात्री नाही. >> शक्यता, खात्री अशा गोष्टी सगळ्यांनाच लागू होतात. उदाहरणार्थ - नाणेफेक जिंकणे, वापरलेला डावपेच यशस्वी ठरणे, सामना जिंकणे, स्पर्धा जिंकणे. असे सिलेक्टिव्हली लेबले कशी लावून चालतील ?

शक्यता, खात्री अशा गोष्टी सगळ्यांनाच लागू होतात.
>>>

एक्झॅक्टली!
जरी दव पडत असले तरी टॉस हरलो म्हणजे मॅच हरलो असेच नसते, त्यातही खेळ ऊंचावून आपण जिंकू शकतो.
तसेच कर्णधार कमी पडतोय याचा अर्थ मॅच हरलोच असे गरजेचे नाही, खेळ उंचावून जिंकू शकतोच.

एक्झॅक्टली! ... तसेच कर्णधार कमी पडतोय याचा अर्थ मॅच हरलोच असे गरजेचे नाही, खेळ उंचावून जिंकू शकतोच. >> एक्झॅक्टली म्हणजे कर्णधार कमी पडत नसला तरी मॅच हरू शकतो इथेही शक्यता लागू होते.

विराट कोहली हा धागा वाचतो त्यामुळे आपण सगळ्यांनी त्याला उपयुक्त पडेल अशी चर्चा इथे केली पाहिजे. आपल्या चर्चेच्या जोरावर तो न्यूझीलँडला हरवू शकतो.

शर्मा कप्तान असता तर भारताची वर्ल्डकप जिंकायची शक्यता वाढली असती.
याचा अर्थ कोहली कर्णधार असताना जिंकणारच नाही असे नाही. चान्स कमी आहे. पण आहे.
शेवटी सांघिक खेळ आहे. कोहली स्वत:च कर्णधार म्हणून कमी पडला तरी फलंदाज म्हणून आपला खेळ ऊंचावून जिंकवून देऊ शकतो.

शेवटी सांघिक खेळ आहे. >> शेवटी गाडं फिरून इथे आले का ? Happy "शर्मा कप्तान असता तर भारताची वर्ल्डकप जिंकायची शक्यता वाढली असती." हे परत फिक्स्ड आयपील च्या आकड्यांवर बेस्ड असले तरीओ फिक्स्ड ह्या मुद्द्याकडे लक्ष द्यायचे नाही. आणि त्याच वेळी कोहली चे फिक्स्ड नसलेल्या आंतरराष्टीय सामन्यांचे रेकॉर्ड मात्र बघायचे नाहीत फक्त तेंव्हा उत्तम संघ होता म्हणून जिंकतो, असे म्हणायचे. बरोबर ?

ता. क. : माझा रोहित चा लिमिटेड ओव्हर्स मधला कर्णधार म्हणून विरोध नाही.

"आयपीएल उदाहरणे नको. त्यांची विश्वासार्हता आधीच गंडली आहे. ....... असे असते तर सर्व आयपीएल ट्रॉफी धोनीनेच जिंकल्या असत्या."
दोन वाक्यांची टोटल लावायचीच नाही असा ठाम निश्चय दिसतो तुझा Proud

"तुझ्या जिद्दीला अन पेशन्सला थम्स अप..." - हे मात्र अगदी खरंय. असामी तू टेस्ट ओपनरच्या चिकाटी ने उभा आहेस बाबा! Happy

परत हे आयपील च्या आकड्यांवर बेस्ड
>>>>

शर्माने लिमिटेड फॉर्मेटमध्ये जी लिमिटेड कप्तानी केली आहे ते पुरेसे आहे हो दोघांत चांगला कप्तान कोण हे ठरवायला

दोन वाक्यांची टोटल लावायचीच नाही ...
>>>>

दोन वाक्यांची टोटल तुम्हालाही लागत आहे
आयपीएलमध्ये काही सामने वा सामन्यंचा भाग गरजेनुसर स्क्रिप्टेड असतो हे तुम्हालाही कळून चुकले आहे
फक्त आता ते कबूल करणे अबघड आहे हे मी समजू शकतो. माझा हट्टही नाही तुम्ही तसे करावे Happy पण त्यामुळे आता आयपीएलमधील एकूण एक बॉल स्क्रिप्टेड असतो हे माझ्या तोंडी घालणे चालू आहे Happy

शर्माने लिमिटेड फॉर्मेटमध्ये जी लिमिटेड कप्तानी केली आहे ते पुरेसे आहे हो दोघांत चांगला कप्तान कोण हे ठरवायला >> टू वर्ड्स. सँपल साईझ. !

टू वर्ड्स. सँपल साईझ. ! >> वन म्हण, शितावरून भाताची परीक्षा Happy

बाकी जेव्हा धोनीला पहिल्यांदा कप्तानी दिली गेली तेव्हा त्याला किती कप्तानीचा अनुभव होता. त्याच्यातील नेतृत्वगुण कोणी कश्याच्या आधारे हेरले होते असे तुम्हाला वाटते Happy

तुम्ही जे दरवेळी वाचन वाचन करता ते पुस्तकी ज्ञान माझे नाहीये. मान्य. कबूल. हा गुन्हा असेल तर शिक्षाही द्या. पण माझे ज्ञान क्रिकेट बघण्यातून आणि माझ्या निरीक्षणातून तयार झाले आहे. जो स्ट्रीट स्मार्टनेस धोनीच्या कप्तानीत आहे तो तुम्हाला कुठल्याच क्रिकेटच्या पुस्तकात मिळणार नाही हे देखील तितकेच खरेय. म्हणून तो स्पेशल आहे. म्हणून तसा दुसरा कप्तान, दुसरा धोनी होणे शक्य नाही.

आज ईतके डेटा अ‍ॅनालिसिस होते की कुठचा फलंदाज कुठच्या प्रकारच्या गोलंदाजांना चांगला खेळतो तर कुठल्या लेंथवर चकतो वा बांधला जातो वगैरे स्टॅट्स एक बटण दाबताच मिळतात. पण प्रेशर सिच्युएशनमध्ये हे सगळे स्टॅट्स फोल ठरतात. कारण त्या नर्वस मोमेंट्स तुमचा नेहमीचा खेळच बदलतात. तुम्ही फलंदाज असाल तर तुमचे हात पाय वेगळे हलू लागतात. रिफ्लेक्सेस साथ सोडतात. गोलंदाज असाल तर तुमचे हात तुम्हाला ठरवलेली लाईन लेंथ फॉलो करायला साथ देत नाहीत. धोनी हे सारे रीड करतो म्हणून तो ईतरांच्या चार पावले नेहमी पुढे राहतो. आणि ही त्याची खासियत आहे हे त्यालाही माहीत असल्याने तो सामना डीप नेतो. थोडक्यात आपल्या झोनमध्ये आणतो.

तर सांगायचा मुद्दा हा की सँपल साईज छोटा असो वा मोठा, कोणी आपल्या कप्तानीत किती सामने जिंकले वा किती हरले हे आकडे कधीही कप्तानीचे योग्य मूल्यमापन करू शकत नाहीत. त्यामुळे शर्माच्या पंधरावीस सामन्यातील कप्तानीचा ८० टक्के विनिंग रेशिओ कोहलीच्या ६०-६५ विनिंग रेशिओपेक्षा भारी आहे वगैरे आकडे मी कधीच दाखवणार नाही. मला त्यात स्वारस्यच नाही. त्यातही जिंकताना तर सर्वच कप्तान छानच वाटतात. पण हरताना, समोरचे भारी पडताना, सामना हातातून निसटतोय असे वाटताना तुम्ही काय करता हे मॅटर करते. तिथे शर्मा मला कोहलीपेक्षा भारी वाटतो. आणि हे ठरवायला मला सँपलसाईज जितका आहे तितका पुरेसा वाटतो.

"फक्त आता ते कबूल करणे अबघड आहे हे मी समजू शकतो" - Lol मुद्दा समजला आणि पटला तर कबूल करण्याइतपत मनाचा मोकळेपणा मी ह्या आधीही दाखवलाय. मागे कधीतरी तुझ्याच कुठल्यातरी पोस्टवर मी सहमती दाखवली होती. त्यामुळे हा आरोप बिनबुडाचा आहे. चर्चा ही चर्चेसाठी व्हावी, त्यातून नविन गोष्टी कळाव्या, स्वतःचे काही गैरसमज असतील तर ते दूर व्हावे हा चर्चेचा उद्देश असावा, फक्त स्वतःचा मुद्दा पुढे रेटत रहाणं हा नाही.

"त्यामुळे आता आयपीएलमधील एकूण एक बॉल स्क्रिप्टेड असतो हे माझ्या तोंडी घालणे चालू आहे" - परत एक निराधार आरोप! 'सगळं स्क्रिप्टेड नसतं' वगैरे वगैरे ही तूच काढलेली पळवाट आहे. हे इतर कुणीही म्हटलेलं नाहीये. इन फॅक्ट असामी आणि मी तुला पहिल्यापासून सांगतोय की तू इतर लीग्ज (क्रिकेट आणि अन्य खेळांच्या) बघ म्हणजे तुला ह्या अनपेक्षित कलाटण्यांविषयी वाटणारा संशय रहाणार नाही. पण तू दर वेळी तुझी गाडी स्वतःचे निश्कर्ष, स्वतःच्या थियरीज कडे वळवून आधीच उत्तर ठरवून गणित सोडवल्यासारखं करतोयस.

'सगळं स्क्रिप्टेड नसतं' वगैरे वगैरे ही तूच काढलेली पळवाट आहे.
>>>>
पळवाट कसली. अहो मी काही स्क्रिप्टेड सामने वा क्लायमॅक्स दाखवताच आयपीएलमधील अमुकतमुक सुद्धा स्क्रिप्टेडच म्हणून तुमचेच सुरू झाले म्हणून क्लीअर केले की सारेच स्क्रिप्टेड नसते. ते शक्य नाही. वा गरजही नाही.
पण आताही आयपीएलचा उल्लेख झाल्यास तुझ्यामते ते तर सारेच स्क्रिप्टेड असते ना हाच मुद्दा तुम्ही रेटत आहात Happy

तुला पहिल्यापासून सांगतोय की तू इतर लीग्ज (क्रिकेट आणि अन्य खेळांच्या) बघ म्हणजे तुला ह्या अनपेक्षित कलाटण्यांविषयी वाटणारा संशय रहाणार नाही.
>>>>>
छे एक आयपीएल पुरेसे आहे जिथे मित्रांशी चर्चा करता येते. मनोरंजन होते. आपलेच प्लेअर असतात.
ईतर टीआरपी लीग क्रिकेट बघण्यात स्वारस्य नाही.
त्यापेक्षा वर्ल्डकप एंजॉय करूया. त्यानंतर ईटरनॅशनल क्रिकेट सुरू होईलच.

"अमुकतमुक सुद्धा स्क्रिप्टेडच म्हणून तुमचेच सुरू झाले " - आणखी एक धादांत निराधार वाक्य!

"ईतर टीआरपी लीग क्रिकेट बघण्यात स्वारस्य नाही." - ओके. तुला स्वतःचा परीघ वाढवायची इच्छाच नसेल आणि तुझे preconceived notions च जर तुला पुढे ढकलायचे असतील तर मग तुझ्याशी ह्या मुद्द्यावर चर्चा करण्यात ही स्वारस्य नाही.

अमुकतमुक सुद्धा स्क्रिप्टेडच म्हणून तुमचेच सुरू झाले " - आणखी एक धादांत निराधार वाक्य!
>>>
उद्या शोधून देतो. आता झोपतोय.

तुला स्वतःचा परीघ वाढवायची इच्छाच नसेल....
>>>>>
बिलकुल नाहीये. आयपीएल पुरेसे आहे. अजून तसलेच बिलकुल नको Happy

बाकी जेव्हा धोनीला पहिल्यांदा कप्तानी दिली गेली तेव्हा त्याला किती कप्तानीचा अनुभव होता. त्याच्यातील नेतृत्वगुण कोणी कश्याच्या आधारे हेरले होते असे तुम्हाला वाटते >>
१. सर्वात पहिला प्रश्न, रोहित, कोहली मधे धोनी कुठून आला ?
२. आता हे तुझे काही लॉजिक असेल असे धरून आणलाच आहेस तर - आणि जेंव्हा कोहलीला कप्तान बनवा असे सांगत धोनीने भर दौर्‍याच्या मधे अंग काढून घेतले तेंव्हा धोनी नि निवडसमिती ने त्याला किती कप्तानीचा अनुभव होता. त्याच्यातील नेतृत्वगुण कोणी कश्याच्या आधारे हेरले होते असे तुम्हाला वाटते ?
३. सगळेच जर फक्त तुला वाटते, मला वाटते, ह्याला वाटते, त्याला वाटते ह्यावरच अवलंबून असेल तर "धोनी ग्रेट फिनिशर आहे " ह्यात आकडे का वापरत होतास नक्की ? तेंव्हा सांघिक खेळ नव्हता का ?
४. " पण हरताना, समोरचे भारी पडताना, सामना हातातून निसटतोय असे वाटताना तुम्ही काय करता हे मॅटर करते" इथे सँपल साईज बघणे मह्त्वाचे असते. १० सामन्यांमधले ५ हरताना काय केले नि ५० मधले २५ हरताना काय केले ह्यांची तुलना करून अमका ग्रेट नि तमक फक्त टीम च्या जीवावर जिंकतो धासे बोलणे किती योग्य असेल असे वाटते तुला ?
५. तू रोहित च्या आयपील चे एव्हढे उदाहरण दिले आहे म्हणून - एकदा त्या टीम चे कोचेस कोण होते नि त्यांना बाहेरच्या लीग्स मधे काय स्थान मिळते ते बघून घे. त्यातून पण श्रेय फक्त रोहीतचेच होते कि त्यात कोच, चांगली टींम, डेटा स्टॅटीस्टियन्स, ह्यांचा वाटा होता हे पण कळेल.
६. "पण प्रेशर सिच्युएशनमध्ये हे सगळे स्टॅट्स फोल ठरतात. कारण त्या नर्वस मोमेंट्स तुमचा नेहमीचा खेळच बदलतात" >> हा साक्षात्कार तुला आत्ता झा ला का ? आम्ही इतके दिवस आयपील मधे तुझ्या मानासारखे होत नसेल तेंव्हा फिस्किंग पुढे अजून काही घटक असू शकतो ह्याबद्दल घसा फोडून बोंबलत होतो तेंव्हा काय झाले होते ?

रोहित इतकाही चांगला कर्णधार नाही की केवळ त्याच्या कर्णधारपदामुळे आपण सामने जिंकू आणि कोहली इतकाही वाईट कर्णधार नाही की केवळ त्याच्या कर्णधारपदामुळे आपण सामने हरू.

*...रोहित इतकाही चांगला कर्णधार नाही आणि कोहली इतकाही वाईट कर्णधार नाही कीं...* +1. अगदींच अपवादात्मक उदाहरण सोडल्यास, सांघिक खेळात कोणत्याच राष्ट्रीय संघाच्या कर्णधाराला इतका चांगला वा वाईट समजणं, म्हणणं टाळलेलंच बरं.

मी आधीच बोललो होतो कोहली कर्णधार आहे म्हणजे वर्ल्ड कप जिकायचं स्वप्न बघू नका. तुमची अवस्था rcb फॅन्ससारखी होईल. विनाकारण भलत्याच अपेक्षा ठेऊ नका. कोहली कॅप्टन म्हणजे जास्तीस्त जास्त संघ सेमीला जाऊन हारणार आणि त्यानंतर कोहली फॅन्सचे कोहली समर्थनार्थ मिम्स येणार. खूप तोटा झाला कोहलीच्या कॅप्टन्सीचा भारतीय क्रिकेटला. Rcb चं समजू शकतो मालक पळाला म्हणून कोहली 10 वर्षे कॅप्टन आहे. पण bcci ने वेळीच कोहलीची चतुराई ओळखून योग्य ती कारवाई करायला पाहिजे होती. चतुर कोल्हाला द्राक्ष आंबट गोष्ट होती लहानपणी पुस्तकात तशी चतुर कोहलीला कप आंबट अशी नव्या युगाची गोष्ट पाठ्यपुस्तकात ऍड करायला पाहिजे Lol

Pages